Pratibha Patil PMC | मतदान केल्याचा महापालिका कर्मचाऱ्यांना द्यावा लागणार अहवाल!  | उपायुक्त प्रतिभा पाटील यांचे आदेश 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pratibha Patil PMC | मतदान केल्याचा महापालिका कर्मचाऱ्यांना द्यावा लागणार अहवाल!

| उपायुक्त प्रतिभा पाटील यांचे आदेश

Pratibha Patil PMC – (The Karbhari News Service) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ (Pune Loksabha Election 2024) साठी पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी मतदानाच्या दिवशी मतदान केलेबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना उपायुक्त प्रतिभा पाटील (Deputy Commissioner Pratibha Patil) यांनी दिल्या आहेत. याबाबत नुकतेच आदेश जारी करण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)

मतदारांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करिता मतदान करावे याकरिता त्यांना प्रोत्साहित करणे व त्यांच्यामध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करणेसाठी जिल्हाधिकारी, तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांचेकडून आवाहन करण्यात आले होते.  मतदारांना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करिता जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करिता पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी आपले कुटूंबासहित सर्वानी मतदान करणेबाबत खातेप्रमुख स्तरावर आवाहन करण्यात यावे. असे आदेशात म्हटले आहे.  तसेच पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संदर्भ सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आलेली आहे.
तरी खातेप्रमुखांनी आपल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांनी मतदान केलेबाबतचा अहवाल सामान्य प्रशासन कार्यालयाकडे 16 मे पर्यंत पाठवावा. असे उपायुक्त पाटील यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Hadapsar Vidhansabha | हडपसर विधानसभा मतदार संघातील २८ मतदान केंद्रांच्या ठिकाणात बदल

Categories
Breaking News Political पुणे

Hadapsar Vidhansabha | हडपसर विधानसभा मतदार संघातील २८ मतदान केंद्रांच्या ठिकाणात बदल

 

Shirur Loksabha Constituency | शिरुर लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणुकीसाठी हडपसर विधानसभा मतदार संघात २८ मतदान केंद्रांच्या ठिकाणात बदल करण्यात आलेले असून मतदारांनी झालेल्या बदलाची नोंद घेऊन आपापल्या मतदान केंद्रावर मतदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

केशवनगर मुंढवा येथील ठिकाणे बदललेली मतदान केंद्रे:
यादी भाग ३० केशवनगर मुंढवा मधील मतदान केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खो. क्र. १, लोणकर पडळ, केशवनगर हे मतदान केंद्र लिटील आईनस्टाईन प्रीस्कूल लोणकरनगर, केशवनगर मुंढवा, तळमजला खोली क्र. १ असे राहील. यादी भाग ३१ केशवनगर मुंढवा मधील जि.प. प्राथ. शाळा खो.क्र.२, लोणकर पडळ, केशवनगर, तात्पुरता पत्रा शेड क्र. २ हे मतदान केंद्र लिटील आईनस्टाईन प्रीस्कूल लोणकरनगर, केशवनगर मुंढवा, तळमजला खोली क्र. २ असे राहील. यादी भाग ३९, केशवनगर मुंढवा मधील द ऑरबिस स्कूल स.नं. ३५ लोणकरनगर, जय गंगानगर समोर, केशवनगर मुंढवा शाळेच्या पार्किंगमध्ये तात्पुरता पत्रा शेड क्र. ७ हे मतदान केंद्र यादी भाग ४०, घोरपडी येथे स्थलांतरीत करण्यात आले असून श्री जिजाई शिक्षण मंदीर शाळा, जहांगीरनगर, हडपसर बालवाडी इमारत खोली क्र. १ असे राहील. यादी भाग ४० केशवनगर मुंढवा येथील द ऑरबिस स्कूल स.नं. ३५ लोणकरनगर, केशवनगर मुंढवा शाळेच्या पार्किंगमध्ये तात्पुरता पत्रा शेड क्र. ८ हे मतदान केंद्र यादी भाग ४१, घोरपडी येथे स्थलांतरीत करण्यात आले असून श्री जिजाई शिक्षण मंदीर शाळा, जहांगीरनगर, हडपसर बालवाडी इमारत खोली क्र. २ असे राहील.

