Abhay Yojana to uplift the industry and trade sector : उद्योग, व्यापार क्षेत्राला उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अभय योजना

Categories
Breaking News Commerce महाराष्ट्र

 उद्योग, व्यापार क्षेत्राला उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अभय योजना

: ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड – 2022’

 

मुंबई :- कोरोना संकटकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड – 2022’ अभय योजना विधीमंडळात जाहीर केली. कर कायद्यांतर्गत एका वर्षात वैधानिक आदेशान्वये 10 हजार रुपयांची थकबाकी असल्यास सदर थकबाकीची रक्कम संपूर्णपणे माफ करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. यासंदर्भातील विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज मंजूर करण्यात आले.

सदर योजनेसंदर्भात माहिती देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, वस्तू व सेवा कर (जीएसटी) अस्तित्वात येण्यापूर्वी विक्रीकर विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध करांसंदर्भातील ही योजना असून या योजनेंतर्गत आवश्यक रकमेचा भरणा करण्यासाठी 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. कर कायद्यांतर्गत एका वर्षात वैधानिक आदेशान्वये 10 हजार रुपयांची थकबाकी असल्यास सदर थकबाकीची रक्कम संपूर्णपणे माफ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. या घोषणेचा लाभ छोट्या व्यापाऱ्यांना सुमारे 1 लाख प्रकरणांमध्ये होणार आहे.

ज्या व्यापाऱ्यांची वैधानिक आदेशान्वये थकबाकीची रक्कम दि. 1 एप्रिल 2022 रोजी, 10 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यापाऱ्यांना अविवादीत कर, विवादीत कर, शास्ती या वेगवेगळा हिशोब न करता सरसकट एकूण थकबाकीच्या 20 टक्के रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. अशी ठोक 20 टक्के रक्कम भरल्यास उर्वरीत 80 टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे. राज्यातील लहान व्यापाऱ्यांना जवळपास 2 लाख 20 हजार प्रकरणांमध्ये याचा लाभ होणार आहे.

जे व्यापारी अशा प्रकारे ठोक रक्कम भरण्यास पात्र ठरणार नाहीत किंवा ते हा पर्याय निवडणार नाहीत, अशा व्यापाऱ्यांना थकबाकीच्या तडजोडीसाठी प्रस्तावित योजनेमध्ये अविवादीत करास कुठलीही सवलत देण्यात येणार नाही. अविवादीत कराचा 100 टक्के भरणा करावा लागेल. मात्र, विवादीत करापोटी 31 मार्च 2005 पूर्वीच्या कालावधीसाठी 30 टक्के भरणा करावा लागेल. त्याचबरोबर व्याजापोटी 10 टक्के व शास्तीपोटी 5 टक्के भरणा करावा लागेल. त्याचबरोबर 1 एप्रिल 2005 ते 30 जून 2017 या कालावधीसाठी विवादीत रकमेपोटी 50 टक्के, व्याजापोटी 15 टक्के, शास्तीपोटी 5 टक्के व विलंब शुल्कापोटी 5 टक्के रकमेचा भरणा केल्यानंतर उर्वरीत थकबाकी माफ करण्यात येणार आहे.

या अभय योजनेच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक रकमेचा एकरकमी भरणा विहित कालावधीत करावा लागेल. तथापि, ज्या व्यापाऱ्यांची एका आर्थिक वर्षाची थकबाकी 50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा व्यापाऱ्यांना अभय योजनेंतर्गत भरावयाच्या आवश्यक रकमेसाठी हप्ते सवलतीचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. एकूण हप्ते सवलत 4 भागात विभागली असून पहिला हप्ता 25 टक्के हा 30 सप्टेंबर 2022 पर्यंत भरणे आवश्यक आहे. उरलेले 3 हप्ते पुढच्या 9 महिन्यात भरावे लागणार आहेत. आवश्यक रकमेपेक्षा कमी भरणा केल्यास त्या व्यापाऱ्याला प्रमाणशीर लाभ देण्यात येईल.

सदर अभय योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं आणि पारदर्शकपणे राबवण्यात येणार असून कोरोना संकटानं अडचणीत आलेल्या उद्योग व व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढण्यात, उभारी देण्यात ही योजना महत्वाची भूमिका बजावेल, तसंच योजनेला उद्योग व व्यापार क्षेत्राकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Abhay Yojna : Tax Collection : PMC : अभय योजनेतून महापालिकेला मिळाले 109 कोटी!   : चालू आर्थिक वर्षात 1471 कोटींचे उत्पन्न 

Categories
Breaking News PMC पुणे

अभय योजनेतून महापालिकेला मिळाले 109 कोटी!

