Pune Gas Cylinder Explodes | मांजरीमधे सहा गॅस सिलेंडरचा स्फोट | अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण

Categories
Breaking News social पुणे

Pune Gas Cylinder Explodes | मांजरीमधे सहा गॅस सिलेंडरचा स्फोट | अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण

Pune Gas Cylinder Explodes | पुणे – मांजरी परिसरात सहा गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. अग्निशमन दलाकडून आग तात्काळ विझवण्यात आली. त्यामुळे मोठी हानी होण्यापासून टळली. (Pune Gas Cylinder Explodes)
अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार आज सायंकाळी ०५•२३ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मांजरी येथे बेल्हेकर वस्तीमधील एका गोडाऊनमधे आग लागल्याची वर्दि मिळाली. दलाकडून तातडीने काळे बोराटे नगर, हडपसर, बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र व मुख्यालयातून एक वॉटर टँकर रवाना करण्यात आला होता.
घटनास्थळी जवान पोहोचताच त्यांनी पाहिले असता तेथे शिवतेज गॅस सेल्स सर्व्हिसेस या पञ्याचे शेड असलेल्या गॅस गोडाउनमधे आग लागली होती. जवानांनी तातडीने आगीवर पाण्याचा मारा करुन सुमारे वीस मिनिटात आगीवर नियंञण मिळवले. सदर ठिकाणी सहा छोटे सिलेंडर फुटल्याचे निदर्शनास आले. अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला असून घटनास्थळी जखमी कोणी नाही. मोठ्या गॅस सिलेंडर मधून छोट्या गॅस सिलेंडरमधे गॅस भरताना आग लागल्याचे समजले. अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आग विझवत धोका दूर केला.

Fire system | फायर सिस्टम सुस्थितीत व कार्यान्वित ठेवण्याचे आदेश | दुर्घटना घडल्यास मालक किंवा भोगवटाधार जबाबदार

Categories
Breaking News PMC social पुणे

फायर सिस्टम सुस्थितीत व कार्यान्वित ठेवण्याचे आदेश

| दुर्घटना घडल्यास मालक किंवा भोगवटाधार जबाबदार

वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्‍वभुमीवर आगीच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी शहरातील इमारतींसह विविध प्रकारच्या आस्थापना, व्यापारी संकुले यांनी त्यांच्याकडील अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित व सुस्थितीत ठेवावी. संबंधित यंत्रणा सुस्थितीत व कार्यान्वित असल्याचे प्रमाणपत्र महापालिकेच्या अग्निशामक दलाकडे जमा करण्याचे आवाहन महापालिकेच्या अग्निशामक दलाच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच कुठली दुर्घटना झाली तर त्यास इमारतीचा मालक किंवा भोगवटाधारक जबाबदार असेल, असे ही महापालिकेने म्हटले आहे.
शहरामध्ये उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. मे महिन्यामध्ये उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात जाणवतो. वाढत्या उन्हामुळे शहरामध्ये आगीच्या घटना दरवर्षी घडतात. या आगीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी, जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी अग्निशामक दलाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. त्यादृष्टीने अग्निशामक दलाकडून विविध आस्थापनांना आवाहन करण्यात आले आहे.

शहरातील उंच इमारती, चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांच्यासह विविध प्रकारच्या आस्थापना, मोठी व्यापारी संकुले, तारांकीत हॉटेल्स, कार्यालये यांना त्यांच्या आस्थापनांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करणे बंधनकारक आहे. संबंधित ठिकाणी असलेली अग्निशामक यंत्रणा सुस्थितीत ठेवण्याची तसेच ती कार्यान्वित ठेवण्याचे काम संबंधित आस्थापनांनी करायचे असते.यंत्रणा कार्यान्वित व सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र (फॉर्म बी) अधिकृत एजन्सीकडून घ्यायचे आहे. संबंधित प्रमाणपत्र जानेवारी व जुलै या कालावधीमध्ये अग्निशामक दलाकडे जमा करायचे आहे.दरम्यान, असे प्रमाणपत्र न दिल्यास भविष्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास त्यास इमारतीचे मालक व वापर करणारे भोगवटादार यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. त्यामुळे अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित असल्याबाबतचे प्रमाणपत्रही जमा करण्याचे आवाहन अग्निशामक दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी केले आहे.

