Tag: Encroachment/Illegal Construction Removal Department Pune Municipal Corporation
PMC Hawker’s License | पुण्यात विकली जाताहेत फेरीवाला प्रमाणपत्र! | पुणे महापालिकेकडून कारवाई करण्याचा इशारा
Encroachment Department of Pune Municipal Corporation (PMC) appeals to Hawker’s to release the seized goods within 7 days
| Goods will not be delivered after auction
PMC Encroachment Department | जप्त केलेला माल 7 दिवसांत सोडवण्याचे पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथारी धारकांना आवाहन
| लिलाव केल्यानंतर माल दिला जाणार नाही
महापालिकेच्या जाहीर प्रकटन नुसार पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण / अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागामार्फत अतिक्रमण निर्मुलन कारवायांमध्ये रस्ते, पदपथांवरील ज्या अनधिकृत पथविक्रेता व्यावसायिकांचे माल / साहित्य दि. ०२-०६-२०२३ ते दि. ३१-१२-२०२३ या कालावधीत जप्त करण्यात आलेले आहे. अशा सर्व पथविक्रेता व्यावसायिकांनी त्यांचा जप्त माल / साहित्य हे या जाहीर प्रकटनाचे दिनांकापासून ७ दिवसांचे आत विहित कार्यपद्धतीनुसार, संबंधित क्षेत्रीय कार्यालयामार्फत जप्त केलेले माल/ साहित्य अतिक्रमण विभागाच्या कोणत्या गोडावूनमध्ये ठेवण्यात आला आहे, याबाबतची खात्री करून त्यानंतर या कार्यालयाकडे अर्जाद्वारे लेखी मागणी करून, माल सोडविण्याची मान्यता प्रक्रिया पूर्ण करावी. तद्नंतर घोले रोड येथील महानगरपालिकेच्या ‘जे’ प्लॉट मधील या कार्यालयाकडे गोडावूनमधून नियमानुसार रिमूव्हल चार्जेस भरून घेऊन स्वतःचे सदरचे माल/साहित्य ज्या गोडावूनमध्ये असेल तेथून आहे त्या अवस्थेत वरील नमूद मुदतीत स्वत: सोडवून न्यावयाचे आहे.
: पथारी धारकांना रिमूव्हल चार्जेस कुठे भरता येतील?
कार्यालय संपर्क क्रमांक: ०२०-२५५०३९८
दुपारी ३.०० ते दुपारी ४.०० वाजता.