MLA Sunil Tingre | वडगावशेरी परिसरातील पाणी टंचाई वरून आमदार सुनिल टिंगरे यांचा आंदोलनाचा इशारा! 

Categories
Breaking News PMC Political पुणे

MLA Sunil Tingre | वडगावशेरी परिसरातील पाणी टंचाई वरून आमदार सुनिल टिंगरे यांचा आंदोलनाचा इशारा!

| महापालिका आयुक्तांना दिले पत्र

MLA Sunil Tingre – (The Karbhari News Service) – वडगावशेरी मतदारसंघातील (Vadgaonsheri Constituency) वडगावशेरी, खराडी, खांदवेनगर व विमाननगर या भागात नियमीत व सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा आमदार टिंगरे यांनी दिला आहे.  (PMC Water Supply Department)

टिंगरे यांच्या पत्रानुसार वडगावशेरी मतदारसंघातील, वडगावशेरी, खराडी, खांदवेनगर व विमाननगर या भागांमध्ये मागील दोन महिन्यांपासून, अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत आहे. त्याबाबत स्थानिक नागरीक वारंवार मनपा प्रशासनास व माझ्याकडे तक्रारी व विनंती करत आहेत. माझ्या कार्यालयाकडूनही सदर भागातील कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता यांना वारंवार तक्रारी / सुचना देऊनही या भागातील पाणीपुरवठयाची समस्या सोडविणेबाबत मनपा प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई करण्यात येत नाही. (Pune Water Issue)
आमदार टिंगरे यांनी पुढे म्हटले आहे कि, सद्यस्थितीत उन्हाळा चालू असून नागरीकांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याने, नागरीकांमध्ये मनपा प्रशासना विरोधात तिव्र असंतोष पसरला आहे. पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास, स्थानिक नागरीक मनपा प्रशासना विरोधात तिव्र आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत. तरी वडगावशेरी, खराडी, खांदवेनगर व विमाननगर या भागातील पाणी पुरवठ्याच्या समस्येचे निवारण होणेबाबत आपल्या स्तरावर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा सदर भागातील नागरीकांसह मनपा प्रशासनाच्या विरोधात लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा टिंगरे यांनी दिला आहे.

Pune News | विश्रांतीवाडी चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरसह १७२ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन

Categories
Breaking News Political पुणे

Pune News | विश्रांतीवाडी चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरसह १७२ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन

| उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचे भूमिपूजन

 

The Karbhari News Service – पुण्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासन प्राधान्य देत आहे. मेट्रो, रेल्वे, विमानसेवा आणि रस्ते विकासाच्या माध्यमातून शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सुनिल टिंगरे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार विकास ढाकणे, रविंद्र बिनवडे आदी उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, पुण्यात वाहनांची संख्या अधिक असल्याने रस्ते विकासावर भर देण्यात येत आहे. पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्याच्या प्रयत्नासोबत रिंगरोडचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. रिंगरोडमुळे राज्याच्या कुठल्याही भागातून येणारी वाहने पुण्यात प्रवेश न करता इतर जिल्ह्यात जावू शकतील आणि यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यावर रस्ते वाहतूकीवरील ताण कमी होणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या विकासकामांमुळे वडगाव शेरी परिसराचा वेगाने विकास होत आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या मनात आपल्या आकांक्षा पुर्ण होत असल्याची भावना निर्माण व्हायला हवी असा शासनाचा प्रयत्न आहे. विश्रांतीवाडी चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरसह १७२ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. उड्डाणपूलामुळे परिसरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील एक कोटी नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी सुधार कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शहरातील पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी मंत्रालय स्तरावर नियमित आढावा घेण्यात येत आहे. या बैठकांच्या माध्यमातून विकासकामात येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येतात, अशी माहिती श्री. पवार यांनी दिली.

सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. अनेक महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी असल्याने शहराचा लौकीक कायम रहावा यासाठी गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक तेथे कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना दिले असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.

