Sadhu Wasvani Bridge | साधू वासवानी पूल पाडून नव्याने बांधणार पुणे महापालिका  | 83 कोटींचा खर्च येणार 

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

Sadhu Wasvani Bridge | साधू वासवानी पूल पाडून नव्याने बांधणार पुणे महापालिका

| 83 कोटींचा खर्च येणार

Sadhu Wasvani Bridge | साधू वासवानी पूल (Sadhu Wasvani Bridge) (कोरेगाव पार्क) ते बंडगार्डन पुलापर्यंत एकात्मिक वाहतूक आराखडा (Integrated Transport Plan) तयार करणेच्या अनुषंगाने साधू वासवानी पूल पाडून नव्याने बांधला जाणार आहे.  कलम ७२ (ब) प्रमाणे हे काम केले जाणार आहे. या कामासाठी 83 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून (Pune Civic Body) स्थायी समिती (Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (Sadhu Wasvani Bridge)

या कामासाठी सन २०२३-२४ चे अंदाजपत्रकात उपलब्ध तरतूद २० कोटी इतकी आहे.  तसेच प्रकल्पीय तरतूद ८०.०० कोटी इतकी मान्य आहे. या कामासाठी तज्ञ सल्लागार कॅशेक इंजिनिअरिंग प्रा. लि. यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने त्यांना या कामासाठी  कार्यादेश देण्यात आलेला आहे. तज्ञ सल्लागार यांना या कामासाठी पुगप रक्कमेच्या १.५०% प्रमाणे सल्लागार फी र.रु.८७,१७,०००/- अदा करावी लागणार आहे. (Pune Municipal Corporation)

या कामासाठी अंदाजे ८३ कोटी इतकी प्रकल्पीय तरतूद आवश्यक आहे. तसेच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, एस.एम.सी. इन्फ्रा. प्रा. लि. यांनी ( तडजोडीने ) ५६,१८,१६,२८६.०० इतक्या रक्कमेची लम्पसम निविदा सादर केली असून ती मान्यतेकरिता  स्थायी समितीकडे सादर करण्यात आली आहे. या पुलाचे काम दोन वर्षात (पावसाळा सोडून) पूर्ण करण्याचे नियोजन आहे.  पुढील दोन वर्षांच्या अंदाजपत्रकामध्ये या कामासाठी लागणारी तरतूद टप्प्याटप्प्याने उपलब्ध करणे गरजेचे आहे. यासाठी हा प्रस्ताव मंजूरीसाठी स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. (PMC Pune Marathi News)
—-
News Title |Sadhu Wasvani Bridge | Pune Municipal Corporation will demolish Sadhu Vaswani Bridge and build a new one| 83 crore will be spent