Pune Gas Cylinder Explodes | मांजरीमधे सहा गॅस सिलेंडरचा स्फोट | अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण

Categories
Breaking News social पुणे

Pune Gas Cylinder Explodes | मांजरीमधे सहा गॅस सिलेंडरचा स्फोट | अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण

Pune Gas Cylinder Explodes | पुणे – मांजरी परिसरात सहा गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. अग्निशमन दलाकडून आग तात्काळ विझवण्यात आली. त्यामुळे मोठी हानी होण्यापासून टळली. (Pune Gas Cylinder Explodes)
अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार आज सायंकाळी ०५•२३ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मांजरी येथे बेल्हेकर वस्तीमधील एका गोडाऊनमधे आग लागल्याची वर्दि मिळाली. दलाकडून तातडीने काळे बोराटे नगर, हडपसर, बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र व मुख्यालयातून एक वॉटर टँकर रवाना करण्यात आला होता.
घटनास्थळी जवान पोहोचताच त्यांनी पाहिले असता तेथे शिवतेज गॅस सेल्स सर्व्हिसेस या पञ्याचे शेड असलेल्या गॅस गोडाउनमधे आग लागली होती. जवानांनी तातडीने आगीवर पाण्याचा मारा करुन सुमारे वीस मिनिटात आगीवर नियंञण मिळवले. सदर ठिकाणी सहा छोटे सिलेंडर फुटल्याचे निदर्शनास आले. अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला असून घटनास्थळी जखमी कोणी नाही. मोठ्या गॅस सिलेंडर मधून छोट्या गॅस सिलेंडरमधे गॅस भरताना आग लागल्याचे समजले. अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आग विझवत धोका दूर केला.

Manjari Water Project | मांजरी पाणी पुरवठा योजना पुणे महापालिकेकडे होणार हस्तांतरित

Categories
Breaking News PMC social पुणे

Manjari Water Project | मांजरी पाणी पुरवठा योजना पुणे महापालिकेकडे होणार हस्तांतरित

| त्यापोटी 2 कोटी 62 लाख महापालिकेला द्यावे लागणार

Manjari Water Project | मांजरी नळपाणी पुरवठा योजना (Manjari Water Project) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (MJP) करण्यात येत आहे.  मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत यासाठी प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. मांजरी नळ पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्यात असून आत्तापर्यंत सदर योजनेचे 85% काम पूर्ण झालेले आहे. मांजरी (Manjari) हे गाव  30 जून 2021 च्या नोटिफिकेशन प्रमाणे पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Municipal Corporation) समाविष्ट झाले आहे. त्यानुसार आता ही योजना महापालिकेकडे हस्तांतरित होणार आहे. मात्र त्यासाठी महापालिकेला 2 कोटी 62 लाख इतका खर्च  करावा लागणार आहे.  (Manjari Water Project)
खासदार, डॉ. अमोल कोल्हे (MP Dr Amol Kolhe), आमदार चेतन तुपे (MLA Chetan Tupe)
व पुणे महानगरपालिकेकडून मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Chief Engineer Aniruddha Pawaskar), अधीक्षक अभियंता इंद्रभान रणदिवे, कार्यकारी अभियंता पी. सी. भांडेकर, कार्यकारी अभियंता सुभाष  पावरा यांचे समवेत 8 जून  रोजी मांजरी कार्यक्षेत्रावर प्रत्यक्ष पहाणी करण्यात आली. यावेळी प्राधिकरण कडून सांगण्यात आले कि  मूळ मंजूर मांजरी योजनेमध्ये विद्युत देयकासाठी कोणतीही तरतूद नसल्याने प्राधिकरण कडून  विद्युत देयके भरता येणार नाहीत. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 (पुणे सोलापूर हायवे) क्रॉसिंग व लगतसाठी 2,62,07,935 इतक्या रकमेची मागणी संबंधित विभागाने (NHAI) केलेली आहे. तथापि योजनेच्या मूळ मंजूर किंमतीमध्ये तरतूद नसल्याने सदरची रक्कम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे भरणा करणे शक्य झाले नाही. यावर खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार चेतन तुपे  यांनी महापालिकेसोबत  चर्चा करुन निर्णय घेऊ, असे सांगितले होते. त्यानुसार महापालिका 2 कोटी 62 लाख nhai ला देणार आहे. त्यानंतर प्राधिकरण उर्वरित कामे पूर्ण करून ही योजना पुणे महापालिकेकडे हस्तांतरित करणार आहे. (Pune Municipal Corporation)
News Title | Manjari Water Project |  Cat water supply scheme will be transferred to Pune Municipal Corporation

Irrigation Dept Vs PMC | पाणी बिलाचा वाद महापालिकेच्या अंगलट! पाटबंधारे विभागाकडून अडवणूक करत दोन गावांचे पाणी तोडले

Categories
Breaking News PMC social पुणे

पाणी बिलाचा वाद महापालिकेच्या अंगलट!

| पाटबंधारे विभागाकडून अडवणूक करत दोन गावांचे पाणी तोडले

पुणे | पाणी वापराच्या वाढीव बिलावरून पाटबंधारेविभाग आणि मनपा पाणीपुरवठा विभाग या दोन संस्था दरम्यान वाद सुरु आहे. महापालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत औद्योगिक दराने बिल देणार नसल्याचा दावा केला आहे. केवळ घरगुती पाणी वापराचेच (Domestic use) पाणी बिल देणार असल्याचे महापालिकेने म्हटले आणि त्यानुसार बिलाचे पैसे देखील पाठवले. मात्र ही भूमिका महापालिकेच्या चांगलीच अंगलट आली आहे. कारण पाटबंधारे विभाग चांगलाच आक्रमक झालेला दिसत आहे. विभागाने त्या बदल्यात मांजरी आणि फुरसुंगी या गावांना कॅनॉल च्या माध्यमातून दिले जाणारे पाणी तोडले. यामुळे महापालिकेला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावर सुधारित बिल देण्याच्या आश्वासनानंतर पाटबंधारे विभागाने तीन दिवसानंतर पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.
 पाटबंधारे विभागाकडून पाणी वापराच्या बदल्यात अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात असल्याचा आरोप महापालिकेने केला होता. त्यावर पाटबंधारे विभागाने बिल कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पाटबंधारे विभागाने पुन्हा एकदा वाढीव बिल दिले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर चे 99 कोटी बिल देत आजपर्यंतची थकबाकी 435 कोटी असल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. शिवाय याबाबत पत्र देत बिल देण्याची मागणी केली आहे. यावर महापालिकेने पाटबंधारे विभागाला कायदा समजावून सांगत एवढे बिल नसल्याचे म्हटले होते.
महापालिका प्रशासनानुसार महापालिका फक्त घरगुती वापरासाठी पाणी देते. औद्योगिक वापरासाठी नाही. महापालिका कायद्यात तसे म्हटले आहे. त्यामुळे दंड वगैरे धरून महिन्याला फक्त 5 कोटी बिल येऊ शकते. त्यानुसार बिले द्यावीत असे महापालिकेने पाटबंधारे ला पत्र लिहिले होते. शिवाय आजपर्यंत ज्यादा घेतलेले पैसे देखील देण्याची मागणी केली होती. मात्र पाटबंधारे विभागाने आपलाच हेका लावून 435 कोटींचे बिल पाठवले आहे. यावरून दोन्ही संस्थांमध्ये महापालिकेत वाद देखील झाला होता. यावेळी महापालिकेने औद्योगिक दराने बिल देणार नसल्याचा पुनरुच्चार केला होता.
यावरून आता पाटबंधारे विभागाने महापालिकेची अडवणूक करण्यास सुरुवात केली आहे. पाटबंधारे विभागाने कॅनॉल च्या माध्यमातून देण्यात येणारे फुरसुंगी आणि मांजरी या गावांचे पाणी तोडले. जवळपास तीन दिवस पाणी देण्यात आले आहे. यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल आहे. परिणामी महापालिकेला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तसेच पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी देखील महापालिकेला सुनावले. यावर महापालिकेने पाटबंधारे विभागाला विचारणा केली असता सांगण्यात आले कि महापालिका या गावांना टँकर ने पाणी देते म्हणून आम्ही पाणी कमी केले. तसेच पाटबंधारे ने आपली मूळ भूमिका महापालिकेसमोर ठेवत आमच्या मागणीनुसार बिल देण्याची मागणी केली. महापालिकेनेही नमते घेत सुधारित बिल पाठवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पाटबंधारे विभागाने त्या दोन गावांना पाणी सोडण्यास सुरुवात केली.

Vaccine : Pune : पुण्यात अजून एक कंपनी तयार करणार कोविड १९ वरील लस! : महापालिकेकडे केली पाण्याची मागणी

Categories
Breaking News PMC आरोग्य देश/विदेश पुणे

पुण्यात अजून एक कंपनी तयार करणार कोविड १९ वरील लस!

: महापालिकेकडे केली पाण्याची मागणी

पुणे : कोविड वरील परिणामकारक कोविशिल्ड लस तयार करण्याचा मान पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ने मिळवला आहे. आता ही लस जगभरात वितरित होत आहे. त्यांनतर देशात वेगवेगळ्या लस आल्या.  दरम्यान पुण्यात अजून एक कंपनी लस तयार करणार आहे. बायोवेट नावाची कंपनी मांजरी मधेच कोविड वरील लस तयार करणार आहे. कोविड शिवाय इतर ही लशी ही कंपनी तयार करणार आहे. त्यासाठी या कंपनीने महापालिकेकडून वितरित केल्या जाणाऱ्या पाण्याची मागणी केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेला पत्र लिहित हे पाणी उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.

: मांजरी खुर्द मध्ये तयार होणार लस

बायोवेट प्रायवेट लिमिटेड ही कंपनी पुण्याजवळील मांजरी खुर्द मध्ये लस तयार करणार आहे. त्यासाठीची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हाय कोर्ट ने देखील यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार कंपनी लवकरच ही लस तयार करेल. कोविड शिवाय इतर ही लशी ही कंपनी भविष्यात तयार करणार आहे. यासाठी कंपनी सद्यस्थितीत बोअर चे पाणी वापरत आहे. मात्र त्या पाण्यातील कठीनता आणि TDS च्या ज्यादा प्रमाणामुळे यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी कंपनीने महापालिकेकडून वितरित केल्या जाणाऱ्या पाण्याची मागणी केली आहे.

दररोज ६०-७० हजार लिटर पाण्याची आवश्यकता

कंपनीला दररोज ६०-७० हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच दररोज ६-८ Tanker ची आवश्यकता भासणार आहे. कारण कंपनी ज्यादा प्रमाणात इंजेक्शन तयार करणार आहे.  कंपनी ने ही मागणी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला पत्र लिहित हे पाणी संबंधित कंपनीला उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. महापालिकेला देखील हे पाणी उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.