आमदार श्री.टिंगरे म्हणाले, वडगावशेरी विधानसभा मतदार संघात विविध विकासकामे करण्यात आली आहेत. गोरगरिबांना हक्काची घरे देण्यासोबत अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी जमीन संपादित करण्यात आली आहे. विश्रांतवाडी परिसराला भेडसावणारा वाहतुकीचा प्रश्न नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलामुळे सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते एकूण १७२ कोटी ३० लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

0000

Nagar Road Pune | MLA Sunil Tingre | नगर रस्ता सिग्नल फ्री करण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी बोलविली बैठक|  आमदार सुनिल टिंगरे यांच्या मागणीवर कार्यवाही

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Nagar Road Pune | MLA Sunil Tingre | नगर रस्ता सिग्नल फ्री करण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी बोलविली बैठक|  आमदार सुनिल टिंगरे यांच्या मागणीवर कार्यवाही

Nagar Road Pune | MLA Sunil Tingre |नगर रस्त्यावरील (Nagar Road Pune) येरवडा ते वाघोली भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवून नगर रस्ता सिग्नल फ्री करण्यासाठी मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) येत्या शनिवारी ( दि. २३) बैठक बोलविण्यात आली आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीच्या (Traffic congestion in Pune) लक्षवेधीवर वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे (Vadgaosheri MLA Sunil Tingre) यांनी केलेल्या मागणीवर ही बैठक लावण्यात आली आहे. (Nagar Road Pune | MLA Sunil Tingre)

पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर आमदार टिंगरे म्हणाले, महापालिकेत समाविष्ट गावात ३०० किमीचे रस्ते असून त्यामधील फक्त १४० किमीचे रस्ते आत्तापर्यंत विकसित झाले आहेत. उर्वरित रस्त्यांची अवस्था चालता येणार नाही अशी आहे. पर्यायी रस्ते विकसित करण्यासाठी महापालिकेकडून काहीच कार्यवाही होत नाही. सार्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या नगर रस्त्याला पर्यायी असलेला शिवणे ते खराडी हा रस्ता १९९७ पासून कागदावरच आहे. लोहगावमधील संतनगरमध्ये सातत्याने वाहतूक कोंडी होते.

विश्रांतवाडी चौक येथे उड्डांणपुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे. येथेही वाहतूक कोंडी होणार असल्याने पर्यायी रस्त्यांची आवश्यकता आहे. तोही विकसित झालेला नाही. लोहगाव – धानोरी परिसरात जाण्यासाठी फाईव्ह नाईन चौकातून धानोरीला जाण्यासाठी कलम २०५ अंतर्गत रस्ता आखण्यात आला आहे. त्याचेही भूसंपादन झालेले नाही. धानोरी गावात मारुती मंदिर परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न असून याठिकाणी माझ्या मालकीची जागा असताना अद्यापपर्यंत भूसंपादनासाठी महापालिकेने मलाही नोटीस बजावली नसल्याचे आमदार टिंगरे यांनी सांगितले.

ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि जुन्या पुणे मुंबई रस्त्यावरील दापोडी ते निगडी प्रमाणे नगर रस्ता सिग्नल फ्री करण्यासाठी विशेष बैठक लावण्यात यावी अशी मागणीही आमदार टिंगरे यांनी केली. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी ही बैठक बोलविण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार येत्या शनिवारी ही बैठक बोलविण्यात आली असल्याचे आमदार टिंगरे यांनी सांगितले.
————————————-
महापालिका फक्त बिल्डरांचे रस्ते करते – टिंगरे यांचा आरोप

महापालिकेने पीपीपीच्या माध्यमातून ५०० कोटींच्या रकमेतून १६० किमीचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते विकसित करत आहे. मात्र हे सर्व रस्ते बिल्डरांसाठीचे आहेत. गोर गरीबांच्या वस्त्या असलेल्या ठिकाणाचे रस्ते महापालिका करत नाही. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी अंदाजपत्रकात असलेली तरतूद सुद्धा खर्च केलेली नाही. त्यामुळे निधी असतानाही खड्डे न बुजविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणही आमदार टिंगरे यांनी केली.

