PMC Health Department | IHIP-IDSP पोर्टल मुळे साथरोग नियंत्रणात आणण्यात पुणे महापालिकेला मिळतंय यश!

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

PMC Health Department | IHIP-IDSP पोर्टल मुळे साथरोग नियंत्रणात आणण्यात पुणे महापालिकेला मिळतंय यश!

PMC Health Department – (The Karbhari News Service) – शहरातील साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने IHIP-IDSP पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. याचा पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला (Pune Municipal Corporation (PMC) Health Department) चांगला फायदा होताना दिसतोय. कारण पुणे शहरातील साथरोग नियंत्रणात आणण्यात याची मदत होत आहे. अशी माहिती महापालिका सहायक आरोग्य अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर (Dr Suryakant Devkar PMC) यांनी दिली. (Pune PMC News)
याबाबत डॉ देवकर यांनी सांगितले कि, केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनुसार पुणे मनपाच्या आरोग्य विभागाकडून कार्यरत दवाखाने/ रुग्णालये व खाजगी रुग्णालामार्फत केंद्र शासनाचे IHIP IDSP पोर्टल वरती दररोज साथरोग संशयित रुग्णाची माहिती नोंदविली जाते. पोर्टलवर नोंदविलेले माहिती प्रमाणे संशयित तसेच पॉजिटीव्ह रुग्णांच्या नोंदी संपूर्ण माहितीसह एकत्र करण्यात येतात. ही माहिती वॉर्ड निहाय सर्व्हेक्षण करिता पुणे म. न. पा. च्या १५ क्षेत्रिय कार्यालयानिहाय करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने कोविड – १९, इन्फ्लुएंझा – H1N1, H3N2, जलजन्य (Water Borne Diseases) इत्यादि रुग्णांची प्रतिबंध करण्यासाठी सर्व्हेक्षण करून वेळेत साथ रोग नियंत्रण करण्यात येत आहे.

साथ रोग विभागाकडून राबवण्यात येत असलेले विविध उपक्रम

NRCP – Rabies Control Programme :-

पुणे म. न. पा. स्तरावर साथरोग विभाग आणि पशु संवर्धन विभाग यांचे संयुक्तिपणे NRCP ( National Rabies Control Programme ) अंतर्गत रेबिज नियंत्रण व प्रतिबंधक लसीचा साठा पुरेसा उपलब्ध ठेवण्यात येतो.

3) NPCCHH – National Program for Climate Change and Human Health :

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनुसार पुणे मनपाच्या स्तरावर उष्मा हवामानाच्या पार्श्वभूमीवर दर वर्षी HRI ( Heat Related Illness) मार्च ते जुलै अखेरपर्यंत पुणे म. न. पा. दवाखाने / रुग्णालय मार्फत सर्वेक्षण व आवश्यक तयारी करण्यात येत आहे.

Metropolitan Surveillance Unit (MSU ) :

साथ रोगाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने शहरांमधील सर्वेक्षण यंत्रणा सक्षम करणे करिता मेट्रोपोलिटन सर्व्हलन्स युनिट उभे करणे करिता महाराष्ट्रातील चार शहरांची निवड केलेल्यांपैकी पुणे
शहर अग्रस्थानी आहे. सदर मेट्रोपोलिटीन सर्व्हलन्स युनिट अंतर्गत शहरा करिता विविध प्रकारच्या साथ रोगांसाठी आवश्यक असणारी अद्यावत लॅब उपलब्ध होणार असून विविध प्रकारच्या साथ रोगांवर तातडीने उपाययोजना व कारवाई करणे व तसेच साथ रोगांबाबत भविष्यात होणाऱ्या घटनांचा सविस्तर अभ्यास करणे शक्य होणार आहे. या अनुषंगाने पुणे महानगरपालिका अंतर्गत बाणेर स.नं १०९ मध्ये जुने डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल मधील सहाव्या मजल्यावर ६००० स्क्वेर फीट जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पुणे म.न.पा स्तरावर मेट्रोपोलिटीन सर्व्हलन्स युनिट स्थापन करण्याकरिता प्रशासकीय
कामकाज चालू आहे.
पोर्टल  – ihip अर्थात integrated health information platform  महापालिका आरोग्य विभागसाठी फायदेशीर ठरत आहे.  त्यासाठी साथरोग विभागाने 4 लोकांची टीम ठेवली आहे. खाजगी आणि महापालिकेच्या दवाखान्यातून सर्व पेशंटची माहिती या पोर्टलवर घेतली जाते. संबंधित टीम ही माहिती दररोज चेक करतात.  त्यानुसार आसपासच्या परिसरात सर्वे केला जातो. त्यानुसार आसपासच्या परिसरात औषध फवारणी आणि तत्सम कार्यवाही केली जाते.  पोर्टल मुळे ही कार्यवाही करता येते. त्यामुळे साथ रोगाला प्रतिबंध करतो आहोत.
डॉ सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी. 

Pune Heat Stroke | पुणे तापले; मात्र पुणेकर घेताहेत काळजी! गेल्या दोन वर्षात पुण्यात उष्माघाताचा एकही रुग्ण नाही!

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

Pune Heat Stroke  | पुणे तापले; मात्र पुणेकर घेताहेत काळजी! गेल्या दोन वर्षात पुण्यात उष्माघाताचा एकही रुग्ण नाही!

