PMC Property Tax Lottery | पुणेकर महापालिकेकडून जिंकणार कार, फोन आणि लॅपटॉप! | उद्या काढली जाणार लॉटरी

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC Property Tax Lottery | पुणेकर पुणे महापालिकेकडून जिंकणार ई कार, लॅपटॉप, बाईक | उद्या काढली जाणार लॉटरी

PMC Property Tax Lottery | पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) प्रॉपर्टी टॅक्स धारकांसाठी लॉटरी योजना (Property Tax Lottery Scheme m) सुरू केली आहे. मिळकत कराची थकबाकी वेळेवर भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी महापालिकेने अभिनव पाऊल उचलले आहे.  महापालिकेने 15 मे ते 31 जुलै 2023 दरम्यान मिळकतकर भरणाऱ्या निवासी, अनिवासी आणि खुल्या भूखंडावरील करदात्यांना लागू असलेली लॉटरी योजना आणली आहे. यामध्ये इ कार पासून ते बाईक, लॅपटॉप, फोन अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. याची लॉटरी उद्या काढली जाणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMC Property Tax Lottery)

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर पोलीस वसाहत येथील हुतात्मा शिरीष कुमार विद्यालय येथे होणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, कर संकलन विभागाचे प्रमुख उपायुक्त अजित देशमुख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. महापालिकेकडून पहिल्यांदाच अशा प्रकारे लॉटरी काढण्यात येणार आहे. ही सर्व लॉटरी ऑनलाइन असणार आहे.

 वेळेवर पेमेंट करण्यास प्रवृत्त करणे हा होता उद्देश 

 वेळेवर पेमेंट करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, PMC ने त्वरित मालमत्ता कर सेटलमेंटसाठी विद्यमान 5% ते 10% सवलतींसोबत लॉटरी योजना आणली आहे.  टॅक्स धारकांना मिळकतकर भरण्यास चालना देणे आणि महानगरपालिकेसाठी वेळेवर महसूल संकलन सुनिश्चित करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. (PMC Pune News)

अशी असणार आहेत बक्षिसे 

1. वार्षिक टॅक्स 25000 व त्यापेक्षा कमी

बक्षिसे – 2 पेट्रोल कार, 6 ई बाईक, 6 मोबाईल फोन आणि 4 लॅपटॉप.

2. वार्षिक टॅक्स 1 लाख वरील धारक

बक्षिसे – 1 पेट्रोल कार, 3 ई बाईक, 3 मोबाईल फोन आणि 2 लॅपटॉप

3. वार्षिक कर 50001 ते 1 लाख

बक्षिसे – 1 पेट्रोल कार, 3 ई बाईक, 3 मोबाईल फोन आणि 2 लॅपटॉप

4. 25001 ते 50000

1 पेट्रोल कार, 3 ई बाईक, 3 मोबाईल फोन आणि 2 लॅपटॉप

——-

News Title | PMC Property Tax Lottery | Punekar will win a car, phone and laptop from the Municipal Corporation! | The lottery will be drawn tomorrow