Nagar Road Pune | MLA Sunil Tingre | नगर रस्ता सिग्नल फ्री करण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी बोलविली बैठक|  आमदार सुनिल टिंगरे यांच्या मागणीवर कार्यवाही

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Nagar Road Pune | MLA Sunil Tingre | नगर रस्ता सिग्नल फ्री करण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी बोलविली बैठक|  आमदार सुनिल टिंगरे यांच्या मागणीवर कार्यवाही

Nagar Road Pune | MLA Sunil Tingre |नगर रस्त्यावरील (Nagar Road Pune) येरवडा ते वाघोली भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवून नगर रस्ता सिग्नल फ्री करण्यासाठी मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) येत्या शनिवारी ( दि. २३) बैठक बोलविण्यात आली आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीच्या (Traffic congestion in Pune) लक्षवेधीवर वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे (Vadgaosheri MLA Sunil Tingre) यांनी केलेल्या मागणीवर ही बैठक लावण्यात आली आहे. (Nagar Road Pune | MLA Sunil Tingre)

पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर आमदार टिंगरे म्हणाले, महापालिकेत समाविष्ट गावात ३०० किमीचे रस्ते असून त्यामधील फक्त १४० किमीचे रस्ते आत्तापर्यंत विकसित झाले आहेत. उर्वरित रस्त्यांची अवस्था चालता येणार नाही अशी आहे. पर्यायी रस्ते विकसित करण्यासाठी महापालिकेकडून काहीच कार्यवाही होत नाही. सार्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या नगर रस्त्याला पर्यायी असलेला शिवणे ते खराडी हा रस्ता १९९७ पासून कागदावरच आहे. लोहगावमधील संतनगरमध्ये सातत्याने वाहतूक कोंडी होते.

विश्रांतवाडी चौक येथे उड्डांणपुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे. येथेही वाहतूक कोंडी होणार असल्याने पर्यायी रस्त्यांची आवश्यकता आहे. तोही विकसित झालेला नाही. लोहगाव – धानोरी परिसरात जाण्यासाठी फाईव्ह नाईन चौकातून धानोरीला जाण्यासाठी कलम २०५ अंतर्गत रस्ता आखण्यात आला आहे. त्याचेही भूसंपादन झालेले नाही. धानोरी गावात मारुती मंदिर परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न असून याठिकाणी माझ्या मालकीची जागा असताना अद्यापपर्यंत भूसंपादनासाठी महापालिकेने मलाही नोटीस बजावली नसल्याचे आमदार टिंगरे यांनी सांगितले.

ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि जुन्या पुणे मुंबई रस्त्यावरील दापोडी ते निगडी प्रमाणे नगर रस्ता सिग्नल फ्री करण्यासाठी विशेष बैठक लावण्यात यावी अशी मागणीही आमदार टिंगरे यांनी केली. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी ही बैठक बोलविण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार येत्या शनिवारी ही बैठक बोलविण्यात आली असल्याचे आमदार टिंगरे यांनी सांगितले.
————————————-
महापालिका फक्त बिल्डरांचे रस्ते करते – टिंगरे यांचा आरोप

महापालिकेने पीपीपीच्या माध्यमातून ५०० कोटींच्या रकमेतून १६० किमीचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते विकसित करत आहे. मात्र हे सर्व रस्ते बिल्डरांसाठीचे आहेत. गोर गरीबांच्या वस्त्या असलेल्या ठिकाणाचे रस्ते महापालिका करत नाही. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी अंदाजपत्रकात असलेली तरतूद सुद्धा खर्च केलेली नाही. त्यामुळे निधी असतानाही खड्डे न बुजविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणही आमदार टिंगरे यांनी केली.

MLA Ravindra Dhangekar | पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी निधी देणार |  मंत्री उदय सामंत | आमदार रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केला होता प्रश्न 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

MLA Ravindra Dhangekar | पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी निधी देणार |  मंत्री उदय सामंत

| आमदार रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केला होता प्रश्न

MLA Ravindra Dhangekar | पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांना (Merged villages) पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी विधानसभेत सांगितले. पुणे महानगरपालिकेत (PMC Pune) नव्याने समाविष्ट केलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्याबाबतचा प्रश्न सदस्य रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी उपस्थित केला होता. (MLA Ravindra Dhangekar)

