MLA Sanjay Jagtap | समाविष्ट गावातील वाड्यावस्त्या, सोसायट्याना नियमित टॅकरने पाणीपुरवठा करण्याची आमदार संजय जगताप यांची मागणी 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

MLA Sanjay Jagtap | समाविष्ट गावातील वाड्यावस्त्या, सोसायट्याना नियमित टॅकरने पाणीपुरवठा करण्याची आमदार संजय जगताप यांची मागणी

MLA Sanjay Jagtap – (The Karbhari News Service) – पुरंदर हवेली मतदारसंघाच्या (Purandar Haveli Constituency) कार्यक्षेत्रातील पुणे महानगरपालिका हद्दीतील (PMC Pune Limits) समाविष्ट गावातील वाड्यावस्त्या, सोसायट्या व गावठाणे यांना तात्काळ नियमित टॅकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune Water Issue)

आमदार जगताप यांनी महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रानुसार  माझ्या कार्यक्षेत्रातील पुणे महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या, पिसोळी, मंतरवाडी, होळकरवाडी, औताडे- हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवालेवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, येवलेवाडी, गुजर- निंबाळकरवाडी, जांभुळवाडी व कोळेवाडी, उंड्री, भेकराईनगर, उरूळीदेवाची, फुरसुंगी, आंबेगाव आंबेगाव बु. खुर्द या परीसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्याने येथील वाड्यावस्त्या, सोसायट्या, गावठाणांचा समावेश झाल्यापासून आजपर्यंत पिण्याच्या पाण्यासह मुलभुत सोयीसुविधांपासून वंचित आहेत.

जगताप यांनी पुढे म्हटले आहे कि मागील वर्षी मान्सुनपुर्व व जुन ते सप्टेंबर २०२३ कालावधीत पर्जन्यात तूट निर्माण झाल्याने तसेच वातावरणीय बदलामुळे सध्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. या परिसराला पाणी पुरवठा करणारे टँकर वेळेवर येत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या परिसराकरीता येणाऱ्या पाण्याच्या टँकरची संख्या अथवा फेऱ्या वाढवून याठिकाणी नियमित पाणी पुरवठ्याकरीता योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

या बाबींचा सहानुभुतीपुर्वक विचार करून समाविष्ट गावातील वाड्यावस्त्या, सोसायट्या व गावठाणे यांना तात्काळ नियमित टॅकरने पाणीपुरवठा करावा. अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.

MLA Sanjay Jagtap | आमदार संजय जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केल्या आहेत या मागण्या 

Categories
Breaking News PMC Political पुणे

आमदार संजय जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केल्या आहेत या मागण्या

पुणे | पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाअंतर्गत (Purandar-Haveli Constituency) नव्याने समाविष्ठ झालेली 11 व 23 गावांमध्ये पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे निर्माण होणा-या पाण्याचे व्यवस्थापन (water management) करण्याची मागणी पुरंदरचे आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

आमदार जगताप यांच्या पत्रानुसार  पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघा अंतर्गत हवेली तालुक्यातील 11 व 23 गावे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेली आहेत. या गावांमध्ये मोजे आंवेगाव बु. व आंबेगाव खुर्द, येवलेवाडी, उंड्री पिसोळी, फुरसुंगी या भागात पावासाळी पाण्याचे व्यवस्थापनाची कामे झालेली नाहीत. त्यामुळे अवकाळी पाऊस व नाल्यावरील वाढते अतिक्रमणाचा फटका या परिसरातील राहणा-या सामान्य नागरिकांना बसतो. त्यामुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत होते. (MLA Sanjay Jagtap)

