Traffic at Baner : Sameer Chandere : बाणेर येथील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार : युवा नेते समीर चांदेरे यांनी व्यक्त केला विश्वास 

Categories
PMC Political पुणे
Spread the love

बाणेर येथील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार

युवा नेते समीर चांदेरे यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे : बाणेर – बालेवाडी या परिसराचा नियोजनबद्ध विकास झाल्यामुळे या परिसरात मोठ्या संख्येने नागरिक, उद्योजक, व्यावसायिक वास्तव्यास आहेत. अनेक नागरिक व्यवसाय निमित्त, नोकरी निमित्त ये – जा करतात त्यामुळे वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रहदारी मोठ्याप्रमाणात वाढत आहे. त्यामुळेच बाणेर भागात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत वाढ होताना दिसत आहे. यावर युवा नेते समीर चांदेरे यांनी पोलिसांना काही उपाय सुचवले आहेत. त्यामुळे बाणेर मधील वाहतूक कोंडी लवकर सुटेल, असा विश्वास चांदेरे यांनी व्यक्त केला.

बाणेर येथील पॅनकार्ड क्लब रोड आणि श्रॉफ रोड ह्या रोड वर दुहेरी वाहतूक असल्यामुळे त्याचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे . हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी या दोन्ही रस्त्यांवर एकेरी वाहतूक केली तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो यासंदर्भात नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी चतृशृंगी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन जाधव आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम देवकर यांच्यासोबत चर्चा करून यावर तातडीने मार्ग काढावेत अशी मागणी केल्यामुळे युवा नेते समीर चांदेरे , विशाल विधाते , अमोल भोरे , सिद्धराम कलशेट्टी आणि पोलीस अधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून त्यावर सविस्तर चर्चा केली , याबाबत बारकाईने पाहणी करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी पोलीस अधिकारी यांनी दिले .
बाणेरच्या मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी श्रॉफ रोडचा तर मुख्य रस्त्याकडून येण्यासाठी पॅन कार्ड क्लब रोडचा एकेरी वापर करण्यास यावेळी पोलिस अधिकाऱ्यांना सुचवले , दोन्ही रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरु झाल्यास बाणेरची वाहतुक कोंडीतून सुटका होईल आणि नागरिकांचाही त्रास वाचेल, असा विश्वास यावेळी युवा नेते समीर चांदेरे यांनी व्यक्त केला .

Leave a Reply