PMC Chief Account and Finance Officer | जितेंद्र कोळंबे यांची प्रतिनियुक्तीवर माजी नगरसेवकांचा आक्षेप 

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

PMC Chief Account and Finance Officer | जितेंद्र कोळंबे यांची प्रतिनियुक्तीवर माजी नगरसेवकांचा आक्षेप

 

PMC Chief Account and Finance Officer |पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Municipal Corporation)  लेखा व वित्त अधिकारी म्हणून जितेंद्र कोळंबे (Chief Account and finance officer Jitendra Kolambe)यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आहे. मात्र याबाबत माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला आहे. कोळंबे यांच्या नियुक्ती बाबत नगर विकास विभागाशी चर्चा करून मगच त्यांच्या लेखी आदेशाप्रमाणे त्यांना रुजू करून घ्यावे. अशी मागणी या माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (PMC Pune)

निवेदनानुसार नियुक्ती ही राज्याच्या अर्थ आणि वित्त विभागाने केली. पुणे महानगरपालिका ही नगर विकास विभागाच्या अधिपत्याखाली येते. पुणे महानगरपालिकेमध्ये प्रतिनियुक्तीवर कुठल्या अधिकारी पाठवायचा असेल तर तो नियमाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव क्रमांक दोन यांच्यामार्फत येणे आवश्यक आहे. या ठिकाणी वित्त विभागाने परस्पर आदेश काढले आहेत हे आदेश पूर्णपणे बेकायदेशीर असून पुणे महानगरपालिका आयुक्तांनी कोळंबे  यांना महानगरपालिकेमध्ये रुजू करून घेऊ नये. निवेदनात पुढे म्हटले आहे कि, महानगरपालिकेमध्ये कुठल्या अधिकाऱ्याला कुठल्या पद्धतीचे हा अधिकार एमएमसी ॲक्ट प्रमाणे महापालिका आयुक्त यांना आहे. वित्त विभाग परस्पर कुठलीही नेमणूक करू शकत नाही. नगर विकास विभाग जोपर्यंत मान्यता देत नाही तोपर्यंत महानगरपालिका पगार देखील देऊ शकणार नाही. आपण हे प्रकरण नगर विकास विभागाकडे पाठवावे त्यांची मान्यता घ्यावी आणि मगच रुजू करून घ्यावे. कोळंबे  कोण आहेत हे आम्हाला माहित नाही. त्यांच्या नियुक्तीला विरोध देखील नाही. परंतु नियम बाजूला करून जर कोणी राजकीय दबावाचा वापर करून महानगरपालिकेमध्ये येत असेल तर जागरूक पुणेकर म्हणून आम्ही त्याला विरोध करू, आयुक्तांनी त्यांच्या नगर विकास विभागाशी चर्चा करून मगच त्यांच्या लेखी आदेशाप्रमाणे त्यांना रुजू करून घ्यावे.