Pune Katraj-Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्ता | ५० पोलीस कर्मचाऱ्यांसह महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती

Categories
Breaking News PMC Political पुणे

Pune Katraj-Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्ता  | ५० पोलीस कर्मचाऱ्यांसह महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती

Pune Katraj-Kondhwa Road |  कात्रज-कोंढवा रस्त्याच्या (Katraj-Kondhwa Road)  कामाला गती देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्या निर्देशानुसार महावितरणकडून (MSEDCL) कार्यकारी अभियंता रविंद्र आव्हाड यांना स्वतंत्र अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे, त्याचबरोबर वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस विभागाने (Traffic Police) ५० वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे. (Pune Katraj-Kondhwa Road)
पालकमंत्री श्री.पाटील यांनी काही दिवसांपूर्वी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्याच्या कामात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या होत्या आणि अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.  यात प्रामुख्याने वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेसह; रस्त्याच्या आराखड्यातील महावितरणचे खांब, विद्युत तारा आणि डीपी आदींमुळे येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्या होत्या. (Pune Municipal Corporation)
वाहतूक नियंत्रणासाठी ५० पोलीस कर्मचारी, रस्त्याच्या आराखड्यात येणारे महावितरणचे खांब आणि विद्युत तारा तातडीने स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र अभियंता देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही केली आहे. (Pune News)
वाहतूक पोलीस आणि महावितरणच्या कार्यतत्परतेबद्दल पालकमंत्र्यांनी दोन्ही यंत्रणांचे अभिनंदन केले असून महावितरणचे खांब आणि विद्युत तारा हटवल्यानंतर एका मार्गिकेचे काम तातडीने हाती घ्यावे, अशा सूचनाही दिल्या आहेत.
——
News Title | Pune Katraj-Kondhwa Road | Katraj-Kondhwa road | Appointment of Executive Engineer of Mahavitaran along with 50 police personnel

Road ‘Safety’ | Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आजपासून रस्ता ‘सुरक्षा’ उपक्रम

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आजपासून रस्ता ‘सुरक्षा’ उपक्रम

मुंबई-पुणे द्रुतगती नवीन व जुन्या महामार्गावर (Mumbai Pune Expressway) अपघाताचे (Road Accident)  प्रमाण कमी करणे, वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी यासाठी १ डिसेंबर पासून पुढील ६ महिन्यांसाठी २४ तास ‘सुरक्षा’ या रस्ता सुरक्षा (Road Safety) जनजागृती व अंमलबजावणी उपक्रमाचे आयोजन परिवहन विभागामार्फत (RTO) करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १७ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत रस्त्यावरील जीवीत व वित्त हानी टाळण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांना आदेश देण्यात आले होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच जुना महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करणे व वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण होण्याकरीता दीर्घकालीन जनजागृती व अंमलबजावणी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले होते.

त्यानुसार परिवहन विभागाने ‘सुरक्षा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमासाठी मोटार वाहन विभागातील मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांची एकूण १२ पथकांची निर्मिती करण्यात आलेली असून त्या प्रत्येक पथकात ३० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही महामार्गावर यामधील प्रत्येकी ६ पथके व १५ अधिकारी २४ तास कार्यरत राहणार आहेत.

रस्ता सुरक्षा जनजागृती व अंमलबजावणी उपक्रमांतर्गत दोन्ही महामार्गावर विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत अपघातग्रस्त ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) तसेच अपघाप प्रवण ठिकाणांचे सर्वेक्षण करणे, त्याठिकाणी रस्ता सुरक्षेच्या हेतूने सर्व उपाययोजना करणे आणि वाहन चालकांच्या माहितीकरीता त्याठिकाणी घडलेल्या अपघातांची माहिती देणारे फलक प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