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, नांदेड किरकीटवाडी व नांदोशी या गावांना 3 हजार मी.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून ग्रामपंचायत काळात अस्तित्वात असलेल्या नांदेड विहीर येथे पाणी आणून या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडरचे द्रावण टाकून या गावांमध्ये अस्तित्वात असलेल्या वितरण व्यवस्थेमधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. (Pune Municipal Corporation)

तसेच पुणे महानगरपालिकेमार्फत नव्याने समाविष्ट ११ व २३ गावांकरीता पाणीपुरवठा करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही महानगरपालिकेमार्फत सुरू आहे. (PMC Pune News)

या गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

००००

News Title |MLA Ravindra Dhangekar | Funds will be given for water supply to newly included villages in Pune Municipal Corporation Minister Uday Samant | The question was raised by MLA Ravindra Dhangekar

PMRDA | PMRDA च्या बांधकामांमधील अनियमितता तपासण्यासाठी लवकरच समिती | उद्योग मंत्री उदय सामंत

Categories
Breaking News Political पुणे

पुणे महानगर प्राधिकरणातील (PMRDA) बांधकामांमधील अनियमितता तपासण्यासाठी लवकरच समिती |  उद्योग मंत्री उदय सामंत

 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील जागांवर विकासक बांधकामांचे नियम धाब्यावर बसवून काम करीत आहे अशा तक्रारी येत आहे. त्यामुळे या कामांमध्ये अनियमितता तपासण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर समिती स्थापन करण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य सुनिल शेळके यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीत होत असलेल्या अनियमित कामांबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. याला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले.

श्री. सामंत म्हणाले की, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना 2015 मध्ये झाली. प्राधिकरणामार्फत विकासकांना बांधकाम करण्यासाठी परवानगी देण्यात येते, मात्र या कामात अनियमितता असेल तर ही गंभीर बाब आहे. त्यामुळे ही अनियमितता तपासण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या स्तरावर अधिवेशन संपल्यानंतर आठ दिवसांच्या आता समिती स्थापन करण्यात येईल. या समितीमध्ये विभागीय आयुक्तांसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा समावेश असेल. याशिवाय समिती स्थापन झाल्यानंतर पुढील दोन महिन्यात याबाबतचा अहवाल घेण्यात येईल.

000

Pandharpur | पंढरपूर तीर्थक्षेत्राचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यास प्राधान्य | मंत्री उदय सामंत

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यास प्राधान्य | मंत्री उदय सामंत

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा बहुआयामी व सर्वंकष विकास करण्याकरिता कॉरिडॉरची निर्मिती प्रस्तावित आहे. कॉरिडॉरचा प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात आला असून जनतेच्या सूचना, हरकती यांचा विचार करून या आराखड्यास अंतिम मान्यता देण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.

वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरमध्ये कॉरिडॉर करण्यासंदर्भात सदस्य मनीषा कायंदे यांनी लक्षवेधी सुचना मांडली होती. या लक्षवेधीस उत्तर देताना मंत्री श्री.सामंत बोलत होते.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करताना गर्दीचे व्यवस्थापन, मंदिर परिसराचा विकास आणि त्यास भव्य स्वरूप देण्यासाठी प्रमुख देवस्थानाचा अभ्यास प्रशासनाने केला आहे. या विकास आराखड्याचे स्वरूप भाविकांना , नागरिकांना अभिप्रेत असेच असेल. शहरातील पुरातन वास्तूंना धोका न पोहचवता हा विकास प्रस्तावित करण्यात येत आहे. हा आराखडा सध्या प्राथमिक स्तरावर आहे. अंतिम स्वरूप देताना येथील व्यावसायिक , दुकानदारांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही, या दृष्टीने उपाययोजना करण्यात येतील, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

भाविकांना द्यावयाच्या सोयी सुविधा, मंदिर व मंदिर परिसर विकास, घाट बांधकाम, दर्शन रांग व आपत्ती व्यवस्थापन, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिसरात करावयाची पायाभूत कामे जतन व संवर्धन, स्काय वॉक, दर्शन मंडप ब. पंढरपूर शहरात करावयाची पायाभूत कामे , ९ वाहन तळांचा विकास, ३९ रस्त्यांची सुधारणा. २८ एमएलडी क्षमतेची पाणीपुरवठा व १० एमएलडी क्षमतेची मलनिस्सारण योजना, ११ ठिकाणी शौचालये, ३ उद्यानांचा विकास, दोन्ही तीरावरील घाटांचा विकास, विश्रामगृह, पूल इ., विद्युत व्यवस्थेतची पायाभूत कामे. ९ पालखी तळांचे भूसंपादन व १८ पालखी तळांच्या ठिकाणी विकास कामे. वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसिध्दीच्या अनुषंगाने संत विद्यापीठ उभारणे, संत चोखामेळा स्मारक, संत नामदेव स्मारक इ. प्रस्तावित कामे, सी.सी.टी.व्ही. यंत्रणा उभारणे, मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय उभारणे इत्यादी बाबींचा समावेश या आराखड्यात असल्याचे मंत्री श्री .सामंत यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य महादेव जानकर, सचिन अहीर, अमोल मिटकरी, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.

०००००

MLA Sunil Kamble | पुणे मनपामधील पाणीपुरवठा आणि STP प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य  – उदय सामंत | आमदार सुनील कांबळे यांनी मांडली होती लक्षवेधी सूचना

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

पुणे मनपामधील पाणीपुरवठा आणि STP प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य  – उदय सामंत

| आमदार सुनील कांबळे यांनी मांडली होती लक्षवेधी सूचना

नागपूर| पुणे शहरासाठी समान पाणीपुरवठा योजना प्रकल्पांतर्गत (24*7 water project) सप्टेंबर २०२३ पूर्वी आणि राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण (Mula mutha pollution control) नियंत्रित करणे या प्रकल्पाची कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येतील. ही कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य सुनील कांबळे (MLA Sunil Kamble) यांनी यासंदर्भात आज लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते.

ते म्हणाले की, पुणे शहर हे भौगोलिकदृष्ट्या उंच व सखल भागांमध्ये विभागलेले आहे. त्यामुळे काही भागांमध्ये जादा दाबाने व जादा वेळेसाठी पाणी उपलब्ध आहे व काही भागामध्ये अत्यल्प पाणीपुरवठा करण्यात येतो. त्याअनुषंगाने पुणे शहरासाठी समान पाणी पुरवठा योजना २४x७ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुणे महानगरपालिकेने हाती घेतला आहे. या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने टाक्या बांधणे, मुख्य दाब नलिका टाकणे, अस्तित्वातील वितरण व्यवस्थेचे पुनरूत्थान करणे, पंपिंग स्टेशन्स बांधणे तसेच नागरिकांच्या नळजोडांवर एएमआर मीटर्स बसविणे आदी बाबींचा अंतर्भाव आहे. हा प्रकल्प राबविण्याकरीता पाण्याच्या साठवण टाक्या बांधण्याकरीता एक निविदा, मुख्य दाब नलिका टाकण्याकरीता एक निविदा व शहराच्या जलशुध्दीकरण केंद्रनिहाय पाच निविदा, अशी ७ निविदांची प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. या निविदांपैकी पाण्याच्या ८२ साठवण टाक्यांपैकी आज अखेर ४२ टाक्यांची कामे पूर्ण झालेली असून २२ टाक्यांची कामे प्रगतीपथावर असून, टप्प्याटप्प्याने माहे सप्टेंबर २०२३ अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

याशिवाय, राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रित करणे या प्रकल्पाची निविदा मान्य झाली असून कार्यादेश देण्यात आलेले आहेत. या प्रकल्पांतर्गत प्रामुख्याने एकूण ११ मैलापाणी शुध्दीकरण केंद्रे बांधणे (एकूण क्षमता ३९६ एम.एल.डी.) व ५५ कि.मी. लांबीच्या मलवाहिन्या टाकणे प्रस्तावित आहेत. या ११ मैलापाणी शुध्दीकरण प्रकल्पांपैकी नायडू हॉस्पिटल (१२७ एम.एल.डी.), भैरोबा (७५ एम.एल.डी.), धानोरी (३३ एम.एल.डी.), वडगाव (२६ एम.एल.डी.) या मैलापाणी शुध्दीकरण केंद्रांची कामे जागेवर सुरू करण्यात आलेली आहेत. तसेच ५५ कि.मी. लांबीच्या मलवाहिन्या टाकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम विहित मुदतीत मार्च २०२५ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन असून योजना कार्यान्वित झाल्यानंतर नदीचे प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली.
लक्षवेधी वरील या चर्चेत सदस्य भीमराव तापकीर यांनी सहभाग घेतला.