Tag: pune fire brigade
PMC Fire Department warns punekar… If buildings and establishments do not have a fire system…!
PMC Fire Department | इमारतींना आणि आस्थापनांना फायर यंत्रणा नसेल तर …! पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचा नागरिकांना इशारा
Pune Fire Brigade | अग्निशमन दल घेणार “अग्निसुरक्षित गणेश मंडळ” आढावा
| गणेश मंडंळाना नोंदणी करण्याचे आवाहन
पुणे – यावर्षी पहिल्यांदाच पुणे अग्निशमन दल (PUNE FIRE BRIGADE) व फायर अँन्ड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया (FSAI) यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील गणेशोत्सवाच्या काळात गणपती मंडळांनी आपले मंडळ आगीपासून सुरक्षित कसे आहे व त्याकरिता मंडळे काय उपाययोजना करतात याबाबत “अग्निसुरक्षित गणेश मंडळ” म्हणून एक स्पर्धा घेण्याचे ठरविले असून त्यामागचे उदिष्ट असे की, गणेशोत्सवाच्या काळात शक्यतो मंडळाच्या ठिकाणी कुठेही आग वा अपघात घडू नये याबाबत जागरूक राहून येणारे असंख्य भाविक यांची ही सुरक्षितता कायम राहावी. त्याबाबत सार्वजनिक मंडळांनी नोंदणी (GOOGLE FORM) करण्याचे आवाहन अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे (Devendra Potphode) यांनी केले आहे.
अग्निशमन दल व एफएसएआय (FSAI) संयुक्तरित्या पुढाकार घेऊन शहरात आग व अपघातापासून मंडळे सुरक्षित कशी राहावीत आणि जनमानसात याबाबत जागृती व्हावी या दृष्टीकोनातून हि संकल्पना साकारली आहे. मंडळांनी नोंदणीच्या करतेवेळी दिलेल्या अर्जामधे माहिती भरुन दिल्यावर त्याची छाननी होऊन अग्निशमन दलाकडील अग्निशमन अधिकारी आणि एफएसएआय संस्थेचे सदस्य हे प्रत्यक्ष मंडळांना भेटी देऊन पाहणी करतील व त्यानंतर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक असे बक्षीस जाहिर केले जाईल. तरी शहरातील जास्तीत जास्त मंडळाने सहभाग घ्यावा यासाठी आवाहन केले जात आहे.
https://forms.gle/RJ3nDrUBukAsFVkHA
Pune Fire Audit | पुणे शहरातील वर्दळीच्या तसेच अरुंद भागांचे होणार फायर ऑडिट!
| पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुणे महापालिकेला निर्देश
Pune Fire Audit | पुणे शहरात (Pune Fire) आगीच्या घटनांचे प्रमाण वाढताना दिसते आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant patil) यांनी शहरातील वर्दळीच्या भागांचे तसेच अशाप्रकारच्या अरुंद भागांचे फायर ऑडिट (Fire audit in pune) करण्याचे निर्देश महापालिका (Pune Municipal corporation) आणि अग्निशमन विभागाला (PMC pune Fire brigade) दिले आहेत. (Pune fire Audit)
काही दिवसांपूर्वी पुणे येथील टिंबर मार्केटमध्ये (Timber Market Pune) फर्निचर गोदामात भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कालही मध्यरात्री मार्केट यार्ड (Market Yard) मधील कागद आणि पुठ्ठा साठवणुक असणाऱ्या गोदामाला आग लागल्याची माहिती मिळाली. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला (pune fire brigade) यश आले आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांची दखल घेऊन, शहरातील वर्दळीच्या भागांचे तसेच अशाप्रकारच्या अरुंद भागांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आणि अग्निशमन विभागाला दिले आहेत. (Pune News)
News Tittle |Pune Fire Audit | There will be a fire audit of busy and narrow areas in the city of Pune!| Guardian Minister Chandrakant Patil’s instructions to Pune Municipal Corporation