PMC Chief Finance and Account Officer | उल्का कळसकर यांच्याकडील अतिरिक्त पदभार कमी केला! | महापालिका आयुक्तांकडून आदेश जारी

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Chief Finance and Account Officer | उल्का कळसकर यांच्याकडील अतिरिक्त पदभार कमी केला!

| महापालिका आयुक्तांकडून आदेश जारी

PMC Chief Finance and Account Officer |  पुणे महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी (PMC Chief Finance and Account Officer) राज्य सरकारकडून जितेंद्र कोळंबे (Jitendra Kolambe) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेत बऱ्याच दिवसापासून रिक्त असलेले हे पद भरण्यात आले आहे. दरम्यान यामुळे मात्र मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांच्याकडील पदभार कमी केला आहे. कळसकर यांच्याकडे फक्त खर्च ची जबाबदारी असेल तर कोळंबे यांच्याकडे महसूल ची जबाबदारी असणार आहे. तसेच कळसकर यांनी अंदाजपत्रकीय कामकाज (PMC Budget) करायचे, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी जारी केले आहेत. (PMC Chief Finance and Account Office)
कोळंबे हे महापालिका सेवेत प्रतिनियुक्तीने आले आहेत. याआधी कोळंबे महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे इथे वित्त व लेखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. वित्त व लेखा संचालक संवर्गात त्यांना पदोन्नती देण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना सुधारित पदस्थापना देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation)
पुणे महापालिकेत मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांची दोन पदे आहेत. यामध्ये महापालिका अर्थसंकल्पातील जमा बाजू म्हणजे महसूल साठी एक अधिकारी आणि खर्चाच्या बाजू साठी दुसरा अधिकारी काम करणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत या दोन्ही पदाचे कामकाज मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर पाहत आहेत. काही वर्षांपूर्वी यातील महसूल बाजूची जबाबदारी महापालिकेत प्रतिनियुक्तीने आलेले तत्कालीन उपायुक्त तुषार दौंडकर यांच्याकडे दिली होती. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्तच होते. अतिरिक्त पदभार कळसकर पाहत होत्या. दरम्यान आता सरकारने दुसरा अधिकारी या पदासाठी दिला आहे. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत.  खर्चाची बाजू राज्य सरकारचा अधिकारी पाहणार, कि महापालिकेचा याबाबत उत्सुकता लागून राहिली होती. मात्र उल्का कळसकर यांच्याकडील पदभार कमी केला आहे. कळसकर यांच्याकडे फक्त खर्च ची जबाबदारी असेल तर कोळंबे यांच्याकडे महसूल ची जबाबदारी असणार आहे. तसेच कळसकर यांनी अंदाजपत्रकीय कामकाज करायचे, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केले आहेत. (PMC Pune)
——
News Title | PMC Chief Finance and Accounts Officer | Ulka Kalaskar’s additional charge reduced! Order issued by Municipal Commissioner

7th Pay Commission | PMC Retired Employees | 2800 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित लाभ मिळणार

Categories
Breaking News PMC पुणे

7th Pay Commission | PMC Retired Employees | 2800 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित लाभ मिळणार

| प्रस्ताव सादर करण्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे आदेश

7th Pay Commission | PMC Retired Employees | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) 1 जानेवारी 2016 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या 2800 सेवकांना ७ व्या वेतन आयोगातील (7th Pay Commission) तरतूदीप्रमाणे निवृत्तिविषयक लाभ सुधारित करण्यात आला आहे. त्यानुसार या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके मान्यतेसाठी सादर करण्याचे आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर (PMC Chief Account and Finance Officer Ulka Kalaskar) यांनी सर्व विभागांना दिले आहेत. (PMC Pune)

महापालिका आयुक्त कार्यालयाचे च्या परिपत्रकानुसार पुणे महानगरपालिकेच्या कार्यरत व सेवानिवृत्त सेवकांना ७ व्या वेतन आयोगाचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे. ०१/०१/२०१६ पूर्वी सेवानिवृत्त सेवकांचे निवृत्तिवेतन सदर परिपत्रकानुसार सुधारित करण्यात आलेले असून  ०१/०१/२०१६ ते ३१/१०/२०२१ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना ७ व्या वेतन आयोगातील तरतूदीप्रमाणे निवृत्तिविषयक लाभ सुधारित करणेची कार्यवाही सुरू आहे. या कालावधीतील जवळपास २८०० सेवकांचे निवृत्तिविषयक लाभ सुधारित करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation News)
सेवकांचे लाभ सुधारित करणेची कार्यवाही वेतन आयोग कक्षामार्फत करण्यात येत आहे. तथापि, या कक्षाचे सदरील काम ऑक्टोबर २०२३ अखेर संपुष्टात आणावयाचे आहे. त्यामुळे सर्व खातेप्रमुखांना सूचित करण्यात येते की, ०१/०१/२०१६ ते  ३१/१०/२०२१ या कालावधीत आपले कायालयाचे अधिनिस्त सर्व सेवानिवृत्त / सेवेत मयत / सेवानिवृत्तिनंतर मयत झालेल्या सेवकांना ७ व्या वेतन आयोगातील तरतूदीप्रमाणे निवृत्तिविषयक लाभ सुधारित करणेकरीता सेवापुस्तके निवृत्तिवेतन विभागास सादर केले असल्याची खात्री करावी. शिल्लक प्रकरणे तातडीने निवृत्तिवेतन विभागामार्फत मुख्य लेखापरिक्षक विभागाच्या मान्यतेस्तव सादर करण्यात यावेत. याबाबत आवश्यक आदेश संबंधिताना देण्यात यावेत. वेतन आयोग कक्षाचे सदरील कामकाज संपुष्टात आणलेनंतर अशी प्रकरणे स्वीकारली जाणार नाहीत व याबाबत सर्व जबाबदारी संबंधित खात्याची राहील. असे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
—-/

