प्रशासनाचा विरोध करत स्थायी समिती तहकूब : जास्तीत जास्त कामे लावण्याची सदस्यांची मागणी : प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप

Categories
PMC पुणे
Spread the love

प्रशासनाचा विरोध करत स्थायी समिती तहकूब

: जास्तीत जास्त कामे लावण्याची सदस्यांची मागणी

: प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप

पुणे. महापालिकेत नगरसेवकांना सह यादीतील कामे करण्यासाठी 30% रक्कम उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र आगामी महापालिका निवडणूक पाहता 100% बजट दिले जावे, अशी मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली. मात्र प्रशासन सहकार्य करत नाही असा आरोप लावत स्थायी समिती अध्यक्ष सहित सर्व पक्षीय सदस्यांनी सभा तहकुबीचा ठराव दिला आणि मंगळवार ची समितीची सभा तहकूब करण्यात आली. समितीच्या या भूमिकेमुळे प्रशासन विरुद्ध स्थायी समिती असा संघर्ष उभा राहिला आहे.

: सद्यस्थितीत 30% कामे करण्याला मंजुरी

गेल्या दिड वर्षांपासून कोरोनाने थैमान घातल्यामुळे महापालिकेच्या विकास कामांवर परिणाम झाला आहे. महापालिकेचे बजट देखील कोलमडले आहे. मात्र चालू आर्थिक वर्षात परिस्थिती निवळली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून नागरसेवकांना काम करण्यासाठी 30% निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार कामे सुरु देखील झाली आहेत. मात्र 6 महिन्यावर येऊन ठेपलेली निवडणूक पाहता आता 100% बजट उपलब्ध मागणी नगरसेवक करत आहेत. मात्र याला प्रशासनाचा प्रतिसाद भेटताना दिसून येत नाही. याचे पडसाद मंगळवारच्या स्थायी समितीत पडलेले दिसून आले.

: वस्ती पातळीवरील कामे होणे गरजेचे

मंगळवारची स्थायी समिती सुरु झाल्याबरोबर सर्वपक्षीय सदस्यांनी मागणी केली कि, आता नगरसेवकांना विकास कामे करण्यासाठी 100% निधी दिला जावा. सदस्यांनी मागणी केली कि वस्ती पातळीवरील सर्व कामे होणे गरजेचे आहे.  सदस्यांसोबत स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी देखील अशीच भूमिका मांडली. त्यांनी सांगितले कि, महापालिकेला आतापर्यंत 3 हजार कोटी उत्पन्न मिळाले आहे. आगामी काळात अजून उत्पन्न मिळेल. त्यामुळे आता निधी देण्यास हरकत नसावी. त्यावर प्रशासनाकडून अशी भूमिका घेतली गेली की, सदस्यांनी सांगावे कि कुठले मोठे प्रोजेक्ट करायचे नाहीत. मोठ्या प्रकल्पांचा निधी काढून दुसऱ्या विकास कामांना देण्यात येईल. मात्र यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यावर मग सदस्यांनी प्रशासनाचा विरोध करत तहकुबीचा ठराव मांडला. समितीच्या या भूमिकेमुळे प्रशासन विरुद्ध स्थायी समिती असा संघर्ष उभा राहिला आहे.
गेल्या 5 महिन्यात 2800 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. जे मागील वर्षाच्या तुलनेत जास्त आहे. तरीही प्रशासन त्यांच्याच भूमिकेवर ठाम आहे. वित्तीय समिती बरखास्त होत नाही. विकास कामांना प्राधान्य द्या. कारण लोकप्रतिनिधींची कामे होणे गरजेचे आहे. आम्ही वारंवार हे सांगत आलो आहेत. मात्र आमच्या आदेशाला प्रशासनाने जुमानले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेचा आम्ही निषेध करून सभा तहकूब केली.

         हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती.

Leave a Reply