PMC Income Tax | महापालिकेच्या विविध विभागातील क्लार्कना दिले जाणार आयकर कायद्याचे (Income Tax Law) प्रशिक्षण | कर्मचाऱ्यांच्या आयकर कपात बाबत देखील होणार चर्चा

Categories
Breaking News Commerce PMC पुणे

PMC Income Tax | महापालिकेच्या विविध विभागातील क्लार्कना दिले जाणार आयकर कायद्याचे (Income Tax Law) प्रशिक्षण | कर्मचाऱ्यांच्या आयकर कपात बाबत देखील होणार चर्चा

PMC  Income Tax | (Author : Ganesh Mule) | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने विविध विकास कामे करण्यात येतात. याची बिले अदा करताना आयकर कायद्या नुसार कपात करणे आवश्यक असते. शिवाय महापालिका कर्मचाऱ्यांचा आयकर भरताना देखील तांत्रिक चुका होतात. हे टाळण्यासाठी आणि कायद्याची व्यवस्थित माहिती होण्यासाठी विविध विभागातील क्लार्क लोकांना आयकर कायदा अनुपालनाबाबत 20 नोव्हेंबर ला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी हे आदेश जारी केले आहेत. (PMC Chief Account and Finance Department)

महापालिका कर्मचाऱ्यांना देखील सहन करावा लागतो त्रास

महापालिकेच्या पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनातून आयकर (Income tax) कपात केली जाते. काही कर्मचारी दर महिन्याला देतात तर काही वर्षातून एकदा. वेळच्या वेळी आयकर भरूनही बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना आयकर भरा, अशा प्रकारच्या नोटीसा आयकर विभागाकडून (Income TaxDepartment) येत आहेत. यामुळे महापालिका कर्मचारी हैराण होतात. याबाबत महापालिका प्रशासनाकडून योग्य ते पाऊल उचलले जावे, अशी मागणी कर्मचारी करत होते. ( PMC Employees Income Tax)
आयकर नियमानुसार आणि कर रचनेनुसार महापालिकेचे कर्मचारी आयकर सरचार्ज भरण्यासाठी पात्र होतात. अशा कर्मचाऱ्यांचा वेतनातून आयकर कापला जातो. काही कर्मचारी प्रत्येक महिन्याला आयकर भरतात तर काही वर्षातून एकदाच. महापालिकेच्या वित्त व लेखा विभागाकडून  वेतनातून रक्कम कापली जाते. दरम्यान वेतनातून आयकर कपात झाल्यानंतर तो आयकर विभागाकडे भरून त्याची नोंद होणे गरजेचे असते. हे काम प्रत्येक विभागाच्या बिल क्लार्क चे असते. तशी जबाबदारी त्यांच्याकडे दिली गेली आहे. काही विभागाकडे दोन ते तीन बिल क्लार्क देखील असतात. असे असतानाही थोड्याशा तांत्रिक चुकांमुळे कर्मचाऱ्यांच्या आयकर भरल्याची नोंद होत नाही. यामध्ये पॅन क्रमांक व्यवस्थित न टाकणे, नावात गफलत असणे, अशा तांत्रिक चुका होत आहेत. परिणामी आयकर विभागाकडे आयकर भरला नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आयकर भरला नसल्याच्या नोटीसा आयकर विभागाकडून कर्मचाऱ्यांना येत आहेत. (Pune Municipal Corporation)
याबाबत प्रशासनाकडून उचित कार्यवाही करण्याची मागणी केली जात होती. वस्तुतः आयकर असा कर आहे, ज्याच्या रचनेत सरकार दरवर्षी बदल करते. याची अद्ययावत माहिती बिल क्लार्क कडे असणे गरजेचे आहे. बिल क्लार्क ही सगळी अद्ययावत माहिती लेखा व वित्त विभागाने देणे आवश्यक आहे. लेखा विभाग म्हणतो कि आम्ही याबाबत बिल क्लार्क ना प्रशिक्षण देखील देतो. तरीही त्यांच्याकडून चुका होतात. त्यामुळे या लोकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

