Spread the love

*व्यथा प्रजासत्ताक दिनाची*

राष्ट्रीय सणी ध्वज हा, उंच गगनी फडकला
विद्यार्थी मात्र आमचा, कोरोनाच्या विळख्यात अडकला ||धृ||

प्रजासत्ताक दिनाची असते, मजाच काही न्यारी
लॉकडाऊन ने हिरावली, लगबग हि सारी ||१||

ढोल ताशे कवायत, राष्ट्रगीत ध्वजगीत आणि संचलन
तिरंग्याचं पण करावं लागतंय, ऑनलाईनच आकलन ||२||

रंगीत तालीम नृत्य सजावट, राहिली सगळी भाषणे
ओस पडली कोविडमुळे, व्यासपीठावरील आसने ||३||

वाडी वस्ती ओसरी, वर्ग भरले मंदिरात
शाळाच आता आतुरली, किलबिलाटऐकण्या परिसरात ||४||

तिरंगा म्हणतोय, आहे हा आनंदोत्सव
पण चिमुकल्यांविना, सुनाच झाला अमृतमहोत्सव ||५||

उंच फडकून आता, मागणे मागतो देवाला
सलामी द्यायला शाळेत, येऊ दे साऱ्या गावाला ||६||

कोविडला करून हद्दपार, लावू मुलांना लळा
ऑनलाईन ठेवून बाजूला, फुलवू शाळेचा मळा ||७||

आजी-माजी सैनिक नागरिक, होतील शाळेत गोळा
तेव्हाच साजरी होईल, राष्ट्रीय सणाचा सोहळा ||८||

*सौ. झुंबर कदम-वाखारे*
उपशिक्षिका
वडगाव बांडे, ता. दौंड, जि. पुणे

Leave a Reply