PMC Chief Account and Finance Officer | जितेंद्र कोळंबे यांची प्रतिनियुक्तीवर माजी नगरसेवकांचा आक्षेप 

Categories
Breaking News PMC Political पुणे

PMC Chief Account and Finance Officer | जितेंद्र कोळंबे यांची प्रतिनियुक्तीवर माजी नगरसेवकांचा आक्षेप

 

PMC Chief Account and Finance Officer |पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Municipal Corporation)  लेखा व वित्त अधिकारी म्हणून जितेंद्र कोळंबे (Chief Account and finance officer Jitendra Kolambe)यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आहे. मात्र याबाबत माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला आहे. कोळंबे यांच्या नियुक्ती बाबत नगर विकास विभागाशी चर्चा करून मगच त्यांच्या लेखी आदेशाप्रमाणे त्यांना रुजू करून घ्यावे. अशी मागणी या माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (PMC Pune)

निवेदनानुसार नियुक्ती ही राज्याच्या अर्थ आणि वित्त विभागाने केली. पुणे महानगरपालिका ही नगर विकास विभागाच्या अधिपत्याखाली येते. पुणे महानगरपालिकेमध्ये प्रतिनियुक्तीवर कुठल्या अधिकारी पाठवायचा असेल तर तो नियमाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव क्रमांक दोन यांच्यामार्फत येणे आवश्यक आहे. या ठिकाणी वित्त विभागाने परस्पर आदेश काढले आहेत हे आदेश पूर्णपणे बेकायदेशीर असून पुणे महानगरपालिका आयुक्तांनी कोळंबे  यांना महानगरपालिकेमध्ये रुजू करून घेऊ नये. निवेदनात पुढे म्हटले आहे कि, महानगरपालिकेमध्ये कुठल्या अधिकाऱ्याला कुठल्या पद्धतीचे हा अधिकार एमएमसी ॲक्ट प्रमाणे महापालिका आयुक्त यांना आहे. वित्त विभाग परस्पर कुठलीही नेमणूक करू शकत नाही. नगर विकास विभाग जोपर्यंत मान्यता देत नाही तोपर्यंत महानगरपालिका पगार देखील देऊ शकणार नाही. आपण हे प्रकरण नगर विकास विभागाकडे पाठवावे त्यांची मान्यता घ्यावी आणि मगच रुजू करून घ्यावे. कोळंबे  कोण आहेत हे आम्हाला माहित नाही. त्यांच्या नियुक्तीला विरोध देखील नाही. परंतु नियम बाजूला करून जर कोणी राजकीय दबावाचा वापर करून महानगरपालिकेमध्ये येत असेल तर जागरूक पुणेकर म्हणून आम्ही त्याला विरोध करू, आयुक्तांनी त्यांच्या नगर विकास विभागाशी चर्चा करून मगच त्यांच्या लेखी आदेशाप्रमाणे त्यांना रुजू करून घ्यावे.

PMC Chief Account and Finance Officer | जितेंद्र कोळंबे यांची पुणे महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी नियुक्ती

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Chief Finance and Account Officer | जितेंद्र कोळंबे यांची पुणे महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी नियुक्ती

| राज्य सरकारकडून आदेश जारी

PMC Chief Account and Finance Officer |  पुणे महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी (PMC Chief Finance and Account Officer) राज्य सरकारकडून जितेंद्र कोळंबे (Jitendra Kolambe) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेत बऱ्याच दिवसापासून रिक्त असलेले हे पद भरण्यात आले आहे. (PMC Chief Finance and Account Office)
कोळंबे हे महापालिका सेवेत प्रतिनियुक्तीने आले आहेत. याआधी कोळंबे महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे इथे वित्त व लेखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. वित्त व लेखा संचालक संवर्गात त्यांना पदोन्नती देण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना सुधारित पदस्थापना देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation)
पुणे महापालिकेत मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांची दोन पदे आहेत. यामध्ये महापालिका अर्थसंकल्पातील जमा बाजू साठी एक अधिकारी आणि खर्चाच्या बाजू साठी दुसरा अधिकारी काम करणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत या दोन्ही पदाचे कामकाज मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर पाहत आहेत. काही वर्षांपूर्वी यातील जमा बाजूची जबाबदारी महापालिकेत प्रतिनियुक्तीने आलेले तत्कालीन उपायुक्त तुषार दौंडकर यांच्याकडे दिली होती. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्तच होते. अतिरिक्त पदभार कळसकर पाहत आहेत. दरम्यान आता सरकारने दुसरा अधिकारी या पदासाठी दिला आहे. यातील खर्चाची बाजू राज्य सरकारचा अधिकारी पाहणार, कि महापालिकेचा याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. (PMC Pune)
——