PMC Health Department | आरोग्य विभागाकडील अधिकाऱ्यांच्या कामकाज व्यवस्थापनात बदल | आरोग्य विभागाच्या प्रस्तावाला आयुक्तांची मंजूरी

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

PMC Health Department | आरोग्य विभागाकडील अधिकाऱ्यांच्या कामकाज व्यवस्थापनात बदल | आरोग्य विभागाच्या प्रस्तावाला आयुक्तांची मंजूरी

PMc Health Department | पुणे | महापालिका आरोग्य विभागाकडील (PMC Pune Health Department) उप आरोग्य आणि सहायक आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामकाज व्यवस्थापनात बदल करण्यात आला आहे. याबाबत सहायक आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य प्रमुखाकडे (PMC Health Chief) मागणी केली होती. त्यानुसार आरोग्य प्रमुखांनी कामकाजात बदल करण्याचा प्रस्ताव आयुक्तांसमोर ठेवला होता. याला मान्यता देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation)

डॉ. कल्पना बळीवंत, उप आरोग्य अधिकारी : यांच्याकडे प्र. आरोग्य अधिकारी, जन्म मृत्तू नोंदणी विभाग, स्मशानभूमी दफनभूमी अध्यावतीकरण याची जबाबदारी होती. ती बदलत आता त्यांच्याकडे आरोग्य विभागाकडील सामान्य प्रशासन व क्षेत्रीय स्तरावरील

आस्थापना (मेडिकल युनिट) पी. सी. पी.एन. डी.टी.,एम.पी.टी.१ ते ३ लाखांपर्यंतचे वैद्यकीय देयके
मान्य करण्याचे अधिकार आणि अर्बन ९५ ची जबाबदारी देण्यात आली आहे.

डॉ. वैशाली जाधव, सहाय्यक आरोग्य अधिकारी : यांच्याकडे राष्ट्रीय नागरी आरोग्य. अभियानआर.सी.एच. (अंधत्व निवारण, कुटुंब कल्याण, शालेय आरोग्य), आरोग्यवर्धिनी कार्यक्रम याची जबाबदारी होती. ती बदलत आता त्यांच्याकडे सर्व राष्ट्रीय कार्यक्रम, साथरोग नियंत्रण, कोविड सानुग्रह अनुदान आणि PMGKY प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना याची जबाबदारी देण्यात आली आहे.
३) डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी : यांच्याकडे सेन्ट्रल मेडिकल स्टोर (औषध भांडार), मनपा रुग्णालयाचे सुधारणा व आधुनिकी करण या विभागांची जबाबदारी होती. त्यांच्याकडे देण्यात आलेल्या नवीन जबाबदारीमध्ये सेन्ट्रल मेडिकल स्टोर (औषध भांडार ), मनपा रुग्णालयाचे सुधारणा व आधुनिकीकरण, जिल्हा नियोजन समिती मार्फत करावयाची कामे. ( डी. पी. डी.सी.)मा. महापौर योजना व  सी.एस.आर.(सामाजिक दायित्व योजना) यांचा समावेश आहे. 
डॉ. सुर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी : यांच्याकडे कीटक प्रतिबंधक विभाग, पी.सी.पी.एन.डी.टी.. एम.पी.टी., बोगस डॉक्टर शोध मोहीम,  एड्स नियंत्रण अधिकारी, साथ रोग नियंत्रण याची जबाबदारी होती. ती बदलून त्यांच्याकडे कीटक प्रतिबंधक विभाग, बोगस डॉक्टर शोध मोहीम आणि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
डॉ. राजेश दिघे, सहाय्यक आरोग्य अधिकारी : यांच्याकडे राष्ट्रीय लसीकरणाची जबाबदारी होती. आता त्यांच्याकडे जन्म मृत्यु नोंदणी विभाग व  स्मशानभूमी दफनभूमी अध्यावतीकरण ची जबाबदारी असणार आहे.
६) डॉ. मनीषा नाईक, यांच्याकडील कामात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.
——

PMC Health Officer | डॉ भगवान पवार पुन्हा पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख | राज्य सरकारकडून आदेश जारी