Pune Fire | नगर रस्ता,वडगाव शेरी येथील भंगार मालाच्या गोडाउनला भीषण आग

Categories
Breaking News social पुणे

नगर रस्ता,वडगाव शेरी येथील भंगार मालाच्या गोडाउनला भीषण आग

पुणे – आज दुपारी  नगर रस्ता, वडगाव शेरी, सोपान नगर येथे एका भंगारच्या गोडाऊनला आग लागली असल्याची वर्दि दलाच्या नियंञण कक्षात मिळताच व नागरिकांचे सतत फोन येत असल्याने प्रथम येरवडा व धानोरी अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन व एक टँकर रवाना करण्यात आला. त्याचवेळी वर्दिवर पोहोचताना अधिकारी सुभाष जाधव यांनी दुरूनच मोठा धूर पाहत अतिरिक्त फायरगाडी व टँकरची मागणी करताच नायडू, हडपसर तसेच पीएमआरडीए आणि दलाचे व महापालिकेचे वॉटर टँकर अशी एकुण सुमारे १५ वाहने व ०८ अग्निशमन अधिकारी व जवळपास ५० ते ६० जवान दाखल होते.

घटनास्थळी पोहोचताच आग भीषण स्वरुपात असल्याचे निदर्शनास येताच दलाच्या जवानांनी होज पाईप वापरत पाण्याचा मारा सुरू केला. त्याचवेळी अग्निशमन अधिकारी यांनी आगीमधे कोणी आत अडकले आहे अथवा कसे याची चौकशी करत खाञी केली असता कोणी नसल्याचे समजले. त्या ठिकाणी सुमारे ६,००० स्केवर फुट व शेजारीच ४,००० स्केवर फुट जागेत पञ्याच्या शेडमधे उभारलेले हे भंगार मालाचे गोडाउन असल्याने जवानांनी घन, पोगर, कटर व इतर अग्निशमन उपकरणांचा वापर करीत पञा काढत आतमधे प्रवेश करुन आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. सुमारे तासाभरा नंतर दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणत शेजारी जवळच असलेली पञ्याची शेडची काही घरे व दुकाने यांना आगीच्या ज्वाळांपासून वाचविले व मोठा धोका टाळला. या गोडाऊधमनमधे छोटे व मोठे असे एकुण ०८ ते १० सिलेंडर ही फुटले. घटनास्थळी जेसीबी यांची मदत घेत जळालेला माल आजुबाजूला करीत पाणी मारत आग पुर्ण विझवली. शेजारील पाण्याच्या हौदातून पंपाच्या साह्याने पाण्याचा उपसा केला. सदर ठिकाणी कोणीही जखमी नसून जिवितहानी नाही याची खाञी केली.

या कामगिरीत दलाचे वरिष्ठ अधिकारी रमेश गांगड, गजानन पाथ्रुडकर, विजय भिलारे, सुभाष जाधव व पीएमआरडीएचे विजय महाजन व इतर जवानांनी सहभाग घेतला.

—-

“भंगार साहित्या मध्ये बरेचसे सिलेंडर होते ज्यांच्या स्फ़ोट होता त्या मुळे अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती अशा वेळेस अग्निशमन दलाने अतिशय कौशल्यपूर्ण परिस्थिती हाताळून आगीवर नियंत्रण मिळवले “

| देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी

Pune Fire | शहरात आगीच्या 2 भीषण घटना : अग्निशमन दलाची प्रशंसनीय कामगिरी

Categories
Breaking News PMC social पुणे

 शहरात आगीच्या 2 भीषण घटना : अग्निशमन दलाची प्रशंसनीय कामगिरी

पुणे – आज  सकाळी 8:15 वाजता कोंढवा, लुल्लानगर चौक, मार्वल व्हीस्टा इमारत येथे आग लागल्याची घटना घडली कोंढवा खुर्द व गंगाधाम अग्निशमन केंद्र, व मुख्यालयातुन 6 अग्निशमन वाहने व टँकर तसेच पीएमआरडीए येथून एक वाहन रवाना करण्यात आले होते.

