Pune Road Devlopment | पुण्याच्या रस्ते विकासातील २ मोठे अडथळे दूर! | अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची माहिती 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Road Devlopment | पुण्याच्या रस्ते विकासातील २ मोठे अडथळे दूर! | अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची माहिती

Pune Road Devlopment | पुणे महापालिकेकडून (PMC Pune) शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी महत्वाचे रस्ते विकसित करण्यात येत आहेत. मात्र भूसंपादन अभावी रस्ते विकसनात अडथळे येत होते. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून समस्या बनून राहिलेले दोन मोठे अडथळे दूर झाले आहेत. यामुळे कात्रज कोंढवा रस्ता आणि मुंढवा चौकातील काम सुरळीतपणे करता येणार आहे. अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (PMC Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी दिली. (PMC Road Department)
1. कात्रज कोंढवा रोड 
कात्रज कोंढवा रस्ता (Katraj-Kondhwa Road) विकास कामासाठी पुणे मनपा टीम उप आयुक्त महेश पाटील, उप अभियंता  बागवान, अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे, कार्य अभियंता  चव्हाण, उप अभियंता  गायकवाड यांनी  प्रकाश धारिवाल यांच्या कडून तडजोडीने ताबा घेतलेला असून टिळेकर नगर ते खडी मशीन या सर्वात महत्वाच्या टप्प्यातील रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation)
2. मुंढवा चौक
खराडी ते हडपसर (Kharadi- Hadapsar Road) या रोडवरील महत्वाच्या मुंढवा चौकात दोन टप्प्यांमध्ये मनपाने कारवाई करून रस्ता मोकळा केला होता. परंतू श्री कोद्रे आणि इतर ४ अशा एकूण ५ मालमत्ता ताब्यात नव्हत्या. तसेच वर्षानुवर्षे त्या ताब्यात घेण्यास मोठा विरोध आणि कायदे विषयक अडथळे होते. परंतू उप आयुक्त  महेश पाटील, उप आयुक्त  प्रतिभा पाटील, मुख्य विधी अधिकारी श्रीमती निशा चव्हाण,  अधिक्षक अभियंता दांडगे, कार्य अभियंता  गव्हाणे, रणवरे, उप अभियंता  सोनवणे यांनी काल दिवसभर मेहनत घेवून सदरचे ५ ताबे स्वखुशीने लिहून घेतले आहेत. (PMC Pune)
——-

PMC Pune News | अनावश्यक खोदाई केल्यास कारवाई | अतिरिक्त महापालिका आयुक्तांचा इशारा

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune News | अनावश्यक खोदाई केल्यास कारवाई | अतिरिक्त महापालिका आयुक्तांचा इशारा

PMC Pune News | पावसाळा (Monsoon) संपेपर्यंत आवश्यक तेथेच खोदाई (Trenching) करण्यात यावी. अनावश्यक खोदाई टाळावी असे निर्देश  अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) विकास ढाकणे (PMC Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी दिले आहेत. तसेच खोदाई करताना ठेकेदार बोर्ड लावत नाहीत. अशा ठेकेदारावर (Contractor) कारवाई करण्याचेही आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. (PMC Pune News)

शहरातील खोदाई बाबत अतिरिक्त आयुक्तांनी पथ, विद्युत आणि मलनिःस्सारण विभागासोबत बैठक घेतली. यावेळी हे आदेश देण्यात आले. शहरातील वाहनांची संख्या सुमारे ५० ते ५५ लाख व बाहेरून दररोज कामासाठी येणाऱ्या वाहनांची संख्या सुमारे १० लाख अशी सुमारे ६० ते ६५ लाख वाहनांची वर्दळ शहरात असते. शहरातील रस्त्यांची खोदाई करताना निविदा अटी व शर्तीनुसार ठेकेदाराचे कामाचे ठिकाणी बोर्ड लावणे आवश्यक आहे. परंतु ठेकेदारामार्फत कोणत्याही प्रकारचे बोर्ड कामाचे ठिकाणी लावले जात नाहीत. बोर्ड लावणेची कार्यवाही करण्यात यावी. बोर्डवर कामाचे नाव,काम सुरू दिनांक, पूर्ण दिनांक, ठेकेदाराचे नाव दुरध्वनी क्रमांक इ. सर्व माहिती नमूद असावी. तसेच खोदाईचे ठिकाणी आवश्यक ते बॅरिकेटिंग करण्यात येवून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. यामुळे नागरिकांचा रोष कमी होण्यास मदत होईल. असे अतिरिक्त आयुक्तांनी निर्देश दिले. (PMC Road Department) 