Vadgaonsheri 7/12 | वडगाव शेरी गावातील गेले 15 वर्ष बंद असलेले ७/१२ पुन्हा चालू होणार

Categories
Breaking News Political social पुणे

Vadgaonsheri 7/12 |  वडगाव शेरी गावातील गेले 15 वर्ष बंद असलेले ७/१२ पुन्हा चालू होणार

| पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे प्रशासनाला निर्देश

Vadgaonsheri 7/12 | वडगाव शेरी मतदारसंघातील (Badgaonsheri Constituency) मौजे वडगाव शेरी गावातील सातबारे गेले पंधरा वर्षे बंद होते. या कारणास्तव स्थानिक नागरिकांना वारस नोंदणी, गृह कर्ज, खरेदी विक्री व जागा विकसित करण्याकरीता मोठी अडचण गेली पंधरा वर्ष निर्माण होत होती. नागरिकांची अडचण लक्षात घेता पुणे जिल्हाधिकाऱ्यांना मागील महिन्या मध्ये निवेदन देऊन हा प्रश्न मार्गी लावावा व यासाठी बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. याच अनुषंगाने दिनांक 8 सप्टेंबर रोजी, शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (IAS Dr Rajesh Deshmukh) यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार सुनील टिंगरे यांच्या निदर्शनाखाली बैठक पुणे येथे पार पडली.
जिल्हाधिकाऱ्यांनी सी.टी.एस नंबर मिळेपर्यंत बंद केलेले सातबारा चालू करण्यात यावेत अशा सूचना दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या आठ ते दहा दिवसात सातबारा चालू करण्याचे निर्देश संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.
लवकरच वडगाव शेरी गावातील सातबारे चालू होऊन नागरिकांच्या समस्येचे निराकरण होईल असा विश्वास आमदार सुनील टिंगरे यांनी व्यक्त केला.
या बैठकीला महसूल विभागाचे अधिकारी, प्रांत, तलाठी, सर्कल व तसेच वडगाव शेरी भागातील माजी नगरसेविका सुनीता गलांडे उपस्थित होत्या.
———–

Pune News | महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी गृहप्रकल्प मधील गैरव्यवहाराची चौकशी करणार | आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर उपमुखमंत्री देवेद्र फडणवीस यांचे उत्तर

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Pune News | महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी गृहप्रकल्प मधील गैरव्यवहाराची चौकशी करणार

| आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर उपमुखमंत्री देवेद्र फडणवीस यांचे उत्तर

Pune News | वडगाव शेरी मतदार संघामध्ये (Vadgaonsheri Constituency) लोहगावमध्ये पोलिसांसाठी उभारण्यात येणाऱ्या गृहनिर्माण संस्थेत बांधकाम व्यवसायिकाकडून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. याबाबत अधिवेशनात आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी लक्षवेधी सूचना मांडली. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याची चौकशी करणार असल्याचे सांगितले. (Pune News)
याबाबत आमदार सुनील टिंगरे यांनी सांगितले कि, वडगाव शेरी मतदार संघामध्ये लोहगावमध्ये पोलिसांसाठी उभारण्यात येणाऱ्या गृहनिर्माण संस्थेत बांधकाम व्यवसायिकाकडून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे २००९ पासून अद्यापपर्यंत ७ हजार २०० पोलिस बांधवांना हक्काची घरे मिळालेली नाहीत. अजूनही हे काम अत्यंत संथगतीने सुरु असून ते तसंच सुरु राहिल्यास पुढील अनेक वर्षे पोलिसांना घरे मिळणार नाहीत. लक्षवेधी सूचनेच्या माधयमातून या गंभीर विषयाकडे सरकारचं लक्ष वेधत या गैरव्यवहाराची चौकशी करुन गैरव्यवहार करणाऱ्या बिल्डरवर कारवाई करण्याची आणि पोलिसांना तातडीने हक्काची घरे मिळवून देण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. असेही आमदार टिंगरे म्हणाले.
———
News Title |Pune News | Maharashtra Police to investigate malpractice in mega city housing project| Deputy Chief Minister Devendra Fadnavis’s reply to MLA Sunil Tingre’s attention