सदर ठिकाणी इमारतीच्या सातव्या मजल्यावर व्हिजेटा हॉटेलमधे आग लागल्याचे दिसून येताच जवानांनी सातव्या मजल्यावर पोहोचत आग मोठी असल्याने दार तोडून आतमधे प्रवेश करत आग विझवण्याचे काम सुरू केले. त्याचवेळी अग्निशमन अधिकारी यांनी कोणी आतमधे अडकले आहे का याची खाञी केली असता हॉटेल बंद असल्याने कोणी कामगार आतमधे नाहीत असे समजले. इमारतीमधील स्थायी अग्निशमन यंञणेचा वापर करण्याचा प्रयत्न केला असता पंप बंद असल्याचे निदर्शनास आले. अग्निशमन यंत्रणा, स्प्रिंकलर्स असूनही कार्यरत नसल्यमुळे आग एवढ्या मोठया प्रमाणात पसरली असे मुख्यअग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले

अग्निशमन जवानांनी शर्थी चे प्रयत्न करून सदर आगीवर चारही बाजूने पाण्याचा मारा केला व आग आजूबाजूला पसरणार नाही याची दक्षता घेतली , सुदैवाने या आगीमधे कोणीही जखमी वा जिवितहानी नाही याची खाञी केली. सदर आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागली असा अंदाज आहे.

घटनास्थळावरून ०८ एलपीजी सिलेंडर जवानांनी बाहेर काढत पुढील संभाव्य धोका टाळला.

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी समीर शेख, प्रभाकर उम्राटकर व प्रभारी अधिकारी कैलास शिंदे व जवान दशरथ माळवदकर, निलेश लोणकर, रवि बारटक्के, प्रकार शेलार, राहुल नलावडे, अतुल खोपडे व इतर जवानांनी सहभाग घेतला.

दुसरी घटना : येरवडा, शास्ञीनगर चौकात एका ‘शिवशाही’ (यवतमाळ ते पुणे) बसला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाकडून 2 फायरगाडी व 1 वॉटर टँकरच्या साह्याने आग आटोक्यात.
सर्व 42 प्रवाशी सुरक्षित असल्या बाबत मुख्यअग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले.

Pune Fire || अग्निशमन दलाकडे सायंकाळी आगीच्या तीन घटना 

Categories
Breaking News PMC social पुणे

अग्निशमन दलाकडे सायंकाळी आगीच्या तीन घटना 

पुणे  २८•१०•२०२२ रोजी सायंकाळी सहानंतर आगीच्या ०३ घटना घडल्या असून सदर ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान वेळेत पोहोचल्याने धोका टळला असून जखमी वा जिवितहानी कोठे ही नाही.
आज सायंकाळी दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी अग्निशमन मुख्यालयात त्यांच्या कार्यालयातून अप्सरा थिएटरच्या दिशेला मोठ्या प्रमाणात धूर दिसत असल्याचे नियंत्रण कक्षात कळवताच तातडीने दोन अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती. त्यावेळी तिथे नाल्यामधे मोठ्या प्रमाणात कचरा पेटून प्रचंड धुर झाला होता. अग्निशमन प्रभारी अधिकारी प्रशांत गायकर व जवानांनी आग पुर्ण विझवली.
तसेच सायंकाळी ०७•१२ वाजता हडपसर, चिंतामणी नगर, गल्ली क्रमांक ०४ येथे गादी कारखान्यात आग लागल्याची वर्दि मिळताच हडपसर व काळेबोराटे नगर अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले. घटनास्थळी सुमारे ६\७ कापसाच्या गाद्यांनी पेट घेतला होता. जवानांनी पाणी मारत आग विझवून पुढील धोका टाळला. अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे व जवानांनी कामगिरी पुर्ण केली. आगीचे कारण समजू शकले नाही.
त्यानंतर लगेचच सायंकाळी ०७•१३ वाजता रविवार पेठ, तांबोळी मस्जिद जवळ, तारा मॉल येथे आग लागल्याची वर्दि मिळाली असता मुख्यालयातून एक फायरगाडी एक देवदूत वाहन, कसबा अग्निशमन वाहन व एक वाॅटर टँकर रवाना करण्यात आला होता. घटनास्थळी इमारत सात मजली असून टेरेसवर एसी डक्ट पॅनेलला आग लागून तिथेच असलेल्या रिकाम्या पाण्याच्या टाकीने पेट घेतला होता. जवानांनी पाणी मारत सुमारे दहा मिनिटात आग आटोक्यात आणत आग इतरञ पसरु न देता धोका टाळला असून यामधे कोणी जखमी नाही. आगीचे कारण समजू शकले नाही. तसेच अग्निशमन अधिकारी पंकज जगताप व प्रशांत गायकर व जवानांनी कामगिरी केली.
रविवार पेठ येथील आग शहराच्या विविध भागातून दिसून आल्याने नियंत्रण कक्षात असंख्य फोन आले तसेच “आग किती मोठी आहे व कोणी जखमी/जिवितहानी झाली का” अशी विचारणा अनेक नागरिकांनी केली. सदर ठिकाणी दलातील अँब्युलंस अटेन्डट व तेथील रहिवाशी असलेले प्रविण सिद्धे यांनी विषेश मदत करत अग्निशमन वाहन पोहोचण्याआधी व नंतर योग्य ते मदतकार्य करुन आपले कर्तव्य बजावले.

