PMPML Employees Diwali Bonus | पीएमपी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा प्रस्ताव पुणे महापालिका आयुक्तांच्या टेबलवर पडून!

Categories
Breaking News PMC पुणे

PMPML Employees Diwali Bonus | पीएमपी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा प्रस्ताव पुणे महापालिका आयुक्तांच्या टेबलवर पडून!

| दिवाळी तोंडावर तरीही अजून बोनस नाही

PMPML Employees Diwali Bonus  | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून दिवाळीची भेट देत बोनस देण्यात आला आहे. दरम्यान दिवाळी तोंडावर आली तरीही पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना मात्र अजूनही बोनस देण्यात आलेला नाही. याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांच्या टेबलवर गेल्या 15 दिवसापासून पडून आहे. दिवाळी आली तरी बोनस नाही म्हणून कर्मचारी धास्तावले आहेत. बोनसचा प्रस्ताव लवकर मान्य करण्याची मागणी केली जात आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (PMPML) सर्व कायम, बदली सेवकांना सानुग्रह अनुदान ८.३३% व बक्षिस  २१०००/- दिवाळीपूर्वी देण्याची मागणी कर्मचाऱ्यानी ने पीएमपीच्या सीएमडी (PMPML CMD) कडे केली आहे.  दरम्यान कालच पुणे महापालिका सेवकांना (PMC Employees) बोनस देण्यात (Bonus) आला आहे. त्याचप्रमाणे पीएमपी सेवकांना दिलासा दिला जाणार का, असा प्रश्न पीएमपी कर्मचारी विचारत आहेत. (PMPML Employees Diwali Bonus)
पुणे महापालिका आणि पिंपरी महापालिका संचलन तुटीच्या माध्यमातून पीएमपी कर्मचाऱ्यांना बोनस देतात. पीएमपी कडून याचे प्रस्ताव दोन्ही महापालिकाना देण्यात आले आहेत. दरम्यान पुणे महापालिका प्रशासनाकडून याबाबतचा प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी आयुक्ताकडे पाठवण्यात आला आहे. मात्र गेल्या 15 दिवसापासून आयुक्तांच्या टेबलवर हा प्रस्ताव तसाच पडून आहे. आयुक्तांनी मान्यता दिल्यांनतर हा प्रस्ताव स्थायी समितीच्या माध्यमातून मुख्य सभेसमोर ठेवला जाणार आहे. यात बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधी बोनस मिळणार कि नंतर असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत लवकर निर्णय करण्याची मागणी पीएमपी कर्मचारी करत आहेत.
—-

DA Difference | PMPML Pune | PMPML च्या कर्मचाऱ्यांना ५ महिन्याचा महागाई भत्त्याचा फरक मिळणार! 

Categories
Breaking News PMC social पुणे

DA Difference | PMPML Pune | PMPML च्या कर्मचाऱ्यांना ५ महिन्याचा महागाई भत्त्याचा फरक मिळणार!

| पीएमटी कामगार संघ इंटक ची माहिती

DA Difference | PMPML Pune | पुणे | PMPML च्या कर्मचाऱ्यांना पुणे महापालिका (PMC) आणि पिंपरी महापालिका (PCMC) प्रमाणे सानुग्रह अनुदान (Bonus), बक्षीस देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना पाच महिन्याचा 4% प्रमाणे महागाई भत्त्याचा फरक (DA Difference) ऑक्टोबर पॅड इन नोव्हेंबरच्या मिळणाऱ्या वेतनात देण्याचे मान्य केले आहे. अशी माहिती पीएमटी कामगार संघ इंटक चे राजेंद्र खराडे (अध्यक्ष), नुरुद्दीन इनामदार (जनरल सेक्रेटरी) यांनी दिली. (PMPML Emplyoees Bonus) 
राजेंद्र खराडे (अध्यक्ष), नुरुद्दीन इनामदार (जनरल सेक्रेटरी) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार  मान्यता प्राप्त पीएमटी कामगार संघ इंटक बरोबर सानुग्रह अनुदान व बक्षीस बाबत झालेला करार, औद्योगिक न्यायालय व मे.उच्च न्यायालयात संघटनेच्या बाजूने झालेला निकाल संघटनेने केलेले कायदेशीर पत्रव्यवहार व पाठपुरावा याचा सकारात्मक विचार करून इंटक संघटने बरोबर गुरुवार  रोजी अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक यांच्याबरोबर झालेली बैठक त्यात सकारात्मक चर्चे नुसार बुधवार  रोजी तातडीने घेतलेली संचालक मंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक यांच्या प्रशासकीय मान्यतेनुसार परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना 8.33% सानुग्रह अनुदान व बक्षीस रक्कम 21000  देण्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व अधिकारी व कामगार यांची  दिवाळी गोड होणार आहे.
त्याच बरोबर 1 जानेवारी 2023 ते मे 2023 पाच महिन्याचा 4% प्रमाणे महागाई भत्त्याचा फरक ऑक्टोबर पॅड इन नोव्हेंबरच्या मिळणाऱ्या वेतनात देण्याचे मान्य केले आहे. असे राजेंद्र खराडे (अध्यक्ष), नुरुद्दीन इनामदार (जनरल सेक्रेटरी) यांनी सांगितले. 
———

PMPML Employees Diwali Bonus | पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याची इंटक ची मागणी | सानुग्रह अनुदान ८.३३% व बक्षीस २१०००/- दिवाळीपूर्वी देण्याबाबत सीएमडीना दिले पत्र

Categories
Breaking News PMC social पुणे

PMPML Employees Diwali Bonus | पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याची इंटक ची मागणी

| सानुग्रह अनुदान ८.३३% व बक्षीस  २१०००/- दिवाळीपूर्वी देण्याबाबत सीएमडीना दिले पत्र

PMPML Employees Diwali Bonus  | पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (PMPML) सर्व कायम, बदली सेवकांना सानुग्रह अनुदान ८.३३% व बक्षिस  २१०००/- दिवाळीपूर्वी देण्याची मागणी पीएमटी कामगार संघ अर्थात इंटक ने पीएमपीच्या सीएमडी (PMPML CMD) कडे केली आहे. याबाबत संघटनेकडून सीएमडीना पत्र देण्यात आले आहे. दरम्यान आजच पुणे महापालिका सेवकांना (PMC Employees) बोनस देण्याबाबत परिपत्रक (Bonus Circular) जारी झाले आहे. त्याचप्रमाणे पीएमपी सेवकांना दिलासा दिला जाणार का, असा प्रश्न पीएमपी कर्मचारी विचारत आहेत. )PMPML Employees Diwali Bonus)

इंटक च्या पत्रानुसार आजतागायत सानुग्रह अनुदान व बक्षिस थकित फरकाच्या रक्कमा परिवहन महामंडळातील कामगारांना वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत. दोन्ही महानगर पालिका त्यांचे सेवकांना सानुग्रह अनुदान व बक्षिस रक्कम देते. त्याचप्रमाणे महामंडळाच्या सर्व कायम व बदली सेवकांना सदरच्या रक्कमा द्यावयाची प्रथा पूर्व परिवहन उपक्रमापासून अस्तित्वात होती. कंपनी कायद्याखाली महामंडळाची स्थापना झाल्यानंतर मागील १६ वर्षांमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना १/८ सानुग्रह अनुदान व बक्षिसाची रक्कम दोन्ही महानगर पालिकांकडून उपलब्ध झालेल्या निधितून देण्यात आलेली होती व आहे. (PMPML Pune)

सन १९९७ च्या करारातील मागणी क. ६ मधील मान्य तडजोडीप्रमाणे सानुग्रह अनुदान व बधिस देणे पीएमपीवर  पुणे म.न.पा. च्या सेवकांप्रमाणे बंधनकारक आहे. तसेच इंडस्ट्रियल डिस्प्युट अॅक्ट चॅप्टर-४ प्रमाणे कस्टमरी प्रथा कायद्याखाली येत आहे. औदयोगिक न्यायालय व  उच्च न्यायालय यांनीही बंधनकारक केलेले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील कर्मचारी जगातील सर्वाधिक गर्दिच्या शहरात ऊन, वारा पाऊस याचा विचार करता रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य निष्ठेने बजावित आहेत. (PMPML News)

पत्रात पुढे म्हटले आहे कि, उत्पन्नात वाढ होवून दरमहा १५ ते २० कोटी रू. उत्पन्न वाढलेले असून संचलन तुट कमी झालेली आहे. सदरचे उत्पन्न कर्मचारी व अधिकारी यांनी परिवहन महामंडळात आपले आवाहनाला प्रतिसाद देवून आपले रक्ताचे पाणी करून रात्रंदिवस कष्ट करून वाढविलेले आहे. हि बाब आपणास ज्ञात आहे. तरी परिवहन महामंडळाकडील सर्व कायम व बदली सेवकांची व त्यांच्या कुटूंबाची दिवाळी गोड करण्याकामी त्वरीत सकारात्मक निर्णय घेवून मनपा सेवकांप्रमाणे सर्व कायम बदली सेवकांना सानुग्रह अनुदान ८.३३% व बक्षिस र.रु. २९०००/- (र. रू. एकविस हजार) दिवाळीपूर्वी आपले स्तरावर पाठपुरावा करून देण्यात यावे अशी संघटनेच्या वतीने  मागणी करण्यात आली आहे.
———