Pune Rain | पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली | पाणीपुरवठा करणारी धरणे ९७% भरली 

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली | पाणीपुरवठा करणारी धरणे ९७% भरली

| धरणामध्ये २८.२२ TMC पाणीसाठा

पुणे | शहर आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसरात गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा चांगलाच वाढला आहे. धरणामध्ये २८.२२ TMC पाणीसाठा जमा झाला आहे. म्हणजेच धरणे सुमारे ९६.८२% भरली आहेत. त्यामुळे आता शहरवासीयांचा वर्षभराचा पाणी प्रश्न सुटला आहे.

खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणातून पाणी पुरवठा केला जातो. धरण क्षेत्रात गेल्या आठवड्याभरापासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. धरणातील पाणीसाठा चांगलाच वाढला आहे. धरणामध्ये २८.२२% पाणीसाठा जमा झाला आहे. म्हणजेच धरणे सुमारे ९६.८२% भरली आहेत. त्यामुळे  पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. मागील वर्षी याच दिवशी २७.९१ टीएमसी जमा झाले होते.

खडकवासला धरण १००% भरले आहे. धरणातून काळ २६ हजार कुसेक पाणी सोडण्यात आले होते. तर आज ते १३८९१ कुसेक आणि सोडण्यात आले. पानशेत धरण देखील ९९% भरले आहे. वरसगाव धरण ९८% तर टेमघर ८३% भरले आहे.

 

Khadakwasla Water Discharge | खडकवासलातून पाण्याचा विसर्ग केला बंद | पावसाचा जोर ओसरला 

Categories
Breaking News पुणे

खडकवासलातून पाण्याचा विसर्ग केला बंद | पावसाचा जोर ओसरला

| चार धरणात 18.89 TMC पाणी जमा

खडकवासला धरण साखळीतील पावसाचा जोर ओसरल्याने खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग आज सकाळी सहा वाजता पूर्ण बंद केला आहे. खडकवासला धरण सध्या १०० टक्के भरले आहे. परंतु या धरणात मागील चार- पाच दिवसात मोठा पाऊस झालेला नाही. पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाला आहे. परिणामी ओढ्याचे पाणी कमी झाल्याने धरणातील येवा बंद झाल्याने धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद केला आहे.

धरणातील विसर्ग एक हजार ७१२ क्यूसेक होता. तो आज पहाटे पाच वाजता ८५६ क्यूसेक केला. सहा वाजता पूर्ण बंद केला. खडकवासला धरण मागील मंगळवारी सकाळी(१२ जुलै रोजी) शंभर टक्के भरले होते. त्यानंतर त्यातून धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. आज सकाळी सहा वाजता बंद केला या दरम्यान धरणातून ३.३४टीएमसी पाणी मुठा नदीत सोडले. पुढे हे पाणी उजनी धरणात जमा होते.

खडकवासला धरण साखळीत मिळून एकूण पाणीसाठा १८.८९ टीएमसी झाला आहे. पानशेत आणि वरसगाव धरणांनंतर टेमघर धरणही निम्मे भरले आहे. खडकवासला धरणाच्या परिसरात सहा मिलिमीटर, पानशेत धरण क्षेत्रात ३२ मिलिमीटर, वरसगाव ३७ आणि टेमघर धरण क्षेत्रात २०मिलिमीटर पाऊस पडला आहे.

Private and IT companies | पुढील 2 दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ साठी प्रोत्साहन द्या  | खाजगी व आयटी कंपन्यांना महापालिकेचे आवाहन 

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे

पुढील 2 दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ साठी प्रोत्साहन द्या

 खाजगी व आयटी कंपन्यांना महापालिकेचे आवाहन

पुणे |  भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) पुणे जिल्ह्यात पुढील २ दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. त्या अनुषंगाने, पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील सर्व खासगी कंपन्या तसेच आयटी कंपन्या यांना आवाहन करण्यात आले आहे की, सुरक्षिततेच्या व सतर्कतेच्या दृष्टीने, त्यांनी पुढील २ दिवस त्यांचे अधिनस्थ कर्मचारीवर्ग यांना वर्क फ्रोम होम करण्यासाठी प्रोत्साहित करावे.

