Congress | पुणेकरांना 40% सवलत पूर्ववत करण्यासाठी व व्याज कमी करण्यासाठी प्रभू रामचंद्रांना साकडे

Categories
Breaking News PMC Political social पुणे
Spread the love

पुणेकरांना  40% सवलत पूर्ववत करण्यासाठी व व्याज कमी करण्यासाठी प्रभू रामचंद्रांना साकडे

पुण्यात राहणाऱ्या नागरिकांना1970 सालापासून 40% घरपट्टी सूट मिळत होती. तथापि गेली पाच वर्ष ती बंद करण्यात आली आहे. ती पूर्ववत करण्यासाठी काँग्रेस च्या वतीने प्रभू श्री रामचंद्रांना साकडे घालण्यात आले.

पुणेकरांना मिळणारी 40% सवलत पुन्हा सुरू ठेवावी यासाठी अनेक वेळा आंदोलन झाली.काँग्रेस पक्षाने सहीची मोहीम राबवली. देवेंद्र फडवणीस यांना निवेदन दिले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील साहेबांना पत्र पाठविले. परंतु पाच वर्षे त्यांनी दुर्लक्ष केले होते. कसब्यात भाजपाचा पराभव झाल्यावर पालकमंत्र्यांनी मागील महिन्यात याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे बैठक घेऊन ती पूर्ववत चालू ठेवावी अशी मागणी केली.


परंतु कॅबिनेटमध्ये लगेच निर्णय घेतो असे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आश्वासन देऊन सुद्धा एक महिना लोटला पुणेकरांना याचा आर्थिक बोजा नागरिकांना सोसावा लागत आहे. यासाठी पुणेकर नागरिकांच्या वतीने काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी व आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली तुळशीबाग राम मंदिरत, राज्य सरकारला 40% पट्टीतील सवलत सुरू ठेवावी व सावकारी व्याज कमी करावे त्यासाठी आरती करून साकडे घालण्यात आले. यावेळी मोहन जोशी म्हणाले की पुणेकर नागरिकांच्या साठी आम्ही प्रत्येक वेळेस आंदोलन केलीत. मग ते रस्त्यावरील खड्ड्यांच्या असो व पाणीपुरवठा बाबत असो सरकारचे नेतृत्व करणारे नुकतेच आयोध्या वारी करून आलेत आमची म्हणजेच पुण्याचे तुळशीबागेतील राम मंदिर आहे.
आमदार यांनी यांनी भाजपाच्या राजकारणावर टीका केली ज्या मतदारांनी भाजपाला मतदान केले भरमसाठ टॅक्स लावून ते छळत आहेत.40% सवलती सोबत 500 .फीट घरांना टॅक्स माफ करण्यासाठी आम्ही पण रस्त्यावर उतरणार असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे संयोजन प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस संजय बालगुडे यांनी केले होते. यावेळी मंदिरात रामाची आरती करण्यात करिता आरतीला 40 ते 50 कार्यकर्ते हजर होते असे पत्रक संजय बानगुडे यांनी दिले आहे.