: चालू आर्थिक वर्षात 1471 कोटींचे उत्पन्न

पुणे : मिळकत करातून जास्तीत जास्त वसुली होण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. नुकतीच महापालिकेने अभय योजना लागू केली होती. त्याची मुदत 26 जानेवारी पर्यंत होती. 7 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत अभय योजनेतून महापालिकेला 109 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. तर चालू आर्थिक वर्षात महापालिकेला तब्बल 1471 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. महापालिकेला हा चांगलाच दिलासा मानला जात आहे.

: अभय योजनेला चांगला प्रतिसाद

महापालिकेने निवासी मिळतीसाठी अभय योजना लागू केली होती. 1 कोटी पर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारासाठी ही योजना राबवबयात येत आहे. या योजनेची मुदत 26 जानेवारी पर्यंत होती. ती आता वाढवून 28 फेब्रुवारी करण्यात आली आहे. मात्र त्यावर अजून प्रशासनाकडून अंमल करण्यात आलेला नाही. दरम्यान 7 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत अभय योजनेतून महापालिकेला 109 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. तर चालू आर्थिक वर्षात महापालिकेला तब्बल 1471 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. अभय योजनेचा लाभ 48460 लोकांनी घेतला आहे. तर आतापर्यंत 8 लाख 46 हजार 498 लोकांनी 1471 कोटींचा टॅक्स जमा केला आहे. मागील वर्षी वर्षभरात 7 लाख 80 हजार 357 लोकांनी 1366 कोटींचा टॅक्स जमा केला होता.

FM Radio : Property Tax Bill : टॅक्स बिले, अभय योजनेची माहिती देण्यासाठी मनपा खर्च करणार 1 कोटी 

Categories
Breaking News PMC पुणे

टॅक्स बिले, अभय योजनेची माहिती देण्यासाठी मनपा खर्च करणार 1 कोटी

: एफ एम रेडिओ द्वारे केली जाणार जाहिरात

पुणे : महापालिकेच्या वतीने नागरिकांकडून मिळकतकर वसूल केला जातो. मात्र काही नागरीक वेळेवर कर भरत नाहीत. अशा लोकांना माहिती देण्यासाठी तसेच नुकतीच लागू केलेली अभय योजना यांची माहिती देण्यासाठी महापालिका एफ एम रेडिओ चा सहारा घेणार आहे. या माध्यमातून जाहिरात करत यासाठी महापालिका 1 कोटी पर्यंतचा खर्च करणार आहे. यामध्ये अभय योजनेसाठी सुमारे २० लक्षपर्यंत, नवीन आर्थिक वर्षातील मिळकतकराच्या बिलातील सवलतीची माहिती होण्यासाठी सुमारे ४० लक्षपर्यंत व इतर योजना जाहिर झाल्यास सुमारे २० लक्षपर्यंत खर्च करण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावास नुकतीच स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

: काय आहे प्रस्ताव

पुणे शहरातील थकीत बाकी असणा-या सर्व मिळकतकर थकबाकीधारकांना त्यांच्या मिळकतीवरील थकबाकी व त्यावरील शास्तीची (दराची) रक्कम त्वरीत मनपाकडे जमा करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना माहिती होण्यासाठी, अभय योजना सवलत इ. नागरिकांनी मनपाकडे भरणा करण्याकरीता मोठया प्रमाणावर जाहिरात करणे आवश्यक आहे. रेडिओ हे एक चांगले माध्यम असून, रेडिओमार्फत केलेल्या जाहिरातीस मोठया प्रमाणावर नागरिकांना माहिती मिळण्यास मदत होते. रेडिओमार्फत प्रसारित करावयाचे संदेशाचे दर प्रती सेंकद असून प्रत्येक कंपनीच्या लिसनरशीपप्रमाणे वेगवेगळे दर आहेत. सध्या पुणे शहरात एंटरटेनमेंट नेटवर्क इंडिया लि. मिर्ची लव एफ एम १०४.२, एंटरटेनमेंट नेटवर्क इंडिया लि. रेडिओ मिर्ची एफ एम ९८.३, म्युझिक ब्राडकास्ट लि. रेडिओ सिटी ९१.१, बिग एफ एम रिलायन्स ब्राडकास्ट नेटवर्क लि. रेड एफ एम ९५, साऊथ एशिया एफ एम लि. रेड एफ एम ९३.५, प्रसार भारती आल इंडिया रेडिओ, नेक्स्ट रेडिओ लि. रेडिओ वन ९४.३ या कंपन्या कार्यरत आहे. सदर विविध रेडिओ कंपनीकडून दर प्राप्त करुन खात्याच्या आवश्यकतेनुसार योजनेनुसार रेडिओ कंपनीकडून काम करुन घेतले जाते. नागरिकांपर्यंत पोहचण्याकरीता रेडिओ हे उत्तम माध्यम असून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जाहिरातीद्वारे पोहचण्यासाठी वारंवार मान्यता न घेता निवेदन मान्य झालेनंतर कार्यादेशाच्या दिनांकापासून पुढील एक वर्षापर्यंत/वेळोवेळी देण्यात आलेल्या कार्यादेशानुसार बिल आदा करेपर्यंत काम करुन घेण्यात येते.

