Eco Friendly Diwali | PMC Pune | दिवाळी सणाच्या निमित्ताने पुणे महापालिकेचे पुणेकरांना आवाहन!

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

Eco Friendly Diwali | PMC Pune | दिवाळी सणाच्या निमित्ताने पुणे महापालिकेचे पुणेकरांना आवाहन!

Eco Friendly Diwali | PMC Pune | पुणे मनपा (Pune Municipal Corporation) तर्फे शहरातील नागरिकांनी दिवाळी हा सण पर्यावरणपूरक पद्धतीने (Eco Friendly Diwali) साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिवाळी हा सण अंधार करुन दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. हा सण साजरा करताना नागरिकांनी हवा प्रदुषण तसेच ध्वनी प्रदुषण यांसारख्या उदभवणाऱ्या समस्यांना आळा घालण्याकरिता पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा यासाठी खालील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. असे आवाहन अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार (IAS Dr Kunal Khemnar) यांनी केले आहे. (PMC Pune News)

हवा प्रदुषण:-

फटाके हे वायू प्रदुषणास कारणीभूत ठरतात तरी शहरातील हवेचे प्रदुषण कमी करण्यासाठी
प्रत्येक नागरिकांनी फटाक्यांचा वापर करणे टाळावे.

ध्वनीप्रदुषण :-

मोठ्या आवाजाचे फटाके ध्वनी प्रदुषण करतात, अशा फटाक्यांचा वापर करू नये. दिवाळीत 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणारे फटाके उडविण्यास मनाई केली आहे. तरी. यांसारखे फटाके उडविणे टाळावे. नागरिकांनी शांतता क्षेत्र जसे की शैक्षणिक संस्था, दवाखाने न्यायालये इ.ठिकाणी फटाके उडवू नये

पर्यावरणपूरक पर्याय:-

नागरिकांनी घर सजविण्यासाठी अधिक ऊर्जा कार्यक्षम प्रकाश देणारे LED दिवे किंवा अपारंपारिक ऊर्जा स्रोत जसे की सौर दिवे वापरावेत.
रेडिमेड (Plaster of Paris) पासून बनवलेले किल्ले पर्यावरणास घातक ठरतात त्यांचा वापर न करता दगड मातीपासून किल्ले बनवावेत.
• रासायनिक रंग/ रांगोळी न वापरता नैसर्गिक सहित्यांसह रांगोळी आकर्षक बनवावी.
तसेच प्लास्टिकचे आकाशकंदील न वापरता पर्यावरणपूरक किंवा रिमायकल करता येणाऱ्या वस्तूंपासून बनलेले आकाशकंदील वापरुन इको फ्रेंडली सजावट करावी.
हवा प्रदूषणाचे प्रमाण जास्त झाल्याने श्वसनाचे आजार होवू शकतात यासाठी जास्त धूर उत्सर्जितकरणाऱ्या फटाक्यांचा वापर करणे टाळावे.