Katraj-Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी महापालिकेला राज्य सरकारकडून 140 कोटी!

Categories
Breaking News PMC पुणे

Katraj-Kondhwa Road | कात्रजकोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी महापालिकेला राज्य सरकारकडून 140 कोटी! 

 
 
Katraj-Kondhwa Road – (The Karbhari News Service) – पुणे शहराच्या दृष्टीने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कात्रजकोंढवा रस्त्याचे रुंदीकरण (Katraj- Kondhwa Road Widening) होणे महत्वाचे आहे. मात्र भूसंपादन (Land Acquisition) अभावी हे काम रखडले आहे. भूसंपादन करण्यासाठी 200 कोटींचा निधी देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) आश्वस्त केले होते. मात्र प्रत्यक्षात निधी मिळालेला नव्हता. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी नगर विकास विभागाला बऱ्याच वेळा पत्र पाठवत 200 कोटी देण्याची मागणी केली होता. त्यानुसार सरकारने महापालिकेला 140 कोटी दिले आहेत. (Katraj-Kondhwa Road) 
– उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासन 

कात्रज कोंढवा रोड हा खूपच रहदारीचा रस्ता आहे. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेकडून रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पूर्वी हा रस्ता 84 मीटर करण्याचे नियोजन होते. मात्र फक्त भूसंपादन साठी 556 कोटी रुपये लागणार होते. मात्र एवढी मोठी रक्कम असल्याने पुन्हा हा रस्ता 50 मीटर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 280 कोटी रुपये भूसंपादन साठी लागणार आहेत. (PMC Pune News) 

यासाठी 200 कोटींचे अनुदान राज्य सरकार देणार होते. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ऑक्टोबर 2022 मध्ये बैठक झाली होती. फडणवीस यांनीच तसे आश्वासन दिले होते.  मात्र सरकारने अजूनपर्यंत काही मदत केलेली नव्हती.  त्यामुळे रस्त्याचे काम पुढे जात नव्हते. त्यामुळे महापालिकेकडून सरकारसोबत पत्र व्यवहार करण्यात आला होता.  (Pune Municipal Corporation Latest News)
 
त्यानुसार भूसंपादनाच्या कामासाठी राज्य सरकार 50% हिस्सा देणार आहे. तर 50% हिस्सा महापालिकेचा आहे. त्यानुसार 140 कोटी सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कामाला आता गती मिळणार आहे. 
——

Pune Road Devlopment | पुण्याच्या रस्ते विकासातील २ मोठे अडथळे दूर! | अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची माहिती 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Road Devlopment | पुण्याच्या रस्ते विकासातील २ मोठे अडथळे दूर! | अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची माहिती

Pune Road Devlopment | पुणे महापालिकेकडून (PMC Pune) शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी महत्वाचे रस्ते विकसित करण्यात येत आहेत. मात्र भूसंपादन अभावी रस्ते विकसनात अडथळे येत होते. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून समस्या बनून राहिलेले दोन मोठे अडथळे दूर झाले आहेत. यामुळे कात्रज कोंढवा रस्ता आणि मुंढवा चौकातील काम सुरळीतपणे करता येणार आहे. अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (PMC Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी दिली. (PMC Road Department)
1. कात्रज कोंढवा रोड 
कात्रज कोंढवा रस्ता (Katraj-Kondhwa Road) विकास कामासाठी पुणे मनपा टीम उप आयुक्त महेश पाटील, उप अभियंता  बागवान, अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे, कार्य अभियंता  चव्हाण, उप अभियंता  गायकवाड यांनी  प्रकाश धारिवाल यांच्या कडून तडजोडीने ताबा घेतलेला असून टिळेकर नगर ते खडी मशीन या सर्वात महत्वाच्या टप्प्यातील रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation)
2. मुंढवा चौक
खराडी ते हडपसर (Kharadi- Hadapsar Road) या रोडवरील महत्वाच्या मुंढवा चौकात दोन टप्प्यांमध्ये मनपाने कारवाई करून रस्ता मोकळा केला होता. परंतू श्री कोद्रे आणि इतर ४ अशा एकूण ५ मालमत्ता ताब्यात नव्हत्या. तसेच वर्षानुवर्षे त्या ताब्यात घेण्यास मोठा विरोध आणि कायदे विषयक अडथळे होते. परंतू उप आयुक्त  महेश पाटील, उप आयुक्त  प्रतिभा पाटील, मुख्य विधी अधिकारी श्रीमती निशा चव्हाण,  अधिक्षक अभियंता दांडगे, कार्य अभियंता  गव्हाणे, रणवरे, उप अभियंता  सोनवणे यांनी काल दिवसभर मेहनत घेवून सदरचे ५ ताबे स्वखुशीने लिहून घेतले आहेत. (PMC Pune)
——-

