Manikrao Thackeray Congress | निवडणुक आयोगाचा‌ गळा भाजपच्या हाती – माणिकराव ठाकरे यांची‌ टिका

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Manikrao Thackeray Congress | निवडणुक आयोगाचा‌ गळा भाजपच्या हाती – माणिकराव ठाकरे यांची‌ टिका

 

Manikrao Thackeray Congress – (The Karbhari News Service) – सर्वांना न्याय‌ मिळावानिवडणु प्रक्रीया निपक्षपातीपणे व्हावीयासाठी निवडणुक आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्रआज निवडणुक आयोगाचा गळा भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या हातात ठेवला आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाकडून निपक्षपातीपणे कामकाज होईलयाची शास्वती नाही. संविधानिक संस्था निस्तनाबुथ करण्याचे काम भाजपकडून केले जात आहेअशी‌ टीका अखल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केली.

 

पुणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडी काँग्रेसचे उमेदवार आ. रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदेगोपाळ तिवारी,अजित दरेकर,संजय बालगुडे नीता परदेशी, सुजित यादव, रफिक शेख, श्री पोळेकर, श्री मेहबूब नदाफ, गुलाम हुसेन, राज अंबिके उपस्थित होते.

 

ठाकरे म्हणालेलोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात १०२ जागांसाठी मतदान झाले. यामध्ये इंडिया आघाडीला यश मिळतेयहे समोर येत आहे. केंद्र सरकारवर जनतेची नाराजी असल्यामुळे ७६ लाख लोकांनी मतदान केले नाही. ग्रामीण भागात व तरुणांमध्ये मोदी सरकारबद्दल रोष आहे. भाजपच्या पायाखालची वाळू घसरत असल्याने ते समाजामध्ये वाद निर्माण करण्याचे काम करत आहे. पंतप्रधान देशाचे असताना ते हिंदु मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करत आहेत. आमच्या जाहीर नाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहेअशी टिका पंतप्रधानांनी करणे दुदैवी आहे. आमच्या जाहीर नाम्यामध्ये मुस्लिमांबद्दल कुठेही उल्लेख नाही. त्यांच्या या विधानाने आमच्या न्याय पत्राला (जाहीरनाम्याला) प्रसिद्धी मिळाली.

 

पहिल्या‌ टप्प्यात विदर्भातील सर्व पाच जागा इंडिया आघाडी‌ जिंकणार आहे. संपूर्ण राज्यात व देशात काँग्रेस व इंडिया आघाडीला‌ चांगले दिवस आहेत.

 

शेतकऱ्यांना लागणाऱ्या प्रत्येक बाबींची किंमतीत वाढझालेली आहे. शेतमालास भाव नाहीत्यामुळे शेतकरी‌ त्रस्त आहे.

देशातील संस्था विकण्याचा धडाका‌ सुरू आहे. देशात महिला‌ सुरक्षित नाहीतयाचे परिणाम या निवडणुकीत दिसतील. आघाडीमध्ये‌ सर्वत्र एकोप्याचे चित्र आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आघाडीचे चारही उमेदवार चांगल़्या मताने निवडून येतील.

 

काँग्रेसने न्याय पत्र म्हणून आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

 

मोदी यांच्या‌ सत्ताकाळात ३० लाख नोकऱ्या‌ थांबल्या आहेत. इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर सहा महिन्यातच या नोकऱ्यांची भरती‌केली जाईल. आमच्या‌ न्याय पत्रातशेतकऱ्यांची‌कर्जमाफी करू,स्वामीनाथन समितीच्या‌ सिफारशि स्विकारू,  महिलांसाठी महालक्ष्मीयोजने अंतर्गत महिलेच्या खात्यात दर वर्षी एक लाख रूपयेआरोग्यासाठी २५ लाख रुपयेआदींचा उल्लेख न्यायपत्रात आहे. हा जाहीरनामा अतिशय‌ चांगला‌ आहे. भाजपने आश्वासने दिली पण ती पाळली नाहीतत्यामुळे  भाजपची चारशे पारची घोषणा पोकळ असून ते २०० सुद्धा पार करणार नाहीत. भाजपच्या जाहीरनाम्यावर लोकांचा विश्वास नाही. त्यांनी दिलेली गॅरंटी फसवी आहेहे लोकांच्या लक्षात आले आहे. जाहीरनाम्यातील तरतुदी काँग्रेस पक्षाच्या‌ सरकारने कर्नाटकतेलंगणा येथे पूर्ण केल्या आहेतअसेही ठाकरे म्हणाले.