जगताप यांनी पुढे म्हटले आहे कि हवेली तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील मौजे आंबेगाव बु. व आंबेगाव खुर्द, येवलेवाडी, उंड्री पिसोळी, फुरसुंगी या गावांमध्ये अपु-या क्षमतेचे पुल अपु-या सिमा भिंती, व पावसाळी लाईन अभावी मागील वर्षापूर्वी अवकाळी पावसामुळे पुरस्थिती निर्माण झालेली होती . व त्यामुळे या नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले होते . हि बाब लक्षात घेता, महानगरपालिके मार्फत वर नमुद केलेल्या गावांमध्ये पावसाळी पाणी व्यवस्थापनाची लवकरात लवकर व्यवस्था होणे गरजेचे आहे.  तरी पावसाळया आधी ही  कामे तातडीने होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. असे जगताप यांनी म्हटले आहे. (PMC Pune)

|  मतदारसंघात तातडीने करावयाच्या कामाची यादी

1) धबाडी-ज्ञानदीप कॉलनी (आंबेगाव बु. )
2 ) शनिनगर (हनुमान नगर ) या परिसरामध्ये नाला बंदिस्त आहे. त्यामुळे पुर सदृष्य परिस्थिती
निर्माण होते. (आंबेगाव खुर्द)
3 ) राजमाता भुयारी मार्गः (आंवेगाव पठार)
4) निलगिरी चौक / जिजामाता चौक / राजे चौक, आंबे पठार,
5) दत्त नगर चौक, व परिसर (आंबेगाव खुर्द )
6) पिसोळी पेट्रोल पंप, परिसर व जेधे वजन काटा
१) उंड्री चौक ते वडाची वाडी परिसर, पुर्णपणे पाणी साचलेले असते.
8) हिलग्रीन हायस्कुल समोरील परिसर उंड्री
(9) पाटील नगर व झांपरे बस्ती व येवलेवाडी परिसर, बोपदेव घाट रोड
10) पिसोळी व जगदंब भवन मार्ग परिसर
11 ) येवलेवाडी – पानसरे नगर व दलिफ सोसा एरिया
12) विठ्ठल पेट्रोलपंप, सासवड रोड व परिसर फुरसुंगी
13 ) ग्रीनलिस्ट सोसा. भोसले नगर, सासवड रोड, परिसर (Purandar MLA Sanjay Jagtap)

Irrigation Dept Vs PMC | पाणी बिलाचा वाद महापालिकेच्या अंगलट! पाटबंधारे विभागाकडून अडवणूक करत दोन गावांचे पाणी तोडले

Categories
Breaking News PMC social पुणे

पाणी बिलाचा वाद महापालिकेच्या अंगलट!

| पाटबंधारे विभागाकडून अडवणूक करत दोन गावांचे पाणी तोडले

पुणे | पाणी वापराच्या वाढीव बिलावरून पाटबंधारेविभाग आणि मनपा पाणीपुरवठा विभाग या दोन संस्था दरम्यान वाद सुरु आहे. महापालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत औद्योगिक दराने बिल देणार नसल्याचा दावा केला आहे. केवळ घरगुती पाणी वापराचेच (Domestic use) पाणी बिल देणार असल्याचे महापालिकेने म्हटले आणि त्यानुसार बिलाचे पैसे देखील पाठवले. मात्र ही भूमिका महापालिकेच्या चांगलीच अंगलट आली आहे. कारण पाटबंधारे विभाग चांगलाच आक्रमक झालेला दिसत आहे. विभागाने त्या बदल्यात मांजरी आणि फुरसुंगी या गावांना कॅनॉल च्या माध्यमातून दिले जाणारे पाणी तोडले. यामुळे महापालिकेला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावर सुधारित बिल देण्याच्या आश्वासनानंतर पाटबंधारे विभागाने तीन दिवसानंतर पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.
 पाटबंधारे विभागाकडून पाणी वापराच्या बदल्यात अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात असल्याचा आरोप महापालिकेने केला होता. त्यावर पाटबंधारे विभागाने बिल कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पाटबंधारे विभागाने पुन्हा एकदा वाढीव बिल दिले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर चे 99 कोटी बिल देत आजपर्यंतची थकबाकी 435 कोटी असल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. शिवाय याबाबत पत्र देत बिल देण्याची मागणी केली आहे. यावर महापालिकेने पाटबंधारे विभागाला कायदा समजावून सांगत एवढे बिल नसल्याचे म्हटले होते.
महापालिका प्रशासनानुसार महापालिका फक्त घरगुती वापरासाठी पाणी देते. औद्योगिक वापरासाठी नाही. महापालिका कायद्यात तसे म्हटले आहे. त्यामुळे दंड वगैरे धरून महिन्याला फक्त 5 कोटी बिल येऊ शकते. त्यानुसार बिले द्यावीत असे महापालिकेने पाटबंधारे ला पत्र लिहिले होते. शिवाय आजपर्यंत ज्यादा घेतलेले पैसे देखील देण्याची मागणी केली होती. मात्र पाटबंधारे विभागाने आपलाच हेका लावून 435 कोटींचे बिल पाठवले आहे. यावरून दोन्ही संस्थांमध्ये महापालिकेत वाद देखील झाला होता. यावेळी महापालिकेने औद्योगिक दराने बिल देणार नसल्याचा पुनरुच्चार केला होता.
यावरून आता पाटबंधारे विभागाने महापालिकेची अडवणूक करण्यास सुरुवात केली आहे. पाटबंधारे विभागाने कॅनॉल च्या माध्यमातून देण्यात येणारे फुरसुंगी आणि मांजरी या गावांचे पाणी तोडले. जवळपास तीन दिवस पाणी देण्यात आले आहे. यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल आहे. परिणामी महापालिकेला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तसेच पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी देखील महापालिकेला सुनावले. यावर महापालिकेने पाटबंधारे विभागाला विचारणा केली असता सांगण्यात आले कि महापालिका या गावांना टँकर ने पाणी देते म्हणून आम्ही पाणी कमी केले. तसेच पाटबंधारे ने आपली मूळ भूमिका महापालिकेसमोर ठेवत आमच्या मागणीनुसार बिल देण्याची मागणी केली. महापालिकेनेही नमते घेत सुधारित बिल पाठवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पाटबंधारे विभागाने त्या दोन गावांना पाणी सोडण्यास सुरुवात केली.