Pune Katraj-Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्ता | ५० पोलीस कर्मचाऱ्यांसह महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती

Categories
Breaking News PMC Political पुणे

Pune Katraj-Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्ता  | ५० पोलीस कर्मचाऱ्यांसह महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती

Pune Katraj-Kondhwa Road |  कात्रज-कोंढवा रस्त्याच्या (Katraj-Kondhwa Road)  कामाला गती देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्या निर्देशानुसार महावितरणकडून (MSEDCL) कार्यकारी अभियंता रविंद्र आव्हाड यांना स्वतंत्र अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे, त्याचबरोबर वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस विभागाने (Traffic Police) ५० वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे. (Pune Katraj-Kondhwa Road)
पालकमंत्री श्री.पाटील यांनी काही दिवसांपूर्वी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्याच्या कामात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या होत्या आणि अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.  यात प्रामुख्याने वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेसह; रस्त्याच्या आराखड्यातील महावितरणचे खांब, विद्युत तारा आणि डीपी आदींमुळे येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्या होत्या. (Pune Municipal Corporation)
वाहतूक नियंत्रणासाठी ५० पोलीस कर्मचारी, रस्त्याच्या आराखड्यात येणारे महावितरणचे खांब आणि विद्युत तारा तातडीने स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र अभियंता देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही केली आहे. (Pune News)
वाहतूक पोलीस आणि महावितरणच्या कार्यतत्परतेबद्दल पालकमंत्र्यांनी दोन्ही यंत्रणांचे अभिनंदन केले असून महावितरणचे खांब आणि विद्युत तारा हटवल्यानंतर एका मार्गिकेचे काम तातडीने हाती घ्यावे, अशा सूचनाही दिल्या आहेत.
——
News Title | Pune Katraj-Kondhwa Road | Katraj-Kondhwa road | Appointment of Executive Engineer of Mahavitaran along with 50 police personnel

Katraj-Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्ता | 31 मे पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करा | वाहतूक नियंत्रणासाठी १२५ वॉर्डनची नियुक्ती करा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Katraj-Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्ता | 31 मे पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करा | वाहतूक नियंत्रणासाठी १२५ वॉर्डनची नियुक्ती करा

| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना

Katraj-Kondhwa Road | पुणे | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणात (Katraj-Kondhwa Road Widening) येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करुन रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करावे. रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादनाची (Land Acquisition) प्रक्रियाही जलदगतीने पूर्ण करावी आणि मार्च 2024 पर्यंत शत्रूंजय मंदिर ते खडी मशीन चौकाचे काम पूर्ण करा. तसेच पूर्ण रस्त्याचे काम 31 मे 2024 पर्यंत पूर्ण करा. त्यासोबतच वाहतूक नियंत्रणासाठी (Traffic Management) महापालिकेच्या माध्यमातून १००, लोकसहभागातून २५ वॉर्डन (Warden) आणि वाहतूक शाखेचे ५० पोलीस (Traffic Police) तातडीने नियुक्त करावेत, असे निर्देश  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले. (Katraj-Kondhwa Road)
पालकमंत्री श्री. पाटील यांनी  कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेतला. यावेळी  महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar), अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे धनंजय देशपांडे (NHAI Dhananjay Deshpande), वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar), माजी आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar), मुख्य अभियंता विजय कुलकर्णी (Chief Engineer V G Kulkarni), विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल (Shrinivas Kandul), पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे (CEO Rajendra Muthe) आदी उपस्थित होते.
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अपघात आणि वाहतूक कोंडी समस्येच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री  पाटील यांनी  रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कात्रज ते खडी मशीन चौक मार्गावरील कामांचा आढावा त्यांनी घेतला.
पोलिसांच्या सुचनेनुसार महापालिका प्रशासनाकडून कात्रज-कोंढवा रस्त्यावर उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ब्लिंकर्स, दिशादर्शक फलक, झेब्रा क्रॉसिंग पट्टे, उतारावर रम्बलर्स लावण्याचे काम पथ विभागांकडून हाती घेण्यात आले, अशी माहिती देण्यात आली.
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करावे. तीव्र उताराच्या ठिकाणी गतिरोधकपट्ट्या  तयार कराव्यात,  खडी मशीन चौकातील स्मशानभूमीची जागा स्थानिकांना विश्वासात घेऊन स्थलांतरित करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी  केल्या. दर महिन्याला शहरातील रस्त्याच्या कामात येणाऱ्या अडचणींबाबत आढावा घेण्यात येईल, असेही श्री.पाटील म्हणाले.
कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी लागणाऱ्या जागांच्या मोजणीसाठी स्वतंत्र मोजणी अधिकारी देण्याचे निर्देश जिल्हाधिक्षक भूमिअभिलेख यांना यावेळी देण्यात आले.  रस्त्याच्या आराखड्यात येणाऱ्या महावितरणचे खांब, आणि विद्युत तारा तातडीने स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र अभियंता देण्याच्या सूचनाही महावितरणच्या मुख्य अभियंतांना देण्यात आल्या.
         ——
News Title | Katraj-Kondhwa Road | Katraj-Kondhwa road | Complete the road work by May 31 | Appoint 125 wardens for traffic control

