Pune Fire News | सुसगाव येथे कामगारांच्या झोपड्यांना आग | ३ सिलेंडरचा स्फोट तर २८ सिलेंडर जळाल्याची घटना

Categories
Breaking News social पुणे

Pune Fire News | सुसगाव येथे कामगारांच्या झोपड्यांना आग | ३ सिलेंडरचा स्फोट तर २८ सिलेंडर जळाल्याची घटना

Pune Fire News – (The Karbhari News Service) – पुणे – सुसगाव येथे कामगारांच्या झोपड्यांना आग लागल्याची घटना आज घडली. यात ३ सिलेंडरचा स्फोट तर २८ सिलेंडर जळाल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या वतीने देण्यात आली.

 

सकाळी १०•३९ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात सुस गाव येथे शेल पेट्रोल पंपाजवळ बेलाकासा इमारत येथे असलेल्या कामगारांच्या झोपड्यांना आग लागल्याची वर्दि मिळताच पुणे अग्निशमन दलाकडून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन औंध, पाषाण, कोथरुड, वारजे येथील अग्निशमन वाहने तसेच एक वाॅटर टँकर आणि पीएमआरडीए दोन अग्निशमन वाहन व वॉटर टँकर व हिंजवडी एमआयडीसी अग्निशमन वाहन अशी एकुण ०९ वाहने रवाना करण्यात आली होती.

घटनासथळी पोहोचताच सदर ठिकाणी पञ्याचे शेड असलेल्या झोपड्यांना मोठी आग असल्याचे जवानांनी पाहिले व तातडीने प्रथमत: आतमध्ये कोणी अडकले आहे का हे पाहत आगीवर चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला व आग इतरञ इतर झोपड्यांमध्ये पसरु नये याची विषेश खबरदारी घेऊन सुमारे तासाभरात आग आटोक्यात आणत पुढील धोका दुर केला. सदर आगीमध्ये तीन घरगुती सिलेंडरचा स्फोट होऊन आग भडकल्याचे निदर्शनास आले. तसेच घटनास्थळी घरगुती वापराचे छोटे मोठे असे एकुण २८ सिलेंडर जळाले. यामध्‍ये अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने कोणीही जखमी वा जिवितहनी झालेली नाही. कामगारांच्या एकुण ५० झोपड्या असून २० झोपड्या जळाल्या तर इतर ३० झोपड्यांना दलाच्या जवानांनी हानी होऊन दिली नाही. कामगारांच्या झोपड्यातील घरगुती साहित्य व गृहोपयोगी वस्तू पुर्णपणे जळाल्याने मोठे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

या कामगिरीत अग्निशमन दल प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर, शिवाजी मेमाणे, कमलेश सनगाळे व सुमारे तीस-चाळीस जवानांनी आगीवर नियंञण मिळवत पुढील अनर्थ टाळला.

—-
“आमच्या जवानांनी वेळेत पोहोचत आग इतरञ पसरु न देता मोठा धोका टाळला. सिलेंडर मोठ्या प्रमाणात असल्याने जर त्यांचा ही स्फोट झाला असता तर मोठी हानी झाली असती. जवानांच्या तत्परतेमुळे मोठी घटना टळली.”

देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महानगरपालिका

 Disaster management training for 2250 security guards in Pune Municipal Corporation!

Categories
Breaking News PMC पुणे

 Disaster management training for 2250 security guards in Pune Municipal Corporation!

 |  Training started from last 15 days

 PMC Security Department |  Disaster Management |  Training and demonstration has been organized for the employees of PMC Security Department through PMC Fire Department and Disaster Management Cell of Pune Municipal Corporation.  A total of 2250 personnel including 1562 private security guards, security guards from Education Board and permanent security guards from Security Department were trained for this programme.  This information was given by security officer Rakesh Vitkar (Rakesh Vitkar PMC).  (Pune Municipal Corporation (PMC)
 This training has been organized to provide information about disaster to the security guards of Pune Municipal Corporation.  This training will be conducted from January 29 to February 20.  60 employees are trained every day from 10 am to 5 pm in the old GB Hall of the Municipal Corporation.  Officials from fire brigade, disaster management force as well as officers from Yashda are involved in imparting this training.  At the same time, the security personnel are also being made aware of their rights and duties on behalf of security officer Rakesh Vitkar.  (Pune PMC News)
 This training given by  Rakesh Witkar Security Officer, Shivaji Bokhare Administration Officer, Disaster Management,  Gajanan Pathrudkar Divisional Fire Officer, and Vivek Naidu in the presence of Disaster Management Officer Yashda Pune.

Fire NOC | PMC Pune | फायर एनओसी बाबतच्या तक्रारी टाळण्यासाठी महापालिका आयुक्तांकडून नवीन नियमावली!

Categories
Breaking News PMC social पुणे

Fire NOC | PMC Pune | फायर एनओसी बाबतच्या तक्रारी टाळण्यासाठी महापालिका आयुक्तांकडून नवीन नियमावली!