 

काँग्रेस सत्तेवर आल्यास देशातील महिलांचे मंगळसूत्र राहणार नाहीहे नरेंद्र मोदी‌ यांचे मत त्यांचा तोल सुटल्याचे द्योतक आहे. वरीष्ठ पद भुषविणाऱ्या‌ व्यक्तीने असे बोलणे दुर्दैवी असून त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहेअसेही‌ते म्हणाले.

प्रारंभी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी माणिकराव ठाकरे यांचे स्वागत केले. राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविक केले.

 

————–

दोन पक्ष फोडल्याचे परिणाम दिसतील:

 

फडणवीस व भाजपने सुड उगवून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडले. पवार साहेबांच्या‌ पुण्यास मोदी‌शहांनी मदत करून पक्ष व चिन्ह काढून घेणेषडयंत्र रचणे लोकांना पटलेलं नाही. षडयंत्र करणारे कोण आहेतमाहिती आहे. अजित पवार व एकनाथ शिंदे‌ केवळ मोहरे आहेत. उमेदवार बदललेस्वाभिमान शिल्लक राहिला नाही. अजित पवारांना चार उमेदवार दिले त्यातही दोन उमेदवार भाजपने दिले.

 

———

शिंदे – पवारांनी पायावर दगड मारून घेतला :

 

अजित पवार पूर्वी राज्यातील निवडणुकीच्या‌ जागा ठरवत असतपवार साहेब कधीही त्यात हस्तक्षेप करत नव्हते. आज अजित पवारांची आवस्था काय आहेऐवढे मिंधे होण्याची गरज कायभाजपने त्यांना घरातलाच उमेदवार देण्यास भाग पाडले.

उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना काय नाही दिले. सर्व निर्णय शिंदे घेत होते. त्यावेळी या दोघांना जी उंची होती ती आज राहिली नाही. या दोघांनी भाजप सोबत जाऊन स्वत:च्या पायावर दगड मारून घेतला आहे.

 

————–

आघाडीसाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला :

 

देशातील परिस्थिती पाहून काँग्रेसने पुढाकार घेवून आघाडी‌ केली. त्यामुळे आघाडीत कमी जास्त होऊ शकते. सर्वांना सोबत घेवून जाण्याची काँग्रेसची भूमीका आहे. शिवसेना व काँग्रेस नेते एकत्र बसुन सांगली बाबत निर्णय घेतील. शिस्तीच्या बाहेर कोण जाणार नाहीअसेही ते म्हणाले.

 

VVPAT Machine | व्हीव्हीपॅटमध्ये दिसणाऱ्या चिठ्ठी बाबत सोशल मिडीयावर प्रसारित होणाऱ्या संदेशाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

Categories
Breaking News social पुणे

VVPAT Machine | व्हीव्हीपॅटमध्ये दिसणाऱ्या चिठ्ठी बाबत सोशल मिडीयावर प्रसारित होणाऱ्या संदेशाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

 

VVPAT Machine – (The karbhari News Service) –  मतदानांनतर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दिसणाऱ्या चिठ्ठीबाबत व्हॉट्सॲप वरुन एक चित्रफीत व त्यासोबत संदेश प्रसारीत होत असून त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी चाचणी मतदानाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. (Dr Suhas Diwase Pune Collector)

प्रसारीत होत असलेला संदेश हा मतदानाच्या दिवशी, मतदान करताना मतदाराने ज्या पक्षाला मतदान केले आहे त्या पक्षाची चिठ्ठी व्हीव्हीपॅटमध्ये खाली पडताना न दिसल्यास हरकत घेण्याबाबतच्या आशयाचा आहे.

