Warkari Lathi-charge आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा निषेध | विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रतिक्रिया

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र
Spread the love

Warkari Lathi-charge | आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा निषेध

| विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रतिक्रिया

 

Warkari Lathi-Charge | “संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीं पालखीच्या (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) आळंदीहून (Alandi) प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलिस लाठीमाराची (Warkari Lathi-Charge) घटना क्लेषदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात (Pandharpur Wari History) असं यापूर्वी घडलं नव्हतं. आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे. सोहळ्याचं योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसं घडलं नाही. वारकऱ्यांवरील पोलिस लाठीमाराचा (Warkari Police Lathi-charge) आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो,” अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar) यांनी व्यक्त केली आहे. (Warkari Lathi-charge)

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राला पंढरपूरच्या आषाढीवारीची (Pandharpur Aashadhi Wari) गौरवशाली परंपरा आहे. आषाढी वारी आणि आळंदीहून निघणारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) हे आपल्या महाराष्ट्राच्या अध्यात्म, भक्तीपरंपरेचं वैभव आहे. दरवर्षी वारीसाठी हजारो वारकरी आळंदीत येतात. वारी आणि प्रस्थान सोहळ्याचं योग्य नियोजनही केलं जातं. वारकरीही या नियोजनाला सहकार्य करत असतात. परंतु, यंदा कुठेतरी चूक घडलेली दिसत आहे. प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे हे घडल्याचं दिसत आहे. ही संपूर्ण घटना दु:खदायक, तशीच मनाला चीड आणणारी आहे. अशी घटना यापुढे घडू नये, यासाठी पूर्ण काळजी घेण्यात यावी, अशी मागणीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. (Pandharpur wari 2023)

कुठल्याही आध्यात्मिक कार्यात आणि पंढरपूरवारी सारख्या सोहळ्यात सहभागी होतांना, सर्वांनी राजकीय हेतू बाजूला ठेवावा. ईश्वरभक्ती आणि वारकऱ्यांची सेवा हाच हेतू मनात ठेवून, वारीत सहभागी व्हावं, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे. (Palkhi Soahala 2023)


News Title | Warkari Lathi-charge Protest against government lathi-charge on warkaris in Alanya | Opposition leader Ajit Pawar’s reaction