Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | खडकवासला प्रकल्पातील 4 धरणे 50% भरली 

Categories
Breaking News social पुणे

Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | खडकवासला प्रकल्पातील 4 धरणे 50% भरली

| धरणांत सद्यस्थितीत 14.53 TMC पाणी

Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | पुणे शहर (Pune city) आणि खडकवासला धरण साखळी (Khadakwasla Chain Project) प्रकल्पात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस (Pune Rain) सुरु आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर अशी चार धरणे 50% भरली आहेत. 4 धरणांत मिळून 14.53 TMC पाणी साठा झाला आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. (Khadakwasla Dam | Pune Rain Update)
मागील वर्षी याच दिवसांत चार धरणामध्ये 20 टीएमसी पाणी होते. यंदा मात्र  पाणी साडे पाच टीएमसी ने कमी आहे. दरम्यान पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दरम्यान पुणे शहरात मे महिन्यापासून पाणी कपात (Pune Water Cut) करण्यात आली आहे. काही भागांत दर गुरुवारी तर काही भागात वेगवेगळ्या दिवशी पाणी बंद ठेवण्यात येते. त्यामुळे महापालिकेने पाण्याची बचत केली आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणी कमी होत चालले होते. मात्र आता पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. तरीही पाणीकपात हटणार नाही, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.  (Pune water cut update)
खडकवासला धरण साखळीतील 4 धरणांत सद्यस्थितीत 14.53 टीएमसी म्हणजे 49.86% इतके पाणी आहे. त्यापैकी खडकवासला धरणांत (Khadakwasla Dam) 1.24 टीएमसी म्हणजे 62.92%,  पानशेत धरणांत (Panshet Dam) 5.62 टीएमसी म्हणजे 52.82, वरसगाव धरणांत (Varasgaon Dam) 6.42 टीएमसी म्हणजे 50.11%, तर टेमघर धरणांत (Temghar Dam) 1.24 टीएमसी म्हणजे 33.49% इतके पाणी आहे. मागील वर्षी याच दिवसांत 20 टीएमसी म्हणजे 68.61% इतके पाणी चार धरणांत होते. (Pune Rain Update)
—-
News Title | Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | 4 dams in Khadakwasla project are 50% full | 14.53 TMC of water in dams at present

Pune Rain | School Closed | पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळा आणि अंगणवाड्या दोन दिवस बंद | जिल्हाधिकारी यांचे आदेश

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र

Pune Rain | School Closed | पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळा आणि अंगणवाड्या दोन दिवस बंद

| जिल्हाधिकारी यांचे आदेश

Pune Rain | School Closed |  जिल्हादंडाधिकारी आणि  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख (Dr Rajesh Deshmukh) यांनी काल रात्री घाट भागात झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज आणि उद्या दुर्गम भागात असलेल्या शाळा बंद ठेवण्याचे (School Closed) आदेश दिले आहेत. या भागातील अंगणवाड्याही (Anganwadi) आज आणि उद्या बंद ठेवल्या जाणार आहेत.  (Pune Rain | School Closed)
ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर (Block Education officer) आणि सीडीपीओ (CDPO) यांनी परिसरात असणे आणि सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापक शाळेत उपस्थित राहतील. (Pune School News)
हा आदेश अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद, सर्व मंडळांशी संलग्न अनुदानित व खाजगी शाळांना लागू आहे.
इतर सर्व भागातील शाळा आणि अंगणवाड्या सामान्यपणे चालू राहतील, असेही आदेशीत करण्यात आले आहे.
——
News Title |Pune Rain | School Closed | Schools and Anganwadis in remote areas of Pune district closed for two days| pune Collector’s order

Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | खडकवासला मधून पाण्याचा विसर्ग सोडला जात नाही तोपर्यंत शहरात पाणीकपात सुरूच राहण्याची शक्यता!