Holiday for all schools in Pune | पुण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी | शिक्षक व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहावे लागणार 

Categories
Breaking News Education PMC पुणे

पुण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी | शिक्षक व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहावे लागणार

| महापालिका शिक्षण विभागाचा निर्णय

पुणे | पुणे शहर आणि परिसरात गेल्या 10 दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे. खडकवासला धरण भरले असल्याने  पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अशातच आगामी काळातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शहरातील सर्व शाळांना उद्या (14 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत महापालिका शिक्षण विभागाने निर्देश जारी केले आहेत.

| असे आहेत आदेश

पुणे महानगरपालिका हद्दीतील क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत असून अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तविण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिका क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सर्व मनपा खाजगी शाळांना अनुदानित, विना अनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित इ.शाळांना दिनांक १४/०७/२०२२ रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
तथापि पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजाच्या अनुषगांने शाळेत उपस्थित राहतील.

Discharge water from Khadakwasla Dam | खडकवासला धरणातून २५६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग 

Categories
Breaking News social पुणे

खडकवासला धरणातून २५६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग

| सकाळी ६वाजता विसर्ग वाढवला

पुणे | शहर आणि शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील धरणामध्ये गेल्या ८ दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे खडकवासला धरण ९४% भरले आहे. खडकवासला धरणाची क्षमता कमी असल्याने पाटबंधारे विभागाने मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. काल रात्री १२ वाजले पासून विसर्ग करण्यात येत आहे. रात्री धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 856 क्युसेक विसर्ग वाढवून  सकाळी ६ वाजले पासून २५६८ क्युसेक करण्यात येत आहे. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

चार धरणामध्ये १०.७९ टीएमसी पाणी जमा

गेल्या ८ दिवसापासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची चांगलीच वाढ झाली आहे. खडकवासला धरण साखळीतील चार धरणामध्ये १०.७९ टीएमसी पाणी जमा झाले आहे. मागील वर्षी याच दिवशी ८.६३ टीएमसी पाणी धरणामध्ये होते. पाऊस चांगला सुरु असल्याने ही वाढ होतच राहिल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान खडकवासला धरणाची क्षमता कमी असल्याने पाटबंधारे विभागाने मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. काल रात्री १२ वाजले पासून विसर्ग करण्यात येत आहे. रात्री धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 856 क्युसेक विसर्ग वाढवून ठीक सकाळी ६ वाज्लेपासून २५६८ क्युसेक करण्यात येत आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.
नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी… असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

Dams Water | चार धरणात जमा झाले मागील वर्षीपेक्षा अधिक  पाणी!

Categories
Breaking News PMC social पुणे

 चार धरणात जमा झाले मागील वर्षीपेक्षा अधिक  पाणी!

| धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडवासाला या चारही धरणाचा एकूण पाणीसाठा ९.४७  टीएमसी  झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी ८.६३ टीएमसी पाणी होते.  आता हे पाणी आगामी ७-८ महिने पुरेल इतके आहे. दरम्यान महापालिकेकडून हा पाणी साठा पाहता पाणी कपात देखील रद्द केली आहे.

खडकवासला धरण साखळीतील ४ धरणातील पाणी खूप कमी झाले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरात एक दिवसाआड पाणी सुरु केले होते. मात्र ईद आणि आषाढी एकादशी मुळे तात्पुरती त्याला स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता धरण क्षेत्रात वाढणारा पाण्याचा साठा पाहून पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. हा पुणेकरांसाठी दिलासाच आहे.

धरणातील पाणी साठा २ जुलै रोजी २.५१ टीएमसी पर्यंत खाली आला होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून या चारही धरणात पावसाला सुरुवात झाली होती.  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने आता७-८  महिन्यांचे पाणी वाढले आहे. सोमवारी सायंकाळी हा साठा ९.४७ टीएमसी इतका झाला आहे. या चारही धरणात अद्यापही पासून सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढे, नाले तसेच आसपासच्या परिसरातून पाणी येत असल्याने हा साठा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला २२ मिमी, पानशेत ८४ मिमी, वरसगाव ७५  मिमी तर टेमघर धरणात ६० मिमी पावसाची नोंद गेल्या २४ तासात झाली आहे.