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

PMC Health Officer | डॉ भगवान पवार पुन्हा पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख | राज्य सरकारकडून आदेश जारी

| डॉ पवारांनी मॅट मध्ये केले होते अपील

PMC Health Officer | पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख म्हणून डॉ भगवान पवार (Dr Bhagwan Pawar) यांची राज्य सरकारकडून पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेने बदली केल्यानंतर पवार बदली विरोधात मॅट (MAT) अर्थात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण येथे अपील केले होते. मॅट ने त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यानुसार राज्य सरकारने हे आदेश जारी केले आहेत. शिवाय फार वेळ न दवडता आदेशास अनुसरून कार्यवाही करावी, असे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. (PMC Health Department)
डॉ पवार यांची पुणे महापालिकेतून नुकतीच बदली करण्यात आली होती. डॉ पवार यांच्याकडे सहायक संचालक, आरोग्य सेवा (अंधत्व नियंत्रण कार्यक्रम), मुंबई हा पदभार देण्यात आला होता. 10 मार्च ला डॉ भगवान पवार यांना महापालिका आरोग्य प्रमुख पदी प्रतिनियुक्तीने नियुक्त करण्यात आले होते. मात्र सहा महिन्यांनंतर पुन्हा डॉ पवार यांची बदली करण्यात आली. त्यामुळे डॉ पवार यांनी या विरोधात मॅट मध्ये अपील केले होते.

राज्य सरकारने आदेशात काय म्हटले आहे?

डॉ. भगवान पवार, आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका यांची सार्वजनिक आरोग्य विभागाने दि.०५.०९.२०२३ च्या शासन आदेशान्वये बदलीने सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (अंधत्व नियंत्रण कार्यक्रम), मुंबई येथे नियुक्ती केलेली आहे. त्यास अनुसरून पुणे महानगरपालिकेने दि.०५.०९.२०२३ रोजी डॉ. पवार यांना कार्यमुक्त केलेले आहे. या बदलीच्या
नियुक्तीबाबत डॉ. पवार यांनी मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) येथे (O.A.No. १२५५/२०२३) याचिका दाखल केलेली आहे. सदरहू याचिकेमध्ये मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांनी दि.११.१०.२०२३ रोजी आदेश पारित केलेले आहेत. यामध्ये कुठेही पुनश्च: नगर विकास विभागाचे आदेश अभिप्रेत नाही. मा. न्यायाधिकरणाचे (मॅट) आदेश स्वयंस्पष्ट आहेत. महानगरपालिकेने याबाबत अनावश्यक संदर्भ करून शासनाच्या वेळेचा अपव्यय न करता मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांच्या आदेशास अनुसरून पुढील कार्यवाही करावी.
—//

PMC Health Officer | महापालिका आरोग्य प्रमुख डॉ भगवान पवार यांची 6 महिन्यांत बदली!

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

PMC Health Officer | महापालिका आरोग्य प्रमुख डॉ भगवान पवार यांची 6 महिन्यांत बदली!

| राज्य सरकारकडून आदेश जारी

PMC Health Officer | पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ भगवान पवार (Dr Bhagwan Pawar) यांची राज्य सरकारकडून बदली करण्यात आली आहे. डॉ पवार यांच्याकडे सहायक संचालक, आरोग्य सेवा (अंधत्व नियंत्रण कार्यक्रम), मुंबई हा पदभार देण्यात आला आहे. दरम्यान यामुळे पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख (PMC Health Officer) पद पुन्हा एकदा रिक्त झाले आहे. आता तरी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला पूर्ण वेळ आरोग्य प्रमुख होण्याची संधी दिली जाणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. (PMC Health Department)
राज्य सरकारने नुकतीच डॉ आशिष भारती यांची बदली केली होती. त्यांच्या बदलीने महापालिकेचे आरोग्य प्रमुख पद रिक्त झाले होते. दरम्यान महापालिका आयुक्तांनी डॉ कल्पना बळिवंत यांची प्रभारी आरोग्य प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर राज्य सरकारकडून पूर्ण वेळ आरोग्य प्रमुख देण्यात आला होता. 10 मार्च ला डॉ भगवान पवार यांना महापालिका आरोग्य प्रमुख पदी प्रतिनियुक्तीने नियुक्त करण्यात आले होते. मात्र सहा महिन्यांनंतर पुन्हा डॉ पवार यांची बदली करण्यात आली आहे. नुकतेच सरकारने याबाबत आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation)
दरम्यान या पदावर आता तरी महापालिका अधिकाऱ्याला संधी दिली जाणार का असा सवाल विचारला जात आहे. या पदासाठी उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत पात्र ठरत आहेत. त्यामुळे डॉ बळिवंत यांना संधी दिली जाणार कि पुन्हा सरकारचा अधिकारी बोलावला जाणार, याबाबत उत्सुकता लागली आहे. (PMC Pune Health Department)
—/
News Title | PMC Health Officer | Municipal health chief Dr. Bhagwan Pawar transferred in 6 months!