सन २१-२२ या कालावधीसाठी १) एंटरटेनमेंट नेटवर्क इंडिया लि. मिर्ची लव एफ एम १०४.२, २) एंटरटेनमेंट नेटवर्क इंडिया लि. रेडिओ मर्ची एफ एम ९८.३, ३) म्युझिक ब्राडकास्ट लि. रेडिओ सिटी ९१.१, ४) बिग एफ एम रिलायन्स ब्राडकास्ट नेटवर्क लि. रेड एफ एम ९५, ५) साऊथ एशिया एफ एम लि. रेड एफ एम ९३.५, ६) प्रसार भारती आल इंडिया रेडिओ, ७) नेक्स्ट रेडिओ लि. रेडिओ वन ९४.३ या कंपन्यांनी दिलेल्या प्रति सेंकदाच्या दरानुसार प्रत्येक कंपनीने दिलेला स्वतंत्र दर विचारात घेवून प्रत्येक कंपनीस निविदा न मागवता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियममधील अनुसूची ‘ड’ प्रकरण ५ मधील कलम २(२) नुसार त्यांनी दिलेल्या दराप्रमाणे विविध स्पाटप्रमाणे म्हणजे ४ वेळेस अथवा आवश्यकतेनुसार विविध वेळेस काम करणेस, करारनामा करुन घेणीस, कार्यादेश देणेस, ब्राडकास्टीग रिपोर्ट मागवून केलेल्या कामाचे देयक आदा करण्यास विविध रेडिओ माध्यमाद्वारे पुढीलप्रमाणे खात्याच्या आवश्यकतेनुसार म्हणजेच अभय योजनेसाठी सुमारे २० लक्षपर्यंत, नवीन आर्थिक वर्षातील मिळकतकराच्या बिलातील सवलतीची माहिती होण्यासाठी सुमारे ४० लक्षपर्यंत व इतर योजना जाहिर झाल्यास सुमारे २० लक्षपर्यंत अथवा प्रत्यक्ष होणा-या रक्कमेपर्यंत काम करुन घेणेस व त्यानुसार करारनामा करणेस मान्यता मिळावी.
या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

Abhay yojna : Residential property : अभय योजना : फक्त रहिवासी मिळकतींसाठी!

Categories
Breaking News PMC पुणे

अभय योजना : फक्त रहिवासी मिळकतींसाठी!

: महापालिका आयुक्तांनी दिली मंजुरी

पुणे : १ कोटी पर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविण्यास स्थायी समितीने मान्यता दिली होती. यामध्ये रहिवासी आणि व्यावसायिक अशा दोघांना ही सवलत मिळणार होती. २० डिसेंबर ते २६ जानेवारी या कालावधीसाठी ही योजना राबवली जाणार होती. याबाबत स्थायी समिती अध्यक्ष यांनी तसे आदेश देखील दिले होते.  मात्र प्रशासनाकडून यावर  अंमल सुरु केलेला नव्हता. प्रशासनाने कमर्शियल मिळकतीवर जोरदार कारवाई सुरु केली होती. दरम्यान नगरसेवकांची आणि नागरिकांची मागणी पाहता अभय योजना सुरु करण्यास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मान्यता दिली आहे. मात्र ही योजना फक्त रहिवासी मिळकती (residential property) साठी असेल. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान कमर्शियल मिळकतींवर कारवाई सुरूच राहणार आहे. 