Categories
Breaking News PMC social पुणे

Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | खडकवासला मधून पाण्याचा विसर्ग सोडला जात नाही तोपर्यंत शहरात पाणीकपात सुरूच राहण्याची शक्यता!

|  खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांत मागील 12 तासांत वाढले 1 टीएमसी पाणी

| धरणांत सद्यस्थितीत 12.22 TMC पाणी

Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | पुणे शहर (Pune city) आणि खडकवासला धरण साखळी (Khadakwasla Chain Project) प्रकल्पात गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस (Pune Rain) सुरु आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्या 2 दिवसांत धरणामध्ये 2 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे.  तर गेल्या अवघ्या 12 तासांत 1 टीएमसी पाणी वाढले आहे. बुधवारी संध्याकाळी हा साठा 11.24 टीएसमी होता. आज सकाळी 6 वाजता हा साठा 12.22 टीएमसी झाला आहे. असे असले तरी शहरातील पाणीकपात तूर्तास तरी जैसे थे च राहणार आहे. जोपर्यंत खडकवासला धरणांतून नदीत पाण्याचा विसर्ग सोडला जात नाही तोपर्यंत ही पाणीकपात अशीच राहणार आहे. असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. (Khadakwasla Dam | Pune Rain Update)

मागील वर्षी याच दिवसांत चार धरणामध्ये 19.35 टीएमसी पाणी होते. यंदा मात्र  पाणी 7 टीएमसी ने कमी आहे. दरम्यान पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दरम्यान पुणे शहरात मे महिन्यापासून पाणी कपात (Pune Water Cut) करण्यात आली आहे. काही भागांत दर गुरुवारी तर काही भागात वेगवेगळ्या दिवशी पाणी बंद ठेवण्यात येते. त्यामुळे महापालिकेने पाण्याची बचत केली आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणी कमी होत चालले होते. मात्र आता पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. तरीही पाणीकपात हटणार नाही, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. (Pune water cut update)

4 धरणांत 41.93%  इतके पाणी

खडकवासला धरण साखळीतील 4 धरणांत सद्यस्थितीत 12.22 टीएमसी म्हणजे 41.93% इतके पाणी आहे. त्यापैकी खडकवासला धरणांत (Khadakwasla Dam) 1.01 टीएमसी म्हणजे 51.35%,  पानशेत धरणांत (Panshet Dam) 4.73 टीएमसी म्हणजे 44.40%, वरसगाव धरणांत (Varasgaon Dam) 5.46 टीएमसी म्हणजे 42.61%, तर टेमघर धरणांत (Temghar Dam) 1.02 टीएमसी म्हणजे 27.46% इतके पाणी आहे. मागील वर्षी याच दिवसांत 19.35 टीएमसी म्हणजे 66.38%  इतके पाणी चार धरणांत होते. (Pune Rain Update)
—-
News Title |Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | Water shortage in the city is likely to continue until the release of water from Khadakwasla is not released!

Maharashtra Rain Update | आजपासून पुण्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा | नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र शेती

Maharashtra Rain Update | आजपासून पुण्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

| नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

 Maharashtra Rain Update |  भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मंगळवार १८ जुलै २०२३ रोजी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच २१ जुलै २०२३ पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. (Maharashtra Rain Update)
या काळात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ४५, तर काही ठिकाणी तो ताशी ५५ किलोमीटरपर्यंत जावू शकतो, अशीही शक्यता वर्तविली आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून मासेमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा इशारा दिल्यानंतर राज्य शासनाने संबंधित जिल्हा प्रशासनांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. (IMD)
००००
News Title | Maharashtra Rain Update | Heavy rain warning in Madhya Maharashtra including Pune from today | Citizens are urged to be vigilant

Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांत मागील 2 दिवसांत वाढले 1 टीएमसी पाणी

