Global Teacher : Disale sir: ग्लोबल गुरुजींची फुलब्राईट स्कॉलरशिप धोक्यात? डिसले गुरुजींना व्यवस्थेचा अडसर!

Categories
Breaking News Education महाराष्ट्र

ग्लोबल गुरुजींची फुलब्राईट स्कॉलरशिप धोक्यात? डिसले गुरुजींना व्यवस्थेचा अडसर!

सोलापूर : जगात सर्वोत्तम शिक्षक ठरलेले रणजितसिंह डिसले सर यांच्यावर शिक्षण विभागाकडून सद्या आरोपांचा भडिमार सुरू आहे. त्यांना फुलब्राईट स्कॉलरशिप साठी परदेशात जायचे आहे. मात्र त्यांना ती रजा मिळताना दिसत नाही. त्यामुळे ही स्कॉलरशिप धोक्यात आली आहे. शिवाय त्यांच्यावर शाळेत येत नसल्याचे आरोप होत आहेत. यावर डिसले गुरुजींनी देखील व्यथा मांडत नोकरी सोडून देण्याचा मानस व्यक्त केला आहे. यामुळे मात्र महाराष्ट्र्रातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

: मी नोकरी का सोडू नये? डिसले गुरुजी

शिक्षण विभागाने गुरुजींना अशी उत्तरे दिल्यामुळे ते व्यथित झाले आहेत. आणि आपण सरकारी नोकरी का सोडू नये, असे त्यांना वाटते आहे. कारण मी सर्व गोष्टी रीतसर केलेल्या आहेत. गुरुजी म्हणतात कि, मला पैसे मिळाल्यापासून हे सर्व सुरु झाले आहे. मला शाळेतील काही जेवणाचे खर्च द्यायला सांगतात. राज्यपाल यांच्या भेटी वेळी मला हे सांगण्यात आले. त्यामुळे आता माझी सहनशक्ती सम्पेल तेव्हा मी हे क्षेत्र सोडणार आहे.
आपल्या कार्यकर्तृत्वाने ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले सर यांनी   जगात बार्शीचा डंका वाजविला तेव्हा अभिनंदनासाठी रांगा लागल्या होत्या. वर्तमानस्थितीतही ‘ सर, आम्ही तुमच्या सोबत आहोत ‘ असं म्हणण्यासाठीही सर्वांनी पुढं यायला हवं. साऱ्या जगानं सरांना डोक्यावर घेतलं असताना व्यवस्थेतील काही मंडळी अडथळे निर्माण करीत आहे. त्यांच्यामागे महाराष्ट्र उभा राहणार का? असा प्रश्न उभा राहत आहे.