PMC Road Department | डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर ३ दिवसांत खोदाई

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Road Department | डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर ३ दिवसांत खोदाई

| पथ विभागाच्या कारभारावर विवेक वेलणकर यांचा आक्षेप

PMC Road Department – (The Karbhari News Service) – सदाशिव पेठेतील (Sadashiv Peth Pune)  टिळक स्मारक मंदिर (Tilak Smarak Mandir)  ते पेरुगेट या रस्त्यावर ११ मार्च रोजी डांबरीकरण करुन रस्ता गुळगुळीत करण्यात आला. त्यातील ९० मीटर रस्त्यावर १५ मार्चपासून खोदाई करण्यासाठी महावितरण कंपनीला परवानगी देण्यात आली. जे खोदकाम काल संध्याकाळी महावितरण कंपनीने केले. हा प्रकार सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी उघडकीस आणला आहे. याबाबत वेलणकर (Vivek Velankar) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. (Pune Municiapal Corporation (PMC)

वेलणकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार महावितरणचे काम अर्जंट नव्हते. तर त्यांच्या नियमित कामाचा भाग म्हणून हे काम करण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाची रीतसर परवानगी घेऊन त्यांनी काम सुरु केले. महापालिकेच्या पथ विभागाच्या रस्ते खोदाई परवानगी देणारे अधिकारी व डांबरीकरण करणारे अधिकारी यांच्यामध्ये कोणताही समन्वय नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. हा नागरीकांसाठी नित्याचा अनुभव झाला आहे. हा नागरीकांच्या करांच्या पैशांचा अपव्यय आहे. अशा प्रकारचा अनागोंदी कारभार टाळण्यासाठी एक रस्ता एक एकक योजना राबविण्याच्या डझनभर तरी गर्जना गेल्या १५ वर्षांत झाल्या आणि हवेत विरून ही गेल्या. त्यामुळे यापुढे तरी या गोष्टींना कायमचा पायबंद घालण्यासाठी सिस्टीम तयार करुन देण्यात यावी. अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.

Pune Power Supply | पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात वीज पुरवठा विस्कळीत | महानगरपालिकेच्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Power Supply | पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात वीज पुरवठा विस्कळीत  | महानगरपालिकेच्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

Pune Power Supply | Shivsena UBT | पुणे – सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील अनेक पेठांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून वीज पुरवठा (Power supply in Peth Area) वारंवार विस्कळीत होत आहे. त्यामुळे व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच ज्ञानप्रबोधिनी भागात कालपासून वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी शिवसेनेकडे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) (Shivsena UBT) तक्रारी केल्या. त्यामुळे शिवसेनाच्या वतीने महानगरपालिकेच्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली. (Pune Municipal Corporation)
शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले कि, नारायण पेठेतील महावितरण केंद्रावर चौकशी केली असता तेथून मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेच्या रस्ता दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारांकडून वेळोवेळी महावितरणच्या केबलचे नुकसान केले जाते. त्यामुळे पेठेतला वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे शिवसेनेकडून संबंधित घटनेची आणि ठेकेदारांची चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून नुकसान भरपाई घेण्याची मागणी शिवसेना पुणे शहर प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत यांनी केली. यासाठी पुणे महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार आणि महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. योग्य कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने महावितरणावर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला.
———————–

Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

Pune Water cut on Thursday | गुरूवार रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या. (MSEDCL) यांचे २२०/२२ KV पर्वती सबस्टेशन येथे तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणाने पर्वती MLR टाकी परिसर, पर्वती HLR टाकी परिसर व पर्वती LLR टाकी परिसर, लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र परीसर, नवीन व जुने होळकर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर, एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) परिसर, एस.एन.डी.टी. (एच.एल. आर.) परिसर व चतुश्रुंगी टाकी परिसर, व कोंढवे – धावडे जलकेंद्र, भामा आसखेड जलकेंद्र व परिसर बंद राहणार आहे. त्यामुळे उपरोक्त ठिकाणची पंपींग यंत्रणा बंद ठेवावी लागणार असल्याने उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या (PMC Water Supply Department) वतीने देण्यात आली. (Pune Water cut on Thursday)

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

पर्वती जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
पर्वती MLR टाकी परिसर :- गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इ.

