Maharashtra State Commission for Backward Classes | मराठा आरक्षण सर्वेक्षणाचा आज शेवटचा दिवस | मागासवर्ग आयोग मुदत वाढवून देणार नाही

Categories
Breaking News cultural PMC social पुणे महाराष्ट्र
Spread the love

Maharashtra State Commission for Backward Classes | मराठा आरक्षण सर्वेक्षणाचा आज शेवटचा दिवस | मागासवर्ग आयोग मुदत वाढवून देणार नाही

Maharashtra State Commission for Backward Classes |  मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्यात मराठा आरक्षण सर्वेक्षण (Maratha Aarakshan Survey) करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यापुढे मुदत वाढवून मिळणार नाही. असे स्पष्ट आदेश राज्य मागासवर्ग आयोगाने (Maharashtra State Commission for Backward Classes) राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. (Maharashtra State Commission for Backward Classes)
मागासवर्ग आयोगाच्या सूचनेनुसार राज्यात 23 जानेवारी पासून मराठा आरक्षण सर्वेक्षण सुरु करण्यात आले होते. हा कालावधी 31 जानेवारी पर्यंत होता. मात्र या कालावधीत सर्वेक्षण पूर्ण झाले नाही म्हणून कालावधी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली 2 फेब्रुवारी पर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार आज हा कालावधी समाप्त होत आहे. यावर राज्य मागासवर्ग आयोगाचे स्पष्ट आदेश आले आहेत. (What is Maratha Aarakshan Survey?)

| काय आहेत राज्य मागासवर्ग आयोगाचे आदेश?

2 फेब्रुवारी रोजी सर्वेक्षण पूर्ण करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार 2 फेब्रुवारी  रोजीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वेक्षणासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही. तरी मुदतवाढीची मागणी करण्यात येऊ नये. 2 फेब्रुवारी रोजी रात्री २३.५९ मिनिटानी सदर Software Application (APK) बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याबाबत प्रगणकांना सूचना देण्यात याव्यात व
संदर्भाधीन पत्रान्वये कळविल्यानुसार ३.२.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आयोगाकडे पाठविण्यात यावे.
—-
Maharashtra state commission for Backward classes
राज्य मागासवर्ग आयोगाकडून जारी करण्यात आलेले आदेश