Dr Milind Kamble | डॉ. मिलिंद कांबळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

Categories
cultural Education पुणे

डॉ. मिलिंद कांबळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

शिक्षक दिनानिमित्त बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बारामती तालुक्यातील ३ मुख्याध्यापक ७ शिक्षक व २ शिक्षकेतर अशा १२ शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सन्मानपत्र,श्रीफळ, देशी वृक्षाचे रोप देऊन व फेटा बांधून सन्मान करण्यात आला. यामध्ये शिक्षकांकडून आत्तापर्यंत केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कामाचा अहवाल मागविण्यात आला होता त्यामध्ये जवळपास 500 शिक्षकांनी नामांकन केले होते त्यामधून फक्त बारा शिक्षका व शिक्षकेतर कर्मचारी यांना पुरस्कार देण्यात आले.

डॉ मिलिंद कांबळे यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्तम काम केले आहे व करीत आहे. संपूर्ण राज्यामध्ये हिंदी भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी ते व त्यांचे सहकारी नेहमीच कार्यरत आहेत. डॉ मिलिंद कांबळे यांचे दोन ग्रंथ प्रकाशित आहेत तसेच अनेक लेख, अनेक विद्यालय. महाविद्यालयात व्याख्याने , महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक पाठ्यपुस्तक निर्मिती मध्ये इयत्ता बारावी युवकभारती पाठ्यपुस्तकांमध्ये समन्वयक, दहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये संपादक, अकरावी व बारावी कृतीपत्रिका समन्वयक , राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून त्यांनी काम केले आहे व करीत आहेत. यापूर्वी त्यांना अनेक वेगवेगळे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बारामती तालुका राष्ट्रवादी भवन येथे डॉ मिलिंद कांबळे यांना सन्मानपत्र,श्रीफळ, देशी वृक्षाचे रोप देऊन व फेटा बांधून सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी मा.संपतराव गावडे साहेब उपस्थित होते.बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा.संभाजी नाना होळकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.बारामतीचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे असे उद्गार याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी मा.संपतराव गावडे यांनी काढले. तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मा.अजितदादा पवारसो व खासदार सुप्रियाताई सुळे या बारामतीच्या शैक्षणिक विकासासाठी नेहमीच आग्रही असतात त्यांना अभिप्रेत असलेला बारामतीचा विकास करण्यासाठी आपण सातत्याने काम करणारे शिक्षक असून यापुढेही शिक्षकांनी विविध उपक्रम राबवून बारामतीचा शैक्षणिक विकास साधावा असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष इम्तियाज भाई शिकीलकर यांनी मनोगत व्यक्त केले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरत नाना खैरे, बारामती तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सिकंदर शेख सर, रयत शिक्षण संस्थेचे समन्वयक प्राचार्य बंडू पवार सर, रयत बँकेचे माजी चेअरमन अर्जुन मलगुंडे सर, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष आर.ए.धायगुडे सर, नाकुरे सर ,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिक्षक सेलचे मान्यवर पदाधिकारी,पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कुटुंबीय सहकारी शिक्षक,इत्यादी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी भवनचे सचिव नितीन काकडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनवान काका वदक यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर शिक्षक सेलचे अध्यक्ष अविनाश सावंत सर यांनी,प्रास्ताविक तालुका शिक्षक सेलचे अध्यक्ष नागनाथ ठेंगल सर यांनी तर आभार प्रदर्शन ढोबळे सर यांनी केले. राष्ट्रवादी भवन कसबा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.