Pune Fire News | सुसगाव येथे कामगारांच्या झोपड्यांना आग | ३ सिलेंडरचा स्फोट तर २८ सिलेंडर जळाल्याची घटना

Categories
Breaking News social पुणे

Pune Fire News | सुसगाव येथे कामगारांच्या झोपड्यांना आग | ३ सिलेंडरचा स्फोट तर २८ सिलेंडर जळाल्याची घटना

Pune Fire News – (The Karbhari News Service) – पुणे – सुसगाव येथे कामगारांच्या झोपड्यांना आग लागल्याची घटना आज घडली. यात ३ सिलेंडरचा स्फोट तर २८ सिलेंडर जळाल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या वतीने देण्यात आली.

 

सकाळी १०•३९ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात सुस गाव येथे शेल पेट्रोल पंपाजवळ बेलाकासा इमारत येथे असलेल्या कामगारांच्या झोपड्यांना आग लागल्याची वर्दि मिळताच पुणे अग्निशमन दलाकडून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन औंध, पाषाण, कोथरुड, वारजे येथील अग्निशमन वाहने तसेच एक वाॅटर टँकर आणि पीएमआरडीए दोन अग्निशमन वाहन व वॉटर टँकर व हिंजवडी एमआयडीसी अग्निशमन वाहन अशी एकुण ०९ वाहने रवाना करण्यात आली होती.

घटनासथळी पोहोचताच सदर ठिकाणी पञ्याचे शेड असलेल्या झोपड्यांना मोठी आग असल्याचे जवानांनी पाहिले व तातडीने प्रथमत: आतमध्ये कोणी अडकले आहे का हे पाहत आगीवर चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला व आग इतरञ इतर झोपड्यांमध्ये पसरु नये याची विषेश खबरदारी घेऊन सुमारे तासाभरात आग आटोक्यात आणत पुढील धोका दुर केला. सदर आगीमध्ये तीन घरगुती सिलेंडरचा स्फोट होऊन आग भडकल्याचे निदर्शनास आले. तसेच घटनास्थळी घरगुती वापराचे छोटे मोठे असे एकुण २८ सिलेंडर जळाले. यामध्‍ये अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने कोणीही जखमी वा जिवितहनी झालेली नाही. कामगारांच्या एकुण ५० झोपड्या असून २० झोपड्या जळाल्या तर इतर ३० झोपड्यांना दलाच्या जवानांनी हानी होऊन दिली नाही. कामगारांच्या झोपड्यातील घरगुती साहित्य व गृहोपयोगी वस्तू पुर्णपणे जळाल्याने मोठे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

या कामगिरीत अग्निशमन दल प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर, शिवाजी मेमाणे, कमलेश सनगाळे व सुमारे तीस-चाळीस जवानांनी आगीवर नियंञण मिळवत पुढील अनर्थ टाळला.

—-
“आमच्या जवानांनी वेळेत पोहोचत आग इतरञ पसरु न देता मोठा धोका टाळला. सिलेंडर मोठ्या प्रमाणात असल्याने जर त्यांचा ही स्फोट झाला असता तर मोठी हानी झाली असती. जवानांच्या तत्परतेमुळे मोठी घटना टळली.”

देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महानगरपालिका

Pune Fire Audit | पुणे शहरातील वर्दळीच्या तसेच अरुंद भागांचे होणार फायर ऑडिट!

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Fire Audit | पुणे शहरातील वर्दळीच्या तसेच अरुंद भागांचे होणार फायर ऑडिट!

| पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुणे महापालिकेला निर्देश

Pune Fire Audit | पुणे शहरात (Pune Fire) आगीच्या घटनांचे प्रमाण वाढताना दिसते आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant patil) यांनी शहरातील वर्दळीच्या भागांचे तसेच अशाप्रकारच्या अरुंद भागांचे फायर ऑडिट (Fire audit in pune) करण्याचे निर्देश महापालिका (Pune Municipal corporation) आणि अग्निशमन विभागाला (PMC pune Fire brigade) दिले आहेत. (Pune fire Audit)

काही दिवसांपूर्वी पुणे येथील टिंबर मार्केटमध्ये (Timber Market Pune) फर्निचर गोदामात भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कालही मध्यरात्री मार्केट यार्ड (Market Yard) मधील कागद आणि पुठ्ठा साठवणुक असणाऱ्या गोदामाला आग लागल्याची माहिती मिळाली. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला (pune fire brigade) यश आले आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांची दखल घेऊन, शहरातील वर्दळीच्या भागांचे तसेच अशाप्रकारच्या अरुंद भागांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आणि अग्निशमन विभागाला दिले आहेत.  (Pune News)


News Tittle |Pune Fire Audit | There will be a fire audit of busy and narrow areas in the city of Pune!| Guardian Minister Chandrakant Patil’s instructions to Pune Municipal Corporation