Categories
Breaking News social पुणे

Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांत मागील 2 दिवसांत वाढले 1 टीएमसी पाणी

| धरणांत सद्यस्थितीत 7.26 TMC पाणी

Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | पुणे शहर (Pune city) आणि खडकवासला धरण साखळी (Khadakwasla Chain Project) प्रकल्पात गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस (Pune Rain) सुरु आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्या 2 दिवसांत धरणामध्ये 1 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे.  गुरुवारी हा साठा 6.24 टीएसमी होता. आज 5 वाजता हा साठा 7.26 टीएमसी झाला आहे. पुणेकरांना हा दिलासा मानला जात आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली. (Khadakwasla Dam | Pune Rain Update)
मागील वर्षी याच दिवसांत चार धरणामध्ये 5.45 टीएमसी पाणी होते. यंदा मात्र  पाणी जास्त आहे. तसेच पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दरम्यान पुणे शहरात मे महिन्यापासून पाणी कपात (Pune Water Cut) करण्यात आली आहे. काही भागांत दर गुरुवारी तर काही भागात वेगवेगळ्या दिवशी पाणी बंद ठेवण्यात येते. त्यामुळे महापालिकेने पाण्याची बचत केली आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणी कमी होत चालले होते. मात्र आता पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. (Pune water cut update)

4 धरणांत 24.89% इतके पाणी

खडकवासला धरण साखळीतील 4 धरणांत सद्यस्थितीत 7.26 टीएमसी म्हणजे 24.89% इतके पाणी आहे. त्यापैकी खडकवासला धरणांत (Khadakwasla Dam) 0.99 टीएमसी म्हणजे 49.97%, पानशेत धरणांत (Panshet Dam) 2.64 टीएमसी म्हणजे 24.80%, वरसगाव धरणांत (Varasgaon Dam) 3.19 टीएमसी म्हणजे 24.87% तर टेमघर धरणांत (Temghar Dam) 0.44 टीएमसी म्हणजे 11.88% इतके पाणी आहे. मागील वर्षी याच दिवसांत 5.45 टीएमसी म्हणजे 18.68% इतके पाणी चार धरणांत होते. (Pune Rain Update)
—-
News Title | Khadakwasla Dam Chain |  Pune Rain Update |  1 TMC water has increased in last 2 days in 4 dams of Khadakwasla project

Khadakwasla Dam | Pune Rain | खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांत मागील 5 दिवसांत वाढले 1 टीएमसी पाणी

Categories
Breaking News social पुणे

Khadakwasla Dam | Pune Rain | खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांत मागील 5 दिवसांत वाढले 1 टीएमसी पाणी

| धरणांत सद्यस्थितीत 5.10 TMC पाणी

Khadakwasla Dam | Pune Rain | पुणे शहर (Pune city) आणि खडकवासला धरण साखळी (Khadakwasla Chain Project) प्रकल्पात गेल्या आठवड्या भरापासून पाऊस (Pune Rain) सुरु आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्या 5 दिवसांत धरणामध्ये 1 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. सोमवारी हा साठा 4.16 टीएसमी होता. आज 6 वाजता हा साठा 5.10 टीएमसी झाला आहे. पुणेकरांना हा दिलासा मानला जात आहे. (Khadakwasla Dam | Pune Rain)

एक दिवसाआड पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता कमी

मागील वर्षी याच दिवसांत चार धरणामध्ये 2.55 टीएमसी पाणी होते. यंदा मात्र दुपटीने पाणी जास्त आहे. तसेच पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दरम्यान पुणे शहरात मे महिन्यापासून पाणी कपात (Pune Water Cut) करण्यात आली आहे. काही भागांत दर गुरुवारी तर काही भागात वेगवेगळ्या दिवशी पाणी बंद ठेवण्यात येते. त्यामुळे महापालिकेने पाण्याची बचत केली आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणी कमी होत चालले होते. त्यामुळे जुलै पासून पाणीकपातीत अजून वाढ (Alternate Day Water cut) करण्याची चर्चा सुरु होते. मात्र आता हे संकट येणार नाही अशी चिन्हे आहेत. (Pune water cut update)