Rain in Dams | पुणे शहरात 26 जुलै पर्यंत पाणीकपात नाही  | महापालिका प्रशासनाचा निर्णय 

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे शहरात 26 जुलै पर्यंत पाणीकपात नाही

| महापालिका प्रशासनाचा निर्णय

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणा मधील पाणी साठा कमी झाल्याने पुणे महानगरपालिकेने दिनांक ४ ते ११ जुलै दरम्यान एक दिवसा आड पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक जाहीर केले होते. तद्नंतर १० तारखेला असलेल्या आषाढी एकादशी आणि  बकरी ईद विचारात घेता दिनांक ८ ते ११ जुलै पर्यंत दररोज पाणी पुरवठा नियमित पणे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आजमितीस चारही धरणा मधील पाणी साठा विचारात घेता दिनांक ११ जुलै पासून दिनांक २६ जुलैपर्यंत दररोज पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. दिनांक २६  जुलै नंतर पाणी  वाटपा बाबतचा निर्णय त्या वेळेच्या धरणांमधील असलेल्या पाणी साठ्याचा विचार करून घेण्यात येऊन तो अलाहिदा कळवण्यात येईल, असे अनिरुद्ध पावसकर  मुख्य अभियंता  (पाणीपुरवठा), यांनी कळवले आहे.

| धरणात 7.74 TMC पाणी जमा

दरम्यान शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळीतील 4 धरणामध्ये 7.74 tmc पाणी जमा झाले आहे. मागील वर्षी याच दिवसात 8.66 tmc पाणी होते. धरण क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून संततधार सुरु आहे. त्यामुळे धरणामध्ये दररोज 1 टीएमसी पाण्याची वाढ होत आहे. या पावसामुळे पुणेकरांनी मोकळा श्वास घेतला आहे.

Pune Rain | खडकवासला साखळीतील चार धरणात जमा झाले ७ टीएमसी पाणी!  | पाणीकपाती पासून पुणेकरांची होणार सुटका 

Categories
Breaking News PMC social पुणे

खडकवासला साखळीतील ४ चार धरणात जमा झाले ७ टीएमसी पाणी!

| पाणीकपाती पासून पुणेकरांची होणार सुटका

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडवासाला या चारही धरणाचा एकूण पाणीसाठा ६.९५ टीएमसी  झाला आहे. दरम्यान आता हे पाणी आगामी ५ महिने पुरेल इतके आहे. त्यामुळे आता पुणे शहरात पाणीकपात होईल, अशी शक्यता  दिसत नाही. असे प्रशासनातील सूत्रांनी स्पष्ट केले.

खडकवासला धरण साखळीतील ४ धरणातील पाणी खूप कमी झाले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरात एक दिवसाआड पाणी सुरु केले होते. मात्र ईद आणि आषाढी एकादशी मुळे तात्पुरती त्याला स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता धरण क्षेत्रात वाढणारा पाण्याचा साठा पाहून पाणी कपात होईल असे चित्र दिसत नाही. ह पुणेकरांसाठी दिलासाच आहे.

धरणातील पाणी साठा २ जुलै रोजी २.५१ टीएमसी पर्यंत खाली आला होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून या चारही धरणात पावसाला सुरुवात झाली होती.  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने आता ५  महिन्यांचे पाणी वाढले आहे. सोमवारी सायंकाळी हा पाणीसाठा २.७६ टीएमसी होता तो मंगळवारी सकाळी ०.२० ने वाढून २.९६ झाला  तर बुधवारी सकाळी हा पाणी साठा ३.६७ टीएमसी झाला. गुरुवारी सायंकाळी हा पाणी साठा ४.९३ टीएमसी झला होता. शनिवारी सायंकाळी हा साठा ६.९५ टीएमसी इतका झाला आहे. या चारही धरणात अद्यापही पासून सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढे, नाले तसेच आसपासच्या परिसरातून पाणी येत असल्याने हा साठा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला २२ मिमी, पानशेत ८५ मिमी, वरसगाव ८६  मिमी तर टेमघर धरणात १०० मिमी पावसाची नोंद गेल्या २४ तासात झाली आहे.