त्या अनुषंगाने एखाद्या मतदाराने त्याने केलेले मतदान हे इतर उमेदवारास दर्शवित असल्याबाबत अभिकथन केले असल्यास सदर मतदारास निवडणूक संचालन नियम १९६१ च्या नियम ४९ एमए अन्वये चाचणी मतदान करणेसाठी प्रतिज्ञापत्र सादर करावयाची तरतुद आहे. तसेच सदर प्रतिज्ञापत्रकात मतदाराने केलेले अभिकथन चुकीचे आढळल्यास भारतीय दंड सहिता कलम १७७ अन्वये दंडात्मक तरतूद असल्याबाबतचेदेखील नमूद आहे, असेही जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
0000

PM Modi in Pune | पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिलला  सभा |  मुरलीधर मोहोळ 25 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

PM Modi in Pune | पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिलला  सभा

|  मुरलीधर मोहोळ 25 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार

 

PM Modi in Pune – (The Karbhsri News Service) – पुणे लोकसभा मतदारसंघासाठी (Pune Loksabha Constituency)  भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय (ए) महायुतीच्या वतीने मुरलीधर मोहोळ (Murlihar Mohol)  गुरुवारी (23 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी पुण्यात सभा होणार असल्याची माहिती आज महायुतीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. (Mahayuti Pune)

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, मनसे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर, आर पी आय चे शहराध्यक्ष संजय सोनावणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जोगेंद्र कवाडे गटाचे प्रकाश भालेराव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे राजाभाऊ कांबळे, लोक जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष संजय आल्हाट, लहुजी शक्ती सेनेचे नितीन वायदंडे, शिवसंग्राम पक्षाचे शहराध्यक्ष भरत लगड,, प्रदेश प्रवक्ते व महायुती समन्वयक संदीप खर्डेकर या वेळी उपस्थित होते.

घाटे म्हणाले, कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून सकाळी नऊ वाजता पदयात्रेला सुरुवात होईल. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पदयात्रेचा समारोप केला जाईल. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि केंद्रीय मंत्री आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते सभेला मार्गदर्शन करणार आहेत. शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हेही या सभेला उपस्थित राहणार आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 तारखेला संध्याकाळी पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर सभा घेणार आहेत. या सभेपूर्वी त्यांचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. हे दोन्ही मोठे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महायुतीच्या सभा आयोजित केल्या होत्या. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक लाख नागरिक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.

मानकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनापासून मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केलेला आहे निवडणुकीसाठी वातावरण खूप चांगले आहे. मुरलीधर मोहोळ हे सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यकर्ते आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी पुणेकरांची सेवा केली. समाजासाठी जीवनदान देणारा हा कार्यकर्ता आहे. त्यामुळे ते चांगल्या मताने निवडून येतील असा विश्वास आहे. बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्राताई पवार, मावळ मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे, पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ मोदींची सभा होणार असून, त्याला चारही मतदारसंघातून मोठा प्रतिसाद मिळेल.

मनसेचे नेते राजेंद्र वागस्कर म्हणाले, रॅलीच्या नियोजनासाठी आम्ही सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये नियोजन करीत आहोत. 27 एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुरलीधर मोहोळ हे अभ्यासू आणि चांगले उमेदवार असून, पुणेकरांच्या आवडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे ते मताधिक्याने विजयी होतील.ही रॅली ही महायुतीच्या विजयाची नांदी असेल असे सर्व पक्षाच्या अध्यक्षांनी सांगितले तसेच महायुतीतील सर्व घटक पक्ष हे एक दिलाने काम करून उमेदवार विजयी करतील असा विश्वास ही यावेळी सर्व पक्षाच्या अध्यक्षांनी व्यक्त केला

