Mahesh Gholve : वर्षअखेपर्यंत मध्य रेल्वेतील सर्वच रेल्वे स्थानकाची पाहणी करणार  : केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य महेश घोळवे यांची माहिती 

Categories
Breaking News social महाराष्ट्र

 वर्षअखेपर्यंत मध्य रेल्वेतील सर्वच रेल्वे स्थानकाची पाहणी करणार

: केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य महेश घोळवे यांची माहिती

पुणे : वर्षअखेपर्यंत मध्य रेल्वेतील सोलापूर विभागातील सर्वच रेल्वे स्थानकाची पाहणी करणार आहे. अशी माहिती नवनिर्वाचित केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य महेश घोळवे यांनी दिली.

 

घोळवे यांनी सांगितले कि,  सोलापूर विभागातील सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर, अकोला,सातारा, सांगली या जिल्ह्यातील पूर्ण स्थानके आणि पुणे नाशिक व कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील काही भागातील स्थानकावर पाहणी करून आवश्यक असेल्याल्या गोष्टी सुधारणा करण्याकरिता प्रयत्न करणार आहे. या विभागात एकूण ९६ स्थानक आहेत.
स्थानकावरील प्रवाशांच्या दृष्टीने आवश्यक समस्या सोवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार त्यासाठी वेळोवेळी मध्ये रेल्वे चे जनरल मॅनेजर(GM) आणि विभागीय रेल्वे मॅनेजर(DRM) यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे घोळवे म्हणाले.

घोळवे पुढे म्हणाले, तुळजापूर नवीन मार्गिका सुरू करण्यासंदर्भात रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेणार आहे. निवड झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांचे स्वीय सहायक जगन गाडे यांनी निवडीबद्दल अभिनंदन करून दिल्लीला भेटण्याचं निमंत्रण दिले होते.

महेश घोळवे हे civil engineer असून अत्यंत कमी वयामध्ये केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य झालेले आहेत.