Katraj-Kondhwa Road Accident | कात्रज-कोंढवा रस्त्यावर स्मशानभूमी चौकात कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात | अपघातानंतर खासदार सुळे यांची मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Katraj-Kondhwa Road Accident | कात्रज-कोंढवा रस्त्यावर स्मशानभूमी चौकात कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात | अपघातानंतर खासदार सुळे यांची मागणी

Katraj-Kondhwa Road Accident |कात्रज-कोंढवा रस्त्यावर (Katraj-Kondhwa Road Accident) खडीमिशन पोलीस चौकीपासून जवळच झालेल्या अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी चिंता व्यक्त केली आहे. सातत्याने या ठिकाणी अपघात आणि वाहतूक कोंडी होती असल्याने येथे कायमसावरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी ट्विटद्वारे केली आहे. (Katraj-Kondhwa Road Accident)

जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. आज झालेल्या अपघातात कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यामुळे त्याचा धक्का बसून आठ वाहनांचे नुकसान झाले. यामध्ये स्कुल बसचाही समावेश आहे. शिवाय एका व्यक्तीला प्राण गमावावे लागले. या अपघातामुळे जवळपास दोन तीन तास वाहतूक ठप्प झाली होती, असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे. (Pune Accident News)

अपघात जेथे झाला ती जागा उताराची अरुंद असून अपघातप्रवण आहे. येथे सातत्याने दुर्दैवी घटना घडतात. यापूर्वीही अनेक नागरीकांना याठिकाणी झालेल्या छोट्या मोठ्या अपघातांत गंभीर स्वरुपाच्या दुखापतींना सामोरे देखील जावे लागले आहे. हे रोखण्यासाठी येथे कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत पालकमंत्री पुणे आणि शासनाने सकारात्मक विचार करावा, असे खासदार सुळे यांनी पुढे नमूद केले.  (Pune News)


News Title |Katraj-Kondhwa Road Accident | Permanent measures should be taken at the cemetery square on the Katraj-Kondhwa road MP Sule’s demand after the accident

Katraj- Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनाला येणार वेग | काही जागामालक जागा ताब्यात देण्यास तयार

Categories
Breaking News PMC social पुणे

Katraj- Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनाला येणार वेग | काही जागामालक जागा ताब्यात देण्यास तयार