अवैधरित्या रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर तात्काळ कारवाई करणे आणि रस्त्यावर वाहतुकीसाठी निर्माण झालेले अडथळे दूर करणे. दोन्ही महामार्गावरील टोल नाक्यावर उद्घोषणा करुन जनजागृती करणे. इंटरसेप्टर वाहनांच्या माध्यमातून अतिवेगाने चालणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे. उजव्या मार्गिकेत ट्रक, बस, कंटेनर आदी कमी वेगाने चालणारी वाहने, चुकीच्या पद्धतीने मार्गिका बदलणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे. विना हेल्मेट, विना सिटबेल्ट प्रवास करणाऱ्या चालकांवर आणि प्रवाशांवर कारवाई करणे आदी उपाययोजना या उपक्रमाअंतर्गत करण्यात येणार आहे.

रस्ता सुरक्षा निर्माण करण्याच्या हेतूने ‘सुरक्षा’ हा उपक्रम प्रथमच परिवहन विभागामार्फत राज्यात सहा महिन्यांच्या कालावधीकरीता सुरु करण्यात आलेला आहे. या उपक्रमांतर्गत पहिले ७ दिवस दोन्ही महामार्गावरील महामवरील टोल नाक्यावर व वाहनांवरील पीए प्रणालीमार्फत जनजागृती व उद्घोषणा करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व वाहतुक नियमांचे पालन करण्याच्या हेतूने कारवाई करुन अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस विभाग, महामार्ग पोलीस, स्वयंसेवी संस्था आदींचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

रस्त्यावरील अपघातांचे शास्त्रीय विश्लेषण केले असता त्यामध्ये ८० टक्के पेक्षा जास्त अपघात हे चालकांचा निष्काळजीपणा, बेफिकीर वृत्ती व वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे होत असल्याचे दिसून आले असून चालक व नागरिकांनी वाहन चालवतांना नियमांचे पालन करण्यासाठी करण्याचे आवाहन राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी केले आहे.

Chandrakant Patil | वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचा ट्रॅफिक पोलिसांच्या बाईकवरुन प्रवास

Categories
Breaking News Political social पुणे

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचा ट्रॅफिक पोलिसांच्या बाईकवरुन प्रवास

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यावरील गर्दी लक्षात घेऊन वाहनांचा ताफा टाळून एका ट्रॅफिक पोलिसांच्या मोटरसायकलवर मागे बसून प्रवास केला.

कोविडच्या दोन वर्षांनंतर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या लाडक्या गणरायाचे अतिशय जल्लोषात स्वागत होत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी पुणेकर रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे आज  मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या वाहनाऐवजी वाहतूक पोलिसांसोबत पुणे शहरात फिरुन वाहतुकीच्या नियोजनाचा आढावा घेतला.

आजपासून 10 दिवस गणेशोत्सव साजरा होणार आहे. यादरम्यान भाविक घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना करून पूजा करतील. गणेश चतुर्थीच्या दहा दिवसीय उत्सवाची सांगता 09 सप्टेंबर रोजी गणेशमूर्तीच्या विसर्जनाने होणार आहे. पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मिरवणुका जल्लोषात निघाल्या असून ढोल ताशांच्या गजराने वातावरण सुरमय झालं आहे  पुणे  शहराचा वैभवशाली गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्यासह देशातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यात करोनामुळे दोन वर्षे बाप्पाचा उत्सव झाला नाही. त्यामुळे यंदाचा उत्सव धुमधडाक्‍यात साजरा होणार हे निश्‍चित. त्यातच भाविकांची मोठी गर्दी शहरात होणार झाली आहे. अशातच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यावरील गर्दी लक्षात घेऊन वाहनांचा ताफा टाळून एका ट्रॅफिक पोलिसांच्या मोटरसायकलवर मागे बसून प्रवास केला.