Congress : MNS : Sanjay Jagtap : मनसे पदाधिकाऱ्यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

मनसे पदाधिकाऱ्यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

पुणे : काँग्रेस भवन, पुणे येथे पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार  संजय चंदूकाका जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस विचारसरणीने प्रेरित झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या देहूरोड येथील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी मलिक हसन शेख, असिफ इसा सय्यद, हसन शेख, जावेद शेख, हुसेन शेख, जेदिन नाडार, सुरज गायकवाड, अजय बाला, संकेत गायकवाड, आकाश सुतार, अजय रामोशी रवी स्वामी, शरद सोनी व माजी पोलीस अधिकारी आबूबकार लांडगे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आगामी काळात देहूरोड परिसरात काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळातील जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निश्चय केला.
या सर्वांचे स्वागत करत असताना पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष-आमदार संजय चंदूकाका जगताप म्हणाले की, काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडी मध्ये एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासूनच इतर दोन पक्षाला कधीही दुखावण्याचा प्रयत्न केला नाही किंवा भविष्यातदेखील आम्ही कधीही तो प्रयत्न करणार नाही. सध्या वर्तमानपत्रातून मावळ परिसरातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसात सातत्याने येत आहेत.  या निमित्ताने मला मित्र पक्षाला सूचित करायचे आहे की, काँग्रेस पक्षाला अनेक जणांनी संपवण्याचा प्रयत्न केला, पण तो कधीही संपला नाही कारण काँग्रेस जनसामान्यांची मजबूत विचारधारा आहे.  तसेच आजही देहूरोड लोणावळा मावळ या ठिकाणी काँग्रेस पक्ष अतिशय सक्षम असून या ठिकाणच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर ती अशा कोणत्याही वाऱ्या वादळाचा काहीही फरक पडणार नाही. जे आता या पक्षातून दुसरीकडे गेले आहेत ते काँग्रेस पक्षात किती दिवस होते याचा देखील अभ्यास करावा असे संजय जगताप म्हणाले.
  यावेळी मावळ परिसरातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत  सातकर, मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा यशवंत मोहोळ, देहूरोड काँग्रेसचे अध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू, लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, खजिनदार महेश बापु ढमढेरे, सरचिटणीस पृथ्वीराज पाटील,दीपक साचसर वेंकटेश कोळी,गफूरभाई शेख, राणी पाडियन, मेहबूब गोलंदाज, बबन टोपे व इतर मान्यवर उपस्थित होते.