पथ, पाणीपुरवठा, मलनि:सारण, विद्युत यांनी खोदाईबाबत समन्वय करून पुढील एक महिन्यात करावयाच्या खोदाईबाबत कार्यक्रम ( Programme ) तयार करावा. त्याव्यतिरिक्त खोदाई केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. कोणता विभाग कोठे खोदाई करणार आहे याबाबत समन्वय करण्यात यावा. विदयुत विभागाचे ATMS चे काम चालू आहे. रिईनस्टेटमेंटचे काम व्यवस्थित झालेले नाही. रिईनस्टेटमेंटची कामे शास्त्रोक्त पध्दतीने होत नाहीत. रिईनस्टेटमेंटच्या कामाची कनिष्ठ अभियंता यांनी तपासणी करणे आवश्यक आहे. सिंहगड रोडबाबत वर्तमानपत्रात बऱ्याच बातम्या प्रसिध्द होत असून पथ विभागाने याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे व खड्डे दुरूस्तीबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. असे ही अतिरिक्त आयुक्तांनी आदेश दिले आहेत. (Pune Municipal Corporation) 
—/–
News Title | PMC Pune News | Action in case of unnecessary digging Warning of Additional Municipal Commissioner

Nagar Road BRTS | पुणे महापालिकेकडून नगर रोड बीआरटी मार्ग हटवण्याचे काम सुरू | पावणे तीन वर्षांपासून मार्ग होता बंद

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Nagar Road BRTS | नगर रोड बीआरटी मार्ग हटवण्याचे काम सुरू | पावणे तीन  वर्षांपासून मार्ग होता बंद

Nagar Road BRTS | नगर रस्त्यावरील येरवडा (गुंजन चौक) ते विमाननगर फिनिक्स मॉल पर्यतच्या बीआरटी मार्ग (Nagar Road BRTS) काढण्याच्या कामास शनिवारी सकाळपासून सुरवात झाली. मेट्रोच्या कामामुळे (Pune Metro Work) बीआरटीचा सर्व मार्ग बंद अवस्थेत होता. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर (Pilot Project) हा मार्ग हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि वाहतूक पोलिस यांच्यात चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (PMC Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी दिली.
अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी सांगितले कि मागील जवळपास पावणे तीन वर्षांपासून हा मार्ग बंदच होता. त्यामुळे वाहतुकीच्या सोयीच्या दृष्टीने सर्वच पक्षाच्या लोकांनी सामाजिक संस्थांनी हा मार्ग हटवण्याची मागणी केली होती.  त्यानुसार विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि वाहतूक पोलिस, पीएमपी यांच्यात चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी आठवडाभरात याचे काम पूर्ण होईल, असेही अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले. (Pune News)
—-
नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बीआरटी मार्गिका काढावी अशी मागणी मी सातत्याने करत होतो. विधीमंडळ अधिवेधनातही हा प्रश्न उपस्थित केला होता. अखेर महापालिका आणि वाहतूक पोलिस यांनी एकत्र येऊन बंद अवस्थेत असलेला गुंजन चौक ते हयात हॉटेलपर्यतचा बीआरटीमार्ग प्रायोगिक तत्त्वावर काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निश्चितच नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एक पाऊल पुढे पडले आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल मी वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिकांच्यावतीने आभार व्यक्त करतो.
  – सुनिल टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.
News Title | Nagar Road BRTS | Removal of Nagar Road BRT route started The road was closed for fifty three years

Vilas Kanade | लघुलेखक ते अतिरिक्त महापालिका आयुक्त… एक स्वप्नवत प्रवास…! | पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाला एका उंचीवर नेऊन ठेवण्यात महत्वाची भूमिका

Categories
Breaking News PMC social पुणे

लघुलेखक ते अतिरिक्त महापालिका आयुक्त… एक स्वप्नवत प्रवास…!

| पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाला एका उंचीवर नेऊन ठेवण्यात महत्वाची भूमिका

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास कानडे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. पुणे महापालिकेतील विविध पदांवर त्यांनी काम केले. जकात प्रमुख, एलबीटी आणि मिळकतकर विभाग प्रमुख म्हणून त्यांनी केलेले काम हे सदैव पुणेकरांच्या लक्षात राहण्याजोगे आहे. खास करून मिळकतकर विभागाला एका उंचीवर नेऊन ठेवण्यात त्यांनी मोलाची भूमिका निभावली. त्यामुळेच महापालिका आज निर्धास्तपणे विकासकामे करू शकते. विलास कानडे यांनी पुणे महापालिकेत लघुलेखक ते अतिरिक्त महापालिका आयुक्त… असा एक स्वप्नवत प्रवास केला आहे. महापालिकेच्या इतिहासात त्यांच्या कामाची नेहमीच नोंद घेतली जाईल.