Kasba Peth Constituency | कसबा पेठ विधानसभा मतदार संघात ३ लाख ८० हजार रुपये जप्त

Categories
Breaking News Political social पुणे

Kasba Peth Constituency | कसबा पेठ विधानसभा मतदार संघात ३ लाख ८० हजार रुपये जप्त

Kasba Constituency – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत कसबा पेठ विधानसभा मतदार संघात निवडणूक कामासाठी नियुक्त स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत दुपारच्या सुमारास ३ लाख ८० हजार ५०० रुपये इतकी रक्कम हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली आहे. (Pune Loksabha Election)

फरासखाना पोलीस स्टेशन अंतर्गत शनिवार वाडा गेटसमोर आज दुपारी १२ वाजता एका इसमाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली. रकमेबाबत सदर व्यक्तीने योग्य स्पष्टीकरण न दिल्याने ही रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे.

00

Keshavrao Jedhe | शहर काँग्रेसला देशभक्त कै. केशवराव जेधेंचा विसर | जेधे यांचे पणतू कान्होजी जेधे यांनी केली टीका 

Categories
Breaking News cultural Political social

Keshavrao Jedhe | शहर काँग्रेसला देशभक्त कै. केशवराव जेधेंचा विसर | जेधे यांचे पणतू कान्होजी जेधे यांनी केली टीका

 

Keshavrao Jedhe – (The Karbhari News Service) – देशभक्त कै. केशवराव जेधे यांच्या स्वतंत्र चळवळीत सिंहाचा वाटा होता. काकासाहेब गाडगीळ, शंकरराव मोरे या नेत्यांनी बहुजन समाजाला स्वातंत्र्य चळवळीच्या मुख्य प्रवाहात आणले. ऐतिहासिक काँग्रेस भवन उभारणीसाठी जेधे, गाडगीळ, मोरे यांनी पुढाकार घेतला असे असताना त्यांच्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेसने त्यांना अभिवादन सुद्धा केले नाही. अशी टीका जेधे यांचे पणतू कान्होजी जेधे (Kanhoji Jedhe) यांनी केली. (Pune Congress)

दरम्यान 21 एप्रिल  रोजी देशभक्त कै. केशवराव जेधे यांची 128 वी जयंतीच्या निमित्ताने जेधे पुतळा स्वारगेट, पुणे येथे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मा. रवींद्र धंगेकर मा. आमदार व मंत्री रमेश बागवे मा.आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना अध्यक्ष संजय मोरे, माजी महापौर कमल व्यवहारे, मा.नगरसेवक अविनाश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड, कॉंग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी रमेश अय्यर, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल खजिनदार अजय पाटील, केशवराव जेधे यांचे पणतू कान्होजी जेधे व सर्व जेधे परिवार उपस्थित होते. मान्यवरांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले.

Loksabha Election Voting | युवकांनी उत्साहाने लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी व्हावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

Categories
Breaking News social पुणे

Loksabha Election Voting | युवकांनी उत्साहाने लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी व्हावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

 

Loksabha Election Voting – (The Karbhari news Service) – अभिनव कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीचा संदेश देण्यासाठी रेखाटलेल्या भित्तीपत्रक चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले. युवकांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी व्हावे आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन यावेळी डॉ.पुलकुंडवार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय व भारतीय कला प्रसारिणी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, स्वीप समन्वयक अधिकारी अर्चना तांबे, भारतीय कला प्रसारिणीचे पृथ्वीराज पाठक, प्राचार्य राहूल बळवंत उपस्थित होते.

डॉ.पुलकुंडवार म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशातील नागरिकांना मताधिकार मिळाल्याने मतदानाचा दिवस हा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. प्रत्येक नागरिकाला लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होता यावे व पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. मतदानावेळी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नागरिकांनीदेखील लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस म्हणून साजरा न करता लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा करावा. समाजामध्ये बदल घडविण्याची ताकद तरुण पिढीमध्ये असून नवमतदारांनी प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ.पुलकुंडवार यांनी कलेच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकाला मतदानाचे आवाहन करणारे संदेश दिल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांच्या मनात निश्चितपणे मतदान करण्याची भावना निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

