Nagar Road BRTS | पुणे महापालिकेकडून नगर रोड बीआरटी मार्ग हटवण्याचे काम सुरू | पावणे तीन वर्षांपासून मार्ग होता बंद

Categories
Breaking News PMC Political social पुणे
Spread the love

Nagar Road BRTS | नगर रोड बीआरटी मार्ग हटवण्याचे काम सुरू | पावणे तीन  वर्षांपासून मार्ग होता बंद

Nagar Road BRTS | नगर रस्त्यावरील येरवडा (गुंजन चौक) ते विमाननगर फिनिक्स मॉल पर्यतच्या बीआरटी मार्ग (Nagar Road BRTS) काढण्याच्या कामास शनिवारी सकाळपासून सुरवात झाली. मेट्रोच्या कामामुळे (Pune Metro Work) बीआरटीचा सर्व मार्ग बंद अवस्थेत होता. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर (Pilot Project) हा मार्ग हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि वाहतूक पोलिस यांच्यात चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (PMC Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी दिली.
अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी सांगितले कि मागील जवळपास पावणे तीन वर्षांपासून हा मार्ग बंदच होता. त्यामुळे वाहतुकीच्या सोयीच्या दृष्टीने सर्वच पक्षाच्या लोकांनी सामाजिक संस्थांनी हा मार्ग हटवण्याची मागणी केली होती.  त्यानुसार विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि वाहतूक पोलिस, पीएमपी यांच्यात चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी आठवडाभरात याचे काम पूर्ण होईल, असेही अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले. (Pune News)
—-
नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बीआरटी मार्गिका काढावी अशी मागणी मी सातत्याने करत होतो. विधीमंडळ अधिवेधनातही हा प्रश्न उपस्थित केला होता. अखेर महापालिका आणि वाहतूक पोलिस यांनी एकत्र येऊन बंद अवस्थेत असलेला गुंजन चौक ते हयात हॉटेलपर्यतचा बीआरटीमार्ग प्रायोगिक तत्त्वावर काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निश्चितच नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एक पाऊल पुढे पडले आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल मी वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिकांच्यावतीने आभार व्यक्त करतो.
  – सुनिल टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.
News Title | Nagar Road BRTS | Removal of Nagar Road BRT route started The road was closed for fifty three years