PMC Chief Finance and Account Officer | उल्का कळसकर यांच्याकडील अतिरिक्त पदभार कमी केला! | महापालिका आयुक्तांकडून आदेश जारी

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Chief Finance and Account Officer | उल्का कळसकर यांच्याकडील अतिरिक्त पदभार कमी केला!

| महापालिका आयुक्तांकडून आदेश जारी

PMC Chief Finance and Account Officer |  पुणे महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी (PMC Chief Finance and Account Officer) राज्य सरकारकडून जितेंद्र कोळंबे (Jitendra Kolambe) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेत बऱ्याच दिवसापासून रिक्त असलेले हे पद भरण्यात आले आहे. दरम्यान यामुळे मात्र मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांच्याकडील पदभार कमी केला आहे. कळसकर यांच्याकडे फक्त खर्च ची जबाबदारी असेल तर कोळंबे यांच्याकडे महसूल ची जबाबदारी असणार आहे. तसेच कळसकर यांनी अंदाजपत्रकीय कामकाज (PMC Budget) करायचे, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी जारी केले आहेत. (PMC Chief Finance and Account Office)
कोळंबे हे महापालिका सेवेत प्रतिनियुक्तीने आले आहेत. याआधी कोळंबे महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे इथे वित्त व लेखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. वित्त व लेखा संचालक संवर्गात त्यांना पदोन्नती देण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना सुधारित पदस्थापना देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation)
पुणे महापालिकेत मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांची दोन पदे आहेत. यामध्ये महापालिका अर्थसंकल्पातील जमा बाजू म्हणजे महसूल साठी एक अधिकारी आणि खर्चाच्या बाजू साठी दुसरा अधिकारी काम करणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत या दोन्ही पदाचे कामकाज मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर पाहत आहेत. काही वर्षांपूर्वी यातील महसूल बाजूची जबाबदारी महापालिकेत प्रतिनियुक्तीने आलेले तत्कालीन उपायुक्त तुषार दौंडकर यांच्याकडे दिली होती. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्तच होते. अतिरिक्त पदभार कळसकर पाहत होत्या. दरम्यान आता सरकारने दुसरा अधिकारी या पदासाठी दिला आहे. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत.  खर्चाची बाजू राज्य सरकारचा अधिकारी पाहणार, कि महापालिकेचा याबाबत उत्सुकता लागून राहिली होती. मात्र उल्का कळसकर यांच्याकडील पदभार कमी केला आहे. कळसकर यांच्याकडे फक्त खर्च ची जबाबदारी असेल तर कोळंबे यांच्याकडे महसूल ची जबाबदारी असणार आहे. तसेच कळसकर यांनी अंदाजपत्रकीय कामकाज करायचे, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केले आहेत. (PMC Pune)
——
News Title | PMC Chief Finance and Accounts Officer | Ulka Kalaskar’s additional charge reduced! Order issued by Municipal Commissioner

PMC Chief Account and Finance Officer | जितेंद्र कोळंबे यांची प्रतिनियुक्तीवर माजी नगरसेवकांचा आक्षेप 

Categories
Breaking News PMC Political पुणे

PMC Chief Account and Finance Officer | जितेंद्र कोळंबे यांची प्रतिनियुक्तीवर माजी नगरसेवकांचा आक्षेप

 

PMC Chief Account and Finance Officer |पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Municipal Corporation)  लेखा व वित्त अधिकारी म्हणून जितेंद्र कोळंबे (Chief Account and finance officer Jitendra Kolambe)यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आहे. मात्र याबाबत माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला आहे. कोळंबे यांच्या नियुक्ती बाबत नगर विकास विभागाशी चर्चा करून मगच त्यांच्या लेखी आदेशाप्रमाणे त्यांना रुजू करून घ्यावे. अशी मागणी या माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (PMC Pune)