Heavy Rain in Pune | पुण्यात पाऊसाचा हाहाकार | अग्निशमन दलाने वाचवले 12 लोकांचे प्राण!

Categories
Breaking News PMC social पुणे

पुण्यात पाऊसाचा हाहाकार | अग्निशमन दलाने वाचवले 12 लोकांचे प्राण!

पुणे – काल दिनांक १७•१०•२०२२ रोजी राञी शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला असता विविध ठिकाणी पाणी शिरल्याच्या व इतर घटना अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात नोंद झाल्या असून अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात अडकलेल्या एकुण १२ जणांची सुखरुप सुटका करुन आपले कर्तव्य चोख बजावले आहे.

अग्निशमन दलाकडे दिनांक १७•१०•२०२२ रोजी राञी ०९•५७ वाजेपासून विविध प्रकारच्या वर्द्या प्राप्त झाल्या होत्या. यामधे दिनांक १८•१०•२०२२ रोजी पहाटे ०४•०० वाजेपर्यंत पाणी शिरणे किंवा जमा होणे याच्या एकुण २० (येवलेवाडी स्मशानभूमीजवळ – सुखसागर नगर, अंबामाता मंदिर – कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड – रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ – सुखसागर नगर, डॉल्फिन चौक – बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर – हडपसर, गाडीतळ – शिवाजीनगर पोलिस मुख्यालय – मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम – कसबा पेठ, फिश मार्केट जवळ – कुंभार वाडा समोर – नारायण पेठ, मोदी गणपती – औंध, डिएव्ही स्कुल गल्ली – कसबा पेठ, पवळे चौक – कसबा पेठ, भुतडा निवास – पर्वती, मिञमंडळ चौक – गंज पेठ – भवानी पेठ तसेच ०१ ठिकाणी  सीमा भिंतीचा भाग पडल्याची घटना पर्वती, रमणा गणपतीजवळ घडली. तसेच झाडपडी ०३ ठिकाणी ज्यामधे हडपसर, आकाशवाणी जवळ रस्त्यावर तर चंदननगर, बिडी कामगार वसाहत येथे रिक्षावर झाड पडले आणि पाषाण, लोयला स्कुल येथे दुचाकीवर झाड पडले होते. यामधे दलाची मदत पोहोचण्यापुर्वी जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला नागरिकांनी दवाखान्यात रवाना केले होते.

विषेश म्हणजे मंगळवार पेठ, स्वरुपवर्धिनी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कुटूंब पाण्यात अडकले होते. तेथील स्थानिक पल्लवी जावळे यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांना कळविताच तिथे अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर, तांडेल राजाराम केदारी, अनिल करडे व जवान छगन मोरे, शफीक सय्यद, हरिश बुंदेले, राजू जगदाळे, निलेश कर्णे, महेश गरड, मयुर कारले, चंद्रकांत मेनसे, राहुल जाधव, नवनाथ जावळे व चालक धीरज सोनावणे यांनी तेथील ०३ लहान मुली ०१ महिला व ०१ पुरूष (एकुण ०५) यांना सुखरुप बाहेर आणले. यामधे तांडेल राजाराम केदारी यांनी लहान मुलींना खांद्यावर घेऊन येताच स्थानिकांनी त्यांचे आभार मानले व याचा विडीओ सोशल मिडियावर बराच प्रसिद्ध झाला.