VadgaonSheri Constituency | वडगाव शेरी मतदारसंघातील बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करा | आमदार सुनिल टिंगरे यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

Categories
Breaking News social पुणे

VadgaonSheri Constituency | वडगाव शेरी मतदारसंघातील बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करा

| आमदार सुनिल टिंगरे यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

VadgaonSheri Constituency |वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील (VadgaonSheri Constituency) अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि बेकायदेशीररित्या चालणाऱ्या अवैध धंद्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार (Pune CP Ritesh kumar) यांच्याकडे केली आहे. यावेळी आयुक्तांनी यासदर्भात तात्काळ कारवाईची मोहीम राबविण्यात येईल असे आश्वासन दिले. (VadgaonSheri Constituency)


आमदार टिंगरे यांनी कल्याणीनगर परिसरातील नागरिकांसह पोलिस आयुक्त कुमार यांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी पोलीस आयुक्ताना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की विमाननगर, कल्याणीनगर, खराडी, लोहगाव तसेच विश्रांतवाडीसह अन्य भागात मोठ्या प्रमाणात पब, टेरेस (रुफटफ) हॉटेल अनधिकृतरित्या सुरु आहेत. हे पब आणि हॉटेल रात्री उशिरापर्यत सुरु असतात. त्याठिकाणी सुरु असलेल्या कर्णकर्कश साउंड सिस्टीमचा या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच हॉटेल/पब मध्ये तरुणवर्ग मद्यधुंद होऊन बाहेर पडतो. त्यामुळे अनेकदा अनुसुचित घटना घडतात. तसेच अनेक ठिकाणी बेकायदा दारू विक्री, हुक्का पार्लर, मटका धंदा, पत्याचे क्लब, अमली पदार्थ विक्री, मसाज पार्लर व लॉज गैरप्रकार चालू आहेत. या सर्व अनधिकृत हॉटेल, पब व बेकायदा व्यवसायावर त्वरित कारवाई करण्यात यावी. पोलिसांनी याबाबत कारवाईस टाळाटाळ केल्यास विधी मंडळाच्या पावसाळी अशिवेशनात या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधू असेही आमदार टिंगरे यांनी म्हटले आहे.

यावेळी त्यांच्या समवेत कल्याणीनगर येथील रचना अग्रवाल, इक्बाल जाफर, मोनिका शर्मा, सुमित कर्णिक, मुनीर वसतांनी, किरण म्हलोत्रा, निलेश चौहान, सचिन आगाशे आदी नागरिक उपस्थित होते.


News Title | Take action against illegal business in Vadgaon Sheri Constituency | MLA Sunil Tingre’s request to the Commissioner of Police

ITI Training Center Yerawada |  MLA Sunil Tingre |  ITI Training Center to be set up at Yerawada

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

ITI Training Center Yerawada |  MLA Sunil Tingre |  ITI Training Center to be set up at Yerawada

