RSS | BJP | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुण्यामध्ये समन्वय बैठक | गृहमंत्री, सरसंघचालक, राष्ट्रीय अध्यक्ष राहणार उपस्थित

Categories
Breaking News Political पुणे
Spread the love

RSS | BJP | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुण्यामध्ये समन्वय बैठक | गृहमंत्री, सरसंघचालक, राष्ट्रीय अध्यक्ष राहणार उपस्थित

RSS | BJP | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या (General Election) दृष्टिकोनातून भाजप (BJP) आणि संघ परिवाराने (RSS) चांगलीच तयारी सुरु केली आहे. याचे नियोजन करण्यासाठी पुणे हे स्थान निवडण्यात आले आहे. विशेष म्हणजे नुकतीच चर्चा सुरु झाली होती कि नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पुण्यातून निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे rss ची समन्वय बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. यासाठी गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) , सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat), भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. (RSS | BJP)

| गृहमंत्री हिंदी भाषा दिवस साठी पुणे दौऱ्यावर

१४ व १५ सप्टेंबर २०२३ रोजी केंद्रीय गृह मंत्री, भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी भाषा दिवस २०२३ तसेच तिसरी अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे संयुक्तरित्या आयोजन श्री. शिवछत्रपती क्रिडा संकुल, बालेवाडी, पुणे (पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्द) येथे आयोजित करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुण्यामध्ये समन्वय बैठकमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील संस्थाची महत्वाची समन्वय बैठक १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. त्या बैठकीस केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, सरकार्यवाहक दत्तात्रय होसमाबाळे भाजपाचे, संघटन सचिव बी एल संतोष हे बैठकीस पुर्णवेळ उपस्थित रहाणार आहे. ही बैठक टिळक रस्त्यावरील एस पी कॉलेज मैदानावर बैठक आयोजित करण्यात आली आहे.

देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्या दृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक कसून तयारी करत आहेत. विरोधकांकडून इंडिया आघाडी करण्यात आली आहे. तर सत्याधारी त्यांना हाणून पाडण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. दरम्यान भाजप नुकतीच कसबा विधानसभेची पोटनिवडणूक हरलं होतं. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यानुसार आता भाजपने पुण्यावर चांगले लक्ष दिले आहे. नरेंद्र मोदी देखील पुण्यातून निवडणूक लढू शकतात. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात संघाची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात वेगवेगळ्या विषयावर मंथन केले जाऊ शकते.
News Title | RSS | BJP | Coordination meeting of Rashtriya Swayamsevak Sangh in Pune Home Minister, Sarsangchalak, National President will be present