कोंढवा खुर्द भाजी मंडई लगत एका ठिकाणी ०७ नागरिक पाण्यामधे अडकले होते. या सर्व ०७ सुखरुप बाहेर काढण्यासाठी रश्शीचा वापर करून पाण्यामधे जात कोंढवा खुर्द अग्निशमन जवान निलेश लोणकर, रवि बारटक्के, नारायण मिसाळ, सुरज माळवदकर, सागर इंगळे, अनिकेत गोगावले व चालक दिपक कचरे यांनी ही उत्तम कामगिरी केली.

Video | Mock Drill | PMC Pune | पुणे महापालिकेत धमाका होतो तेंव्हा ..! 

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे महापालिकेत धमाका होतो तेंव्हा ..!

| अग्निशमन दलाचे मॉक ड्रील

 जागतिक आपत्ती निवारण दिनाचे औचित्य साधून गुरुवारी
सायंकाळी ५.०० वा. पुणे अग्निशमन दलाने महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये मॉक ड्रील आयोजित केले होते. त्याप्रमाणे महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बॉम्ब सदृश आवाजाने धमाका होताच महापालिका हादरली. त्यावेळी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना हि कदाचित याची कोणतीही पूर्व कल्पना नसल्याने एकच धांदल उडाली होती. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असता, घटनास्थळी या वेळी अधिकारी व जवान यांनी परिस्थिती अगदी उत्तमरित्या हाताळत दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी  देवेंद्र पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यवाही यशश्वीरित्या पार पडली. नंतर हि मॉक ड्रील असल्याचे समजल्यावर उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.

 

 

सायंकाळी ५.०० ची आणि महापालिकेत एकच मोठा धमाका होतो आणि आग लागते. अग्निशमन दलाला पाचारण होताच दलाचे दोन फायर टेंडर, एक रेस्क्यू व्हॅन, एक देवदूत वाहन, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म व दोन रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचताच व नंतर सुरु होते प्रत्यक्ष कार्यवाही. ज्यामध्ये जवान आग विझवण्याचे कार्य करत असतानाच दुसऱ्या व चौथ्या
मजल्यावर अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढतात व दुसरीकडे जखमी झालेले नागरिक आणि फुटलेले सिलिंडर जवान बाहेर घेऊन येत आग पूर्ण विझवितात. त्याचवेळी जखमी नागरिकांना प्राथमिक उपचार देत रुग्णवाहिकेतून दवाखान्यात पाठविण्यात येते. संपूर्ण इमारत अंदाजे आठ मिनिटात योग्यरीत्या कोणालाही इजा न होता रिकामी करत हि सर्व कार्यवाही दलाचे अधिकारी व जवान यांनी अवघ्या दहा मिनिटात पूर्ण केली. सदरील नागरिकांसाठी हेच वैशिष्टपूर्ण व अभिमानस्पद आहे. जागतिक आपत्ती व्यवस्थापन दिनानिमित या मॉक ड्रीलमध्ये महापालिकेचे आपत्ती
व्यस्थापन कक्ष विभाग व त्यांचे प्रमुख  गणेश सोनुने आणि सुरक्षा विभाग व त्यांचे प्रमुख व  राकेश विटकर यांचे सहकार्य झाले. तसेच प्रत्यक्षात जर अशी घटना घडली तर आपण खरोखरच किती जागरूक आहोत हे या निमित्ताने तपासण्याची संधी मिळाली. या मॉक ड्रील मुळे झालेल्या तसदीबद्दल अग्निशमन दल दिलगिरी व्यक्त करत शहरातील इतर सरकारी कार्यालय व अन्य संस्था यांच्यामध्ये जागरूकता व जबाबदारी निर्माण व्हावी या दृष्टीकोनातून हे मॉक ड्रील आयोजित केले होते.

