PMC Encroachment Department | जप्त केलेला माल 7 दिवसांत सोडवण्याचे पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथारी धारकांना आवाहन

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC Encroachment Department | जप्त केलेला माल 7 दिवसांत सोडवण्याचे पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथारी धारकांना आवाहन

| लिलाव केल्यानंतर माल दिला जाणार नाही

PMC Encroachment Department | पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण / अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागामार्फत (Encroachment/Illegal Construction Removal Department Pune Municipal Corporation) अतिक्रमण निर्मुलन कारवायांमध्ये रस्ते, पदपथांवरील अनधिकृत पथविक्रेता  (Illegal Hawker’s Pune) व्यावसायिकांचे माल किंवा साहित्य जप्त केले जाते. 2 जून ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत महापालिकेने जो माल जप्त केला आहे. तो माल रिमूव्हल चार्जेस (PMC Seized Removal Charges Pune) भरून सोडवून नेण्याचे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून करण्यात आले आहे. त्यासाठी पथारी धारकांना 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर लिलाव (PMC Auction for Seized Material) केला जाणार आहे. लिलाव केल्यांनतर माल मिळणार नाही, असा इशारा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner of Pune Municipal Corporation Madhav Jagtap) यांनी दिला आहे. याबाबत विभागाकडून जाहीर प्रकटन (PMC Public Disclosure) देण्यात आले आहे. (PMC Encroachment Department)

महापालिकेच्या जाहीर प्रकटन नुसार पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण / अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागामार्फत अतिक्रमण निर्मुलन कारवायांमध्ये रस्ते, पदपथांवरील ज्या अनधिकृत पथविक्रेता व्यावसायिकांचे माल / साहित्य दि. ०२-०६-२०२३ ते दि. ३१-१२-२०२३ या कालावधीत जप्त करण्यात आलेले आहे. अशा सर्व पथविक्रेता व्यावसायिकांनी त्यांचा जप्त माल / साहित्य हे या जाहीर प्रकटनाचे दिनांकापासून ७ दिवसांचे आत विहित कार्यपद्धतीनुसार, संबंधित क्षेत्रीय कार्यालयामार्फत जप्त केलेले माल/ साहित्य अतिक्रमण विभागाच्या कोणत्या गोडावूनमध्ये ठेवण्यात आला आहे, याबाबतची खात्री करून त्यानंतर या कार्यालयाकडे अर्जाद्वारे लेखी मागणी करून, माल सोडविण्याची मान्यता प्रक्रिया पूर्ण करावी. तद्नंतर घोले रोड येथील महानगरपालिकेच्या ‘जे’ प्लॉट मधील या कार्यालयाकडे गोडावूनमधून नियमानुसार रिमूव्हल चार्जेस भरून घेऊन स्वतःचे सदरचे माल/साहित्य ज्या गोडावूनमध्ये असेल तेथून आहे त्या अवस्थेत वरील नमूद मुदतीत स्वत: सोडवून न्यावयाचे आहे.

नमूद मुदतीनंतर अतिक्रमण कारवाईतील विविध ठिकाणच्या अतिक्रमण गोडावूनमधील जप्त शिल्लक मालाचा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ४३८ चे तरतुदीचे अनुषंगाने पुणे महानगरपालिकेकडून अधिकृत लिलाव करण्यात येईल. लिलाव झाल्यानंतर जप्त माल/ साहित्य मिळणार नाही अथवा त्याबाबत आपणास कोणतीही हरकत घेता येणार नाही.

याकामी पथविक्रेता व्यावसायिकांचे संबंधित संस्था, संघटना यांनीदेखील वरीलप्रमाणे दिलेल्या मुदतीमध्ये जप्त माल / साहित्य सोडवून घेणे कामी आपल्या पथविक्रेता व्यावसायिक सदस्यांना योग्य ती सूचना देण्यात यावी. असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

: पथारी धारकांना रिमूव्हल चार्जेस कुठे भरता येतील?

माल सोडविणेकामी रिमूव्हल चार्जेस भरणेचे ठिकाण घोले रोड क्षेत्रीय कार्यालयासमोरील अतिक्रमण गोडावून ‘जे’ प्लॉट, शिवाजीनगर, पुणे ४११००५.
कार्यालय संपर्क क्रमांक: ०२०-२५५०३९८
चलनाची वेळ :
सकाळी १०.३० ते दुपारी २.०० वाजता
दुपारी ३.०० ते दुपारी ४.०० वाजता.
PMC encroachment department
पुणे महापालिका जाहीर प्रकटन