डॉ. दिवसे म्हणाले, कला हे प्रभावी माध्यम असल्याने कलेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत प्रभावीपणे संदेश पोहोचविता येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयार केलली भित्तीपत्रके मतदारजागृतीसाठी उपयुक्त ठरतील. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या चित्रांतून मतदानाचा संदेश अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचेल. अन्य माध्यमांचा उपयोग करून ही कलाकृती विविध शासकीय कार्यालयात प्रदर्शित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सजग नागरिक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभागी व्हावे, असे सांगून प्रत्येक पात्र मतदाराने येत्या १३ मे रोजी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून स्वीप उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी स्वीप समन्वयक अधिकारी अर्चना तांबे यांनी मतदान जनजागृतीसाठी स्वीप मार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच भारतीय कला प्रसारणीचे श्री. पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी तसेच विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भित्तीपत्रके तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

Pune Water Issue | 7.25 TMC पाणी पुण्यासाठी राखून ठेवण्याची पालकमंत्री यांच्याकडे मागणी

Categories
Breaking News social पुणे

Pune Water Issue | 7.25 TMC पाणी पुण्यासाठी राखून ठेवण्याची पालकमंत्री यांच्याकडे मागणी

| सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकर यांनी केली मागणी

Pune Water Issue – (The Karbhari News Service) – निवडणूका संपल्यानंतर पुण्यात पाणीकपात (Pune Water Scarcity) सुरु होईल अशी लोकांमध्ये भिती आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणसाखळीत 7.25 TMC पाणी पुण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश जलसंपदा विभागास (Department of Water Resources) द्यावे आणि पुणेकरांस आश्वस्त करावे. अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar Sajag Nagrik Manch) यांनी पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली आहे.
वेलणकर यांच्या निवेदनानुसार खडकवासला धरण साखळीत आज रोजी 9.4 TMC पाणी शिल्लक आहे. पुणे शहर दरमहा खडकवासला धरणसाखळीतून 1.6 TMC पाणी वापरते. 31 जुलै पर्यंत पुणे शहरासाठी खडकवासला धरणसाखळीतून 5.25 TMC पाण्याची गरज आहे. उन्हाळ्याचा कडाका बघता पुढील तीन महिन्यात किमान 1.5 TMC पाण्याचे धरणातून बाष्पीभवन होईल. जून महिन्यात वारीसाठी किमान अर्धा TMC पाणी लागेल.
हे सर्व बघता ३१ जुलैपर्यंत किमान ७.२५ TMC पाणी राखून ठेवणे गरजेचे आहे. आत्ता शेतीसाठी सुरु असलेले आवर्तन आवरते घेण्याची गरज आहे. कारण परत मे अखेर दौंडसह गावांना पिण्यासाठी दीड TMC चे आवर्तन सोडणे आवश्यक ठरणार आहे. पुणे हे देशातील पहिले शहर आहे की जे महिन्याला अर्धा TMC सांडपाणी शुद्धीकरण करून शेतीसाठी पुनर्वापरासाठी सोडते आहे. त्यामुळे शेतीला पाणी कमी पडेल ही भिती अनाठायी आहे. असे वेलणकर यांनी म्हटले आहे.
  निवडणूका संपल्यानंतर पुण्यात पाणीकपात सुरु होईल अशी लोकांमध्ये भिती आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणसाखळीत 7.25 TMC पाणी पुण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश आपण जलसंपदा विभागास द्यावे आणि पुणेकरांस आश्वस्त करावे.
–  विवेक वेलणकर,अध्यक्ष, सजग नागरिक मंच,  पुणे

PMC Health Department | IHIP-IDSP पोर्टल मुळे साथरोग नियंत्रणात आणण्यात पुणे महापालिकेला मिळतंय यश!

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

PMC Health Department | IHIP-IDSP पोर्टल मुळे साथरोग नियंत्रणात आणण्यात पुणे महापालिकेला मिळतंय यश!