पर्वती HLR टाकी परिसर :- सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग – १ व २ लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर,
शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२,४६ ( कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर, इत्यादी.

पर्वती LLR परिसर – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर

लष्कर जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग :- संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी. टी-कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हंडेवाडी रोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु, शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (पार्ट), संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स, इत्यादी लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारीत येणारे संपूर्ण
परिसर.
नवीन व जुने होळकर जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग:- मुळा रोड, खडकी कॅन्टॉनमेंट संपूर्ण परिसर, MES, “HE Factory, हरीगंगा सोसायटी इत्यादी.
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर :- पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी
कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीन गर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड, इत्यादी.
गांधी भवन टाकी परिसर :- कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी. एस. यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क – १, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज आर्चिड लेन ७ व ९. मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर :- बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर, इ.
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील शिवणे इंडस्ट्रीज परिसर वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर:
कर्वे नगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. १ ते १०
एस. एन. डी. डी. ( एम. एल. आर.) : गोखलेनगर, औध, बोपोडी, पुणे विद्यापिठ, लॉ कॉलेज रोड, महाबळेश्वर हॉटेल पर्यंत भागेर रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉल्स भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, चतुश्रृंगी टाकीवरून पाणीपुरवठा होणारा बाधीत भाग, पौड रोड शीला विहार
कॉलनी, अद्वैत सोसा. भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर झोनिंग पध्दतीने, सहवास, क्षिप्रा, मनोहन सोसा. विठ्ठल मंदिर परिसर झोननिंग करून, गोसावी वस्ती परिसर, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बीग बाझार परिसर, बंधन सोसायटी परिसर, डी. पी. रस्ता (पार्ट), मयुर कॉलनी परिसर, मयुर डी. पी. रस्त्याची डावी बाजु, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, दशभूजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एच. ए. कॉलनी टिळेकर प्लॉट, भरतनगर अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदीर, सुनिता, युको बँक कॉलनी, टैंकर पॉईट डि.पी. रस्ता मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकिलनगर इत्यादी, करिष्मा सोसा., ते वारजेवार्ड ऑफिस गिरीजा शंकर, नवसह्याद्री ताथवडे उद्यान परिसर निलकमल युनायटेड वेस्टर्न अनुरेखा स्थैर्य, मधूचय, शैलेश, अलंकार, मनिषा, स्वस्तिश्री, रघुकुल महिम्न, सुखा जयशक्ती, इत्यादी.

एस.एन.डी.टी. (एच.एल. आर.) :- गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी ,गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी.
जुने वारजे जलकेंद्र भागः- रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, सहयोगनगर पठार, गोकुळनगर पठार, विठठलनगर, ज्ञानेश सोसायटी, यशोदिप चौक, अमर भारत सोसायटी, गणपती माथा परिसर, एनडीए रोडचा काही भाग, पॉप्युलर कॉलनी इत्यादी.
कोंढवे – धावडे जलकेंद्र :- वारजे हाय-वे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंढवे धावडे, न्यु
कोपरे.
वडगाव जलकेंद्र परीसर:- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी. विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर,
भामा आसखेड जलकेंद्र परिसर :- लोहगाव,
विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, कळस, धानोरी, इत्यादी
—-

Pune Katraj-Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्ता | ५० पोलीस कर्मचाऱ्यांसह महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती

Categories
Breaking News PMC Political पुणे

Pune Katraj-Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्ता  | ५० पोलीस कर्मचाऱ्यांसह महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती

Pune Katraj-Kondhwa Road |  कात्रज-कोंढवा रस्त्याच्या (Katraj-Kondhwa Road)  कामाला गती देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्या निर्देशानुसार महावितरणकडून (MSEDCL) कार्यकारी अभियंता रविंद्र आव्हाड यांना स्वतंत्र अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे, त्याचबरोबर वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस विभागाने (Traffic Police) ५० वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे. (Pune Katraj-Kondhwa Road)
पालकमंत्री श्री.पाटील यांनी काही दिवसांपूर्वी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्याच्या कामात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या होत्या आणि अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.  यात प्रामुख्याने वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेसह; रस्त्याच्या आराखड्यातील महावितरणचे खांब, विद्युत तारा आणि डीपी आदींमुळे येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्या होत्या. (Pune Municipal Corporation)
वाहतूक नियंत्रणासाठी ५० पोलीस कर्मचारी, रस्त्याच्या आराखड्यात येणारे महावितरणचे खांब आणि विद्युत तारा तातडीने स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र अभियंता देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही केली आहे. (Pune News)
वाहतूक पोलीस आणि महावितरणच्या कार्यतत्परतेबद्दल पालकमंत्र्यांनी दोन्ही यंत्रणांचे अभिनंदन केले असून महावितरणचे खांब आणि विद्युत तारा हटवल्यानंतर एका मार्गिकेचे काम तातडीने हाती घ्यावे, अशा सूचनाही दिल्या आहेत.
——
News Title | Pune Katraj-Kondhwa Road | Katraj-Kondhwa road | Appointment of Executive Engineer of Mahavitaran along with 50 police personnel

Pune Water cut Update | गुरुवारची पाणीकपात रद्द | गुरुवारी पाणीपुरवठा सुरळीत राहणार

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water cut Update | गुरुवारची पाणीकपात रद्द | गुरुवारी पाणीपुरवठा सुरळीत राहणार

Pune Water cut update | महावितरण (MSEDCL) च्या कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याबाबतचे निवेदन पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र महावितरण शी चर्चा केल्यानंतर महापालिकेने ही पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून (PMC water Supply Department) देण्यात आली. (Pune Water Cut Update)
गुरुवार  रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या, यांचे २२०/२२ के. व्ही. पर्वती सब स्टेशन येथे तातडीचे देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पर्वती जलकेंद्र (जुने व नवीन ) व अखत्यारीतील पंपिंग, लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी MLR पंपिंग व वडगाव जलकेंद्र येथील बीज पुरवठा बंद राहणार असल्याने जलकेंद्र व पंपिंगच्या अखत्यारीतील पुणे शहरातील भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे निवेदन पुणे महानगरपालिके कडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या बाबत महाराष्ट्र
राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या. पर्वती सब स्टेशन यांचे अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या. यांचे काम रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सूचित केले आहे. या नुसार पुणे महानगरपालिके कडून प्रसिद्ध करण्यात येत आहे कि वरील नमूद जलकेंद्र व पंपिंग स्टेशन वरील भागाचा गुरुवार १०/०८/२०२३ रोजी नियमितपणे पाणीपुरवठा
सुरळीत चालू राहील. (PMC Pune)
—-
News Title | Pune Water cut Update | Thursday’s water cut cancelled Water supply will be normal on Thursday

Mahavitran | MSEDCL | महावितरणच्या उदासीन कामकाजाचा नागरिकांना ‘शॉक’

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Mahavitran | MSEDCL | महावितरणच्या उदासीन कामकाजाचा नागरिकांना ‘शॉक’

| महावितरण ची बिलं मिळाली नसल्याने नागरिक हैराण

Mahavitran | MSEDCL | महावितरण च्या उदासीन कामकाजाचा शॉक नागरिकांना लागत आहे. मे महिन्याची नागरिकांना अजून बिले (Light Bill) मिळाली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी बिले भरली नाहीत. तर दुसरीकडे बिल भरले नाही म्हणून महावितरण च्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम केले आहे. या कारभारामुळे नागरिक हैराण आहेत. (Mahavitran News)