मांजरी बुद्रुक मधील ठिकाणे बदललेली मतदान केंद्रे:
यादी भाग ९३ मधील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज आण्णासाहेब मगर विद्यालय मांजरी बु. शाळेच्या आवारात उत्तराभिमुख तात्पुरता पत्रा शेड क्र. १ हे मतदान केंद्र यादी भाग ९४ मध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय मांजरी बु., पश्चिमेकडून पूर्वाभिमुख खो.क्र. १ असे राहील. यादी भाग क्र. ९४ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज आण्णासाहेब मगर विद्यालय मांजरी बु. शाळेच्या आवारात उत्तराभिमुख तात्पुरता पत्रा शेड क्र. २ हे मतदान केंद्र यादी भाग ९४, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय मांजरी बु., पश्चिमेकडून पूर्वाभिमुख खो.क्र. २ असे राहील. यादी भाग क्र. ९५, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज आण्णासाहेब मगर विद्यालय मांजरी बु. शाळेच्या आवारात उत्तराभिमुख तात्पुरता पत्रा शेड क्र. ३ हे मतदान केंद्र यादी भाग ९६, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय मांजरी बु., उत्तरेकडून दक्षिणाभिमुख खो.क्र. ३ असे राहील.

यादी भाग क्र. ९६ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज आण्णासाहेब मगर विद्यालय मांजरी बु. शाळेच्या आवारात उत्तराभिमुख तात्पुरता पत्रा शेड क्र. ४ हे मतदान केंद्र यादी भाग ९७ पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय मांजरी बु., उत्तरेकडून दक्षिणाभिमुख खो.क्र. ४ असे राहील. यादी भाग क्र. ९७ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज आण्णासाहेब मगर विद्यालय मांजरी बु. शाळेच्या आवारात उत्तराभिमुख तात्पुरता पत्रा शेड क्र. ५ हे मतदान केंद्र यादी भाग ९८ पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय मांजरी बु., दक्षिणेकडून उत्तराभिमुख खो.क्र. ५ असे राहील. यादी भाग क्र. ९८ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज आण्णासाहेब मगर विद्यालय मांजरी बु. शाळेच्या आवारात उत्तराभिमुख तात्पुरता पत्रा शेड क्र. ६ हे मतदान केंद्र यादी भाग ९९ पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय मांजरी बु., दक्षिणेकडून उत्तराभिमुख खो.क्र. ६ असे राहील.

यादी भाग क्र. ९९ जि.प.प्राथ. शाळा, गोपाळवस्ती, मांजरी बु. खोली क्र. १ हे मतदान केंद्र यादी भाग १०० पोदार स्कूल, गोपाळपट्टी, मांजरी बु. पूर्वेकडील पुर्वाभिमुख खो.क्र. १ असे राहील. यादी भाग क्र. १०० जि.प.प्राथ. शाळा, गोपाळवस्ती, मांजरी बु. खोली क्र. २ हे मतदान केंद्र यादी भाग १०१ पोदार स्कूल, गोपाळपट्टी, मांजरी बु. पूर्वेकडील पश्चिमाभिमुख खो.क्र. २ असे राहील. यादी भाग क्र. १०१ जि.प.प्राथ. शाळा, गोपाळवस्ती, मांजरी बु. खोली क्र. ३ हे मतदान केंद्र यादी भाग १०२ पोदार स्कूल, गोपाळपट्टी, मांजरी बु. दक्षिणेकडील उत्तराभिमुख खो.क्र. ३ असे राहील. यादी भाग क्र. १०२ जि.प.प्राथ. शाळा, गोपाळवस्ती, मांजरी बु. खोली क्र. ४ हे मतदान केंद्र यादी भाग १०३ पोदार स्कूल, गोपाळपट्टी, मांजरी बु. दक्षिणेकडील उत्तराभिमुख खो.क्र. ४ असे राहील. यादी भाग क्र. १०३ जि.प.प्राथ. शाळा, गोपाळवस्ती, मांजरी बु. खोली क्र. ५ हे मतदान केंद्र यादी भाग १०४ पोदार स्कूल, गोपाळपट्टी, मांजरी बु. पश्चिमेकडील पश्चिमाभिमुख खो.क्र. 5 असे राहील. यादी भाग क्र. १०४ जि.प.प्राथ. शाळा, गोपाळवस्ती, मांजरी बु. खोली क्र. ६ हे मतदान केंद्र यादी भाग १०५ पोदार स्कूल, गोपाळपट्टी, मांजरी बु. पश्चिमेकडील पुर्वाभिमुख खो.क्र. ६ असे राहील. यादी भाग क्र. १०५ जि.प.प्राथ. शाळा, गोपाळवस्ती, मांजरी बु. खोली क्र. ७ हे मतदान केंद्र यादी भाग १०६ पोदार स्कूल, गोपाळपट्टी, मांजरी बु. पश्चिमेकडील पश्चिमाभिमुख खो.क्र. ७ असे राहील.

यादी भाग क्र. ११५ जि.प.प्राथ. शाळा, अनाजीवस्ती, मांजरी बु. खोली क्र. १ हे मतदान केंद्र यादी भाग ११६ पायोनियर पब्लिक स्कूल, धावडेवस्ती, मांजरी मुंढवा रोड, मांजरी बु. शाळेची दक्षिणेकडून उत्तराभिमुख खो.क्र. १ असे राहील. यादी भाग क्र. ११६ जि.प.प्राथ. शाळा, अनाजीवस्ती, खोली क्र. २ हे मतदान केंद्र यादी भाग ११७ पायोनियर पब्लिक स्कूल, धावडेवस्ती, शाळेची पूर्वेकडून पश्चिमाभिमुख खो.क्र. २ असे राहील. यादी भाग क्र. ११७ जि.प.प्राथ. शाळा, अनाजीवस्ती, खोली क्र. ३ हे मतदान केंद्र यादी भाग ११८ पायोनियर पब्लिक स्कूल, धावडेवस्ती, शाळेची पूर्वेकडून पश्चिमाभिमुख खो.क्र. ३ असे राहील. यादी भाग क्र. ११८ जि.प.प्राथ. शाळा, अनाजीवस्ती, खोली क्र. ४ हे मतदान केंद्र यादी भाग ११९ पायोनियर पब्लिक स्कूल, धावडेवस्ती, शाळेची पूर्वेकडून पश्चिमाभिमुख खो.क्र. ४ असे राहील. यादी भाग क्र. ११९ जि.प.प्राथ. शाळा, अनाजीवस्ती, तात्पुरता पत्रा शेड क्र. १ हे मतदान केंद्र यादी भाग १२० पायोनियर पब्लिक स्कूल, धावडेवस्ती, शाळेची पूर्वेकडून पश्चिमाभिमुख खो.क्र. ५ असे राहील. यादी भाग क्र. १२० जि.प.प्राथ. शाळा, अनाजीवस्ती, तात्पुरता पत्रा शेड क्र. २ हे मतदान केंद्र यादी भाग १२१ पायोनियर पब्लिक स्कूल, धावडेवस्ती, शाळेची पूर्वेकडून पश्चिमाभिमुख खो.क्र. ६ असे राहील. यादी भाग क्र. १२१ जि.प.प्राथ. शाळा, अनाजीवस्ती, तात्पुरता पत्रा शेड क्र. ३ हे मतदान केंद्र यादी भाग १२२ पायोनियर पब्लिक स्कूल, धावडेवस्ती, शाळेची पूर्वेकडून पश्चिमाभिमुख खो.क्र. ७ असे राहील. यादी भाग क्र. १२२ जि.प.प्राथ. शाळा, अनाजीवस्ती, तात्पुरता पत्रा शेड क्र. ४ हे मतदान केंद्र यादी भाग १२३ पायोनियर पब्लिक स्कूल, धावडेवस्ती, शाळेची उत्तरेकडील दक्षिणाभिमुख खो.क्र. ८ असे राहील. यादी भाग क्र. १२३ जि.प.प्राथ. शाळा, अनाजीवस्ती, तात्पुरता पत्रा शेड क्र. ५ हे मतदान केंद्र यादी भाग १२४ पायोनियर पब्लिक स्कूल, धावडेवस्ती, शाळेची उत्तरेकडील दक्षिणाभिमुख पत्रा शेड क्र. १ असे राहील. यादी भाग क्र. १२४ जि.प.प्राथ. शाळा, अनाजीवस्ती, तात्पुरता पत्रा शेड क्र. ६ हे मतदान केंद्र यादी भाग १२५ पायोनियर पब्लिक स्कूल, धावडेवस्ती, शाळेची उत्तरेकडील दक्षिणाभिमुख पत्रा शेड क्र. २ असे राहील.

हडपसर येथील बदललेले मतदान केंद्र:
यादी भाग क्र. १५३, हडपसर- पुणे मनपा दवाखानाशेजारी (कै. अण्णासाहेब मगर रुग्णालय आवारात) आरोग्य कोठी शेजारील खो. क्र. २, हे मतदान केंद्र यादी भाग १५४ कै. अण्णासाहेब मगर रुग्णालय स्वॅबची खोली क्र.१, तळमजला असे राहील, असेही शिरुर लोकसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे यांनी कळविले आहे.

Baramati Loksabha Election |बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी होणाऱ्या निवडणूकीसाठी साहित्याचे वितरण

Categories
Breaking News Political पुणे

Baramati Loksabha Election |बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी होणाऱ्या निवडणूकीसाठी साहित्याचे वितरण

 

Baramati Loksabha Election – (The Karbhari News Service) –  बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी आज मतदारसंघनिहाय पोलीस बंदोबस्तात साहित्याचे वितरण करण्यात आले असून सर्व साहित्य सुस्थितीत मतदान केंद्रावर पोहचले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड विधानसभा मतदासंघात ३ लाख ४ हजार ६०७, इंदापूर ३ लाख २३ हजार ५४१, बारामती ३ लाख ६९ हजार २१७, पुरंदर ४ लाख २९ हजार ३५१, भोर ४ लाख ७ हजार ९२१ व खडकवासला ५ लाख ३८ हजार ३१ असे एकूण मतदार २३ लाख ७२ हजार ६६८ मतदार आहेत. ५ व ५ पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेले दौंड विधानसभा मतदारसंघात ६, इंदापूर ५, बारामती ६, पुरंदर १७, भोर ९ व खडकवासला ४४ असे एकूण ८७ मतदान केंद्रे आहेत.

दौंड विधानसभा मतदारसंघात एकूण ३०९ मतदान केंद्र आहेत. या करीता एकूण टेबल २१ ची मांडणी करुन ९२७ बॅलेट युनिट, ३०९ कंट्रोल युनिट, ३०९ व्हीव्हीपॅटचे शासकीय धान्य गोदाम, मदर तेरेसा चौक, नगरमोरी येथून मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. साहित्य मतदान केंद्रावर नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता एकूण ४८ एसटी बसेस, १० जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. १५५ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरीता एकूण २ हजार ५९७ मनुष्यबळ कार्यरत आहे.

इंदापूर विधानसभा मतदारसंघात एकूण ३३० मतदान केंद्र आहेत. या करीता एकूण टेबल ३५ ची मांडणी करुन १ हजार १८८ बॅलेट युनिट, ३३० कंट्रोल युनिट, ३३० व्हीव्हीपॅट यंत्राचे शासकीय धान्य गोदाम कालठण रोड येथून मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. साहित्य मतदान केंद्रावर नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता एकूण ५५ एसटी बसेस, ४ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. १६५ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरीता एकूण २ हजार ५१८ मनुष्यबळ कार्यरत आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण ३८० मतदान केंद्र आहेत. या करीता एकूण टेबल ३७ ची मांडणी करुन १ हजार १४० बॅलेट युनिट, ३८० कंट्रोल युनिट, ३८० व्हीव्हीपॅट यंत्राचे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळ परिसर येथून मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. साहित्य मतदान केंद्रावर नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता एकूण ४७ एसटी बसेस, १५ मिनीबस, ७ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. १९० मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरीता एकूण ३ हजार ५०० मनुष्यबळ कार्यरत आहे.

पुरंदर विधानसभा मतदारसंघात एकूण ४२१ मतदान केंद्र आहेत. याकरीता एकूण टेबल ३० ची मांडणी करुन १ हजार २६३ बॅलेट युनिट, ४२१ कंट्रोल युनिट, ४२१ व्हीव्हीपॅट यंत्राचे श्री कातोबा हायस्कूल दिवे येथून मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. साहित्य मतदान केंद्रावर नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता एकूण ६९ एसटी बसेस, ८ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. २११ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरीता एकूण ३ हजार ३७७ मनुष्यबळ कार्यरत आहे.

भोर विधानसभा मतदारसंघात एकूण ५६१ मतदान केंद्र आहेत. याकरीता एकूण टेबल ७० ची मांडणी करुन १ हजार ६८३ बॅलेट युनिट, ५६१ कंट्रोल युनिट, ५६१ व्हीव्हीपॅट यंत्राचे भोर तालुक्याकरीता औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर आणि वेल्हे तालुक्याकरीता जुनी पंचायत समिती, वेल्हे व जिल्हा परिषद मध्यवर्ती शाळा कुरण खुर्द, मुळशी तालुक्याकरीता राणी लक्ष्मीबाई सैनिकी मुलींची शाळा कासार आंबोली येथून मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. साहित्य मतदान केंद्रावर नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता एकूण ९० एसटी बसेस, ८ मिनीबस व ६५ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. २८१ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरीता एकूण ४ हजार ६२ मनुष्यबळ कार्यरत आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात एकूण ४६५ मतदान केंद्र आहेत. याकरीता एकूण टेबल ५३ ची मांडणी करुन १ हजार ३९५ बॅलेट युनिट, ४६५ कंट्रोल युनिट, ४६५ व्हीव्हीपॅट यंत्राचे स्प्रिंग डेल प्ले ग्रांऊड वडगाव बु. ता. हवेली येथून वितरण मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. साहित्य मतदान केंद्रावर नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता एकूण ११३ एसटी बसेस, ५३ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. २७६ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरीता एकूण ४ हजार ४९ मनुष्यबळ कार्यरत आहे.

कविता द्विवेदी, निवडणुक निर्णय अधिकारी- बारामती लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी नियोजनाप्रमाणे तयारी करण्यात आली आहे. मतदान पथकाला साहित्याचे वितरण करण्यात आलेले असून बसेस, जीपद्वारे आज सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर सायंकाळी उशिरापर्यंत पोहोचतील. पोलीस बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था आदीच्या अनुषंगानेही सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या ७ मे रोजी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होणार असून पात्र मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे-
0000

Kothrud Congress | कोथरूड मतदारसंघात यंदा काँग्रेस  मुसंडी मारणार : चंदूशेठ कदम 

Categories
Breaking News Political पुणे

Kothrud Congress | कोथरूड मतदारसंघात यंदा काँग्रेस  मुसंडी मारणार : चंदूशेठ कदम  

 
Kothrud Congress – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत (Pune Loksabha Election) भाजपचा (BJP Pune) पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात  (Kothrud Vidhansabha Constituency) यंदा इंडिया फ्रंटच्या (INDIA Front) एकीमुळे काँग्रेस (Pune Congress)  मुसंडी मारणार असल्याचा ठाम विश्वास  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव व  माजी नगरसेवक  रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम (Chandusheth Kadam Pune Congress)  यांनी व्यक्त केला आहे. (Pune Loksabha Election 2024)
 
सद्यस्थितीत   विधानसभा मतदारसंघ निहाय समीकरणे बदलण्याची भीती महाविकास आघाडीच्या एकीमुळे भाजपला भेडसावत आहे.  महाविकास आघाडीतील काँग्रेसला पुन्हा पुणे लोकसभा मतदारसंघ काबीज करण्याची संधी चालून आली आहे. याच पार्श्वभूमीवर कोथरूड विधानसभा मतदारसंघ, जो भाजपचा बालेकिल्ला आहे. तिथे  इंडिया फ्रंटचा प्रचार एकजुटीने सुरु आहे. प्रत्येक कार्यकर्ता घराघरात पोहचत आहे. त्यामुळे या मतदारसंघात यंदा समीकरणे बदलणार का ? यावर    महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव  चंदूशेठ कदम यांच्याशी संवाद साधला असता,त्यांनी गत लोकसभा निवडणुकीचा दाखला दिला. ते म्हणाले,गत लोकसभा निवडणुकीत  स्व.  गिरीश बापट यांना कोथरूड या भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्यातून एक लाख ४८ हजार ५७० मते मिळाली होती तर मोहन जोशी यांना ४२ हजार ३७४ मते मिळाली.   कोथरूडमधून स्व. गिरीश बापट यांना एक लाख सहा हजार १९६ मतांचे मताधिक्य मिळाले होते. हे बापट यांना मिळालेले सर्वाधिक मताधिक्य होते.पण   विधानसभा निवडणुकीत मनसेचे किशोर शिंदे यांना ८० हजार मते मिळाली मात्र विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना २५ हजार ४९५ चे मताधिक्य मिळाले. हाच फरक महत्वाचा आहे.यंदा या मतदारसंघात ४ लाख १० हजार ६३४  मतदारसंख्या आहे. त्यामुळे काँग्रेसला पडलेली  ४२ हजार ३७४ मते आणि शिवसेनेची ३५ हजार  मते  तसेच घटक पक्षातील अन्य मतांचे समीकरण हे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या पथ्यावर पडणार आहे. साधारण एक लाखांवर मते ही महाविकास आघाडीच्या पारड्यात जाणार असल्याचा ठाम दावा  चंदूशेठ कदम यांचा आहे.
 
  राज्यातील सत्तेचा विचित्र प्रयोग हा मतदारांच्या पचनी पडलेला नाही, याकडे लक्ष वेधून चंदूशेठ कदम म्हणाले ,गत लोकसभा निवडणुकीतील मतांची टक्केवारी पाहिल्यास यंदा कोथरूड विधानसभा मतदारसंघात काँग्रेस मुसंडी मारणार असा आशावाद निश्चित आहे. कारण इंडिया फ्रंटचा एकजुटीने प्रचार सुरु आहे. प्रभागनिहाय नियोजन करून प्रत्येक कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरून प्रामाणिकपणे प्रचार करत आहे. घराघरात पोहचत आहे. मतदारांना पक्षाची भूमिका सांगत आहे. भाजपने केलेल्या ‘फोडाफोडी’ च्या राजकारणामुळे मतदारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत. मागीलवेळी मोदी लाट होती मात्र यंदा ती प्रभावहीन ठरेल अशी स्थिती आहे. त्यात पेठांमधून स्थलांतरित झालेले अनेक मतदार या मतदारसंघात आहेत. विशेषतः कसबा मतदारसंघातील बहुतांश मतदार आज कोथरूडमध्ये वास्तव्यास आहेत. रवींद्र धंगेकर यांनी लोकप्रतिनिधी माध्यमातून त्यावेळी नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक केलेली आहे. ही बाबही महत्वाची आहे. त्यात कोथरूड मतदारसंघात इंडिया फ्रंटची एकजुटच यंदा बदल घडवणार आहे. सध्या आम्ही प्रभाग निहाय नियोजनपूर्वक प्रचार करत आहोत. संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहोत. माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, पृथ्वीराज सुतार, शिवसेना शहराध्यक्ष गजानन थरकुडे, विजय खळदकर, तानाजी निम्हण, शिवा मंत्री, दत्ता जाधव, स्वप्नील दुधाने, उमेश कंधारे, डॉ. अभिजीत मोरे,  ॲड अमोल काळे, नेटके, गोसावी, भगवानराव कडू, संदीप मोकाटे, राजू मगर, महेश ठाकूर, राजेश पळसकर, रामदास थरकुडे, गिरीश गुरनानी, ज्योतीताई सूर्यवंशी, कानूभाऊ साळुंखे, शिवाजी सोनार, पांडुरंग गायकवाड, सोमनाथ पवार, गणेश मारणे, अनिकेत कुरपे, किशोर मारणे,  दिलीप गायकवाड, नितीन पवार, पुरुषोत्तम विटेकर, मनिषाताई करपे, रवींद्र माझिरे, किशोरजी कांबळे, सविताताई मते, संतोष डोख, सौ दिपाली डोख, जीवन चाकणकर, रोहित धेंडे, आण्णा राऊत, शीलाताई राऊत, यशराज पारखी, मंगेश निम्हण, संतोष तोंडे, योगेश मोकाटे, भारत सुतार, राज जाधव, आकाश माने,  योगेश सुतार, अनिल घोलप,किशोर मारणे असे इंडिया फ्रंटमधील प्रत्येक जण परिश्रम घेत आहेत. वस्ती भागात आम्ही केलेली कामे हीच जमेची ठरणार आहे. असेही  चंदूशेठ कदम यांनी   सांगितले.

Baramati Loksabha Election 2024 |बारामती लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी ७ मे रोजी कामगारांना भरपगारी सुट्टी | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Baramati Loksabha Election 2024 |बारामती लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी ७ मे रोजी कामगारांना भरपगारी सुट्टी | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

| मतदान केंद्राच्या माहितीसाठी मतदार सहायता कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन

 

Baramati Loksabha Election – (The Karbhari News Service) –  जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदासंघाकरीता मंगळवार ७ मे रोजी मतदान होत असून मतदारसंघातील सर्व आस्थापनांनी कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या आणि पुणे शहराशी संलग्न असलेल्या भागातील नागरिकांनी मतदान केंद्राची माहिती घेवून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही डॉ.दिवसे यांनी केले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर व खडकवासला असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. भोर विधानसभा मतदारसंघात म्हाळुंगे, सूस व बावधन बु., ताथवडे, हिंजवडी, पिरंगुट, मान, भुकूम, भुगाव, लवळे तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात कात्रज, धायरी, नऱ्हे, वडगाव बुद्रुक, वारजे, शिवणे खडकवासला, खेड शिवापुर, बिबेवाडी (काही भाग) या शहरी भागाचा समावेश करण्यात आलेला आहे. या भागातील मतदारांना मतदान करता यावे यासाठी मतदनाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

शहरी भागातील नागरिकांनी आपल्या मतदान केंद्राविषयी माहितीकरीता जवळचे मतदान केंद्र किंवा मतदान सहायता कक्षाशी संपर्क साधावा. भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation या लिंकवर क्लिक करुन आपल्या मतदान केंद्राविषयी माहिती घेता येणार आहे. वोटर हेल्पलाईन ॲपवरही मतदान केंद्राची माहिती घेता येईल.

बारामती मतदारसंघातील ग्रामीण भागासोबत शहराशी संलग्न भागात उद्योग, उर्जा व कामगार विभागाअंतर्गत असलेल्या सर्व आस्थापना, कारखाने व दुकान मालक, व्यवस्थापनांनी कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी येत्या ७ मे रोजी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सर्व आस्थापना, कारखाने व दुकाने उदा. खाजगी कंपन्यामधील आस्थापना, दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, खरेदी केंद्रे , मॉल्स, किरकोळ विक्रेते आदी ठिकाणी कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देवून मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करावे, असेही आवाहन डॉ. दिवसे यांनी दिले आहे.

Pune Municipal Corporation Latest News | महापालिका कर्मचाऱ्यांनी मालमत्ता विवरणपत्र सादर करण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांचे नवीन आदेश | जाणून घ्या 

Categories
Breaking News PMC पुणे

Pune Municipal Corporation Latest News | महापालिका कर्मचाऱ्यांनी मालमत्ता विवरणपत्र सादर करण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांचे नवीन आदेश | जाणून घ्या

Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिका कायद्यानुसार पालिकेच्या १ ते ३ ऱ्या गटातील सर्व कामगार व अधिकाऱ्यांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.  कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दरवर्षी ३१ मे पूर्वी ही माहिती द्यावी लागते. त्यानुसार  वर्ग १ ते ३ मधील अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांचे मालमत्ता व दायित्वाबाबतचे विवरण पत्र  सादर करणेबाबत आदेशित करण्यात आले होते. त्यानुसार सर्व खातेप्रमुखांनी कार्यवाही करावयाची आहे. असे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)

– महापालिका कायद्यानुसार तपशील देणे बंधनकारक आहे

 महानगरपालिकेच्या इमारतीत आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 20 हजारांहून अधिक कामगार काम करतात.  श्रेणी 1 ते श्रेणी 4 कर्मचारी यामध्ये काम करतात.  राज्य सरकारच्या सूचनेनुसार श्रेणी 4 वगळता सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील देणे बंधनकारक करण्यात आले आहे.  त्याअंतर्गत महापालिका त्यावर अमल करत आहे.  या तपशिलाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना महापालिकेच्या प्रत्येक विभागाला देण्यात आल्या आहेत.  तरीही त्यांच्या मालमत्तेचा तपशील महापालिका कर्मचारी व अधिकारी मांडत नाहीत.

– काय म्हटले आहे आदेशात?

प्रशासन विभागाने वर्ग-१ मधील सर्व अधिका-यांनी त्यांची मत्ता व दायित्वाबाबतची विवरणपत्रे त्यांचे नियंत्रक असलेल्या अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचे मार्फत महापालिका आयुक्त यांचेकडे सादर करणे बाबत सूचित करण्यात आले आहे. तरी सर्व वर्ग-१ मधील अधिकाऱ्यांनी त्यांची मत्ता व दायित्वाबाबतची विवरणपत्रे वेळेत सादर करावी. सादर केलेले वर्ग १ मधील अधिकाऱ्यांचे विवरणपत्र जतन करण्याची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाकडील आस्थापना विभागाने करावी.

प्रत्येक मनपा अधिकारी / कर्मचा-यांनी (वर्ग ४ मधील कर्मचारी वगळता) मनपा सेवेतील कोणत्याही पदांवरील नियुक्तीद्वारे त्याच्या प्रथम सेवा प्रवेशाच्या वेळी, अशा नियुक्तीच्या दिनांकापासून २ महिन्याच्या कालावधीत मत्ता व दायित्वे याबाबतची विवरणपत्र विहित  सादर करावे.
वर्ग २ व ३ मधील अधिकारी / कर्मचा-यांनी त्यांची मत्ता व दायित्वाबाबतची विवरणपत्रे ते सध्या कार्यरत असलेल्या खात्यांच्या खातेप्रमुखांकडे सादर करावे.

Pune Loksabha Election Voting | पुणे शहरात वॉर्डनिहाय मतदार सहाय्यता कक्ष स्थापन

Categories
Breaking News social पुणे

Pune Loksabha Election Voting | पुणे शहरात वॉर्डनिहाय मतदार सहाय्यता कक्ष स्थापन

 

Pune Loksabha Election Voting – (The Karbhari News Service) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्र शोधता यावे यासाठी पुणे शहरात वॉर्डनिहाय मतदार सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

मतदार सहायता कक्षाचा संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहे. औंध बाणेर 020-29912679, ढोले पाटील रोड 020-29995164, विश्रामबाग वाडा 020-29950782, भवानी पेठ 020-29950749, घोले रोड 020-29950672, कर्वे नगर 020-29900101, कोंढवा 9373949573, वानवडी 020-29980508, येरवडा 020-29913010, हडपसर 020-29980410, सिंहगड रोड 020-29950768, नगर रोड 020-29913491, बिबवेवाडी 020-29950752, धनकवडी 020-29950746, कोथरुड 020-29950838.

सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यत ही सेवा उपलब्ध असून नागरिकांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
००००

Hadapsar Vidhansabha Constituency | नरेंद्र मोदी सभा : हडपसर विधानसभा मतदार संघातून 6 हजाराहून अधिक लोक उपस्थित राहणार! | शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची माहिती 

Categories
Breaking News Political पुणे

Hadapsar Vidhansabha Constituency | नरेंद्र मोदी सभा : हडपसर विधानसभा मतदार संघातून 6 हजाराहून अधिक लोक उपस्थित राहणार!

| शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची माहिती

Hadapsar Vidhansabha Constituency- (The Karbhari News Service) – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविजय संकल्प सभेचे आयोजन येत्या 29 एप्रिल रोजी वानवडी येथील रेस कोर्स मैदान येथे करण्यात आले आहे. या सभेसाठी हडपसर विधानसभा मतदार संघातून 6 हजाराहून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे हे सगळे लोक सोसायटी मधील असणार आहेत. अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी दिली. (Pune Loksabha Election)
 पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत असून  रेसकोर्स याठिकाणी सभेचे आयोजन केले आहे. सभेच्या माध्यमातून महायुतीच्या चारही उमेदवारांची ही महाविजय संकल्प सभा असणार आहे. 128 एकरांमध्ये ही सभा होणार असून या सभेला 2 लाख नागरिक उपस्थित राहणार आहेत.  भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, मनसे, आरपीआय यांच्याबरोबर सर्व सहकारी पक्ष सभेच्या तयारीला लागले आहेत. 21 विधानसभा मतदारसंघामधून सभेसाठी कार्यकर्ते येणार आहेत.
दरम्यान यासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघ सज्ज झाला आहे. याबाबत भानगिरे यांनी सांगितले कि शिवसेना पक्षाच्या वतीने नुकतीच मतदारसंघातील सोसायट्याध्ये नागरिकांसोबत बैठका घेण्यात आल्या. यात नागरिकांना सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार सोसायट्यामधील 6 हजारहून अधिक नागरिक या सभेला उपस्थित राहणार आहेत.

Mohan Singh Rajpal | पुणे शहराचे माजी महापौर मोहन सिंग राजपाल यांचे निधन

Categories
Breaking News Political social पुणे

Mohan Singh Rajpal | पुणे शहराचे माजी महापौर मोहन सिंग राजपाल यांचे निधन

 

Mohan Singh Rajpal – (The Karbhari News Service) – पुणे शहराचे माजी महापौर मोहन सिंग राजपाल यांचे आज जहांगीर हॉस्पिटल येथे उपचारा दरम्यान निधन झाले. उद्या रविवार 28 एप्रिल रोजी पार्थिव दर्शन दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत राहत्या घरी (रास्ता पेठ) येथे असून पाच वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यविधी होणार आहे.

पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. मोहनसिंग राजपाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुण्याचे महापौर झाले होते. २०१० ते २०१२ या कालावधीत त्यांनी पुण्याचे महापौरपद भूषवले होते. गेले महिन्यांपासून ते आजारी होते.

PM Modi Pune Tour | पंतप्रधान मोदींच्या सभेला महायुतीचे दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील | प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांची माहिती 

Categories
Breaking News Political पुणे

PM Modi Pune Tour | पंतप्रधान मोदींच्या सभेला महायुतीचे दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील | प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांची माहिती

 

PM Modi Pune Tour – (The Karbhari News Service) –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविजय संकल्प सभेचे आयोजन येत्या 29 एप्रिल रोजी वानवडी येथील रेस कोर्स मैदान येथे सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी करण्यात आले आहे. या सभेला महायुतीचे दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी माहिती प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी दिली. (Pune Loksabha Election)

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसनेचे शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख संजय भोसले, मनसेचे अध्यक्ष साईनाथ बाबर, आरपीआयचे अध्यक्ष संजय सोनावणे, पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, महायुती समन्वयक संदीप खर्डेकर, राजेंद्र शिळिमकर आदी उपस्थित होते.

पांडे म्हणाले, अनेक वर्षानंतर पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत असून रेसकोर्स याठिकाणी सभेचे आयोजन केले आहे. सभेच्या माध्यमातून महायुतीच्या चारही उमेदवारांची ही महाविजय संकल्प सभा असणार आहे. 128 एकरांमध्ये ही सभा होणार असून या सभेला 2 लाख नागरिक उपस्थित राहणार आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, मनसे, आरपीआय यांच्याबरोबर सर्व सहकारी पक्ष सभेच्या तयारीला लागले आहेत. 21 विधानसभा मतदारसंघामधून सभेसाठी कार्यकर्ते येणार असल्याचे पांडे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्यासह 3 हजार व्हीआयपी यासभेला उपस्थित राहणार आहेत. सभेसाठी आठ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना समाज माध्यमातून गुगल लिंक पाठवण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांचे पार्किंग कोठे आहे ते त्यांना समजेल. कार्यकर्त्यांनी येताना पाण्याची बाटली आणू नये. पाण्याची सोय मैदानात करण्यात आली आहे. 22 ठिकाणी एलइडी लावण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी येण्यापुर्वी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व दरवाजे बंद करण्यात येतील. त्यामुळे नागरिक आणि कार्यकर्त्यांनी 4 वाजून 30 मिनिटापर्यंत सभेच्या ठिकाणी पोहचावे असे पांडे यांनी सांगितले.