स्थायी समितीने घेतला होता निर्णय

महापालिकेची मिळकत कराची वसुली करण्यासाठी आणि महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने १ कोटी पर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविण्यास स्थायी समितीने मान्यता दिली होती. यामध्ये रहिवासी आणि व्यावसायिक अशा दोघांना ही सवलत मिळणार होती. २० डिसेंबर ते २६ जानेवारी या कालावधीसाठी ही योजना राबवली जाणार होती. याबाबत स्थायी समिती अध्यक्ष यांनी तसे आदेश देखील दिले होते.  मात्र प्रशासनाकडून यावर  अंमल सुरु केलेला नव्हता. उलट त्या दिवसापासून महापालिका प्रशासनाने आयुक्तांच्या आदेशानुसार कमर्शियल मिळकतीवर जोरदार कारवाई सुरु केली होती. त्यातून महापालिकेला आजपर्यंत जवळपास ५५ कोटींचे उत्पन्न देखील मिळाले आहे. मात्र शहरातील नागरिक आणि माननीय अभय योजना लागू होण्याची वाट पाहत होते. मिळकत कार विभागाने देखील तसा प्रस्ताव महापलिका आयुक्त यांच्या समोर ठेवला होता. मात्र आयुक्तांनी त्यावर स्वाक्षरी केली नव्हती.

: कमर्शियल मिळकतींवर कारवाई सुरूच राहणार

दरम्यान बुधवारी संध्याकाळी आयुक्त विक्रम कुमार यांनी मिळकतकर विभागा सोबत एक आढावा बैठक घेतली. त्याचवेळी अभय योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी देखील दिली. मात्र हो योजना फक्त रहिवासी मिळकती (residential property) साठी असेल. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु करण्यात येणार आहे. याचा कालावाधि २६ जानेवारी पर्यंत असेल. दरम्यान कमर्शियल मिळकतींवर कारवाई सुरूच राहणार आहे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

दरम्यान महापालिकेने यावर्षी देखील मिळकत करातून उत्पन्न मिळवण्याच विक्रम केला आहे. १३०० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न महापालिकेला मिळकत करातून मिळाले आहे.

—–

अभय योजना लागू करण्यास आम्ही मान्यता दिली आहे. मात्र ही योजना फक्त रहिवासी मिळकती (residential property) साठी असेल. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान कमर्शियल मिळकतींवर कारवाई सुरूच राहणार आहे. 

          विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका.

Abhay Yojana : Hemant Rasne : १ कोटी पर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना : दंडाच्या रकमेत ७५ टक्के सवलत 

Categories
Breaking News PMC पुणे

१ कोटी पर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना

: दंडाच्या रकमेत ७५ टक्के सवलत

पुणे : १ कोटी पर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. यामध्ये रहिवासी आणि व्यावसायिक अशा दोघांना ही सवलत मिळणार आहे. अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

२० डिसेंबर ते २६ जानेवारी २०२२ या कालावधीसाठी योजना

रासने म्हणाले, ज्या मिळकतकरधारकांची मूळ मिळकतकर आणि २ टक्के शास्ती अशी एकूण थकबाकी १ डिसेंबर २०२१ रोजी एक कोटी रुपयांपेक्षा कमी आहे अशांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे. मोबार्इल टॉवरच्या थकबाकीसाठी ही योजना लागू होणार नाही. थकबाकीदाराला २० डिसेंबर ते २६ जानेवारी २०२२ या कालावधीत एकरकमी थकबाकी भरावी लागणार आहे. त्या थकबाकीदारांना शास्तीच्या रकमेत ७५ टक्के सवलत देण्यात येणार आहे.

रासने पुढे म्हणाले, सद्यस्थितीत मिळकतकराची थकबाकी सात हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यामध्ये चक्रवाढ व्याजाने दोन टक्के शास्तीची रक्कम मूळ मागणीपेक्षा जास्त म्हणजेच चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मागील वर्षी २ ऑक्‍टोबर ते २६ जानेवारी या कालावधीत अक्षय योजना पन्नास लाख रुपयांपर्यंत थकबाकी असणार्यांसाठी अभय योजना राबविण्यात आली होती. या योजनेत एक लाख एकोणपन्नास हजार मिळकतधारकांनी सहभागी होत ४८५ कोटी रुपयांचा कर महापालिकेकडे जमा केला. तथापी अद्याप थकबाकी असलेल्या मिळकतधारकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नव्याने अभय योजना राबविण्यात येत आहे.