Fire NOC | PMC Pune | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) क्षेत्रांत येणाऱ्या विविध प्रकारच्या व सर्व उंच इमारतींचे बांधकाम नकाशे मंजूर करण्यापूर्वी प्राथमिक अग्निशमन दाखला देण्यात येतो. तसेच भोगवटा पत्र देणेपूर्वी पुणे महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत (PMC Fire Brigade Department) अग्निशमन सेवा शुल्क आकारून अंतिम अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येते. मात्र अंतिम दाखला देताना हेरफार केल्याची उदाहरणे निदर्शनास आली आहेत. याबाबत महापालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हे टाळण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी नवीन नियमावली जारी केली आहे. (Pune Municipal Corporation News)
महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा अधिनियम २००६ कलम ३ (२) व ४ (१) तसेच एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहनपर नियमावली २०२० नुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रांत येणाऱ्या विविध प्रकारच्या व सर्व उंच इमारतींचे बांधकाम नकाशे मंजूर करण्यापूर्वी प्राथमिक अग्निशमन दाखला देण्यात येतो. तसेच भोगवटा पत्र देणेपूर्वी पुणे महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत अग्निशमन सेवा शुल्क आकारून अंतिम अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येते. प्राथमिक अग्निशमन ना हरकत दाखल्यामध्ये नमुद केलेल्या अग्निशमन यंत्रणेचे काम संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, मुंबई यांनी परवाना दिलेल्या फायर लायसन्स एजन्सी यांच्या कडून केले जाते. तथापी, फायर लायसन्स एजन्सी अग्निशमन यंत्रणेचे काम करतांना मंजुर बांधकाम नकाशानुसार जागेवर बांधकाम नसतांना देखील अग्निशमन यंत्रणेचे काम करणे, अग्निशमन यंत्रणेचे चुकीच्या पध्दतीने काम करणे, भारतीय मानांकनाचे (ISI Mark) अनुपालन न
करता अग्निशमन यंत्रणेचे काम करणे, फायर लायसन्स एजन्सी स्वतः अग्निशमन यंत्रणेचे काम न करता “फॉर्म-अ/ फॉर्म-ब” अदा करणे व दोन फायर लायसन्स एजन्सींनी काम केल्यामुळे संबंधितांवर जबाबदारी निश्चित करणे अडचणीचे होणे अशा बाबी घडल्याचे निदर्शनास आले आहे. यातून तक्रारीचे प्रसंग उद्भवले आहेत. या  बाबी टाळण्यासाठी कार्यपद्धतीत सुसूत्रता आणली आहे. (PMC Pune News)

अग्निशमन यंत्रणेचे काम करण्यापूर्वीची कार्यपध्दती (प्राथमिक अग्निशमन दाखल्यासाठी)
१) बांधकाम नकाशे मंजुरी असल्याची तसेच जागेवरील बांधकाम मंजुर बांधकाम नकाशानुसार झाले आहे किंवा नाही (जसे साईड मार्जीन, जीन्याची रुंदी, पॅसेज वॉटर टँक इत्यादी) याची खात्री करुनन फायर लायसन्स एजन्सी यांनी अग्निशमन यंत्रणा उभारणीचे प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी.
२) प्राथमिक अग्निशमन ना-हरकत दाखल्यात नमुद केल्याप्रमाणे अग्निशमन यंत्रणेचे काम जागेवर सुरु करण्यापूर्वी अग्निशमन यंत्रणेच्या कामाचा नकाशे तयार करुन ते अग्निशमन विभागा कडून मंजुर करुनच लायसन्स एजंसी णे तयार केलेले अग्निशमन यंत्रणेचे काम प्रत्यक्ष जागेवर सुरु करण्यात यावेत.
३) नियमितीकरण बांधकामाच्या अग्निशमन यंत्रणेचे काम सुरु करण्यापूर्वीदेखील अग्निशमन यंत्रणेच्या कामाचे नकाशे तयार करुन ते अग्निशमन विभागाकडून मंजुर करुनच अग्निशमन यंत्रणेचे काम जागेवर सुरु करण्यात यावेत.
४) अग्निशमन यंत्रणेचे काम करतांना आवश्यक त्या सर्व ठिकाणी / वापरण्यात येणाऱ्या उपकरणांसाठी भारतीय मानंकनाचे (ISI Mark) अनुपालन करावे. तसेच या यंत्रणेचे काम करताना वापरण्यात येणारे साहित्याचा मेक व तांत्रिक माहिती स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक राहील.

अग्निशमन यंत्रणेचे काम केल्यानंतर करावयाची कार्यपध्दती (अंतिम अग्निशमन ना- हरकत दाखल्यासाठी)
१) अग्निशमन यंत्रणेचे काम जागेवर पूर्ण झाल्यानंतर फायर लायसन्स एजन्सी यांनी प्रथम अग्निशमन यंत्रणेची चाचणी घेऊन चाचणी यशस्वीरित्या पार पडल्यावर सदर चाचणीस समधानकारक असल्यास त्याबातचे विकासकाचे प्रमाणपत्र घेऊन फायर लायसन्स एजन्सी यांनी विकासक यांना फॉर्म अ अदा करावा.
२) अंतिम अग्निशमन ना हरकत प्रस्तावासाठी प्रस्ताव दाखल करतांना जागेवर काम करण्यात आल्याप्रमाणे अग्निशमन यंत्रणेच्या कामाचे नकाशे (Fire System Layout) व Hydraulic Calculation सादर करणे आवश्यक राहिल.
३) अग्निशमन विभागाने दिलेली चेक लिस्ट नुसार अंतिम अग्निशमन ना-हरकत प्रस्ताव सादर करावा.
४) अग्निशमन यंत्रणेचे काम एकापेक्षा अधिक फायर लायसन्स एजन्सी यांनी केले असल्यास कोणत्या एजन्सी यांनी कोणते काम केले आहे याबाबत मेक व तांत्रिक माहितीसह स्पष्ट उल्लेख असावा. अशा एजंसीची नावे अंतिम ना-हरकत दाखल्यात दाखल करण्यात येतील
५) अपूर्ण अग्निशमन यंत्रणेचे काम करतांना पूर्वीच्या फायर लायसन्स एजन्सी यांनी केलेल्या कामाबातचा तपशिल व अग्निशमन कायद्याप्रमाणे आवश्यक Form-A विकासकामार्फत सादर करणे आवश्यक आहे.
६) अग्निशमन यंत्रणेचे काम करतांना वापरण्यात आलेल्या अग्निशमन पंपाची क्षमता, पंपाचा सिरियल नंबर, पॅनल डिटेल्स याचा समावेश असणे अत्यावश्यक राहील तसेच फायर हायड्रन्ट, डिटेक्शन स्पिन्कलर्स, पाईप्स, फायर डोअर ( Fire Door) यांचे मेक, क्षमता व संख्या तसेच आवश्यकतेनुसार सिरियल नंबर उपलब्धे नुसार “FORM-A” मध्ये नमुद करणे आवश्यक राहील.

PMC Building Lift | तब्बल 2 तासांनी महापालिका भवनातील लिफ्ट मध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका | लिफ्ट च्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Building Lift | तब्बल 2 तासांनी महापालिका भवनातील लिफ्ट मध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका

| लिफ्ट च्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

PMC Building Lift | पुणे | महापालिका भवनातील लिफ्ट (Pune Municipal Corporation Building Lift) चा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण महापालिका भवनात तिसऱ्या मजल्यावरील आरोग्य विभागाकडील बाजूची लिफ्ट अचानक बंद पडली. यात महापालिकेचा कर्मचारी अडकून पडला. सुमारे दोन तास हा कर्मचारी अडकून पडला होता. अखेर विद्युत विभाग आणि अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) शर्तीच्या प्रयत्नाने लिफ्ट सुरळीत करण्यात यश मिळाले आणि त्या कर्मचाऱ्याची सुटका झाली. मात्र यामुळे महापालिकेच्या लिफ्ट च्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Pune Municipal Corporation)
महापालिका गाडीखाण्यातील एक कर्मचारी महापालिका भवनातील आरोग्य विभागात आला होता. मात्र माघारी जाताना 5 वाजण्याच्या सुमारास हा कर्मचारी लिफ्ट बंद पडल्याने त्यातच अडकून पडला. संबंधित कर्मचाऱ्याने मग आपल्या सहकाऱ्यांना फोन केला. त्यानुसार मग विद्युत विभागाचे कर्मचारी आले. मात्र जवळपास तासभर खटपट करून त्यांना लिफ्ट सुरु करता आली नाही. त्यामुळे मग अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत हा कर्मचारी बराच घाबरून गेला होता. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील तासभर प्रयत्न करावे लागले. तेव्हा कुठे लिफ्ट सुरु होऊन संबंधित कर्मचाऱ्याला बाहेर काढता आले. 7 वाजण्याचा सुमारास हा कर्मचारी बाहेर आला. मात्र घाबरला असल्याने कर्मचारी घामाघूम होऊनच बाहेर आला. असे असले तरी यामुळे महापालिकेच्या लिफ्ट चा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (PMC Health Department)
या अगोदर देखील अशा घटना घडल्या आहेत. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील लिफ्ट महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अडकून पडले होते. तसेच त्याआधी कमला नेहरू हॉस्पिटल मधील लिफ्ट बंद पडल्याने रुग्णांची हेळसांड झाली होती. त्यामुळे याकडे प्रशासनाने गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे. (PMC Electrical Department)
—-
लिफ्ट सुरु करण्यास एवढा वेळ का लागला याबाबत पूर्ण चौकशी करण्यात येईल. त्यानंतर संबंधित लोकांवर कारवाई करण्यात येईल.

श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग, पुणे मनपा 
—-