 |  Success in the pursuit of MLA Sunil Tingre

 ITI Training Center Yerawada |  MLA Sunil Tingre |  The state government has approved the establishment of a new Industrial Training Institute (ITI) at Yerwada in Vadgaon Sheri Constituency.  A total of 9 different professional courses will be provided in this ITI training center and nearly 5400 students will get benefit from it in a year. MLA Sunil Tingre of Vadgaon Sherry had demanded the state government to start an ITI training center at Yerwada.  (ITI Training Center Yerawada |  MLA Sunil Tingre)
For that he had followed up from time to time.  Accordingly, the former finance minister Ajit Pawar had announced in the budget to start ITI at Yerawada.  Accordingly, the process was started by the government.  Accordingly, on Wednesday, the Department of Skills, Employment, Entrepreneurship and Innovation has issued an order to approve the curriculum, post creation and necessary expenses for establishing an ITI institute here.
 ————————
 This course will be taught
 ITI Training Center in Yerwada includes the posts of Computer Operator and Programming Assistant, Electronics Mechanic, Tool and Diemaker, Mechanic Motor Vehicle, Mechanic Auto Body Repair, Mechanic Auto Petting, Fitter, Electrician and Welder.  A total of 376 students will get training in it and for this, approval has been given for the recruitment of 40 different posts.
 ——————————
 In the assembly elections, I had promised to solve civic issues along with employment generation.  Pursuant accordingly to establish an ITI institute at Yerawada.  It is believed that employment opportunities will definitely be available in Chakan, Rajangangaon area by taking training from this institute.
 Sunil Tingre, MLA, Vadgaon Sheri

ITI Training Center Yerawada | MLA Sunil Tingre | येरवडा येथे होणार आयटीआय प्रशिक्षण केंद्र

Categories
Breaking News Political social पुणे

ITI Training Center Yerawada | MLA Sunil Tingre | येरवडा येथे होणार आयटीआय प्रशिक्षण केंद्र

| आमदार सुनिल टिंगरे यांच्या पाठपुराव्याला यश

ITI Training Center Yerawada | MLA Sunil Tingre  | वडगाव शेरी मतदारसंघातील (Vadgaonsheri Constituency) येरवडा (Yerwada) येथे नविन औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या आयटीआय प्रशिक्षण केंद्रात एकूण 9 विविध व्यावसायिक कोर्सेचे प्रशिक्षण मिळणार असून वर्षभरात जवळपास पावने चारशे विद्यार्थांना त्याचा लाभ मिळणार आहे.वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी येरवडा येथे आयटीआय प्रशिक्षण केंद्र सुरू करावी अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती. ITI Training Center Yerawada | MLA Sunil Tingre

त्यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानुसार तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी अर्थसंकल्पात येरवडा येथे आयटीआय सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शासनाकडून प्रक्रिया सुरू होती. त्यानुसार बुधवारी येथील आयटीआय संस्था स्थापन करण्यासाठीचा अभ्यासक्रम, पदनिर्मिती व त्यासाठीच्या आवश्य्यक खर्चास मंजुरी देण्याचे आदेश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने काढले आहेत.
————————
हे कोर्स शिकविणार

येरवडा येथील आयटीआय प्रशिक्षण केंद्रात कॉम्प्युटर ऑपरेटर अ‍ॅण्ड प्रोगॅमिंग असिस्टंट, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, टुल अ‍ॅण्ड डायमेकर, मेकॅनिक मोटार व्हेईकल, मेकॅनिक ऑटो बॉडी रिपेअर, मे़कॅनिक ऑटो पेटिंग, फिटर, इलेक्ट्रिशियन आणि वेल्डर या पदांचा समावेश आहे. त्यात एकूण 376 विद्यार्थांना प्रशिक्षण मिळणार असून त्यासाठी 40 विविध पदांच्या भरतीस मंजुरी देण्यात आली आहे.
——————————

विधानसभा निवडणूकीत नागरि प्रश्नांच्या सोडविणुकीबरोबरच रोजगार निर्मितीचे आश्वासन मी दिले होते. त्यानुसार येरवडा येथे आयटीआय संस्था स्थापन करण्यासाठी पाठपुरावा केला. हे संस्थेतून प्रशिक्षण घेऊन चाकण, राजंगणगाव परिसरात रोजगाराच्या संधी निश्चितपणे उपलब्ध होतील असा विश्वास आहे.

सुनिल टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.


News Title | ITI Training Center to be set up at Yerawada| Success in the pursuit of MLA Sunil Tingre