PMC Health Department – (The Karbhari News Service) – शहरातील साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने IHIP-IDSP पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. याचा पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला (Pune Municipal Corporation (PMC) Health Department) चांगला फायदा होताना दिसतोय. कारण पुणे शहरातील साथरोग नियंत्रणात आणण्यात याची मदत होत आहे. अशी माहिती महापालिका सहायक आरोग्य अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर (Dr Suryakant Devkar PMC) यांनी दिली. (Pune PMC News)
याबाबत डॉ देवकर यांनी सांगितले कि, केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनुसार पुणे मनपाच्या आरोग्य विभागाकडून कार्यरत दवाखाने/ रुग्णालये व खाजगी रुग्णालामार्फत केंद्र शासनाचे IHIP IDSP पोर्टल वरती दररोज साथरोग संशयित रुग्णाची माहिती नोंदविली जाते. पोर्टलवर नोंदविलेले माहिती प्रमाणे संशयित तसेच पॉजिटीव्ह रुग्णांच्या नोंदी संपूर्ण माहितीसह एकत्र करण्यात येतात. ही माहिती वॉर्ड निहाय सर्व्हेक्षण करिता पुणे म. न. पा. च्या १५ क्षेत्रिय कार्यालयानिहाय करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने कोविड – १९, इन्फ्लुएंझा – H1N1, H3N2, जलजन्य (Water Borne Diseases) इत्यादि रुग्णांची प्रतिबंध करण्यासाठी सर्व्हेक्षण करून वेळेत साथ रोग नियंत्रण करण्यात येत आहे.

साथ रोग विभागाकडून राबवण्यात येत असलेले विविध उपक्रम

NRCP – Rabies Control Programme :-

पुणे म. न. पा. स्तरावर साथरोग विभाग आणि पशु संवर्धन विभाग यांचे संयुक्तिपणे NRCP ( National Rabies Control Programme ) अंतर्गत रेबिज नियंत्रण व प्रतिबंधक लसीचा साठा पुरेसा उपलब्ध ठेवण्यात येतो.

3) NPCCHH – National Program for Climate Change and Human Health :

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनुसार पुणे मनपाच्या स्तरावर उष्मा हवामानाच्या पार्श्वभूमीवर दर वर्षी HRI ( Heat Related Illness) मार्च ते जुलै अखेरपर्यंत पुणे म. न. पा. दवाखाने / रुग्णालय मार्फत सर्वेक्षण व आवश्यक तयारी करण्यात येत आहे.

Metropolitan Surveillance Unit (MSU ) :

साथ रोगाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने शहरांमधील सर्वेक्षण यंत्रणा सक्षम करणे करिता मेट्रोपोलिटन सर्व्हलन्स युनिट उभे करणे करिता महाराष्ट्रातील चार शहरांची निवड केलेल्यांपैकी पुणे
शहर अग्रस्थानी आहे. सदर मेट्रोपोलिटीन सर्व्हलन्स युनिट अंतर्गत शहरा करिता विविध प्रकारच्या साथ रोगांसाठी आवश्यक असणारी अद्यावत लॅब उपलब्ध होणार असून विविध प्रकारच्या साथ रोगांवर तातडीने उपाययोजना व कारवाई करणे व तसेच साथ रोगांबाबत भविष्यात होणाऱ्या घटनांचा सविस्तर अभ्यास करणे शक्य होणार आहे. या अनुषंगाने पुणे महानगरपालिका अंतर्गत बाणेर स.नं १०९ मध्ये जुने डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल मधील सहाव्या मजल्यावर ६००० स्क्वेर फीट जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पुणे म.न.पा स्तरावर मेट्रोपोलिटीन सर्व्हलन्स युनिट स्थापन करण्याकरिता प्रशासकीय
कामकाज चालू आहे.
पोर्टल  – ihip अर्थात integrated health information platform  महापालिका आरोग्य विभागसाठी फायदेशीर ठरत आहे.  त्यासाठी साथरोग विभागाने 4 लोकांची टीम ठेवली आहे. खाजगी आणि महापालिकेच्या दवाखान्यातून सर्व पेशंटची माहिती या पोर्टलवर घेतली जाते. संबंधित टीम ही माहिती दररोज चेक करतात.  त्यानुसार आसपासच्या परिसरात सर्वे केला जातो. त्यानुसार आसपासच्या परिसरात औषध फवारणी आणि तत्सम कार्यवाही केली जाते.  पोर्टल मुळे ही कार्यवाही करता येते. त्यामुळे साथ रोगाला प्रतिबंध करतो आहोत.
डॉ सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी. 