Katraj-Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनाला (Katraj-Kondhwa Road Land Acquisition) वेग येण्याची चिन्हे आहेत. रस्त्याच्या कामात बाधित होणारे काही नागरिक आता महापालिकेच्या ताब्यात जागा देण्यास तयार झाले आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी नुकतीच या रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी नागरिकांनी तयारी दाखवली आहे. त्यानुसार आयुक्तांनी  देखील जागा ताब्यात घेऊन कामास सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत. (Katraj-  Kondhwa Road)
कात्रज-कोंढवा रस्त्याची पाहणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार  यांनी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे , नगरअभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी, अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे, मालमत्ता विभागाचे प्रमुख  महेश पाटील, माजी आमदार योगेश टिळेकर,  माजी नगरसेवक प्रकाश कदम , संगिता ठोसर, आदी उपस्थित होते. (Pune Municipal Corporation News)
पुणे शहराच्या मंजूर विकास योजना आराखड्यामध्ये ८४ मी. रूंदीचा विकास योजना रस्ता ( कात्रज कोंढवा) दर्शविलेला आहे. सदर ८४ मी. रूंदी पैकी सरासरी २० मी. रूंदीचा रस्ता अस्तित्वात आहे. उर्वरीत रूंदीसाठी भूसंपादन करणे आवश्यक आहे. सदर रस्त्यावरून मुंबई सातारा या भागातून सोलापूरकडे व मार्केटयार्डकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतुक आहे. सदरचा रस्ता विकसीत केल्यानंतर शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होईल. (Pune Municipal Corporation)
 रस्त्याच्या विकसनासाठी सन २०१८ मध्ये निविदा मागविण्यात आलेल्या असून ३१.१०.२०१८ रोजी सदर कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. या कामासाठी रक्कम रूपये १९२ कोटी (जीएसटी वगळून) खर्च येणार आहे. टी.डी. आर. पोटी ताब्यात आलेल्या जागेवर रस्ता विकसनाचे काम झालेले आहे. तुकड्या तुकड्यामध्ये सुमारे ३० % रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या भूसंपादना अभावी रस्त्याचे काम खोळंबलेले आहे. टी. डी. आर. चे दर कमी झाल्यामुळे रस्तारूंदीतील जागेसाठी रस्तारूंदीतील जागा मालकांकडून जागेच्या बदली रोख रकमेची मागणी करण्यात येत आहे. (PMC Pune News)
८४ मी. रूंदीच्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी अंदाजे रक्कम रूपये ५५६ कोटी खर्च अपेक्षित आहे. भू संपादन व रस्ता विकसनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करणे महापालिकेस अडचणीचे झालेले आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत ५० मी. रूंदीचा रस्ता करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. ५० मी. रूंदीच्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी रक्कम रूपये २८० कोटी खर्च अपेक्षित आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेकडून 6 जुलै ला  विनंतीपत्र देण्यात आलेले होते. (Pune News)
पुणे महानगरपालिका हद्दीतील चांदणी चौक उड्डाणपूल भू संपादन प्रकल्प याकरिता महाराष्ट्र शासनाकडून १८५.४३ कोटी चा निधी मंजूर झालेला आहे व त्यानुसार काम सुरू आहे. प्रस्तुत कात्रज कोंढवा रस्ता मुंबई – सातारा या भागातून सोलापूरकडे व मार्केटयार्ड कडे अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतुक आहे. यामुळे या भागातील वाहतुकीवर प्रचंड ताण येत आहे. चांदणी चौक उड्डाणपूल भू संपादन प्रकल्प याकरिता अनुदान प्राप्त झाले त्याच धर्तीवर कात्रज कोंढवा रस्त्याचे भूसंपादन करणे व रस्त्याचे काम प्राधान्याने करणेकरिता निधी मिळणेस विनंती आहे. या रस्त्याचे भूसंपादनाबाबत उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सोबत दिनांक १७/१०/२०२२ रोजी बैठकही झालेली आहे. तरी रस्त्याच्या भूसंपादनासाठी रक्कम रूपये २०० कोटी निधी / अनुदान शासनाकडून सत्वर देण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पुरवणी मागणीत सरकारने 200 कोटी मंजूर केले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कामाला वेग येईल. असे म्हटले जात आहे.
—-
News Title | Katraj- Kondhwa Road | Speed ​​of land acquisition of Katraj-Kondhwa road Some landlords are willing to hand over the premises

Katraj-Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी 200 कोटी देण्याची महापालिकेची सरकारकडे मागणी

Categories
Breaking News PMC social पुणे महाराष्ट्र

Katraj-Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी 200 कोटी देण्याची महापालिकेची सरकारकडे मागणी 

 

| महापालिकेने राज्य सरकारला पाठवले पत्र 

 
Katraj-Kondhwa Road | पुणे शहराच्या दृष्टीने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण (Katraj- Kondhwa Road Widening) होणे महत्वाचे आहे. मात्र भूसंपादन (Land Acquisition) अभावी हे काम रखडले आहे. भूसंपादन करण्यासाठी 200 कोटींचा निधी देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) आश्वस्त केले होते. मात्र प्रत्यक्षात निधी मिळालेला नाही. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी नगर विकास विभागाला पत्र पाठवत 200 कोटी देण्याची मागणी केली आहे. (Katraj-Kondhwa Road) 

– उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासन

कात्रज कोंढवा रोड हा खूपच रहदारीचा रस्ता आहे. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेकडून रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पूर्वी हा रस्ता 84 मीटर करण्याचे नियोजन होते. मात्र फक्त भूसंपादन साठी 556 कोटी रुपये लागणार होते. मात्र एवढी मोठी रक्कम असल्याने पुन्हा हा रस्ता 50 मीटर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 280 कोटी रुपये भूसंपादन साठी लागणार आहेत. (PMC Pune News)

यासाठी 200 कोटींचे अनुदान राज्य सरकार देणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ऑक्टोबर 2022 मध्ये बैठक झाली होती. फडणवीस यांनीच तसे आश्वासन दिले होते.  मात्र सरकारने अजूनपर्यंत काही मदत केलेली नाही. त्यामुळे रस्त्याचे काम पुढे जाताना दिसत नाही. त्यामुळे महापालिकेकडून सरकारसोबत पत्र व्यवहार करण्यात आला आहे. दरम्यान चालू आर्थिक वर्षात आयुक्तांनी या रस्त्यासाठी 17 कोटींची तरतूद केली आहे. (Pune Municipal Corporation News)
——
News Title | Katraj-Kondhwa Road | Municipal Corporation’s request to the government to pay 200 crores for land acquisition of Katraj-Kondhwa road