Pune Rain | Tree Fall | शहरात परवाच्या पाऊसाने शंभरहून अधिक ठिकाणी झाडपडीच्या घटना

Categories
Breaking News social पुणे

शहरात परवाच्या पाऊसाने शंभरहून अधिक ठिकाणी झाडपडीच्या घटना

पुणे – शहरात  दिनांक ३०|०९| २०२२ रोजी दुपारी चार नंतर मुसळधार पाऊस व वारयाचा प्रचंड जोर असल्याने शहराच्या विविध ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या असून  दिनांक ०१|१०|२०२२ रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत १०० झाडे पडल्याची तसेच अनेक ठिकाणी झाडपडीच्या किरकोळ घटनांची नोंद अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात झाली आहे.

धुवादार बरसणारा पाऊस व सोसाट्याचा वारा यामुळे कुठे रस्त्यावर तर कुठे वाहनावर व एखाद्या ठिकाणी घरावर झाड पडल्याचे दुरध्वनी अग्निशमन दलाकडे आले होते. नियंत्रण कक्षात कर्तव्य बजावणारे अधिकारी व जवान यांनी योग्य नियोजन करत अग्निशमन मुख्यालय व इतर अग्निशमन केंद्र अशा एकूण २० केंद्रातील अग्निशमन वाहने व रेस्क्यु व्हॅन वेळेत रवाना केल्या. तसेच दलाचे सर्व अधिकारी व जवान यांनी प्रत्येक ठिकाणी तत्परतेने काम करत चेन सॉ, रश्शी, ट्रि पुनर अशी वेगवेगळी अग्निशमन उपकरण वापरून झाडे हटवण्याचे कार्य पार पाडले असून अजून ही बरयाच ठिकाणी जवान काम करीत होते.

President Medal : Pune fire brigade:पुणे मनपाच्या अग्निशमन दलाचा सन्मान : अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे आणि फायरमन चंद्रकांत आनंदास यांना राष्ट्रपती पदक

Categories
Breaking News cultural PMC पुणे

अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे आणि फायरमन चंद्रकांत आनंदास यांना राष्ट्रपती पदक

पुणे – पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाचे (Fire Brigade) प्रमुख प्रशांत दादाराम रणपिसे (Prashant Ranpise) यांना “विशेष उल्लेखनीय सेवेबद्दल’, तर फायरमन चंद्रकांत नारायण आनंदास (Chandrakant Anandas) यांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक (President Award) जाहीर करण्यात आले आहे.

 

: अपघाती घटनांवर धाडसी कामगिरी

प्रशांत रणपिसे हे अग्निशामक दलात 34 वर्षांपासून कार्यरत आहेत.2015 पासून ते मुख्य अग्निशामक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द, जनता वसाहत, गंगाधाम येथील अग्निशामक केंद्रे तयार झाली. 2014 मध्ये राज्यात सर्वाधिक उत्पन्न मिळविणारे अग्निशामक विभाग म्हणूनही विभागाचा गौरव झाला. त्यांनी शहरामध्ये एक हजार अग्निसुरक्षा मित्र स्वयंसेवक तयार केले. बहुतांश मोठ्या आगींच्या घटना त्यांनी स्वतः हातळल्या आहेत. कोरोनाकाळात त्यांनी शहरातील सर्व कोविड सेंटरचे फायर ऑडीट करून आगीच्या दुर्घटना टाळल्या आहेत. त्यांना 2010 मध्ये “गुणोत्कृष्ट अग्निशामक सेवा’ राष्ट्रपती पदक प्राप्त झाले होते. त्यानंतर आता उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले. आनंदास यांना “गुणोत्कृष्ट अग्निशामक सेवा’ राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले आहे. त्यांनी विविध आगी व अपघाती घटनांवर धाडसी कामगिरी केली आहे. त्यांनी 200 5 मधील टिंबर मार्केट येथील आग, मांढरदेवी येथील आग व चेंगराचेंगरीत अडकलेल्यांची सुटका केली. 5 ऑगस्ट 2015 रोजी पुरंदर तालुक्‍यातील माळशिरस येथील लोळेवस्तीमधील कुपनलिकेत अडकलेल्या अडीच वर्षाच्या सोहम यादव या मुलाला सुखरुप बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले.