Manjari Water Project | मांजरी पाणी पुरवठा योजना पुणे महापालिकेकडे होणार हस्तांतरित

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

Manjari Water Project | मांजरी पाणी पुरवठा योजना पुणे महापालिकेकडे होणार हस्तांतरित

| त्यापोटी 2 कोटी 62 लाख महापालिकेला द्यावे लागणार

Manjari Water Project | मांजरी नळपाणी पुरवठा योजना (Manjari Water Project) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (MJP) करण्यात येत आहे.  मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत यासाठी प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. मांजरी नळ पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्यात असून आत्तापर्यंत सदर योजनेचे 85% काम पूर्ण झालेले आहे. मांजरी (Manjari) हे गाव  30 जून 2021 च्या नोटिफिकेशन प्रमाणे पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Municipal Corporation) समाविष्ट झाले आहे. त्यानुसार आता ही योजना महापालिकेकडे हस्तांतरित होणार आहे. मात्र त्यासाठी महापालिकेला 2 कोटी 62 लाख इतका खर्च  करावा लागणार आहे.  (Manjari Water Project)
खासदार, डॉ. अमोल कोल्हे (MP Dr Amol Kolhe), आमदार चेतन तुपे (MLA Chetan Tupe)
व पुणे महानगरपालिकेकडून मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Chief Engineer Aniruddha Pawaskar), अधीक्षक अभियंता इंद्रभान रणदिवे, कार्यकारी अभियंता पी. सी. भांडेकर, कार्यकारी अभियंता सुभाष  पावरा यांचे समवेत 8 जून  रोजी मांजरी कार्यक्षेत्रावर प्रत्यक्ष पहाणी करण्यात आली. यावेळी प्राधिकरण कडून सांगण्यात आले कि  मूळ मंजूर मांजरी योजनेमध्ये विद्युत देयकासाठी कोणतीही तरतूद नसल्याने प्राधिकरण कडून  विद्युत देयके भरता येणार नाहीत. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 (पुणे सोलापूर हायवे) क्रॉसिंग व लगतसाठी 2,62,07,935 इतक्या रकमेची मागणी संबंधित विभागाने (NHAI) केलेली आहे. तथापि योजनेच्या मूळ मंजूर किंमतीमध्ये तरतूद नसल्याने सदरची रक्कम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे भरणा करणे शक्य झाले नाही. यावर खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार चेतन तुपे  यांनी महापालिकेसोबत  चर्चा करुन निर्णय घेऊ, असे सांगितले होते. त्यानुसार महापालिका 2 कोटी 62 लाख nhai ला देणार आहे. त्यानंतर प्राधिकरण उर्वरित कामे पूर्ण करून ही योजना पुणे महापालिकेकडे हस्तांतरित करणार आहे. (Pune Municipal Corporation)
News Title | Manjari Water Project |  Cat water supply scheme will be transferred to Pune Municipal Corporation