Abhay yojna : Residential property : अभय योजना : फक्त रहिवासी मिळकतींसाठी!

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

अभय योजना : फक्त रहिवासी मिळकतींसाठी!

: महापालिका आयुक्तांनी दिली मंजुरी

पुणे : १ कोटी पर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविण्यास स्थायी समितीने मान्यता दिली होती. यामध्ये रहिवासी आणि व्यावसायिक अशा दोघांना ही सवलत मिळणार होती. २० डिसेंबर ते २६ जानेवारी या कालावधीसाठी ही योजना राबवली जाणार होती. याबाबत स्थायी समिती अध्यक्ष यांनी तसे आदेश देखील दिले होते.  मात्र प्रशासनाकडून यावर  अंमल सुरु केलेला नव्हता. प्रशासनाने कमर्शियल मिळकतीवर जोरदार कारवाई सुरु केली होती. दरम्यान नगरसेवकांची आणि नागरिकांची मागणी पाहता अभय योजना सुरु करण्यास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मान्यता दिली आहे. मात्र ही योजना फक्त रहिवासी मिळकती (residential property) साठी असेल. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान कमर्शियल मिळकतींवर कारवाई सुरूच राहणार आहे. 

स्थायी समितीने घेतला होता निर्णय

महापालिकेची मिळकत कराची वसुली करण्यासाठी आणि महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने १ कोटी पर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविण्यास स्थायी समितीने मान्यता दिली होती. यामध्ये रहिवासी आणि व्यावसायिक अशा दोघांना ही सवलत मिळणार होती. २० डिसेंबर ते २६ जानेवारी या कालावधीसाठी ही योजना राबवली जाणार होती. याबाबत स्थायी समिती अध्यक्ष यांनी तसे आदेश देखील दिले होते.  मात्र प्रशासनाकडून यावर  अंमल सुरु केलेला नव्हता. उलट त्या दिवसापासून महापालिका प्रशासनाने आयुक्तांच्या आदेशानुसार कमर्शियल मिळकतीवर जोरदार कारवाई सुरु केली होती. त्यातून महापालिकेला आजपर्यंत जवळपास ५५ कोटींचे उत्पन्न देखील मिळाले आहे. मात्र शहरातील नागरिक आणि माननीय अभय योजना लागू होण्याची वाट पाहत होते. मिळकत कार विभागाने देखील तसा प्रस्ताव महापलिका आयुक्त यांच्या समोर ठेवला होता. मात्र आयुक्तांनी त्यावर स्वाक्षरी केली नव्हती.

: कमर्शियल मिळकतींवर कारवाई सुरूच राहणार

दरम्यान बुधवारी संध्याकाळी आयुक्त विक्रम कुमार यांनी मिळकतकर विभागा सोबत एक आढावा बैठक घेतली. त्याचवेळी अभय योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी देखील दिली. मात्र हो योजना फक्त रहिवासी मिळकती (residential property) साठी असेल. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु करण्यात येणार आहे. याचा कालावाधि २६ जानेवारी पर्यंत असेल. दरम्यान कमर्शियल मिळकतींवर कारवाई सुरूच राहणार आहे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

दरम्यान महापालिकेने यावर्षी देखील मिळकत करातून उत्पन्न मिळवण्याच विक्रम केला आहे. १३०० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न महापालिकेला मिळकत करातून मिळाले आहे.

—–

अभय योजना लागू करण्यास आम्ही मान्यता दिली आहे. मात्र ही योजना फक्त रहिवासी मिळकती (residential property) साठी असेल. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान कमर्शियल मिळकतींवर कारवाई सुरूच राहणार आहे. 

          विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका.

Leave a Reply