District Collector | Pune | जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला चांदणी चौक उड्डाणपूल कामाचा आढावा

Categories
Breaking News social पुणे

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला चांदणी चौक उड्डाणपूल कामाचा आढावा

पुणे |: जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी चांदणी चौक परिसराला भेट देऊन तेथील जूना पूल पाडण्याच्या कामाच्या अंतिम तयारीबाबत माहिती घेतली. त्यांच्या समवेत पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, संबंधित यंत्रणेचे अधिकारी आदी उपस्थित होते.

पूल पाडण्यापूर्वी २०० मीटरचा परिसर सायंकाळी ६ वाजता निर्मनुष्य करावा. वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी आवश्यक पोलीस कर्मचारी नेमावेत. पूल पाडल्यानंतर राडारोडा नियोजित वेळेतच बाजूला केला जाईल याची विशेष दक्षता घ्यावी आणि त्यासाठी गरज असल्यास अतिरिक्त वाहने आणि मनुष्यबळ तैनात करावे, असे निर्देश डॉ.देशमुख यांनी दिले.

बाहेरून येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाविषयी माहिती देण्यासाठी एनएचएआयने महामार्गावर ठिकठिकाणी माहितीचे फलक लावावेत. बावधन परिसरातील लहान रस्त्यांवर वाहतूक नियोजनासाठी पोलीस कर्मचारी नेमण्यात यावेत. आवश्यतेतनुसार आपत्कालीन नियोजन तयार ठेवावे, असे निर्देश पोलीस आयुक्त श्री.शिंदे यांनी दिले.

पोलीस उपायुक्त श्रीरामे यांनी पूल पाडण्याच्या वेळेत करण्यात येणाऱ्या वाहतूक नियोजनाची माहिती दिली.

असा पाडला जाईल जूना पूल

पूल पाडण्यासाठी त्याला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण ३५ मिमी व्यासाचे १ हजार ३०० छिद्र पाडण्यात आले आहे. ६०० किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग करण्यात येणार आहे. १ हजार ३५० डिटोनेटरचा उपयोग नियंत्रीत पद्धतीने ब्लास्ट करण्यासाठी करण्यात येणार आहे. ब्लास्ट एक्स्पर्ट आनंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे करण्यात येत आहेत. रविवारी (२ ऑक्टोबर रोजी) पहाटे सर्व तयारी वेळेवर झाल्यास पहाटे १ ते २ च्या दरम्यान पूल पाडण्यात येईल.

पूल पाडतांना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये यासाठी ६ हजार ५०० मीटर चॅनल लिंक्स, ७ हजार ५०० वर्ग मीटर जिओ टेक्स्टाईल, ५०० वाळूच्या पिशव्या आणि ८०० वर्ग मीटर रबरी मॅटचा वापर आच्छादनासाठी करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून २०० मीटर परिघातील इमारतीतून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येणार आहे.

पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री

पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी एनएचएआयतर्फे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपयोगात आणली जात आहे. १६ एक्स्कॅव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, ३० टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, २ अग्निशमन वाहन, ३ रुग्णवाहिका, २ पाण्याचे टँकर आणि पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण २१० कर्मचारी संबंधित यंत्रणतर्फे नियुक्त करण्यात आले आहेत.

सुरक्षा बंदोबस्त आणि वाहतूक नियोजनासाठी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे एकूण ३ पोलीस उपायुक्त, ४ सहायक आयुक्त, १९ पोलीस निरीक्षक, ४६ सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसेच ३५५ पोलीस कर्मचारी असे एकूण ४२७ पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त् करण्यात आले आहेत. नागरिकांनी पूल पाडण्याच्या वेळेत चांदणी चौक परिसरात येऊ नये आणि पोलीसांनी दिलेल्या वाहतूक विषयक सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी केले आहे.

Shivjayanti : shivneri : शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन करा: राजेश देशमुख

Categories
cultural पुणे

शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन करा: राजेश देशमुख

शिवनेरी गडावरील शिवजयंती सोहळ्याबाबत आढावा बैठक

 

पुणे : -शिवनेरी गडावरील शिवजयंती सोहळा उत्साहात आणि शासनाच्या कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून होण्यासाठी आवश्यक नियोजन करावे आणि सोहळा चांगल्यारितीने साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देखमुख यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शिवनेरी गडावरील छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याबाबत आयोजित आढावा बैठाकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार अतुल बेनके, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, माजी आमदार शरद सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे, नगराध्यक्ष शाम पांडे, उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर आदी उपस्थित होते.

डॉ.देशमुख म्हणाले, गडाच्या पायथ्याशी वाहनतळाची योग्य व्यवस्था करण्यात यावी. पंचायत समितीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कची व्यवस्था करावी. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयासाठी स्वतंत्र कक्ष तयार करावा. साखळदंड कड्याच्याबाजूने शिवप्रेमींना शिवजयंतीच्या दिवशी प्रवेश बंद ठेवावा. राज्य परिवहन महामंडळाने आवश्यकतेनुसार बसेसची व्यवस्था करावी. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांनी समन्वयाने वेळेत आवश्यक नियोजन पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले.

आमदार बेनके म्हणाले, सोहळ्याशी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक परिसरात प्रदर्शित करण्यात यावे. येणाऱ्या शिवप्रेमींसाठी चौकशी कक्षाची व्यवस्था करण्यात यावी. वाहनतळांची संख्या वाढविण्यात यावी. पथदिव्यांची आवश्यक दुरूस्ती करण्यात यावी.

पोलीस अधीक्षक देशमुख यांनी वाहनतळाच्या ठिकाणांची निश्चिती आणि गर्दी नियंत्रणासाठी सीसीटीव्हीचा वापर करण्याची सूचना केली. आपत्कालीन मदतीसाठी गिर्यारोहकांचे स्थानिक पथक तयार ठेवावेत असे त्यांनी सांगितले.

बैठकीत शिवप्रेमींनी सोहळ्याच्या नियोजनाच्यादृष्टीने उपयुक्त सूचना मांडल्या. बैठकीला सोहळ्याशी संबंधित विविध संस्थांचे प्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Vaccine : Pune : पुण्यात अजून एक कंपनी तयार करणार कोविड १९ वरील लस! : महापालिकेकडे केली पाण्याची मागणी

Categories
Breaking News PMC आरोग्य देश/विदेश पुणे

पुण्यात अजून एक कंपनी तयार करणार कोविड १९ वरील लस!

: महापालिकेकडे केली पाण्याची मागणी

पुणे : कोविड वरील परिणामकारक कोविशिल्ड लस तयार करण्याचा मान पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ने मिळवला आहे. आता ही लस जगभरात वितरित होत आहे. त्यांनतर देशात वेगवेगळ्या लस आल्या.  दरम्यान पुण्यात अजून एक कंपनी लस तयार करणार आहे. बायोवेट नावाची कंपनी मांजरी मधेच कोविड वरील लस तयार करणार आहे. कोविड शिवाय इतर ही लशी ही कंपनी तयार करणार आहे. त्यासाठी या कंपनीने महापालिकेकडून वितरित केल्या जाणाऱ्या पाण्याची मागणी केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेला पत्र लिहित हे पाणी उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.

: मांजरी खुर्द मध्ये तयार होणार लस

बायोवेट प्रायवेट लिमिटेड ही कंपनी पुण्याजवळील मांजरी खुर्द मध्ये लस तयार करणार आहे. त्यासाठीची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हाय कोर्ट ने देखील यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार कंपनी लवकरच ही लस तयार करेल. कोविड शिवाय इतर ही लशी ही कंपनी भविष्यात तयार करणार आहे. यासाठी कंपनी सद्यस्थितीत बोअर चे पाणी वापरत आहे. मात्र त्या पाण्यातील कठीनता आणि TDS च्या ज्यादा प्रमाणामुळे यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी कंपनीने महापालिकेकडून वितरित केल्या जाणाऱ्या पाण्याची मागणी केली आहे.

दररोज ६०-७० हजार लिटर पाण्याची आवश्यकता

कंपनीला दररोज ६०-७० हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच दररोज ६-८ Tanker ची आवश्यकता भासणार आहे. कारण कंपनी ज्यादा प्रमाणात इंजेक्शन तयार करणार आहे.  कंपनी ने ही मागणी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला पत्र लिहित हे पाणी संबंधित कंपनीला उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. महापालिकेला देखील हे पाणी उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.