| महावितरण च्या एजेन्सी बदलाचा नागरिकांना फटका

महावितरण कडून नागरिकांना दर महिन्याला प्रिंटेड बिले पाठवली जातात. त्यानुसार नागरिकांकडून बिलांचा भरणा केला जातो. बिल उशिरा भरले तर दंड असतो आणि नाहीच भरले तर वीज कनेक्शन तोडले जाते. म्हणून नागरिक वीज बिल भरण्याची घाई करत असतात. वाकडेवाडी, शिवाजीनगर परिसरातील काही नागरिकांनी सांगितले कि,  मात्र जून महिन्याची 15 तारीख आली तरी मे महिन्याचे बिल अजूनही नागरिकांना मिळाले नाही. नेहमी महिन्याच्या सुरुवातीला बिल येत असते. बिल आले नसल्याने आम्ही बिल भरण्याचे विसरून गेलो. त्याचा फटका तात्काळ बसला. आमचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. दुसऱ्या एका नागरिकांना सांगितले कि वीज कनेक्शन तोडताना आम्ही कर्मचाऱ्यांना ऑनलाईन वीज बिल भरल्याची पावती दाखवत होतो. त्यांनी आमचे न ऐकता आम्हांला महावितरणच्या मुख्य कार्यालयात जा म्हणून सांगितले.
नागरीकांच्या या तक्रारी घेऊन आम्ही जेव्हा याबाबत महावितरण च्या अधिकाऱ्यांना विचारले तेव्हा सांगण्यात आले कि बिलाच्या कामाची एजेन्सी बदलली असल्याने हा गोंधळ झाला आहे. लवकरच बिले पाठवण्यात येतील.
News title | Mahavitran |  ‘Shock’ to the citizens of the depressed functioning of Mahavitran

MSEDCL : बनावट ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नये : महावितरणचे आवाहन

Categories
Breaking News social पुणे

बनावट ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नये

: महावितरणचे आवाहन

पुणे : ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट ‘एसएमएस’ वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पुन्हा पाठविण्यात येत आहेत. याआधी गेल्या जानेवारी हा प्रकार घडला होता. मात्र कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून अशा प्रकारचे ‘एसएमएस’ व व्हॉट्स अॅप मेसेज महावितरणकडून पाठविण्यात येत नाही. आर्थिक फसवणूकीची शक्यता असल्यामुळे या मेसेजला प्रतिसाद देऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वीजबिलाची रक्कम भरलेली नसल्याने वीजपुरवठा आज रात्री खंडित करण्यात येत आहे असा संदेश वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठविण्यात येत असल्याचे पुन्हा प्रकार घडत आहेत. या मेसेजनंतर वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ऑनलाईन पेमेंट लिंक पाठविण्यात येत आहे. मात्र मेसेज व लिंककडे संपूर्णपणे दुर्लक्ष करावे. अन्यथा आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. महावितरणकडून केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात आणि त्याचा सेंडर आयडी (Sender ID) हा ‘एमएसईडीसीएल’ (MSEDCL) (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा आहे. तसेच या अधिकृत मेसेजमधून वीजग्राहकांना किंवा नागरिकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याबाबत कळविले जात नाही.

महावितरणकडून ‘एसएमएस’द्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस आदींची माहिती पाठविण्यात येते. परंतु, वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येणारे मेसेज हे बनावट आहे व त्यातून आर्थिक फसगत होऊ शकते असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या वीजबिलासंदर्भात ‘एसएमएस’ किंवा पेमेंट लिंकला नागरिकांनी प्रतिसाद किंवा कोणतेही उत्तर देऊ नये. मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये. काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी चोवीस तास सुरु असलेल्या १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Power outage : Pune : Pimpri-chinchwad : पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित

: महापारेषणच्या ४०० केव्ही टॉवर लाईनमध्ये बिघाड

पुणे: महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्ही महत्वाच्या ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये ५ ठिकाणी बुधवारी (दि. ९) पहाटे ४.३०च्या सुमारास बिघाड (ट्रीपिंग) झाला. त्यामुळे कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर, पिंपरी व चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात सकाळी ६ वाजेपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे.

अतिशय दाट धुके व दवं यामुळे या टॉवर लाईन मध्ये बिघाड झाल्याची शक्यता असल्याचे महापारेषणकडून सांगण्यात आले. तसेच महत्वाचे दोन ४०० केव्ही अतिउच्च दाब उपकेंद्र बंद असल्याने पर्यायी वीज पुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान महावितरणकडून याबाबतची माहिती वीज ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे देण्यात येत आहे.

महापारेषणचे सर्व वरिष्ठ अभियंता सध्या टॉवर लाइनमधील बिघाड शोधण्यासाठी युद्धपातळीवर पेट्रोलिंग करीत आहेत. सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागू शकतो. सकाळी ११ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होऊ शकेल. या कालावधीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे.