Baramati Loksabha Election |बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी होणाऱ्या निवडणूकीसाठी साहित्याचे वितरण

Categories
Breaking News Political पुणे
Spread the love

Baramati Loksabha Election |बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी होणाऱ्या निवडणूकीसाठी साहित्याचे वितरण

 

Baramati Loksabha Election – (The Karbhari News Service) –  बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी आज मतदारसंघनिहाय पोलीस बंदोबस्तात साहित्याचे वितरण करण्यात आले असून सर्व साहित्य सुस्थितीत मतदान केंद्रावर पोहचले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड विधानसभा मतदासंघात ३ लाख ४ हजार ६०७, इंदापूर ३ लाख २३ हजार ५४१, बारामती ३ लाख ६९ हजार २१७, पुरंदर ४ लाख २९ हजार ३५१, भोर ४ लाख ७ हजार ९२१ व खडकवासला ५ लाख ३८ हजार ३१ असे एकूण मतदार २३ लाख ७२ हजार ६६८ मतदार आहेत. ५ व ५ पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेले दौंड विधानसभा मतदारसंघात ६, इंदापूर ५, बारामती ६, पुरंदर १७, भोर ९ व खडकवासला ४४ असे एकूण ८७ मतदान केंद्रे आहेत.

दौंड विधानसभा मतदारसंघात एकूण ३०९ मतदान केंद्र आहेत. या करीता एकूण टेबल २१ ची मांडणी करुन ९२७ बॅलेट युनिट, ३०९ कंट्रोल युनिट, ३०९ व्हीव्हीपॅटचे शासकीय धान्य गोदाम, मदर तेरेसा चौक, नगरमोरी येथून मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. साहित्य मतदान केंद्रावर नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता एकूण ४८ एसटी बसेस, १० जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. १५५ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरीता एकूण २ हजार ५९७ मनुष्यबळ कार्यरत आहे.

इंदापूर विधानसभा मतदारसंघात एकूण ३३० मतदान केंद्र आहेत. या करीता एकूण टेबल ३५ ची मांडणी करुन १ हजार १८८ बॅलेट युनिट, ३३० कंट्रोल युनिट, ३३० व्हीव्हीपॅट यंत्राचे शासकीय धान्य गोदाम कालठण रोड येथून मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. साहित्य मतदान केंद्रावर नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता एकूण ५५ एसटी बसेस, ४ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. १६५ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरीता एकूण २ हजार ५१८ मनुष्यबळ कार्यरत आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण ३८० मतदान केंद्र आहेत. या करीता एकूण टेबल ३७ ची मांडणी करुन १ हजार १४० बॅलेट युनिट, ३८० कंट्रोल युनिट, ३८० व्हीव्हीपॅट यंत्राचे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळ परिसर येथून मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. साहित्य मतदान केंद्रावर नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता एकूण ४७ एसटी बसेस, १५ मिनीबस, ७ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. १९० मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरीता एकूण ३ हजार ५०० मनुष्यबळ कार्यरत आहे.

पुरंदर विधानसभा मतदारसंघात एकूण ४२१ मतदान केंद्र आहेत. याकरीता एकूण टेबल ३० ची मांडणी करुन १ हजार २६३ बॅलेट युनिट, ४२१ कंट्रोल युनिट, ४२१ व्हीव्हीपॅट यंत्राचे श्री कातोबा हायस्कूल दिवे येथून मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. साहित्य मतदान केंद्रावर नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता एकूण ६९ एसटी बसेस, ८ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. २११ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरीता एकूण ३ हजार ३७७ मनुष्यबळ कार्यरत आहे.

भोर विधानसभा मतदारसंघात एकूण ५६१ मतदान केंद्र आहेत. याकरीता एकूण टेबल ७० ची मांडणी करुन १ हजार ६८३ बॅलेट युनिट, ५६१ कंट्रोल युनिट, ५६१ व्हीव्हीपॅट यंत्राचे भोर तालुक्याकरीता औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर आणि वेल्हे तालुक्याकरीता जुनी पंचायत समिती, वेल्हे व जिल्हा परिषद मध्यवर्ती शाळा कुरण खुर्द, मुळशी तालुक्याकरीता राणी लक्ष्मीबाई सैनिकी मुलींची शाळा कासार आंबोली येथून मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. साहित्य मतदान केंद्रावर नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता एकूण ९० एसटी बसेस, ८ मिनीबस व ६५ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. २८१ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरीता एकूण ४ हजार ६२ मनुष्यबळ कार्यरत आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात एकूण ४६५ मतदान केंद्र आहेत. याकरीता एकूण टेबल ५३ ची मांडणी करुन १ हजार ३९५ बॅलेट युनिट, ४६५ कंट्रोल युनिट, ४६५ व्हीव्हीपॅट यंत्राचे स्प्रिंग डेल प्ले ग्रांऊड वडगाव बु. ता. हवेली येथून वितरण मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. साहित्य मतदान केंद्रावर नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता एकूण ११३ एसटी बसेस, ५३ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. २७६ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरीता एकूण ४ हजार ४९ मनुष्यबळ कार्यरत आहे.

कविता द्विवेदी, निवडणुक निर्णय अधिकारी- बारामती लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी नियोजनाप्रमाणे तयारी करण्यात आली आहे. मतदान पथकाला साहित्याचे वितरण करण्यात आलेले असून बसेस, जीपद्वारे आज सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर सायंकाळी उशिरापर्यंत पोहोचतील. पोलीस बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था आदीच्या अनुषंगानेही सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या ७ मे रोजी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होणार असून पात्र मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे-
0000