PMC Building Lift | तब्बल 2 तासांनी महापालिका भवनातील लिफ्ट मध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका | लिफ्ट च्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

PMC Building Lift | तब्बल 2 तासांनी महापालिका भवनातील लिफ्ट मध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका

| लिफ्ट च्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

PMC Building Lift | पुणे | महापालिका भवनातील लिफ्ट (Pune Municipal Corporation Building Lift) चा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण महापालिका भवनात तिसऱ्या मजल्यावरील आरोग्य विभागाकडील बाजूची लिफ्ट अचानक बंद पडली. यात महापालिकेचा कर्मचारी अडकून पडला. सुमारे दोन तास हा कर्मचारी अडकून पडला होता. अखेर विद्युत विभाग आणि अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) शर्तीच्या प्रयत्नाने लिफ्ट सुरळीत करण्यात यश मिळाले आणि त्या कर्मचाऱ्याची सुटका झाली. मात्र यामुळे महापालिकेच्या लिफ्ट च्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Pune Municipal Corporation)
महापालिका गाडीखाण्यातील एक कर्मचारी महापालिका भवनातील आरोग्य विभागात आला होता. मात्र माघारी जाताना 5 वाजण्याच्या सुमारास हा कर्मचारी लिफ्ट बंद पडल्याने त्यातच अडकून पडला. संबंधित कर्मचाऱ्याने मग आपल्या सहकाऱ्यांना फोन केला. त्यानुसार मग विद्युत विभागाचे कर्मचारी आले. मात्र जवळपास तासभर खटपट करून त्यांना लिफ्ट सुरु करता आली नाही. त्यामुळे मग अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत हा कर्मचारी बराच घाबरून गेला होता. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील तासभर प्रयत्न करावे लागले. तेव्हा कुठे लिफ्ट सुरु होऊन संबंधित कर्मचाऱ्याला बाहेर काढता आले. 7 वाजण्याचा सुमारास हा कर्मचारी बाहेर आला. मात्र घाबरला असल्याने कर्मचारी घामाघूम होऊनच बाहेर आला. असे असले तरी यामुळे महापालिकेच्या लिफ्ट चा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (PMC Health Department)
या अगोदर देखील अशा घटना घडल्या आहेत. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील लिफ्ट महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अडकून पडले होते. तसेच त्याआधी कमला नेहरू हॉस्पिटल मधील लिफ्ट बंद पडल्याने रुग्णांची हेळसांड झाली होती. त्यामुळे याकडे प्रशासनाने गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे. (PMC Electrical Department)
—-
लिफ्ट सुरु करण्यास एवढा वेळ का लागला याबाबत पूर्ण चौकशी करण्यात येईल. त्यानंतर संबंधित लोकांवर कारवाई करण्यात येईल.

श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग, पुणे मनपा 
—-