निवेदनानुसार नियुक्ती ही राज्याच्या अर्थ आणि वित्त विभागाने केली. पुणे महानगरपालिका ही नगर विकास विभागाच्या अधिपत्याखाली येते. पुणे महानगरपालिकेमध्ये प्रतिनियुक्तीवर कुठल्या अधिकारी पाठवायचा असेल तर तो नियमाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव क्रमांक दोन यांच्यामार्फत येणे आवश्यक आहे. या ठिकाणी वित्त विभागाने परस्पर आदेश काढले आहेत हे आदेश पूर्णपणे बेकायदेशीर असून पुणे महानगरपालिका आयुक्तांनी कोळंबे  यांना महानगरपालिकेमध्ये रुजू करून घेऊ नये. निवेदनात पुढे म्हटले आहे कि, महानगरपालिकेमध्ये कुठल्या अधिकाऱ्याला कुठल्या पद्धतीचे हा अधिकार एमएमसी ॲक्ट प्रमाणे महापालिका आयुक्त यांना आहे. वित्त विभाग परस्पर कुठलीही नेमणूक करू शकत नाही. नगर विकास विभाग जोपर्यंत मान्यता देत नाही तोपर्यंत महानगरपालिका पगार देखील देऊ शकणार नाही. आपण हे प्रकरण नगर विकास विभागाकडे पाठवावे त्यांची मान्यता घ्यावी आणि मगच रुजू करून घ्यावे. कोळंबे  कोण आहेत हे आम्हाला माहित नाही. त्यांच्या नियुक्तीला विरोध देखील नाही. परंतु नियम बाजूला करून जर कोणी राजकीय दबावाचा वापर करून महानगरपालिकेमध्ये येत असेल तर जागरूक पुणेकर म्हणून आम्ही त्याला विरोध करू, आयुक्तांनी त्यांच्या नगर विकास विभागाशी चर्चा करून मगच त्यांच्या लेखी आदेशाप्रमाणे त्यांना रुजू करून घ्यावे.

PMC Chief Account and Finance Officer | जितेंद्र कोळंबे यांची पुणे महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी नियुक्ती

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Chief Finance and Account Officer | जितेंद्र कोळंबे यांची पुणे महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी नियुक्ती

| राज्य सरकारकडून आदेश जारी

PMC Chief Account and Finance Officer |  पुणे महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी (PMC Chief Finance and Account Officer) राज्य सरकारकडून जितेंद्र कोळंबे (Jitendra Kolambe) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेत बऱ्याच दिवसापासून रिक्त असलेले हे पद भरण्यात आले आहे. (PMC Chief Finance and Account Office)
कोळंबे हे महापालिका सेवेत प्रतिनियुक्तीने आले आहेत. याआधी कोळंबे महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे इथे वित्त व लेखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. वित्त व लेखा संचालक संवर्गात त्यांना पदोन्नती देण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना सुधारित पदस्थापना देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation)
पुणे महापालिकेत मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांची दोन पदे आहेत. यामध्ये महापालिका अर्थसंकल्पातील जमा बाजू साठी एक अधिकारी आणि खर्चाच्या बाजू साठी दुसरा अधिकारी काम करणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत या दोन्ही पदाचे कामकाज मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर पाहत आहेत. काही वर्षांपूर्वी यातील जमा बाजूची जबाबदारी महापालिकेत प्रतिनियुक्तीने आलेले तत्कालीन उपायुक्त तुषार दौंडकर यांच्याकडे दिली होती. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्तच होते. अतिरिक्त पदभार कळसकर पाहत आहेत. दरम्यान आता सरकारने दुसरा अधिकारी या पदासाठी दिला आहे. यातील खर्चाची बाजू राज्य सरकारचा अधिकारी पाहणार, कि महापालिकेचा याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. (PMC Pune)
——

PMC Chief Accounts and Finance Department | पुणे मनपाच्या लेखा व वित्त विभागाकडे 80% कर्मचारी वाणिज्य शाखेची पदवी नसलेले! | लेखा विभागाने मागितली 138 नवीन पदे!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Chief Accounts and Finance Department | पुणे मनपाच्या लेखा व वित्त विभागाकडे 80% कर्मचारी  वाणिज्य शाखेची पदवी नसलेले! | लेखा विभागाने मागितली 138 नवीन पदे!

