FM Radio : Property Tax Bill : टॅक्स बिले, अभय योजनेची माहिती देण्यासाठी मनपा खर्च करणार 1 कोटी 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

टॅक्स बिले, अभय योजनेची माहिती देण्यासाठी मनपा खर्च करणार 1 कोटी

: एफ एम रेडिओ द्वारे केली जाणार जाहिरात

पुणे : महापालिकेच्या वतीने नागरिकांकडून मिळकतकर वसूल केला जातो. मात्र काही नागरीक वेळेवर कर भरत नाहीत. अशा लोकांना माहिती देण्यासाठी तसेच नुकतीच लागू केलेली अभय योजना यांची माहिती देण्यासाठी महापालिका एफ एम रेडिओ चा सहारा घेणार आहे. या माध्यमातून जाहिरात करत यासाठी महापालिका 1 कोटी पर्यंतचा खर्च करणार आहे. यामध्ये अभय योजनेसाठी सुमारे २० लक्षपर्यंत, नवीन आर्थिक वर्षातील मिळकतकराच्या बिलातील सवलतीची माहिती होण्यासाठी सुमारे ४० लक्षपर्यंत व इतर योजना जाहिर झाल्यास सुमारे २० लक्षपर्यंत खर्च करण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावास नुकतीच स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

: काय आहे प्रस्ताव

पुणे शहरातील थकीत बाकी असणा-या सर्व मिळकतकर थकबाकीधारकांना त्यांच्या मिळकतीवरील थकबाकी व त्यावरील शास्तीची (दराची) रक्कम त्वरीत मनपाकडे जमा करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना माहिती होण्यासाठी, अभय योजना सवलत इ. नागरिकांनी मनपाकडे भरणा करण्याकरीता मोठया प्रमाणावर जाहिरात करणे आवश्यक आहे. रेडिओ हे एक चांगले माध्यम असून, रेडिओमार्फत केलेल्या जाहिरातीस मोठया प्रमाणावर नागरिकांना माहिती मिळण्यास मदत होते. रेडिओमार्फत प्रसारित करावयाचे संदेशाचे दर प्रती सेंकद असून प्रत्येक कंपनीच्या लिसनरशीपप्रमाणे वेगवेगळे दर आहेत. सध्या पुणे शहरात एंटरटेनमेंट नेटवर्क इंडिया लि. मिर्ची लव एफ एम १०४.२, एंटरटेनमेंट नेटवर्क इंडिया लि. रेडिओ मिर्ची एफ एम ९८.३, म्युझिक ब्राडकास्ट लि. रेडिओ सिटी ९१.१, बिग एफ एम रिलायन्स ब्राडकास्ट नेटवर्क लि. रेड एफ एम ९५, साऊथ एशिया एफ एम लि. रेड एफ एम ९३.५, प्रसार भारती आल इंडिया रेडिओ, नेक्स्ट रेडिओ लि. रेडिओ वन ९४.३ या कंपन्या कार्यरत आहे. सदर विविध रेडिओ कंपनीकडून दर प्राप्त करुन खात्याच्या आवश्यकतेनुसार योजनेनुसार रेडिओ कंपनीकडून काम करुन घेतले जाते. नागरिकांपर्यंत पोहचण्याकरीता रेडिओ हे उत्तम माध्यम असून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जाहिरातीद्वारे पोहचण्यासाठी वारंवार मान्यता न घेता निवेदन मान्य झालेनंतर कार्यादेशाच्या दिनांकापासून पुढील एक वर्षापर्यंत/वेळोवेळी देण्यात आलेल्या कार्यादेशानुसार बिल आदा करेपर्यंत काम करुन घेण्यात येते.

सन २१-२२ या कालावधीसाठी १) एंटरटेनमेंट नेटवर्क इंडिया लि. मिर्ची लव एफ एम १०४.२, २) एंटरटेनमेंट नेटवर्क इंडिया लि. रेडिओ मर्ची एफ एम ९८.३, ३) म्युझिक ब्राडकास्ट लि. रेडिओ सिटी ९१.१, ४) बिग एफ एम रिलायन्स ब्राडकास्ट नेटवर्क लि. रेड एफ एम ९५, ५) साऊथ एशिया एफ एम लि. रेड एफ एम ९३.५, ६) प्रसार भारती आल इंडिया रेडिओ, ७) नेक्स्ट रेडिओ लि. रेडिओ वन ९४.३ या कंपन्यांनी दिलेल्या प्रति सेंकदाच्या दरानुसार प्रत्येक कंपनीने दिलेला स्वतंत्र दर विचारात घेवून प्रत्येक कंपनीस निविदा न मागवता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियममधील अनुसूची ‘ड’ प्रकरण ५ मधील कलम २(२) नुसार त्यांनी दिलेल्या दराप्रमाणे विविध स्पाटप्रमाणे म्हणजे ४ वेळेस अथवा आवश्यकतेनुसार विविध वेळेस काम करणेस, करारनामा करुन घेणीस, कार्यादेश देणेस, ब्राडकास्टीग रिपोर्ट मागवून केलेल्या कामाचे देयक आदा करण्यास विविध रेडिओ माध्यमाद्वारे पुढीलप्रमाणे खात्याच्या आवश्यकतेनुसार म्हणजेच अभय योजनेसाठी सुमारे २० लक्षपर्यंत, नवीन आर्थिक वर्षातील मिळकतकराच्या बिलातील सवलतीची माहिती होण्यासाठी सुमारे ४० लक्षपर्यंत व इतर योजना जाहिर झाल्यास सुमारे २० लक्षपर्यंत अथवा प्रत्यक्ष होणा-या रक्कमेपर्यंत काम करुन घेणेस व त्यानुसार करारनामा करणेस मान्यता मिळावी.
या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

Leave a Reply