Heat wave increasing : Signal : दुपारी १२ ते ४ पुणे शहरातील सिग्नल बंद ठेवा 

Categories
Breaking News Political social पुणे

दुपारी १२ ते ४ पुणे शहरातील सिग्नल बंद ठेवा

: मनसे ची वाहतूक पोलिसांकडे मागणी

पुणे : शहरातील सर्व गरजेचे मुख्य चौक सोडुन सर्व वाहतूक सिग्नल दुपारी १२ ते ४ बंद करण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाहतूक शाखेकडे केली आहे. याबाबत मनसे चे शहर उपाध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी पत्र दिले आहे.
वाहतूक पोलिसांना दिलेल्या पत्रानुसार पुणे शहरातील उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे.  ४०-४३ सेल्सिअस च्या पेक्षा जास्त दिवसें दिवस तापमानात वाढ होत चालली आहे.  पुणेकरांना सिग्नल वर कडक उन्हाचे चटके सहन करत थांबावे लागत आहे. त्यामुळे अनेक पुणेकरांना उष्णतेमुळे घोळणा फुटणे, त्वचा रोग, डोकेदुखी अशक्तपणा, चक्कर येणे, शरीरातील पाण्याची कमतरता होणे. असे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. आपणांस विनंती आहे पुणे शहरातील सर्व वाहतूक सिग्नल दुपारी १२ ते ४ बंद ठेवण्यात यावेत.

Traffic Fines : Chandrakant patil : Nitin Gadkari : वाहतुक दंडवसुली बाबत नितीन गडकरींशी बोलू  : पोलिसांच्या दंडवसुलीला चंद्रकांत पाटील यांचा विरोध 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

वाहतुक दंडवसुली बाबत नितीन गडकरींशी बोलू

: पोलिसांच्या दंडवसुलीला चंद्रकांत पाटील यांचा विरोध

पुणे : वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाते. मागील तीन वर्षांपासून सीसीटीव्हीद्वारे प्रामुख्याने ही कारवाई केली जात आहे. नियम मोडलेल्यांना घरपोच तसेच मोबाईलवर याची माहिती कळवली जाते. हा दंड न भरल्यास वाहतूक शाखेकडून नाकाबंदी आयोजित केली जाते आणि त्याद्वारे वाहनांची तपासणी करून दंड वसूल केला जातो. याच दंडात्मक कारवाईला पुणेकर सध्या वैतागले आहेत. कारण शहरात ठिकठिकाणी वाहतूक पोलीस वाहने अडवून दंड वसूल करताना दिसत आहे.

वाहतूक पोलिसांच्या या दंडवसुली बाबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  (BJP Chandrakant patil) यांना विचारले असता ते म्हणाले, ही जी हुकूमशाही सुरू आहे, जुलूम सुरू आहे त्याला भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे. याचा विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी नजीकच्या काळात रस्त्यावर उतरणार आहे. हेल्मेट वापरणं हे जिवीतच्या दृष्टीने आवश्यक आहे म्हणता परंतु दुसरीकडे त्याच्यावर एवढे जास्त दंड लावता हे त्या माणसाच्या जिवापेक्षाही भयंकर आहे. प्रबोधन करून, समजावून किंवा ताकीद देऊनही यावर मार्ग काढता येऊ शकतो. परंतु जास्तीचा फाईन आकारणे हे त्या माणसाच्या जिवापेक्षाही भयंकर आहे.

नितीन गडकरींच्या खात्याने हे दंड लावणे सुरू केले असल्यास त्यांना भेटून इतक्या मोठ्या प्रमाणात दंड आकारणे अन्यायकारक आहे हे आम्ही त्यांना सांगू. आपल्या एखाद्या नेत्याने अपुर्‍या माहितीच्या आधारे, परिणाम काय होतील याचा विचार न करता एखादा निर्णय घेतला असेल तर भारतीय जनता पार्टी त्यांनी त्या नेत्याला सुद्धा प्रेमाने निवेदन देऊन समजते. या विषयावर आम्ही नितीन गडकरींशी देखील बोलू, असं पाटील  म्हणाले.