Pune Heat Stroke – (The Karbhari News Service) – राज्यात सगळीकडे उन्हाचा (Heat Wave) कडाका वाढला आहे. यात पुणे देखील मागे नाही. गेल्या काही दिवसापासून पुणे शहर (Pune Heat) चांगलेच तापू लागले आहे. पुण्याचा पारा 44 अंश पर्यंत जाऊन पोचला. मात्र पुणेकरांना या उन्हापासून आपला बचाव कसा करायचा हे चांगलेच माहित आहे. यामुळेच पुण्यात गेल्या दोन वर्षांपासून उष्माघाताचा (Heat Stroke) एकही रुग्ण पुणे शहरात आढळून आला नाही. अशी माहिती महापालिचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर (Dr Suryakant Devkar PMC)  यांनी दिली आहे. (PMC Health Department)
गेल्या आठवड्याभरापासून सगळीकडे उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. राज्यात उष्माघाताच्या रुग्णाची संख्या देखील वाढू लागली आहे. काही ठिकाणी या आजाराने रुग्ण दगावले देखील आहेत. पुण्यात मात्र गेल्या दोन वर्षांपासून उष्माघाताचा एकही रुग्ण आढळलेला नाही. नागरिकांनी स्वतः काळजी घेतली तर या आजाराचे रुग्ण दिसून येणार नाहीत. त्यामुळे स्वतःचा बचाव स्वतः करणे, हा यावरील एकमेव उपाय आहे.
पुणे शहरात ऊन जरी वाढलं असलं तरी नागरिक काळजी घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे दोन वर्षांपासून एकही रुग्ण आढळला नाही. नागरिकांनी अशीच काळजी घ्यावी. भरपूर पाणी प्यायला हवं आहे. त्यामुळे डिहायड्रेशन होत नाही. असे आव्हान पुणे मनपाचे आहे. उष्माघात चा पेशंट आला तर त्याची माहिती मुख्य कार्यालय येथे पोर्टल वर अपलोड करण्याचे आदेश आम्ही सर्व दवाखान्यांना दिले आहेत.
डॉ सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी. 

– पुणे महापालिकेने केले आहे आवाहन

सध्या शहराच्या तापमानात वाढ होत आहे. या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळीच उपचार न केल्यास उष्माघातामुळे व त्यामुळे होणाऱ्या डिहायड्रेशन ( जलशुष्कता ) मूळे मृत्यूही ओढवू शकतो. त्यामुळे याबाबत काळजी घेण्याचे आवाहन पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ भगवान पवार (Dr Bhagwan Pawar PMC) आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर (Dr Surykant Devkar PMC) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation Health Department)

उष्माघात होण्याची कारणे :-

उन्हात शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीचे व कष्टाची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील
वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होऊ शकतो.

लक्षणे :-

मळमळ उलटी, हात पायात गोळे येणे, थकवा येणे, 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे क्वचित लाल होणे, घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थ, बेशुद्धवस्था इ.

अतिजोखमीच्या व्यक्ती:-

बालके, लहान मुले, खेळाडू, सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्ती ज्यांना हृदयरोग, फुप्फुसाचे विकार, मूत्रपिडाचे विकार इ.

प्रतिबंधात्मक उपाय :-

१. वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळणे व शक्य नसल्यास थोड्या वेळाने सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावे. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमानात असताना करावीत.
२. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत. सैल पांढरे किंवा फिक्कट रंगाचे सूती कपडे वापरावेत. तीव्र उन्हाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे. बाहेर प्रवासाला जाताना पाणी सोबत ठेवावे.
३. पाणी भरपूर प्यावे. डिहायड्रेशन होऊ देऊ नये, लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी इत्यादी प्यावे.
४. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री इत्यादी चा वापर करावा.
५. घरामध्ये कामाच्या ठिकाणी कुलर्स, एअर कंडिशनर्स, वाळ्याचे पडदे यांचा वापर करावा.
६. पार्क केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्याना सोडू नका.
७. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या मनपाच्या आरोग्य केंद्रा/ रुग्णालय किंवा खाजगी रुग्णालयाशी संपर्क साधावा.

उपचार :-

१. रुग्णास प्रथम सावलीत आणावे, रुग्णाचे तापमान कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
२. रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरित उपचार सुरू करावेत, रुग्णाचे कपडे सैल करून त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी
होईपर्यंत पुसत राहावे.
३. रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर्स, एयर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत.
४. रुग्ण शुद्धीवर आल्यास त्यास थंड पाणी, जलसंजीवनी द्यावे व डिहायड्रेशन टाळावे, चहा, कॉफी देऊ नये.
५. रुग्णाच्या काखेखाली आइसपॅक ठेवावेत, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्ट्या ठेवाव्यात.
६. थर्मामीटरने रुग्णाचे तापमान बघत राहावे व 36.8 सेल्सिअस तापमान होईपर्यंत वरील उपचार चालू ठेवावेत.
७. नजीकच्या मनपा आरोग्य केंद्रात, रुग्णालय अथवा खाजगी रुग्णालयाशी संपर्क साधावा. रुग्णालयात भरतीची गरज पडल्यास 108 अॅम्बुलन्ससाठी कॉल करावा.