Chhatrapati Sambhaji Maharaj : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे पुण्यात विस्तृत जागेत स्मारक व्हावे

Categories
Breaking News cultural पुणे

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे पुण्यात विस्तृत जागेत स्मारक व्हावे

: संतोष पाटील ( उपायुक्त, महसूल पुणे विभाग )

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या ३६५ व्या जन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघ पुणे शहराच्या वतीने  संतोष पाटील उपायुक्त महसुल विभाग पुणे , संभाजी कदम उपायुक्त पोलिस पुणे यांच्या हस्ते व मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य राजेंद्र कुंजीर, मराठा सेवा संघाचे पुणे शहर अध्यक्ष सचिन आडेकर यांच्या उपस्थितीत डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी बोलताना संतोष पाटील म्हणाले ” पुण्यामध्ये विस्तृत जागेत छत्रपती संभाजी राजांचे स्मारक व्हावे सद्या पुण्यात डेक्कन येथील अतिशय वर्दळीच्या ठिकाणी संभाजीराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे. तिथे सार्वजनिक कार्यक्रम करणेस अडचण निर्माण होत आहे. दिवसेंदिवस जयंती व बलिदानाचे दिवशी जनतेतून उस्फुर्त गर्दी होताना दिसत आहे. पुलाचे खालील जागेत जी शंभुसृष्टी उभारली आहे त्याला सुरक्षीतता नसुन पावसाळयात त्याची खराबी होण्याची शक्यता वाटते.स्वराज्यरक्षक संभाजीराजे यांचे बलिदान हे इतिहासातील मोठी प्रेरणा देणारे आहे. मराठा सेवा संघाने १४ मे रोजी जयंती चा उत्सव मोठ्या प्रमाणात सुरू केल्याने आज संपूर्ण जगामध्ये छत्रपती संभाजीराजे यांचे कर्तृत्व पोहचले.”

यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले ” छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचे रक्षण करताना कोणत्याही जाती-धर्मांमध्ये भेद केला नाही कायद्याचे राज्य जे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले तेच समानतेचे राज्य व कायद्याचे राज्य छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे चांगल्याप्रकारे सांभाळले. आज छत्रपतींचा हाच विचार समाजाला देशाला पुढे घेऊन जाणारा आहे.”

यावेळी संभाजी उर्फ आबा जगताप , अन्वरभाई शेख , सौ. भारती कुंजीर , बाळासाहेब प्रताप , पै. गणेश सपकाळ , राकेश भिलारे हे उपस्थित होते.