विलास कानडे यांनी मिळकतकर विभागात अगदी कमी कर्मचाऱ्या मध्ये देखील यशस्वीपणे काम करून दाखवले. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी मिळकत कर विभागात त्यांनी विविध उपाययोजना राबविल्या आहेत. मागील वर्षी महापालिकेने मिळकत करात अठराशे कोटी उत्पन्न मिळवत ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. त्यांच्या निर्देशानुसार काम करणाऱ्या त्यांच्या कर्मचाऱ्या मध्ये देखील त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त भीती होती. राज्य सरकारने जकात रद्द करुन त्याऐवजी स्थानिक संस्था कर लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यावेळी जकात विभाग प्रमुख म्हणून कानडे यांची भूमिका महत्त्वाची
ठरली. व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध असताना सतत संवाद व चर्चा करुन त्यांनी एलबीटीची यशस्वी अंमलबजावणी केली होती.  केंद्र सरकारने जीएसटी लागू करताना त्याबदल्यात गेल्या पाच वर्षात सर्वोच्च उत्पन्न असलेली रक्कम आधारभूत मानून त्यानुसार प्रत्येकवर्षी रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता. एलबीटीमध्ये कानडे यांनी सर्वोच्च उत्पन्न मिळवून दिल्याने आता जीएसटीचा निधी मोठ्या प्रमाणात पालिकेला मिळत आहे.

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त या पदावर काम करण्याची त्यांना संधी मिळाली.  पुणे महापालिकेमध्ये त्यांनी 37 वर्ष सचोटीने त्यांनी काम केले. राजकारणी, सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोकं, पत्रकार अशा सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या प्रशासन अधिकारी आणि कानडे यांच्या पत्नी वनिता विलास कानडे या ही त्यांच्याबरोबर 33 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाल्या. पुणे महापालिकेत एकाच दिवशी पती-पत्नी सेवानिवृत्त होण्याचा योग जुळून आला.

_____

| आपल्या सेवेविषयी  कानडे  यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दात

संमिश्र भावनांमध्ये, मी तुम्हा सर्वांना कळवत आहे की मी आज दिनांक 30 सप्टेंबर 2022 रोजी नियतवयोमानानुसार पुणे महानगरपालिका सेवेतून निवृत्त होत आहे.

पुणे महापालिकेमध्ये 25.09.1985 रोजी लघुलेखक पदावर रूजू झाल्यानंतर “ अतिरिक्त महापालिका आयुक्त “ पदापर्यंत पोहोचलो. हा प्रवास मला स्वप्नवत आहे.

पुणे महापालिकेत सेवा करताना मला लोकांची सेवा करण्यासाठी एक जबरदस्त एक्सपोजर, ओळख आणि संधी मिळाली. खूप कमी लोकांपैकी एक असणाऱ्या मी खूप भाग्यवान होतो ! आश्चर्य आणि यशांनी भरलेला हा अतिशय समाधानकारक आणि रोमांचक प्रवास होता.

कामाच्या बाबत व महापालिकेचे जेथे हित आहे तेथे मी कधीही तडजोड केली नाही. सामाजिक पदानुक्रमातील मी नेहमीच दुर्बल आणि गरजू लोकांचे आवाज ऐकले. समाजाच्या भल्यासाठी मी जे काही नियम आणि नियमांच्या चौकटीत राहून काम करण्याचा प्रयत्न केला. मी असा दावा करत नाही की, मी सर्व वेळ परिपूर्ण होतो. तथापि, मला खूप वाईट वाटते आणि माझे कर्तव्य बजावत असताना मी कोणाचे मन दुखावले असल्यास मला क्षमा करावी.

मला खरोखरच माझ्या दिवंगत आई – वडिलांकडून मिळालेल्या माझ्या अत्यंत ‘प्रामाणिकपणा आणि प्रामाणिकपणाला’ पाठिंबा देणाऱ्या, पालनपोषण आणि कौतुक करणाऱ्या समाजातील सर्व घटकांचा मी खरोखर ऋणी आहे. आजपर्यंतच्या आयुष्याच्या आणि कारकिर्दीच्या अशा अद्भुत प्रवासाबद्दल मी सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ, सहकारी, कर्मचारी, मित्र, कुटुंबातील सदस्य आणि जवळचे आणि ज्ञात-अज्ञात हितचिंतकांचे आभार मानतो आणि आदर व्यक्त करतो !

मी माझी पत्नी सौ वनिता आणि मुले, विपुल आणि वेदांती यांचा उल्लेख केला पाहिजे आणि कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, ज्यांनी माझ्यातील व्यक्तीला समजून घेतले. सर्व काही असूनही प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालणे सोपे केले. त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्या दु:खाचा, त्यांना वेळ न देण्याचा अपराधीपणा मला कायमचा सतावतो, त्याच बरोबर त्यांना कमीत कमी दुसऱ्या डावात तरी अधिक वेळ देण्याचा व समजून घेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार.

पुढे काय? अनेक गोष्टी आहेत. पण आताच काय बोलणार !

आता वेळ आली आहे अति वरिष्ठ पदावर काम केल्याची ‘आभा’ टाकून ‘कॉमन मॅन’ बनण्याची, संघर्ष करण्याची आणि बाहेरच्या जगात अज्ञात आणि असुरक्षित सिद्ध करण्याची !

कोणत्याही मदतीसाठी आणि सल्ल्यासाठी मी नेहमी लोकांसाठी उपलब्ध असेन.

जीवनात मी अत्यंत आनंदी, समाधानी आणि परिपूर्ण आहे !!  (विलास कानडे सर यांच्या फेसबुक पोस्ट वरून साभार)