President Medal : Pune fire brigade:पुणे मनपाच्या अग्निशमन दलाचा सन्मान : अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे आणि फायरमन चंद्रकांत आनंदास यांना राष्ट्रपती पदक

Categories
Breaking News cultural PMC पुणे
Spread the love

अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे आणि फायरमन चंद्रकांत आनंदास यांना राष्ट्रपती पदक

पुणे – पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाचे (Fire Brigade) प्रमुख प्रशांत दादाराम रणपिसे (Prashant Ranpise) यांना “विशेष उल्लेखनीय सेवेबद्दल’, तर फायरमन चंद्रकांत नारायण आनंदास (Chandrakant Anandas) यांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक (President Award) जाहीर करण्यात आले आहे.

 

: अपघाती घटनांवर धाडसी कामगिरी

प्रशांत रणपिसे हे अग्निशामक दलात 34 वर्षांपासून कार्यरत आहेत.2015 पासून ते मुख्य अग्निशामक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द, जनता वसाहत, गंगाधाम येथील अग्निशामक केंद्रे तयार झाली. 2014 मध्ये राज्यात सर्वाधिक उत्पन्न मिळविणारे अग्निशामक विभाग म्हणूनही विभागाचा गौरव झाला. त्यांनी शहरामध्ये एक हजार अग्निसुरक्षा मित्र स्वयंसेवक तयार केले. बहुतांश मोठ्या आगींच्या घटना त्यांनी स्वतः हातळल्या आहेत. कोरोनाकाळात त्यांनी शहरातील सर्व कोविड सेंटरचे फायर ऑडीट करून आगीच्या दुर्घटना टाळल्या आहेत. त्यांना 2010 मध्ये “गुणोत्कृष्ट अग्निशामक सेवा’ राष्ट्रपती पदक प्राप्त झाले होते. त्यानंतर आता उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले. आनंदास यांना “गुणोत्कृष्ट अग्निशामक सेवा’ राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले आहे. त्यांनी विविध आगी व अपघाती घटनांवर धाडसी कामगिरी केली आहे. त्यांनी 200 5 मधील टिंबर मार्केट येथील आग, मांढरदेवी येथील आग व चेंगराचेंगरीत अडकलेल्यांची सुटका केली. 5 ऑगस्ट 2015 रोजी पुरंदर तालुक्‍यातील माळशिरस येथील लोळेवस्तीमधील कुपनलिकेत अडकलेल्या अडीच वर्षाच्या सोहम यादव या मुलाला सुखरुप बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले.

Leave a Reply