Muralidhar Mohol : ‘त्या’ कुटुंबियांना महापौरांकडून अनोखा ‘आधार’ : ५ हजार कुटुंबियांना दिला गेला फराळ

Categories
cultural PMC पुणे

‘त्या’ कुटुंबियांना महापौरांकडून अनोखा ‘आधार’

– कोरोनाने दगावलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन फराळ

– ५ हजार कुटुंबियांना दिला गेला फराळ

पुणे : कोरोनामुळे कुटूंबातील सदस्याचा मृत्यू झाल्याने हिंदू रीतिरिवाजानुसार वर्षभर कोणताही सण साजरा केला जात नाही. मात्र दिवाळीचा सण ‘तम सोमा ज्योतिर्गमय’प्रमाणे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा असतो. हाच धागा लक्षात घेता आणि दुःखात असलेल्या कुटुंबियांना फराळ आणि संदेशपत्र घरपोच करुन आधार देण्याचा प्रयत्न महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. शहरात गेल्या वर्षभरात कोरोनाग्रस्त मृत्यूची संख्या जवळपास ५ हजारांच्या आसपास आहे, या सर्व कुटूंबियांना महापौर मोहोळ यांनी आधार दिला.

कोरोनामुळे गेल्या वर्षी मृत्यू झालेल्या जवळपास साडेचार हजार नागरिकांच्या कुटूंबियांना फराळ देऊन कुटूंबियांना आधार देण्याचा प्रयत्न केला होता. यंदाही जवळपास पाच हजार कुटूंबियांना हा आधार देण्याचा प्रयत्न महापौर मोहोळ यांच्याकडून केला गेला आहे.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, गेल्या दीड-पावणे दोन वर्षात जवळपास साडेनऊ हजार कुटूंबियांच्या घरी दुःखाचे सावट होते. ज्यांनी कुटूंबियांतील सदस्य गमावले, त्यांचे दुःख कमी होणारे नसले तरी अशा कुटूंबियांना आधार देणे आवश्यक होते. म्हणूनच त्यांना आधार देण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून संदेशपत्र आणि फराळ पोहोचवत आहोत.’

‘आपल्या हिंदू संस्कृतीत कुटूंबियांतील सदस्य गमावल्यास जवळपास वर्षभर सण साजरा केला जात नाही. मात्र कोरोनाच्या संकटकाळात एकूणच नकारात्मक वातावरणात निर्माण होते. या पार्श्वभूमीवर दुःखाचा डोंगर मागे सारून नवी पहाट अशा कुटूंबियांमध्ये आणणे आवश्यक होते. त्या दृष्टीने प्रयत्न म्हणून कुटूंबियांचा आधार देण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः काही कुटूंबियांकडे जाऊन आधार देण्याचा प्रयत्न केला असून संपूर्ण पाच हजार कुटूंबियांमध्ये फराळ पोहोच करण्यात येत आहे’, असेही महापौर म्हणाले.

Amol Balwadkar : सलग पाचव्या वर्षी अमोल बालवडकर यांनी दिवाळी केली गोड !

Categories
cultural Political पुणे

सलग पाचव्या वर्षी अमोल बालवडकर यांनी दिवाळी केली गोड !

बालेवाडीमध्ये रावसाहेब दानवे,चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिवाळी सरंजाम वितरण

पुणे : पाच वर्ष अमोल बालवडकर यांनी नागरिकांची दिवाळी गोड करण्याचे काम केले आहे. त्यांनी नेहमीच अडी अडचणीत असणाऱ्या नागरिकांची सेवा केली आहे त्यांच्या समस्या सोडविल्या आहेत. असेच पुढील पाच वर्षात देखील नगरसेवक म्हणून अमोल बालवडकर यांना दिवाळी सरांजामाच्या महत्वाचा कार्यक्रम करण्याची संधी द्यावी. अशा शब्दात केंद्रीय मंत्री  रावसाहेब दानवे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे कौतुक केले.

: मराठवाड्यातील नागरिकांची काळजी अमोल बालवडकर नेहमीच घेत आले आहेत : बोर्डीकर

बालेवाडीमध्ये ‘नगरसेवक अमोल बालवडकर फाऊंडेशन’ च्या वतीने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते दिवाळी सरंजामाचे  वितरण करण्यात आले. सलग पाचव्या वर्षी अमोल बालवडकर यांनी नागरिकांची  दिवाळी  गोड केली ! हा कार्यक्रम संजय फार्म, दसरा चौक, बालेवाडी येथे ३० ऑक्टोबर रोजी झाला.