MLA Sanjay Jagtap | समाविष्ट गावातील वाड्यावस्त्या, सोसायट्याना नियमित टॅकरने पाणीपुरवठा करण्याची आमदार संजय जगताप यांची मागणी 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

MLA Sanjay Jagtap | समाविष्ट गावातील वाड्यावस्त्या, सोसायट्याना नियमित टॅकरने पाणीपुरवठा करण्याची आमदार संजय जगताप यांची मागणी

MLA Sanjay Jagtap – (The Karbhari News Service) – पुरंदर हवेली मतदारसंघाच्या (Purandar Haveli Constituency) कार्यक्षेत्रातील पुणे महानगरपालिका हद्दीतील (PMC Pune Limits) समाविष्ट गावातील वाड्यावस्त्या, सोसायट्या व गावठाणे यांना तात्काळ नियमित टॅकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune Water Issue)

आमदार जगताप यांनी महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रानुसार  माझ्या कार्यक्षेत्रातील पुणे महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या, पिसोळी, मंतरवाडी, होळकरवाडी, औताडे- हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवालेवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, येवलेवाडी, गुजर- निंबाळकरवाडी, जांभुळवाडी व कोळेवाडी, उंड्री, भेकराईनगर, उरूळीदेवाची, फुरसुंगी, आंबेगाव आंबेगाव बु. खुर्द या परीसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्याने येथील वाड्यावस्त्या, सोसायट्या, गावठाणांचा समावेश झाल्यापासून आजपर्यंत पिण्याच्या पाण्यासह मुलभुत सोयीसुविधांपासून वंचित आहेत.

जगताप यांनी पुढे म्हटले आहे कि मागील वर्षी मान्सुनपुर्व व जुन ते सप्टेंबर २०२३ कालावधीत पर्जन्यात तूट निर्माण झाल्याने तसेच वातावरणीय बदलामुळे सध्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. या परिसराला पाणी पुरवठा करणारे टँकर वेळेवर येत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या परिसराकरीता येणाऱ्या पाण्याच्या टँकरची संख्या अथवा फेऱ्या वाढवून याठिकाणी नियमित पाणी पुरवठ्याकरीता योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

या बाबींचा सहानुभुतीपुर्वक विचार करून समाविष्ट गावातील वाड्यावस्त्या, सोसायट्या व गावठाणे यांना तात्काळ नियमित टॅकरने पाणीपुरवठा करावा. अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.

Pune And Khadki Cantonment Board in PMC – पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मधील आस्थापना आणि मनुष्यबळ पुणे महापालिकेत होणार हस्तांतरित!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune And Khadki Cantonment Board in PMC – पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मधील आस्थापना आणि मनुष्यबळ पुणे महापालिकेत होणार हस्तांतरित!

| पुणे महापालिकेने सुरु केली प्रक्रिया

Pune and Khadki Cantonment Board in PMC limit- (The Karbhari News Service) – पुणे जिल्ह्यातील पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड (Pune Cantonment board and Khadaki Cantonment board) पुणे महापालिकेत (PMC) विलीन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लष्कराच्या संस्था आणि केंद्रीय संस्था वगळून कॅन्टोन्मेंट हद्दीतील रहिवाशी भाग पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) समाविष्ट करण्यात येणार आहे. दरम्यान या दोन्ही बोर्डातील आस्थापना आणि मनुष्यबळ पुणे महापालिकेकडे हस्तांतरित केले जाणार आहे. याबाबतची प्रक्रिया पुणे महापालिकेने सुरु केली आहे. उपायुक्त महेश पाटील (Mahesh Patil PMC) यांनी याबाबतचे आदेश महापालिकेच्या सर्व विभागांना दिले आहेत.

देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये मिळून लष्कराच्या 62 छावण्या म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. आता ही कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून त्यातील नागरी वस्तीचा समावेश महापालिकांमध्ये करण्याचा तर लष्कराच्या ताब्यातील भाग एक्स्क्लुजिव्ह मिलिटरी स्टेशन्स म्हणून लष्कराच्या ताब्यात ठेवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यासाठीची प्रक्रिया केंद्र आणि संबंधित राज्य सरकारांकडून सुरू करण्यात आली आहे. यामुळे लष्कराच्या ताब्यातील लाखो हेक्टर जागा महापालिकेच्या ताब्यात जाऊन विकासासाठी खुली होणार आहे. लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांच्या नेतृत्वाखालील समितीने हा बदल सुचवला आहे. (PMC Pune Cantonment board)

दरम्यान केंद्र शासन अर्थात  संरक्षण विभागाच्या अधिसूचनेनुसार कटक मंडळातील सिविल एरिया संलग्न स्थानिक स्वराज्य संस्थाना हस्तांतरित करणेबाबत 4 मार्च रोजी  सह सचिव, संरक्षण
मंत्रालय, भारत सरकार यांच्या सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी कॅन्टोनमेंट
बोर्ड व. महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांची व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे संयुक्त बैठक घेण्यात
आली होती.  या बैठकीत संरक्षण विभागाने खडकी/पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड यांची सर्व माहिती पुणे महानगरपालिकेस देण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड यांनी 13 मार्च l रोजी पुणे सब एरीया येथे संयुक्त बैठक आयोजित करून प्रेझेन्टेशन दाखविण्यात आले.

 प्रेझेन्टेशन प्रमाणे संरक्षण विभागाच्या अधिसुचनेसुसार कटक मंडळातील सिविल एरिया संलग्न स्थानिक स्वराज्य संस्थाना अस्थापना / मनुष्य बळ हस्तांतरित करणेसाठी विविध विभागांचे समन्वय आवश्यक आहे.  पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड यांचे प्रेझेंटेशन प्रमाणे महापालिकेच्या विविध विभागाकडे हस्तांतरित होणाऱ्या आस्थापना / मनुष्य बळ यांचे संबंधिताकडून मेळ घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड यांच्याशी समन्वय साधून आपल्या विभागाकडे हस्तांतरित होणारी संसाधने, आस्थापना / मनुष्यबळ यांची माहिती व त्याबाबत आपल्या विभागाचे मुद्दे इ.बाबींची माहिती तयार ठेवावी. आवश्यकते प्रमाणे प्रत्यक्ष पाहणी करावी. असे आदेश उपायुक्त महेश पाटील यांनी दिले आहेत.

महाराष्ट्रातील  कॅन्टोन्मेंट बोर्ड

महाराष्ट्रात पुणे, खडकी, देहू रोड, औरंगाबाद, अहमदनगर, देवळाली (नाशिक) आणि नागपूर अशी सात कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. ही सातही कॅन्टोन्मेंट बोर्ड स्थानिक महापालिकांच्या हद्दीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहे. (Cantonment board)

62 कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि लाखो हेक्टर जागा
देशातील वेगवगेळ्या राज्यांमध्ये 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. या कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या ताब्यात एक लाख साठ हजार एकर जागा आहे. 50 लाखाहून अधिक लोकसंख्या या कॅन्टोन्मेंट बोर्डांमध्ये राहते. कॅन्टोन्मेंट हद्दीतील खाजगी मालमत्ता देखील लष्कराच्या ताब्यात आहे. लष्कराकडून मूळ मालकांशी दर काही वर्षांनी त्यासाठी भाडेकरार देखील केला जातो. लष्करी कार्यालयांच्या सुरक्षेच्या कारणास्तव कॅन्टोन्मेंट हद्दीत विकास कामे आणि बांधकामासाठीच्या एफएसआयला मर्यादा घालण्यात आल्या आहेत. (Pune News)