PMC: biometric Attendence: महापालिकेत पुन्हा बायोमेट्रिक हजेरी!

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

महापालिकेत पुन्हा बायोमेट्रिक हजेरी!

: महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे : जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसारामुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाल्यामुळे  पुणे महानगरपालिकेतील सर्व कार्यालयांमधील बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली स्थगित करण्यात आली होती. मात्र आता सरकारने बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली सुरु केली आहे. त्यामुळे महापालिकेत देखील ही प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तानी हे आदेश नुकतेच जारी केले आहेत.

: असे आहेत आदेश

महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार  शासन निर्णयान्वये सर्व शासकीय कार्यालयामधील बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिकेतील सर्व कार्यालयांमध्ये Aadhar Enable Bio-Metric Attendance System प्रणाली काही अटी व शर्थीच्या अधीन राहून चालू करण्यात येत आहे. सर्व शासकीय कार्यालयामधील बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली आता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी यापुढे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा वापर करून (जसे हात मॅनिटाईझ करणे) बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीबरच त्यांची दैनंदिन उपस्थिती नोंदवावी.  प्रशासकीय विभागांच्या कार्यालयांच्या आस्थापना शाखांनी सर्व अधिकारी/कर्मचारी कार्यालयात येताना व कार्यालय सोडताना त्यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीवरच नोंदवत आहेत याची दक्षता घ्यावी, तसेच विभागप्रमुख /कार्यालय प्रमुख यांनी याकरिता आवश्यक कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जसे बायोमेट्रिक मशिनच्या जवळ हात सॅनिटाईझ करायची व्यवस्था इ. उपलब्ध करून द्यावी, जेणे करून कोविड-१९ पसरण्याचा धोका राहणार नाही.

Leave a Reply