PMC Chief Accounts and Finance Department | पुणे महापालिकेचा लेखा व वित्त विभाग (PMC Chief Accounts and Finance Department)  खूप महत्वाचा मानला जातो. महापालिकेचा 8 हजार कोटींहून अधिक रकमेचा अर्थसंकल्प (PMC Budget) करण्याचे काम या विभागाकडे असते. असे असतानाही विभागाकडील 80% कर्मचारी हे वाणिज्य शाखेचे (Commerce Background) पदवी नसलेले आहेत. काही कर्मचारी पदोन्नती ने तर काही कर्मचारी हे मागणीनुसार घेतलेले आहेत. मात्र वाणिज्य शाखेचे पर्याप्त ज्ञान नसल्याने कामकाजात बऱ्याच अडचणी येत आहेत. त्यामुळे वाणिज्य शाखेची पदवी आणि पदव्युत्तर पदवी असलेली विभागात 138 नवीन पदे भरण्याची मागणी विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडे (PMC General Administration Department) केली आहे. मात्र सामान्य प्रशासन विभागाकडे हा प्रस्ताव गेल्या 9 महिन्यापासून तसाच पडून आहे. (PMC Chief Accounts and Finance Department)
पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प (PMC Pune Budget) अर्थात बजेट साडे आठ कोटींच्या घरात गेले आहेत. यात दरवर्षी वाढच होत आहे. अर्थसंकल्प तयार करण्यात महापालिकेच्या लेखा आणि वित्त विभागाची महत्वाची भूमिका असते. शिवाय अर्थसंकल्पचा समतोल राखण्याचे काम देखील असते.  दरवर्षी बजेट ची रक्कम वाढत जाते, मात्र विभागाचे कर्मचारी वाढवले जात नाहीत. उलट सेवानिवृत्ती अथवा इतर कारणाने कर्मचारी कमीच होतात. त्यांच्या जागेवर नवीन कर्मचारी देखील दिले जात नाहीत. अशी लेखा व वित्त विभागाने तक्रार केली आहे. विशेष म्हणजे जे कर्मचारी विभागाकडे आहेत त्यातील 80% कर्मचारी हे वाणिज्य शाखा नसलेले (Non Commerce Ground) आहेत. त्यामुळे विभागाला बऱ्याच तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये कर्मचाऱ्यांचा  income tax वेळेवर जमा न करणे, सेवानिवृत्त सेवकांची प्रलम्बित पेंशन प्रकरणे, वेतन आयोग लागू होण्यात विलंब अशा प्रकरणांचा समावेश आहे. (Pune Municipal Corporation)
लेखा आणि वित्त विभागाने सामान्य प्रशासन विभागाला पाठवलेल्या प्रस्तावानुसार विभागाकडे सद्यस्थितीत मंजूर पदांची संख्या 169 आहे. त्यापैकी 150 पदे कार्यरत आहेत. यामध्ये वर्ग 1 पासून ते वर्ग 3 पर्यंतच्या पदांचा समावेश आहे. विभागाने आता नवीन 138 पदांची मागणी केली आहे. यात लेखा अधिकारी (Account Officer) हे मुख्य पद आहे. महापालिकेच्या महत्वाच्या विभागांना म्हणजे ज्याचे बजेट 500 कोटीपेक्षा जास्त आहे, अशा विभागांना स्वतंत्र लेखा अधिकारी देण्याचे नियोजन आहे. याबाबतचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे गेल्या 9 महिन्यापासून पडून आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाला विचारले असता सांगण्यात आले कि आपल्या पहिल्या भरती प्रक्रियेत बऱ्याच अडचणी येत आहेत. नवीन पदांचा प्रस्ताव सरकारकडे पाठवावा लागेल. त्यानंतर पदे भरण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल.

| ही मागितली आहेत नवीन पदे

लेखा अधिकारी      – 10
सहायक लेखा अधिकारी – 20
वरिष्ठ लिपिक  – 88
लिपिक टंकलेखक – 20
——-
News Title | PMC Chief Accounts and Finance Department | Accounts and Finance Department of Pune Municipality has 80% employees without commerce degree! | Accounts department asked for 138 new posts!