4 धरणांत 17.50% इतके पाणी

खडकवासला धरण साखळीतील 4 धरणांत सद्यस्थितीत 5.10 टीएमसी म्हणजे 17.50% इतके पाणी आहे. त्यापैकी खडकवासला धरणांत (Khadakwasla Dam) 1 टीएमसी म्हणजे 50.63%, पानशेत धरणांत (Panshet Dam) 1.80 टीएमसी म्हणजे 16.87%, वरसगाव धरणांत (Varasgaon Dam) 2.10 टीएमसी म्हणजे 16.37% तर टेमघर धरणांत (Temghar Dam) 0.21 टीएमसी म्हणजे 5.56% इतके पाणी आहे. मागील वर्षी याच दिवसांत 2.55 टीएमसी म्हणजे 8.75% इतके पाणी चार धरणांत होते. (Pune Rain Update)
—-
News Title | Khadakwasla Dam |  Pune Rain |  1 TMC water has increased in last 5 days in 4 dams of Khadakwasla project
 |  Presently 5.10 TMC of water in dams

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेने कोटी रुपये खर्च करून बांधलेली पावसाळी गटारे निरुपयोगी | रस्त्यावर पाण्याची थारोळी | विवेक वेलणकर

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेने कोटी रुपये खर्च करून बांधलेली पावसाळी गटारे निरुपयोगी | रस्त्यावर पाण्याची थारोळी | विवेक वेलणकर

Pune Municipal Corporation | पावसाळ्यात रस्त्यावर पाण्याची थारोळी साचू नयेत म्हणून गेल्या काही वर्षांत पुणे महापालिकेने (PMC Pune) अनेक रस्त्यांवर शेकडो कोटी रुपये खर्च करून पावसाळी गटारे बांधली आहेत. मात्र ही गटारे निरुपयोगी ठरत आहेत. रस्त्यावर पाण्याची थारोळी साचत आहेत. असा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी केला आहे. (Pune Municipal Corporation)
 वेलणकर यांनी सांगितले कि, रस्त्यावर पाणी न साचता ते या गटारांमधून वाहून जावे ही या मागची मूळ कल्पना. मात्र यासाठी रस्ते डांबरीकरण करताना,  दुरुस्त करताना त्यांचा उतार या पावसाळी गटारांच्या मॅनहोल कडे राहील याची दक्षता घ्यावी लागते. मात्र महापालिकेचे रस्ते कंत्राटदार याची कोणतीही काळजी घेत नाहीत आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी फक्त कंत्राटदाराची बिले मंजूर करण्यासाठीच काम करत असल्याने आज दोन दिवसांच्या थोड्या पावसाने रस्तोरस्ती तळी निर्माण झाली आहेत , त्यातली अनेक तर मॅनहोलच्या सभोवताली आहेत.  यातून पाणीच पाणी चोहीकडे आणि गेले पावसाळी गटार कुणीकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ही पावसाळी गटारे निरुपयोगी ठरत आहेत आणि ती बांधण्यासाठी खर्च करण्यात आलेले नागरीकांच्या करांचे शेकडो कोटी रुपये अक्षरशः पाण्यात गेले आहेत. (Pune News)
वेलणकर पुढे म्हणाले कि,  आमची मागणी आहे की रस्त्यावर पाणी साचण्याच्या जागांचा तातडीने सर्व्हे करावा आणि ज्या रस्त्यावर पावसाळी गटारे बांधली असूनही पाणी साचते आहे त्यासाठी जबाबदार कंत्राटदार व महापालिकेचे अधिकारी यांचेवर कारवाई करावी. (PMC Pune News)
——
News Title | Pune Municipal Corporation |  Rainy sewers built by Pune Municipal Corporation at a cost of crores of rupees are useless  Water splashing on the road  Vivek Velankar

Monsoon 2023 |  Good News |  Monsoon has entered the entire Maharashtra state  |  Announcement of Meteorological Department

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र शेती

Monsoon 2023 |  Good News |  Monsoon has entered the entire Maharashtra state

 |  Announcement of Meteorological Department

 Monsoon 2023 |  There is a good news for all.  Monsoon has covered entire Maharashtra today.  The Indian Meteorological Department has announced this.  The Indian Meteorological Department has informed that monsoon has become active in the entire country except Gujarat, Rajasthan, Haryana, Punjab and some parts of Jammu and Kashmir.  However, this has brought relief to the farmers and common people.  (Monsoon 2023)
 According to the information provided by the Meteorological Department (IMD), the entire Maharashtra is covered by monsoon.  The Meteorological Department has also informed that there is a favorable environment for the activation of Monsoon in the next two days in Gujarat, Rajasthan, Haryana, Punjab and Jammu Kashmir.  It is currently raining in some parts of the state.  Still waiting for rain in some places.  (Maharashtra Rain)

 Heavy rain forecast for two days in Pune

 There was heavy rain in Pune on June 24.  Heavy rain is also predicted on 25th and 26th.  Accordingly, it has been raining in Pune since Sunday morning.  (Pune Rain)
 —-

Monsoon 2023 | आनंदाची बातमी | मान्सून संपूर्ण राज्यात दाखल | हवामान विभागाची घोषणा 

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र शेती

Monsoon 2023 | आनंदाची बातमी | मान्सून संपूर्ण राज्यात दाखल

| हवामान विभागाची घोषणा

Monsoon 2023 | सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मान्सूनने (Monsoon) आज संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) व्यापला आहे. भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department) याबाबतची घोषणा केली आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मिरचा काही भाग सोडता संपूर्ण देशात मान्सून सक्रिय झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. यामुळे मात्र शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांना चांगला दिलासा मिळाला आहे. (Monsoon 2023)

 

हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मिरात पुढील दोन दिवसात मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे. सध्या राज्याच्या काही भागात पाऊस कोसळत आहे. अद्याप काही ठिकाणी पावसाची  प्रतिक्षा कायम आहे. (Maharashtra Rain)

पुण्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

पुण्यात 24 जून ला जोरदार पाऊस झाला. 25 आणि 26 ला देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार रविवार सकाळपासूनच पुण्यात पाऊस कोसळत आहे. (Pune Rain)

—-

News Title | Monsoon 2023 | Good News | Monsoon has entered the entire state | Announcement of Meteorological Department

Pune Rain Update | उद्या आणि परवा पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज | हवामान खात्याकडून अंदाज वर्तवला

Categories
Breaking News social पुणे

Pune Rain Update | उद्या आणि परवा पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज

| हवामान खात्याकडून अंदाज वर्तवला

 Pune Rain Update | पुण्यातील पावसाची (Pune Rain)!प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. आज म्हणजेच शनिवारी पुण्यात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. शहर आणि आसपासच्या परिसरात तसेच धरण पाणलोट क्षेत्रात देखील जोरदार पाऊस पडला. दरम्यान भारतीय हवामानशास्त्र विभागाने  (IMD), 25 आणि 26 जून रोजी शहर आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाची (Heavy Rainfall in Pune) शक्यता वर्तवली आहे. (Pune Rain Update)
 IMD च्या हवामान अंदाजानुसार, या दोन दिवसांत पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, डोंगराळ भागात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे.  (Pune Rain)
 साधारणपणे, जूनमध्ये पुण्यात अंदाजे 100 मिलिमीटर पाऊस पडतो.  मात्र, यावर्षी आतापर्यंत केवळ 20.7 मिमी पाऊस झाला आहे.  मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने उष्णतेची लाट आणि वाढलेले तापमान यामुळे रहिवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होई. त्यामुळे आगामी मुसळधार पावसामुळे कडक उन्हापासून दिलासा मिळणार आहे. आजच्या पावसाने देखील पुणेकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. (Pune Rain News)
——
News Title | Pune Rain Update |  Heavy rain forecast in Pune tomorrow and the day after |  Forecasted by Pune Meteorological Department