भाजपचे परभणी जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदिश मुळीक, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेवक किरण  दगडे-पाटील, प्रकाशतात्या बालवडकर, स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर,ज्ञानेश्वर तापकीर,लहु बालवडकर, राहुल कोकाटे,सौ.उमाताई गाडगिळ,सौ.अस्मिता करंदिकर,प्रल्हाद सायकर, सुंदरशेठ बालवडकर,अनिलतात्या बालवडकर, हनुमंत बालवडकर, अनिल बाप्पु ससार, काळुराम गायकवाड, किरण तापकिर, सौ.राखी श्रीवास्तव, सौ.उज्वला साबळे, सौ.रिना सोमैया, सौ.स्मरणिका जुवेकर, अशोक बालवडकर, नामदेव गोलांडे, हनुमंत बालवडकर, अतुल आमले, अनंता चांदेरे, राजु पाडाळे पाटील, राजु पाषाणकर, रामदास विधाते, रामदास मुरकुटे, राजेश विधाते, भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व इतर मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली..

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले, “दिवाळी सरंजाम ही केवळ नागरिकांची दिवाळी चांगली जावी म्हणून एक भेट आहे. त्यामागे कोणतीही अपेक्षा नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये नागरिकांच्या समस्यांचे निराकरण जर मी केले असेल, त्यांची कामे केली असेल तर निश्चितच नागरिकांचे आशीर्वाद मला मिळतील. दिवाळी सरंजाम वितरण समारंभाला मी आपणास आमंत्रित केलं, आपण नेहमीप्रमाणे प्रेमाने सरंजाम स्वीकारण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात याबद्दल मी आपला सदैव ऋणी आहे.

कार्यक्रमाचे कौतुक करताना केंद्रीय मंत्री  रावसाहेब दानवे म्हणाले “पाच वर्ष अमोल बालवडकर यांनी नागरिकांची दिवाळी गोड करण्याचे काम केले आहे. त्यांनी नेहमीच अडी अडचणीत असणाऱ्या नागरिकांची सेवा केली आहे त्यांच्या समस्या सोडविल्या आहेत. असेच पुढील पाच वर्षात देखील नगरसेवक म्हणून अमोल बालवडकर यांना दिवाळी सरांजामाच्या महत्वाचा कार्यक्रम करण्याची संधी द्यावी”

भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, कोरोना काळामध्ये नागरिकांना आर्थिक दुरवस्था निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याचं काम अमोल बालवडकर करत आहेत .

परभणीच्या  आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या “परभणी जिल्हा व मराठवाड्यातील नागरिकांची काळजी अमोल बालवडकर नेहमीच घेत आले आहेत व  इथून पुढेही अशीच घेत राहतील याची खात्री आहे “.  परभणीचे भाजपा जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनीदेखील बालवडकर यांच्या  कामांचे कौतुक केले.

शिवाजी महाराजांच्या स्मारकास देणगी 

दरम्यान  प्रल्हाद सायकर यांच्या संकल्पनेतून, स्वराज्य प्रतिष्ठान मार्फत बाणेर येथे उभारले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास रुपये २,५१,०००/- ची रोख देणगी अमोल बालवडकर फाऊंडेशन तर्फे दिली, प्रभागातील दिव्यांग गरजु व्यक्तीला तीन चाकी सायकल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते भेट दिली

Farmers Protest : उद्यापासून पुकारलेला शेतकरी संघटनेचा संप काही काळ स्थगित  : प्रदेश अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांची माहिती 

Categories
Breaking News महाराष्ट्र शेती

उद्यापासून पुकारलेला शेतकरी संघटनेचा संप काही काळ स्थगित

: प्रदेश अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांची माहिती

पुणे : उद्या 1 नोव्हेंबर 21 पासून होणारे शेतकरी संपाचा आंदोलने आम्ही आठ दिवसांसाठी स्थगित केलेला आहे. कारखाने 15 ऑक्टोबरपासून सुरू झालेले आहेत.  कारखान्यांनी पहिला हप्ता जो आहे तो एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान देतात की नाही देतात हे पाहणे आणि त्यानंतर 16 नोव्हेंबरला ऊसाचा दुसरा हप्ता दिलेला नसेल तर महाराष्ट्र राज्यांमध्ये शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी निश्चितपणे पुन्हा उग्र आंदोलन राज्यभर उभा करेल. त्याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र सरकार, साखर आयुक्तालय, विभागीय साखर सहसंचालक, कलेक्टर, विभागीय आयुक्त यांचे वरती राहील, अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद जोशी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी दिली.

: सरकारला दिवाली कशी गोड लागते?

पवार राजे म्हणाले,  राज्यामध्ये साधारण 2013/14 पासून सातत्याने गारपीट बिगरमोसमी पाऊस, वादळ वारा, सततचे सुलतानी व आस्मानी संकट यामुळे शेतकरी सातत्याने अडचणीत आलेला आहे. काॅंग्रेस सरकार असेल किंवा 14नंतरचे भाजप सरकार असेल किंवा आघाडीच्या सरकारच्या या सर्व सरकारमध्ये सर्वांनी ज्या ज्या वेळी विरोधी पक्ष नेत्यांच्या भूमिका बजावल्या त्यावेळी त्यांनी शेतकर्‍यांची बाजू मांडली. मात्र सत्तेवर गेल्याच्यानंतर यांनी सातत्याने शेतकऱ्यांची बाजू केवळ कागदोपत्री मांडलेल्या यामुळे गेल्या 2013/14 पासून तर आजच्या दिवसापर्यंत राज्यात जवळपास 15 ते 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या ना कुठल्या आजारामुळे, अपघाता मुळे झालेले नाहीत कोविड मुळे झालेले नाहीत किंवा कोणत्या भांडणामुळे, या आत्महत्या केवळ शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव नाही पीक विम्याचे, पीक संरक्षण नाही. सरकारने प्रत्येकवेळी केवळ जीआर व आश्वासने देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. कोणत्याही प्रकारची पुर्ण कर्जमाफी नाही किंवा वीज बिल मुक्ती नाही त्या संदर्भातला एकही विचार या सरकारांनी कधी केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आणि या सर्व आत्महत्याना राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार आहे. म्हणून यावर्षीची कोविड नंतरच्या दुसऱ्या वर्षातही शेतकऱ्यांच्या 3500 हजार आत्महत्या झाल्या नतरही राज्यकर्त्यांना, राज्य सरकार मधल्या शासन प्रशासन अधिकारी खासदार आमदार मंत्री यांना दिवाळी गोड कसे लागते! असा प्रश्न पवार यांनी विचारला आहे.

Hawker’s: शहरातील छोट्या व्यावसायिकांना दिलासा! : दिवाळीच्या सणात कडक कारवाई नाही

Categories
PMC social पुणे

शहरातील छोट्या व्यावसायिकांना दिलासा!

: दिवाळीच्या सणात कडक कारवाई नाही

पुणे: दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त शहरात लगबग सुरु आहे. या कालावधीत छोटे व्यावसायिक रस्त्यावर पथारी ठेवत वेगवेगळ्या वस्तू विक्रीस ठेवतात. मात्र या लोकांकडे पथारीचा परवाना नसल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते. यामुळे या लोकांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेविका अर्चना पाटील यांनी व्यावसायिकांवर कडक कारवाई न करता त्यांना फक्त समज देऊन सोडून देण्यात यावे. अशी मागणी केली होती. त्यानुसार स्थायी समिती अध्यक्षांनी प्रशासनास कडक कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे छोट्या व्यावसायिकांना दिवाळीच्या मुहूर्तावर दिलासा मिळाला आहे.

: नगरसेविका अर्चना पाटील यांनी केली होती मागणी

शहरात सद्यस्थितीत कोरोनाचा जोर कमी झालेला असला तरी शहरातील छोट्या व्यावसायिकांचे मात्र कंबरडे मोडले आहे. मागील वर्षी दिवाळीच्या सणाला या व्यावसायिकांची फार मोठी उलाढाल झाली नव्हती. खास करून वर्षभरात साजरा होणाऱ्या विविध सणांसाठी छोटे व्यावसायिक पथारी मांडत वेगवेगळ्या वस्तू विक्रीस ठेवतात. हे लोक शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्याच्या कडेला तसेच फुटपाथ वर व्यवसाय करतात. यामुळे शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. शिवाय यांच्याकडे पथारी चा परवाना देखील नसतो. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते. त्यांचे पथारी सहित सर्व सामग्री उचलून नेली जाते. हे सोडवण्यासाठी त्यांच्याकडून दंड देखील वसूल केला जातो. त्यामुळे दिवाळी च्या सणाला या व्यावसायिकांवर अशा पद्धतीची कारवाई करू नये. अशी मागणी नगरसेविका अर्चना पाटील यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली होती. या व्यावसायिकांवर कडक कारवाई न करता त्यांना फक्त समज देऊन सोडून देण्यात यावे. असे ही पाटील यांनी सांगितले होते. याला स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि तसे आदेश अतिक्रमण विभागाला दिले.
यामुळे छोट्या व्यावसायिकांना दिवाळीच्या मुहूर्तावर दिलासा मिळाला आहे.