Vadgaonsheri 7/12 | वडगाव शेरी गावातील गेले 15 वर्ष बंद असलेले ७/१२ पुन्हा चालू होणार

Categories
Breaking News Political social पुणे

Vadgaonsheri 7/12 |  वडगाव शेरी गावातील गेले 15 वर्ष बंद असलेले ७/१२ पुन्हा चालू होणार

| पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे प्रशासनाला निर्देश

Vadgaonsheri 7/12 | वडगाव शेरी मतदारसंघातील (Badgaonsheri Constituency) मौजे वडगाव शेरी गावातील सातबारे गेले पंधरा वर्षे बंद होते. या कारणास्तव स्थानिक नागरिकांना वारस नोंदणी, गृह कर्ज, खरेदी विक्री व जागा विकसित करण्याकरीता मोठी अडचण गेली पंधरा वर्ष निर्माण होत होती. नागरिकांची अडचण लक्षात घेता पुणे जिल्हाधिकाऱ्यांना मागील महिन्या मध्ये निवेदन देऊन हा प्रश्न मार्गी लावावा व यासाठी बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. याच अनुषंगाने दिनांक 8 सप्टेंबर रोजी, शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (IAS Dr Rajesh Deshmukh) यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार सुनील टिंगरे यांच्या निदर्शनाखाली बैठक पुणे येथे पार पडली.
जिल्हाधिकाऱ्यांनी सी.टी.एस नंबर मिळेपर्यंत बंद केलेले सातबारा चालू करण्यात यावेत अशा सूचना दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या आठ ते दहा दिवसात सातबारा चालू करण्याचे निर्देश संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.
लवकरच वडगाव शेरी गावातील सातबारे चालू होऊन नागरिकांच्या समस्येचे निराकरण होईल असा विश्वास आमदार सुनील टिंगरे यांनी व्यक्त केला.
या बैठकीला महसूल विभागाचे अधिकारी, प्रांत, तलाठी, सर्कल व तसेच वडगाव शेरी भागातील माजी नगरसेविका सुनीता गलांडे उपस्थित होत्या.
———–